मृत्यु बोलतोय (डेथ स्पीक्स)

गेल्या शनिवारची गोष्ट.. मित्रांबरोबर ’लव आज कल’ बघायचं ठरलेलं.. शेवटच्या घटकेला एका मित्राचं मत..
"अरे.. सध्या नको जायला मल्टिप्लेक्स मधे सिनेमा बघायला.. स्वाईन फ्लुची साथ आहे.. नंतर बघु सिनेमा.."

म्हटलं बरं बाबा.. नको तर नको..
शेवटी प्रत्येक जण हवी ती काळजी घेणार.. कोणी मास्क घालणार.. कोणी दर दोन-एक तासानी हात स्वच्छ धुवुन घेणार.. कोणी हस्तांदोलन करणार नाही.. कोणी मल्टिप्लेक्स, मॉल्स अशा गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही.. शाळा, कॉलेज बंद होणार..

हे सगळं कशा करता.. तर आपल्याला स्वाईन फ्लु नको.. स्वाईन फ्लु का नको.. तर आजार नको आणि शेवटी मृत्यु नको..

मृत्यु.. प्रत्येकालाच भिती आहे त्याची.. त्या शनिवारी सिनेमाला न जाता, नेमकं ह्याच संदर्भात जेफ्री आर्चरच्या पुस्तकात एका अरबी कथा वाचली.. आणि अंगावर शहारे आले.. जेफ्री स्वत: म्हणतो, की ही कदाचित जगातली सर्वात छोटी, आणि सर्वात पूर्ण अशी कथा आहे.. ह्या कथेचा लेखक कोण आहे, कोणालाच माहित नाही..

********************************************

बघदादच्या एका शेठनी एकदा त्याच्या नोकराला बाजारातुन काही आणायला पाठवलं. थोड्या वेळानी तो नोकर परत आला - प्रचंड घाबरलेला, भेदरलेला - आणि म्हट्ला, "मालक, आता मी बाजारात गेलेलो, तेव्हा गर्दीत मला एकानी मागुन धक्का दिला. मी वळुन पाहिलं, तर माझ्या समोर साक्षात मृत्यु उभा होता. त्यानी माझ्याकडे धमकावुन पाहिलं; कृपया, मला तुमचा घोडा द्या - मी आताच्या आता हे शहर सोडुन समराला जातो, जिथे मृत्यु मला शोधु शकणार नाही."

मालकानी घाबरलेल्या आपल्या नोकराला घोडा दिला, नोकर त्यावर स्वार होऊन त्वरित निघुन गेला. मग मालक बाजारात आला - मला गर्दी मधे पाहुन, मला त्यानी विचारलं, "का रे? आज सकाळी, माझ्या नोकराला का धमकावंलंस?". मी उत्तरलो, "मी धमकावलं नाही त्याला. उलट त्याला इथे बघदाद मधे पाहुन माझं मला आश्चर्य वाटलं, कारण आज रात्री मी त्याला समराला भेटणार होतो."

English story on Jeffrey's website: http://www.jeffreyarcher.co.uk/excerpt-cut-short.htm

8 comments:

सर्किट said...

gud 1.

pan smallest story in the world award goes to Ernest Hemingway.

The story is made of just 6 words!!! It goes like this :

====================
for sale. shoe pair. never worn.
====================

Thanx 2 A.Bathe 4 telling me this striking story!

btw, nice post!

स्नेहल said...

sadhya kaay translation manawar ghetal ahes ka? Punjabi to Marathi, English to Marathi :)

changal ahe pan :)

Monsieur K said...

@Circuit,
i guess there's a small mistake. i was googling on what Hemingway wrote & found this:
"For sale. Baby pair. Never worn."

http://dangitbill.wordpress.com/2007/07/13/saying-so-much-in-six-words/

another interesting link is:
http://www.thenutgraph.com/short-and-sweet

People were asked to write about their life in 6 words, and they came up with rather amusing descriptions.

one of my friends has blogged about "stories in two lines"
http://blandspice.blogspot.com/2009/04/stories-in-two-sentences.html

now that could become one of those 'passing the parcel' or 'kho-kho' blog post games. ;-)

anyways, thanks for ur comment :)

@Snehal,
aga ho! sadhya khara mhanje vel nahi.. aani topic pan naahi.. tyamule swat:ch doka chaalavnyaa pekshaa, dusryaa koni tari vyaktini lihilela asel, aani tey aavadla, tar tey marathi madhe translate karun taakat aahe ithe :D

Vibha said...

parikshit rajachi gosht athavli

Samved said...

For sale. Baby pair. Never worn हे बरोबर आहे. अंगावर काटा आला होता जेव्हा ही गोष्ट पहील्यांदा ऎकली होती.

Deep said...

Hey Ketan, next update on
एक प्रवास... कधीही न संपणारा... (फायनल) is now published! :D you can have a look ;)

roadandsong said...

Sahi translation! I always get stuck up in translating intense stuff in one language to another!

- K ( Non-monsieur!) ;-)

TheKing said...

हीच गोष्ट मला कोणीतरी महाभारताताली म्हणून सांगितली होती, फक्त मालकाच्या ठिकाणी गरुड़ होता आणि नोकराच्या जागी कबूतर!