विहिर.. The Bucket List.. L'Étranger..

आज 'विहिर' पाहिला. आजच 'The Bucket List' सुद्धा पाहिला.
आणि आज पुन्हा कामुसच्या 'L'Étranger' ची आठवण पण झाली.

"नचा दादा पळुन जाणार आहे."
कानात खुसफुसलेल्या शब्दांनी सम्या अतोनात अस्वस्थ होतो. दाण-दाण पाय आपटत खेळातुन उठुन निघुन जातो.
एक वेगळंच जिव्हाळ्याचं नातं असतं दोघा मावस भावांमधे.
नचा दादाला पडणारे प्रश्न सम्याच्या डोक्यावरुन जातात, तरी पण त्याच्याशी मारलेल्या गप्पांचा आनंद त्याला नेहमीच हवा-हवासा असतो.
मग तो संवाद पत्रांद्वारे असो, किंवा सुट्‍टीत आजोळी प्रत्यक्ष भेटल्यावर असो.

"माणुस अदृष्य कसा होऊ शकतो?"
"आपण जे शोधत असतो, ते अंधारातच सापडेल - ते उजेडात समोर असेल, तरी दिसणार नाही..."
"मी घर सोडुन जाणार आहे.. तुम्हा सगळ्यांना सोडुन.."
नचिकेत ज्या अदृष्यपणाच्या शोधात असतो, त्यानी समीर अस्वस्थ होतो.

आणि एक दिवस अचानक, नचा दादा जेव्हा खरंच अदृष्य होतो - नेहमी करता - तेव्हा तर त्याचं सारं जगच कोसळतं.
पत्रांद्वारे होणारा एकमेकांचा संवाद मग समीरच्या डायरीतुन एक तर्फीच होतो.

दोन १४-१५ वर्षांच्या मुलांचं ते एक हळवं नातं.
त्या नात्यात देवाण-घेवाण असतेच.
भावनांच्या वजनाच्या काट्यावर मोजली, तर ही देवाण-घेवाण नेहमीच असंतुलित (imbalanced) असते का?
नचिकेत स्वत:च्या मनाला पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात असतो. आई-वडिल, बहिण, भाऊ, नातेवाईक.. ह्या सगळ्या कौटुंबिक बेड्यांतुन तो मुक्‍त होऊ पाहतो..

आणि समीर? वयानी तो नचिकेत पेक्षा १-२ वर्षांनीच लहान. नचिकेत म्हणजे त्याचं दैवत म्हट्लं तरी चालेल.
त्याचं ते दैवतच अदृष्य होतं. वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यु म्हणजे नेमकं काय.. हे त्याच्या मनाला कळत नाही.. इतर लोकांचं आयुष्य पुढे चालु राहतं, पण तो अंधारातच त्याच्या दैवताला शोधु लागतो..
उजेडात जेव्हा तो डोळे उघडतो, तेव्हा त्याचा नचा दादा समोरच त्याच्याकडे शांतपणे हसत, विहिरीच्या कडेवर बसलेला दिसतो..

सिनेमा संपुन २ तास देखिल झालेले नसतात.. बऱ्याच दिवसांपासुन बघायचा राहिलेला 'The Bucket List' मी मधुनच पहायला सुरु करतो..
इजिप्टच्या पिरामिडवर दोन कान्सरग्रस्त म्हातारे, कार्टर आणि एडवर्ड, बसलेले असतात.
कार्टर एडवर्डला विचारतो,
"You know, the ancient Egyptians had a beautiful belief about death. When their souls got to the entrance to heaven, the guards asked two questions. Their answers determined whether they were able to enter or not.

‘Have you found joy in your life?’

'Has your life brought joy to others?’
"

खरंच.. आपण आयुष्यभर फक्‍त स्वत: करता सुख शोधत असतो का फक्‍त दुसऱ्यांना सुख देत असतो? आयुष्यातला हा देवाण-घेवाणीचा काटा देखिल असंतुलीतच राहतो का?

आणि मग कामुसच्या L'Étranger (लेत्रांजर) ची आठवण झाली.
पुस्तकाची सुरुवातच -
"Aujourd'hui, maman est morte. Ou peut-être hier, je ne sais pas. J'ai reçu un télégramme de l'asile: Mère décédée. Enterrement demain. Sentiments distingués. Cela ne veut rien dire. C'était peut-être hier"

-"आज आई गेली. किंवा कदाचित काल गेली, मला नक्की माहित नाही. मला एक टेलिग्राम मिळाला: आई गेली. अंत्यविधी उद्या. दिलगिर आहोत. त्यावरुन काहीच सांगता येत नाही. कदाचित कालच गेली असावी."

