किल्ले रायगड

शालिवाहन शके १९३१.
ज्येष्ठ महिन्यातल्या अमावास्येचा आदला दिवस.
पहाटे ५.३० ची अतिशय शांत वेळ.
निळ्याभोर शाईमध्ये रंगलेल्या गर्द आकाशाच्या कपाळावर एक सुबक छोटी नक्षीदार श्वेत चंद्रकोर.
क्षितिजावर सह्याद्रीच्या कुशीमधे झोपलेल्या कापसांच्या असंख्य ढगांमधे आकाशातली ती शाई घुलुन जात होती.

हिंदवी स्वराज्याला जशी जाग येत होती, तसा सिंहासनावर आरुढ झालेला शिवबा त्याला रोज पहाटे इमाने-इतबारे मुजरा करणाऱ्या पूर्वेच्या क्षितिजावरच्या सूर्याशी नजर भिडवत होता. जणु त्याच शिवबाच्या डोळ्यांचे तेज सूर्यातुन गडावर आणि गडाच्या आजु-बाजुच्या मुलखात झळकत होते.

पहाटे पहाटे एके काळच्या त्या गजबजलेल्या भव्य दगडी बाजार पेठेतुन चालताना आदली दुपार आठवली. माथ्यावर तळपणारा सूर्य, पाहता-पाहता काळ्या ढगांच्या आड गेलेला. बाजार पेठेतच्या मधल्या गल्लीतुन संगीताच्या झोपडीचा रस्ता पकडलेला. जेवणाची व्यवस्था तिच्या घरी होती. शेणानी सारवलेलं तिच्या घराचं आंगण, त्या आंगणातल्या दगडावर आळसावलेला तिचा कुत्रा. आंगणात इकडुन तिकडे पळणाऱ्या २-३ कोंबड्या आणि एक दिमाखदार कोंबडा. झोपडीच्या आत संगीता आणि तिचा नवरा स्वयंपाक करत होते, म्हणुन आम्ही बाहेर आंगणात गप्पा मारत बसलो. वारा जोरात वाहु लागला, तसं अंगणात पसरलेली प्लास्टिकची शीट उडु लागली. पावसानी जोर धरला, तसे आम्ही त्या धनगरांच्या झोपडीत गेलो.

आत मध्ये वीज नाही. चूलीवर एका कोपऱ्यात स्वयंपाक चालु होता. धुराला आणि अंधाराला डोळे adjust झाले, तेव्हा ते लोकं किती साध्या जगात रहात होते, ते जाणवलं. तांदळाच़्या २ भाकऱ्या, पिठलं आणि कांदा असे जेवाणाचे ताट तिच्या लहान मुलीनी हातात दिले. पाणी मागीतले, तेव्हा एका क्रेट मधुन बिसलेरीची बाटली दिली. बाहेर धो धो पडणारा पाऊस आणि हातात गरम गरम पिठलं-भाकरी - सुख म्हणतात ते हेच!

जेवणा नंतर पाऊस थांबला आणि बाहेर पडलेलो, ते धुक्यातच. समोर ३-४ फुटांपुढे काहीच दिसत नव्हते.

*****
exactly एक वर्षापुर्वी जून २०-२१ ला रायगडला गेलेलो, तेव्हा हे असं अपुरंच लिहिलेलं..
आता आठवुन बघत आहे, की पुढे काय लिहिणार होतो..
काय, काय धमाल केली होती.. संध्याकाळी सूर्यास्तामागे धावलो होतो.. किल्ल्यावर रात्री राहुन मित्रांबरोबर मनसोक्‍त गप्पा मारल्या होत्या.. रात्री खूप उशिरा किल्ल्यावर एक छोटी चक्कर मारली होती.. पहाटे लवकर उठुन - रोपवे जवळच्या राणी महालापासुन थेट महराजांच्या समाधी पर्यंत असा अख्खा किल्ला फिरलो होतो..

टकमक टोकावर चुकलेला काळजाचा ठोका..
रात्री आजु-बाजुच्या डोंगर-दऱ्यांमधे विसावलेले ढग..
नगारखान्यातुन प्रवेश केल्यावर समोरचा राज दरबार आणि महराजांची सिंहासनावर आरुढ मुर्ती..
खाली गाडी लावुन, ३ तास गडाच्या १४५० पायऱ्या चढल्यावर पाहिलेला महा दरवाजा..
पुण्याहुन सकाळी निघुन - मुळशी, ताम्हिणी घाट, NH-१७ - अशी ४ तासाची अप्रतिम drive..

सगळंच आज आठवतंय असं नाही.. त्या वेळेला मनात काय विचार आले होते..
त्या पावसाळी धुक्याच्या आड सगळंच थोडंसं विरळुन जातं..

"Life is always a battle between memory and forgetfulness.What we care to remember and what we prefer to forget is often a measure of who and what we are."
पेपर मधे ही ओळ वाचली.. आणि माझं मलाच हसु आलं..
काही आठवणी फक्‍त स्मरणातच राहतात.. दिवस सरले की त्यांना शब्द देणं जमत नाही.. आणि कदाचित प्रयत्न देखिल करु नये.. it is neither fair to the words, nor to the memories..

8 comments:

Vidya Bhutkar said...

it is neither fair to the words, nor to the memories.. :-) Perfect !!
-Vidya.

rayshma said...

very well said... :)

Sneha Kulkarni said...

How did I miss it? Very well written.
:) Like Vidya said, that line is perfect.

Sneha Kulkarni said...
This comment has been removed by the author.
Rohini said...

I agree too...the last line..brought a smile on the lips :) All of us have such memories...very well written ..

Rohini

Monsieur K said...

@Vidya, Rayshma, Sneha & Rohini,
thanks for your comments :)

~Ketan

Dhananjay said...

I am wondering why did you miss the snacks at the restaurant on banks of Savitri river while returning back.
True the food was not much to care about the location is straight out of books or movies ;)
Must say well written, now the Q is are you willing to put in "10,000" hours?

Anonymous said...

Ketan,
Came across your blog through Orkut. Just awesome! There are some unexplored gems in the Western Ghats. A new career in writing reckons?
Pradeep Talekar