वेक अप सिड...सायोनारा, इत्सुका...

"वेक अप सिड"

एखादी जागा..
"सिड, तुझ्या ह्या शहरात मी नविन आहे.. ह्या वेळेस जर तु मला फक्‍त एक जागा दाखवशील, तर ती कोणती?"
-"ह्या वेळी? इतक्या ऊशिरा आणि ती सुद्धा एकच जागा?"
"हो.. एकमेव जागा.. आणि ह्या वेळीच!"
-"ह्म्म्म.. आहे एक जागा..."
....
"तुला माहितीये.. मुंबईत जर अशी एक जागा असेल जी मला सर्वाधिक आवडते, तर ती हीच जागा.. इथे मी किती तरी वेळ असाच समुद्राकडे तासनतास बघत बसु शकतो.. गंमत सांगु? खरं म्हणजे तु इथे पावसात येऊन बघायला पाहिजे.. पावसात ही जागा काय विलक्षण सुंदर दिसते, माहितीये?"

एखादी मैत्री...
"तुला राग नाही येत - तुझा मित्र बदलला आहे, तुला वेळ देत नाही - हे पाहुन?"
-"येतो ना.. खुप, खुप राग येतो.. म्हणजे हा माझाच मित्र आहे, आणि आज त्याला अजिबात वेळ नाहिये माझ्या करता..
किती बदलला आहे तो.. नविन मित्र जोडले आहेत.. पण मी त्याच्या करता खूष आहे.. नोकरी सुरु केली आहे त्यानी.. त्याला जे मना पासुन आवडतं - photography - ते करत आहे तो.. अजुन काय पाहिजे?"

एखादं नातं...आधी...
"हे काय?? तु माझ्या शिवाय जेवुन पण घेतलंस?"
-"हो! म्हणजे काय? तु काय नवरा आहेस का माझा???"

एखादं नातं.. नंतर...
"अचानक एक दिवस माझ्या घरी यायचं.. रहायला लागायचं.. आणि मग पुन्हा अचानक एक दिवस सांगायचं की मी चाललो हे घर सोडुन.. किती immature आहेस तु!!"
-"हो.. मी सोडुन चाललो आहे.. आणि मी माझ्या घरीच चाललो आहे ना?.. तुला सांगु.. मी काही केलं तरी तुला ते कमीच वाटतं.. थकलो आहे मी सतत सारखं स्वत:ला तुझ्या नजरेत prove करता-करता.. घर आवरलं.. स्वंयपाक केला.. तुझे कपडे आवरुन ठेवले.. पण नाही, मी काही केलं, तरी मी तुझ्या करता नेहमी immature आणि लहानच आहे.. हो आहे मी लहान!"

एखादा पाऊस...
एखाद्या मुली बरोबर एकाच छता खाली एकत्र राहणं.. किती वेगळं असतं.. वेळ, विचार, emotions, feelings.. सगळं, सगळं एकमेकांबरोबर share करायचं.. तुझं ते घर सोडुन मी माझ्या घरी परतलो.. समोर तुझा तो पांढरा लखनवी कुर्ता.. झोपताना घालतेस तो कुर्ता तु.. आणि मी तो स्वच्छ धुवुन, इस्त्री करुन ठेवला, तर किती रागावलीस.. तो कुर्ता मी अंगावर चढवला.. आणि रात्रभर तुझ्याच आठवणींत खिडकीत बसलेलो..
सकाळी तुझं ते आर्टिकल वाचलं..
मुंबई मधे पाऊस पडु लागला.. ह्या पावसात तु मला एकाच जागी भेटशील, मला खात्री होती..
एवढं सगळं लिहिलस तु.. मला एका शब्दानी पण नाही सांगितलस..

आणि एखादं प्रेम...
मैं तो दीवानी होके.. यह भी ना जानी..
पूरी कहानी हैं या.. किसे हैं पता...


