सकाळची ६.०२ स्लो पकडलेली दादर हून CSTकरता.. माझ्या छोट्याला घेऊन चढलेलो.. ऑफिसला जायच्या आधी, सुट्टीचा दिवस म्हणुन, त्याला त्याच्या आजी-आजोबांकडे सोडायचं होतं मला... तु चढलास आमच्या बरोबर तसंच तुझ्यासारखे आणखिन काही जणं पण चढलेले लोकल मधे.. कोणी शॉर्ट्स मधे होतं, कोणी ट्रॅक पॅन्ट मधे होतं.. माझ्या पोरानी तुला पाहिलं तेव्हा हसलास त्याच्याकडे.. मला वाटलं ओळखीचा आहेस की काय..
जागा असुन सुद्धा तु दारात उभा होतास.. सकाळचा गार वारा खात.. हाता मधे तुझा धावायचा नंबर पकडुन.. मधेच खिशातुन पिना काढल्यास आणि मग टी-शर्टला तो कागद लावलास.. तु पण मला वरुन खाल पर्यंत पाहिलेलंस की.. माझ्या पांढऱ्या, स्वच्छ शर्ट आणि ग्रे पॅन्ट मधे मी तुम्हा सगळ्यांपेक्षा थोडा वेगळाच होतो...
तुमच्यात काय बघत होतो मी.. मला कळत नव्हता तुम्ही सगळे.. रविवारी सकाळी पळायला निघाला होता.. पळण्यानी काय मिळणार होतं तुम्हाला.. रोज ह्या शहरात काही कमी पळतो का आपण.. तुमच्याबद्दल कुतुहल होतं माझ्या मनात.. माझ्या पोराला पकडुन मी दारात तुझ्या समोर उभा होतो.. कुठल्यातरी एका विलक्षण अपेक्षा भरलेल्या तुझ्या त्या नज़रेतच कदाचित माझ्या कुतुहलाचं उत्तर शोधत मी लोकल मधुन उतरलेलो.. तुझी अपेक्षा पूर्ण झाली की नाही.. किंवा समाधान झालं की नाही त्या दिवशी.. माहित नाही..
*********************************************
तुझ्या सारखे हजारो लोकं आज ह्या आजाद मैदानावर आले आहेत.. तुमचं ठीक आहे.. येता काय, पळता काय, आणि घरी जाता काय.. नाही आलं, तर उत्तम.. पण आमची ड्युटी आहे..आम्हाला यावंच लागतं.. आणि सध्याच्या दिवसात तर आणखिन जास्ती जबाबदारी.. शेवटी तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आमची पोलिसांचीच..
गर्दीमुळे उशीर होत आहे, म्हणुन उगीच टेन्शन घेतलं होतंस.. ६.४५ वाजता शर्यत सुरु होणार, तर जरा लवकर यायचं ना.. पण तु आळशी.. तुला कसं जमणार ते.. त्या मोठ्या रांगेतुन कसा-बसा गेटवर पोचलास, तेव्हा तुझी झडती घेतली मी.. आणि पुढे पाठवलं.. जा पळ.. सोडलं मी तुला..
*********************************************
पळायला सुरु केलंस तु... तुझ्या बरोबरीनेच धावत होतो ना रे मी..
कोण होतो मी.. वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी तुझी सोबत देत होतो मी.. तुला एकटं नको वाटायला.. म्हणुन माझं रुप बदलत होतो.. आणि सतत तुझ्या शेजारी किंवा आजुबाजुला राहिलो..
ओबेरॉय जवळ मी ते साठी उलटलेले सावकाश पळणारे तरुण आजोबा झालो होतो..
तर विल्सन कॉलेज जवळ मी ती इटुकली-पिटुकली माझ्या बाबांबरोबर प्रचंड उत्साहानी पळणारी मुलगी होते..
मधेच मी पळणं सोडुन रेडियो जॉकी झालेले.. आणि तुला माझ्या रेडियो स्टेशन वरुन प्रोत्साहन देत होते..
चर्नी चौपाटी जवळ मी हातात तिरंगा घेऊन तुझ्या शेजारी पळत होते.. माझी पांढरी वेणी माझ्या लयबद्ध पळण्यावर हवेत उडत होती, तेव्हा तु पण बाकीच्यांसारखं मला टाळ्या वाजवुन समर्थन दिलंस..
