
२४ वर्षांचा क्रिस.. अलास्काच्या जंगलात एका abandoned बस मध्ये स्वत:चे शेवटचे क्षण मोजत होता.. आयुष्यात काही तरी वेगळं हवं म्हणुन घर सोडलेलं त्यानी.. कॉलेज मध्ये अतिशय हुषार आणि खेळात प्राविण्य मिळवलेलं.. पण सगळं सोडुन दिलं.. शिक्षणाकरता घरुन मिळलेले $२४०००, देणगी म्हणुन देऊन टाकले.. आणि स्वत:च्याच एका प्रवासावर निघाला..
आरिज़ोना, कोलोरॅडो, कॅलिफोर्निया.. अशा विविध राज्यातुन तो त्याला हव्या त्या अलास्का पर्यंत पोचला.. रस्त्यामध्ये मिळेल ते काम... भेटतील ती लोकं.. येतील ते प्रसंग... ह्या सगळ्यांना सामोरं गेला..
फ्रान्ज नावाचा म्हातारा भेटलेला.. त्यानी क्रिसला विचारलं.. की तु हुषार दिसतोस.. आणि वयानी २३-२४... ह्या वयात तु अजुन शिकलं पाहिजे.. नोकरी-करियर केलं पाहिजेस.. का असं स्वत:चं आयुष्य वाया घालवतोयस.. त्यावर क्रिसचं उत्तर:
"Mr. Franz I think careers are a 20th century invention and I don't want one."
सगळ्या जगापासुन दूर.. लोकांपासुन लांब.. उंच डोंगरावरुन लांब वसलेलं एखादं शहर किती सुंदर दिसतं हे लांबुनच पहायचं.. जंगलात एकटं राहणं.. स्वत: जवळ दिशा दाखवणारा कंपास किंवा त्या प्रदेशाचा एखादा नक्षा देखिल नाही.. शिकार करुन स्वत:चं पोट भरायचं.. शिकार जमली नाही की रानात उगणारी झाडं, वनस्पती खायची..स्वत:ला आवडणारी काही पुस्तकं वाचायची.. डायरी मधे स्वत:चे विचार लिहायचे... एकटंच स्वत:शी संभाषण करायचं.. माणसांशी संपर्क सोडुन निसर्गाशी जवळीक केलेली.. का करावंसं वाटलं असेल..
जगातल्या materialism, नाते-संबंध, रूढी-परंपरा ह्या सगळ्यांचा इतका वीट आला होता त्याला.. आणि जंगलात एकटा राहुन काय शोधत होता... जे पाहिजे होतं, ते मिळालं का.. का शेवटी स्वत:ला फार एकाकी वाटलं म्हणुनच त्याचे ते शब्द:
"Happiness only real when shared."
शेवटची नोंद म्हणुन डायरी मध्ये त्यानी "Wise Men In Their Bad Hours" नावाच्या एका कवितेच्या काही ओळी टिपल्या:
- Death's a fierce meadowlark: but to die having made
- Something more equal to centuries
- Than muscle and bone, is mostly to shed weakness.
- The mountains are dead stone, the people
- Admire or hate their stature, their insolent quietness,
- The mountains are not softened or troubled
- And a few dead men's thoughts have the same temper.
बस मध्ये स्लिपिंग बॅग मध्ये त्याचा मृतदेह २ आठवड्यांनंतर मिळाला...
सिनेमाचं पहिलं टायटल कार्ड:
There is a pleasure in the pathless woods,
There is a rapture on the lonely shore,
There is society, where none intrudes,
By the deep sea, and music in its roar;
I love not man the less, but Nature more...
- Lord Byron
माणसापेक्षा सृष्टीच काही जणांना जास्ती आवडते...
~ "Into The Wild", a 2007 movie based on the real life character of Christopher Johnson Mccandless, directed by Sean Penn - this year's Oscar winner for Best Actor.
References:
http://www.imdb.com/title/tt0758758/
http://en.wikipedia.org/wiki/Christopher_McCandless
The picture is a self-portrait found undeveloped in his camera at the time of his death.
Christopher Johnson Mccandless
Born: February 12, 1968
Died: August 18, 1992 (aged 24)