***************************************************
"सायोनारा, इत्सुका"
(अल्विदा, एक दिवस)

एरलाईन कंपनीत नोकरी करणारा तरुण युताका Bangkokला ट्रान्स्फर होतो. ३ महिन्यांत त्याचं मिचिकोशी लग्न होणार असतं. मिचिको एरलाईन कंपनीच्या मालाकाची नातेवाईक, त्यामुळे जरी तिच्यावर त्याचं प्रेम नसलं तरी त्याला आशा असते की त्या लग्नामुळे एक दिवस तो ती कंपनी चालवेल. (हे पाहताना त्रिशुल मधला संजीव कुमार आठवलेला - पण similarity इथेच संपते).

Bangkok मधे युताकाची भेट टौकोशी एका बार मधे होते. टौको वयानी त्याच्या पेक्षा मोठी, आणि कुठल्या तरी एका श्रीमंत माणसाची ex-wife. तिला सोडुन तिचा श्रीमंत नवरा एका तरुण मुली बरोबर जातो, म्हणुन ती युताका सारख्या तरुण मुलांबरोबर संबंध ठेवायला लागते - तिच्या आयुष्यात तरुण बदलतात, कॉन्स्टंट राहते ती तिची दारु.

सुरुवातीचं दोघांतलं शारिरीक नातं कधी प्रेमात बदलतं.. दोघांनाही उमजत नाही.. physical attraction मधुन ते एकमेकांशी इतके emotionally attached होतात.. की युताका आयुष्याच्या रस्त्यात अशा एका fork वर पोचतो, जेव्हा त्याला दोन पैकी एकाच रस्त्यावर पुढे जाता येतं..

२५ वर्षांनी तो Bangkokला परत येतो.. तेव्हा त्याला पुन्हा टौको भेटते.. पण ती भेट क्षणिक राहते..

सिनेमातली एक कविता मनातुन जाता जात नाही..

To live is to prepare for goodbye; 生命中总要准备好道别

For loneliness is a friend who will not betray 孤独是不可背弃的伙伴

Shiver not into pouring love instead buy an umbrella; 如果无法沐浴爱的暴雨,那就买好一把伞吧


Believe not in happiness, even in the passions of love 快乐不可信,即使你对爱充满激情

Confess not your love even if you would die for it; 深藏起你对至死不渝爱的怅悔吧


For love is like a season; 爱情,就像季节一般

It comes and goes to decorate life’s boredom; 它来,它去,只是为了点缀沉闷的一生


The moment you call it Love, 当你确认爱情到来的一刻

it melts away, like an ice sculpture… 它就开始了融化,像一座美丽的冰雕


Goodbye, someday 道别吧,这段日子

Happiness lasts not forever, as despair lasts not forever. 快乐不会永远,就如失落不会永远一样


Somedays, there is goodbye; 有一天,我们道别

Somedays, there is Hello 有一天,我们重逢


At death, 到死的一刻,

some look back on being loved; 有人会去回顾曾经的被爱

While some look back on having loved… 有人会去回顾自己的所爱

I shall look back on having loved… 我,会去(回顾自己的所)爱



****************************************************
फ्लाईट मधे पाहिलेले २ सिनेमे.. एक हिंदी.. जो आधी पाहिला होता, तरी पण पुन्हा मुद्दामुन अजुन २ वेळा पाहिला.. आणि एक जपानी.. जो केवळ त्या कवितेच्या शेवटच्या ४ ओळींकरता खरं म्हणजे आवडला..
I shall look back on having loved...

4 comments:

rayshma said...

as always, your post transforms me to a different zone... :)

Vibha said...

kavita chhant vatli..vachtana Illusions athavla

"a farewell is necessary before you can meet again and meeting again

Jaswandi said...

2010... phakt 3 posts :(

Yogini said...

hey hi..

lihit ka nahiyes tu??

mi jam wat baghtey tuza posts chi..
plz plz lihi na kahitari..