पेडर रोड वर आम्ही दोघं नवरा-बायको सुद्धा तुझ्याच बरोबर पळत होतो..
चाळिशी उलटलेली आमची.. तरी काही अंतर तरी तुझ्या बरोबरच पळत होतो..
मॅरेथॉन संपल्यावर घरी जाताना दादर स्टेशनवर पण आपण भेटलेलो की! ह्याचे पाय दुखत होते म्हणुन माझा आधार घेऊन तो जीना चढलेलो/उतरलेलो, तेव्हा तु आम्हाला दोघांना येऊन "congrats" म्हटलेलास..
आणि मला कसा विसरलास.. तुझ्या सारखे आणखिन किती तरी मुलं माझ्याकडे बघत होते.. कधी एखादी सुंदर मुलगी पाहिली नाही का मॅरेथॉन मधे तुम्ही.. कॅडबरी पासुन वरळी सी-फेस पर्यंत किती प्रयत्न केला होतास तु माझ्या बरोबर पळायचा.. पण जमलं नाहीच तुला माझ्या बरोबरीने पळायला.. शेवटी मागेच पडलास माझ्या.. अगदी literally "मागे" पडलास!
*********************************************
दमलेला, भागलेला तु मरीन ड्राईववर पुन्हा पोचलेलास.. शेवटचं काही अंतर राहिलेलं..
आमचा Indian Navyचा बॅन्ड.. मी आणि बाकीचे ऑफिसर्स कडक इस्त्री-बंद युनिफॉर्म मधे भर उन्हात स्टेजवर उभे होतो..
ड्रम्स, गिटार, बॅन्जो, ट्रम्पेट.. पूर्ण ताकदीनिशी आलेलो आम्ही तुमच्या करता..
माझ्या डोळ्यांवर रे-बॅनचा गॉगल होता आणि हातात माईक..
आणि तुझ्या सारख्या बाकीच्या सगळ्या पळणाऱ्या आमच्या मित्रांकरता मी एकच आव्हान केलेलं..
कुछ करिये, कुछ करिये
नस-नस मेरी खौले
होS कुछ करिये.. होS कुछ करिये..
कुछ करिये, कुछ करिये
बस बस बडा बोले
अब कुछ करिये, अब कुछ करिये
हो.. कोइ तो चल ज़िद्द फडिये
डूबे, तरिये या मरिये..
हाये! कोइ तो चल ज़िद्द फडिये
डूबे, तरिये या मरिये..
हाये! चक देSS.. होSS.. चक दे India!!
चक देSS.. होSS.. चक दे India!!
Nowhere to run, nowhere to hide
This is the time, it’s do or die!!
हुंकार आज भर लें,
दस बारा बार कर लें,
रेहना ना यार पीछे,
कित्ना भी कोई खींचे,
टस हैं ना.. मस हैं जी,
ज़िद है तो, ज़िद्द है जी
घिसना युंही, पिसना युंही, पिसना युंही..
बस करियेSS..
हाये! कोइ तो चल ज़िद्द फडिये
डूबे, तरिये या मरिये..
हाये! चक देSS.. होSS.. चक दे India!!
चक देSS.. होSS.. चक दे India!!
~A few words penned after running the Mumbai Half Marathon on January 18 - the memories, the experience, the thoughts - all of those are simply beyond me - just wish to thank all those who called/emailed me wishing me luck for the marathon; all the Mumbai residents who encouraged all the participants on the roads of Mumbai; all those organisers and little kids and families who held out water, biscuits, fruits and even dry-fruits for the runners that day. It was indeed quite an amazing experience - I'd set myself a target of running in Delhi, Pune and Mumbai - did manage to complete the Half Marathon(21km) in Delhi (Nov 9, time:3hr 6min) & Mumbai (Jan 18, time:3hr 0min) and the 10km race in Pune (Dec 7, time: 1hr 20min). Wish I could finish these in better time - but thanks to my laziness, I didnt practise - something that I intend to correct next year. And I have to say this - out of all three - Mumbai ROCKS!
p.s.: My friend Amit has been running the Mumbai Half Marathon for 3 years in a row now - he's also blogged about it on his blog.