पुस्तकाचं मुख्य पात्र Mersault (मर्सो) हाच गोष्टीचा सुत्रधार असतो.
आईचं शेवटचं दर्शन घ्यायच्या ऐवजी Mersault तिच्या कॉफिन शेजारी बसुन एक सिगरेट ओढतो, आणि एक कॉफी पितो.
इतका विरक्‍त आणि भावनाशुन्य असतो की विश्वास ठेवता येत नाही.
म्हणुनच पुस्तकाचं नाव 'L'Étranger म्हणजे 'The Stranger' किंवा 'The Outsider' आहे.

गोष्टी मधे पुढे Mersault एका अरब माणसचा खून करतो.
कोर्टात केस चालते.
केस मधे त्याच्या विरुद्ध सगळ्यात ठळक मुद्दा म्हणजे त्याची स्वत:ची आई गेली तेव्हा त्याच्या डोळ्यांतुन एक अश्रु सुद्धा आला नाही, उलट त्यानी तिथेच बसुन सिगरेट आणि कॉफी घेतली - किती धक्कादायक वागणुक आहे त्याची! असा शेरा मारला जातो..

फाशीची शिक्षा मिळालेला Mersault शेवटी म्हणतो,
"...for the first time, in that night alive with signs and stars, I opened myself up to the gentle indifference of the world. Finding it so much like myself - so like a brother, really - I felt that I had been happy and that I was happy again. For everything to be consummated, for me to feel less alone, I had only to wish that there be a large crowd of spectators the day of my execution and that they greet me with cries of hate."

gentle indifference of the world..
जगाला काहीच फरक कधीच पडत नाही..
नचिकेत, समीर, कार्टर, एडवर्ड किंवा Mersault..
प्रत्येक जण मनाला पडलेल्या प्रश्नांमधे आणि विचारांमधे असेच अदृष्य होऊन जातात..
उजेडात शोधा त्यांना.. अंधारात नाही.. तुम्हाला देखिल दिसतील ते..

12 comments:

Sneha Kulkarni said...

Masta lihila aahes! Vihir aani bucketlist donhihi aavadate. ani donhi mrutyushi related asunhi positive note var sampnare.

Raj said...

छान पोस्ट. एकेकाळी अस्तित्ववादाचा मोठ्ठा फ्यान होतो आता आवड थोडी बदलली आहे. आउटसायडरचा सर्वात मोठा इरोधाभास म्हणजे पहिल्या भागात नायक स्वतंत्र असूनही त्याला आपली ओळख पटलेली नसते. शेवटी जेलमध्ये मृत्यू समोर दिसत असताना त्याला साक्षात्कार होतो की तो स्वतंत्र आहे.

Binary Bandya said...

फार छान लिहिले आहेस ...

स्नेहल said...

hmmm.... Vihir baddal aikalay pan baghitala nahi ajun. Ata baghawasa watatoy.

Devan-ghevani baddal boltoyas.... mag jaraa jastit jast blog wachayala det ja na amhala!! :)

yog said...

mast linking keliye ...
khup aavadal..

Vibha said...

Bucket list ani Vihir donhi hi watch- list var ahet ,ajun pahayla jamala nahi..

donhi gosthi chi summery awadli ..interesting :)

ani shevach vaky chhan ahe

Samved said...

Interesting! good attempt to link various threads

a Sane man said...

Interesting...have not read/watched any of these...but still found an interesting read.

Vidya Bhutkar said...

Me Vihir pahila nahiye na ajun kuthla. Gele 7 mahine Indiat aate pan aalyapasun first time blog vachla aani ek olkhicha feeling aala.:-) Your blogs...they are as always...good and emotional, sensitive,nicely written. :-))

-Vidya.

Dhananjay said...

Why should one watch such depressing movies?
Ketya go watch Housefull instead ;)
Mhanje yewde prashna padnar nahit

Indli said...

Your blog is cool. To gain more visitors to your blog submit your posts at hi.indli.com

Monsieur K said...

Hi guys,
thanks for your comments :)
~Ketan