रिसर्वेशन रोड
Posted by
Monsieur K
on Monday, January 12, 2009
/
Comments: (5)

दोन बाप-लेकांची गोष्ट.. बायकोपासुन घटस्फोट घेतलेला वकिल ड्वाईट आणि त्याचा मुलगा लुकास..
आणि प्रोफेसर असलेला इथन आणि त्याचा मुलगा जोश..
गोष्ट सुरु होते एका अपघातानी.. ड्वाईटच्या गाडी खाली जोश मरतो..
घाई मधे असलेला ड्वाईट घाबरुन न थांबता तिथुन पळुन जातो..
झालेल्या अपघाताचे पुरावे नष्ट करायला पाहतो..
पण त्याचं मन त्याला सतत खात राहतं.. वकिलाची मदत हवी म्हणुन इथन त्याच्याकडेच येतो..
आणि प्रयत्न करुनही तो स्वत:चा गुन्हा सहजासहजी कबुल करु शकत नाही..
लुकासला त्याच्या शाळेत शिक्षा मिळते..
त्याच्या मित्रानी एक अपराध केला असतो, पण तो मित्र त्याचा अपराध कबुल करत नाही, म्हणुन लुकास त्याच्याशी भांडतो आणि दोघांची मारामारी होते..
शाळेत मारामारी केली म्हणुन मुलावर संतापलेला ड्वाईट, ही खरी गोष्ट ऐकुन गप्प बसतो..
स्वत:च अपराध करुन गप्प बसलेला बाप कुठल्या तोंडानी मुलाला चूक काय आणि बरोबर काय सांगु शकेल?
दुसऱ्या बाजुला असतो इथन.. असं म्हणतात की स्वत:चं मूल जाणं हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं दु:ख.. जोशची तर काहीच चूक नव्हती.. ज्याची चूक होती, त्या माणसाकडुन सूड घ्यायचा असतो इथनला.. त्या माणसाला शोधुन काढायचं असतं.. म्हणुन अतोनात प्रयत्न करतो तो.. झोप, जेवण, बायको, मुलगी.. सगळ्याचाच विसर पडतो त्याला.. पोलिस, कायदा, वकिल, hit-and-run केसेस मधे दगावलेल्या मुलांचे आई-वडिल.. अशा सगळ्यांची मदत घेत असतो..
शेवटी इथनला समजतं..की खरा अपराधी कोण आहे.. सुडानी पेटलेला असतो तो.. एका बाजुला त्याचा सूड.. आणि दुसऱ्या बाजुला ड्वाईटच्या मनाला सतत टोचत राहणारा त्याचा पश्चाताप.. दोघांची व्यथा एकाच घटनेशी बांधलेली..
प्रश्न असतो तत्वाचा.. नीती-अनितीचा.. चूक काय, बरोबर काय ह्याचा..
जवळ-जवळ १०-१२ वर्षांपुर्वीची गोष्ट आठवली.. नविनच दुचाकी चालवायला शिकलो होतो.. मित्राच्या घरी जाताना लांबुन फेरी नको म्हणुन wrong side नी short-cut नी गाडी घातलेली.. नेमकं एका सायकलवाल्याला आदळलेलो.. भीतीनी तिथे न थांबता शेजारच्या गल्लीत राहणाऱ्या मित्राच्या घरी गेलो.. तो सायकलवाला माझ्या पाठोपाठ तिथे पोचलाच.. पायाला थोडी जखम झालेली त्याच्या.. रक्त वाहत होतं.. मला घेऊन जवळच्या एका हॉस्पिटल मधे जाऊन मलमपट्टी करुन घेतली.. शिवाय माझ्याकडुन ५० रुपये घेऊन निघुन गेला..
चूक माझीच होती.. मी पळुन जायला नको होतं.. पोलिस केस होईल.. घरी कळेल.. लायसन्स जप्त होईल.. पुन्हा गाडी चालवायला मिळणार नाही..
नीती-अनितीच्या गप्पा मारणं खूप सोपं असतं.. त्या वेळेला तुम्ही कसं react करता, तेच महत्त्वाचं..
आज जर पुन्हा तो प्रसंग घडला, तर मी तिथुन पळुन जाईल का? का उलट त्या माणसाला लगेच हॉस्पिटल मधे घेऊन जाईल?
बोलणं वेगळं.. but this time, i hope i am able to walk the talk and not run away.. but most importantly, i would definitely not take the wrong side.. and would try to avoid an accident in the first place itself..
सध्या रोज पुण्यात गाडी चालवतोय.. इथल्या ट्रॅफिकची सवय होत आहे.. रस्त्यात चालवणाऱ्या दुचाकी वाहनांची जास्ती भीती वाटते.. especially, एका बाईकवर नवरा-बायको आणि लहान मूल असलेले.. आपला धक्का नाही बसला पाहिजे, म्हणुन थोडं दुरुन चालवायचं म्हटलं तरी ते स्वत:च जवळ येतात.. सतत भीती वाटते.. आपणच काळजी घ्यायची, असं सांगत बसतो स्वत:ला..
तुम्ही गाडी चालवत असाल.. तर एकच विनंती आहे.. drive safely..
सिनेमातला अजुन एक सीन..
जोश हा सेलो वाजवायचा.. तो गेल्या नंतर त्याची बहिण एम्माच्या शाळेतली टीचर तिच्या आईला विचारते की एम्मा शाळेच्या कॉन्सर्ट मधे पियानो वाजवेल का..
Grace Learner: Mrs. Wheldon was wondering if you'd like to play in the school concert. Maybe practice with her after school. You don't have to do anything you don't want to do.
Emma Learner: Can you hear music if you're in Heaven?
Grace Learner: [pauses] Yes.
Emma Learner: Okay, then. I'll do it.
(source: http://www.imdb.com/title/tt0831884/)
आणि त्या नंतर कॉन्सर्टच्या वेळेस एम्मा म्हणते - "This is for my brother Josh."
तेव्हा खरंच अंगावर शहारे आलेले..
Stay safe.. drive safely..
~Peace.
लग जा गले...
Posted by
Monsieur K
on Tuesday, January 06, 2009
/
Comments: (6)
दिल्ली एरपोर्ट वर बसलेलो.. फ्लाईटची वाट बघत.. नोकरी सोडत होतो.. नेहमी(?) करता घरी परत जात होतो..
एक वेगळंच emptyness खात होतं..
बंगलोर.. कलकत्ता.. लॉस एनजलस.. फ्लोरिडा.. मुंबई.. गुडगाव..
होस्टेलची रुम.. भाड्याची घरं.. पेईंग गेस्ट वाली रुम.. हॉटेल्स.. client guesthouses.. rented apartments.. मावशीचं घर..
शहरं आणि माझी घरं.. घर नाही... वास्तव्याची ठिकाणंच म्हणु..
एकत्र राहणारे मित्र.. बरोबर काम करणारे सहकारी..
पाहिलेले सिनेमे.. वाचलेली पुस्तके..
फिरत, फिरत पाहिलेले ठिकाणं.. भेटलेले लोकं..
ह्यातलं काहीच आठवत नव्हतं.. अगदी रिकामं, हलकं-हलकं वाटत होतं..
दिल्लीहून घरी परतणाऱ्या शेवटच्या फ्लाईटची वाट एकदम कधीच न संपणारी वाटु लागलेली..
आणि तेवढ्यात एरपोर्टवर लताचं शब्दविरहित गाणं सुरु झालं..
नुसतंच instrumental music..
पण रिकाम्या माझ्या मनातुन ते शब्द अलगद, एका पाठोपाठ एक बाहेर पडु लागले..
पास आईये के हम नहीं आयेंगे बार-बार,
बाहें गले में डालके हम रो ले ज़ार-ज़ार,
आंखों से फिर यह प्यार की बरसात हो ना हो,
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो...
विमानाच्या खिडकीतुन मी रात्रीचे दिल्लीला सजवणारे ते केशरी-पिवळे-पांढरे दिवे बघत होतो..
मनातुन तिचे शब्द जाता-जात नव्हते..
हमको मिली हैं आज यह घडीयां नसीब से,
जी भरके देख लीजीये हमको करीब से,
फिर आपके नसीब में यह बात हो ना हो,
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो...
टिमटिमणारे ते दिवे लवकरच ओझरते झाले..
खिडकीतुन रिकाम्या अंधारातच बघत बसलेलो..
गंमत असते ना.. कधी, कधी खिडकीतुन काहीच पहावंसं वाटत नाही..
you appreciate the emptiness, the darkness for the uncluttered solitude and peace that they offer..
मधुन एखादं शहर किंवा छोटंसं गावावरचे दिवे दिसायचे..
वेळ किंवा जागा कुठली.. दोन्हीचा पत्ता नव्हता..
लोहगावच्या विमानतळावर ती रात्र शेवटी पोचली..
शेवटचं का होईना.. पण त्या रात्रीला एक कडाडुन घट्ट मिठी मारली.. बॅग उचलली आणि घरी चालु लागलो..
लग जा गले.. के फिर यह हसीन रात हो ना हो..
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो...
लग जा गले..
softly, i treaded away from the dark night i had embraced for one last time and just left behind... towards a yet to be born morning of hope that was waiting eagerly and patiently for me... at that nice, old place.. that you and I call 'home'...
एक वेगळंच emptyness खात होतं..
बंगलोर.. कलकत्ता.. लॉस एनजलस.. फ्लोरिडा.. मुंबई.. गुडगाव..
होस्टेलची रुम.. भाड्याची घरं.. पेईंग गेस्ट वाली रुम.. हॉटेल्स.. client guesthouses.. rented apartments.. मावशीचं घर..
शहरं आणि माझी घरं.. घर नाही... वास्तव्याची ठिकाणंच म्हणु..
एकत्र राहणारे मित्र.. बरोबर काम करणारे सहकारी..
पाहिलेले सिनेमे.. वाचलेली पुस्तके..
फिरत, फिरत पाहिलेले ठिकाणं.. भेटलेले लोकं..
ह्यातलं काहीच आठवत नव्हतं.. अगदी रिकामं, हलकं-हलकं वाटत होतं..
दिल्लीहून घरी परतणाऱ्या शेवटच्या फ्लाईटची वाट एकदम कधीच न संपणारी वाटु लागलेली..
आणि तेवढ्यात एरपोर्टवर लताचं शब्दविरहित गाणं सुरु झालं..
नुसतंच instrumental music..
पण रिकाम्या माझ्या मनातुन ते शब्द अलगद, एका पाठोपाठ एक बाहेर पडु लागले..
पास आईये के हम नहीं आयेंगे बार-बार,
बाहें गले में डालके हम रो ले ज़ार-ज़ार,
आंखों से फिर यह प्यार की बरसात हो ना हो,
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो...
विमानाच्या खिडकीतुन मी रात्रीचे दिल्लीला सजवणारे ते केशरी-पिवळे-पांढरे दिवे बघत होतो..
मनातुन तिचे शब्द जाता-जात नव्हते..
हमको मिली हैं आज यह घडीयां नसीब से,
जी भरके देख लीजीये हमको करीब से,
फिर आपके नसीब में यह बात हो ना हो,
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो...
टिमटिमणारे ते दिवे लवकरच ओझरते झाले..
खिडकीतुन रिकाम्या अंधारातच बघत बसलेलो..
गंमत असते ना.. कधी, कधी खिडकीतुन काहीच पहावंसं वाटत नाही..
you appreciate the emptiness, the darkness for the uncluttered solitude and peace that they offer..
मधुन एखादं शहर किंवा छोटंसं गावावरचे दिवे दिसायचे..
वेळ किंवा जागा कुठली.. दोन्हीचा पत्ता नव्हता..
लोहगावच्या विमानतळावर ती रात्र शेवटी पोचली..
शेवटचं का होईना.. पण त्या रात्रीला एक कडाडुन घट्ट मिठी मारली.. बॅग उचलली आणि घरी चालु लागलो..
लग जा गले.. के फिर यह हसीन रात हो ना हो..
शायद फिर इस जनम में मुलाकात हो ना हो...
लग जा गले..
softly, i treaded away from the dark night i had embraced for one last time and just left behind... towards a yet to be born morning of hope that was waiting eagerly and patiently for me... at that nice, old place.. that you and I call 'home'...