Inspiration




२२ वर्षांचा अंगद देव सिंघ दुग्गल. त्याला cerebral palsy आहे.

मुंबई मॅरेथॉनच्या जाहिराती पाहुन inspire झाला.

जुहु बीच वर काही महिने प्रॅक्टिस केली.

आणि २२ जानेवरी, २००७ रोजी मुंबई मॅरेथॉन मधे "ड्रीम रन" मधे भाग घेतला - not in the run for disabled!

सोबतीला त्याची आई आणि बहिण होते.

थोडं अंतर पळाल्यावर थकला, की त्या खुर्चीवर बसुन घ्यायचा.
तो इतक्या जिद्दीने पळु शकतो, तर तुम्ही किंवा मी का नाही?

निर्विकार

तिसऱ्या मजल्यावरच्या मीटिंग रुम मधे ३-४ महिने बसलेलो.
रोज सकाळी-दुपारी, ठरलेल्या वेळी, उत्तम चहा आणुन द्यायचा. उत्तम म्हणजे त्या मजल्यावरचा ऑफिस बॉय.
त्या ठरलेल्या वेळे व्यतिरिक्‍त, अधुन-मधुन टी-कॉफी मशीन पाशी गेलो, की तो लगेच चहा द्यायचा... एखाद्या वेळेस कप नसला, तर लगेच कप विसळुन चहा देणार.. मग जनरल गप्पा व्हायच्या त्याच्या बरोबर... तो मुळचा नेपाळचा.. वय २०-२१ वर्षांचं.. एकदम शांत..

नुकतंच पहिल्या मजल्यावर दुसरी जागा मिळाली बसायला.. तिथल्या ऑफिस बॉय बरोबर अजुन इतकी मैत्री झाली नाहीये.. परवा एका मीटिंग करता तिसऱ्या मजल्यावर गेलो.. मीटिंग सुरु व्हायच्या आधीच टी-कॉफी मशीन पाशी गेलो..तर उत्तम फोन वर बोलत होता.. अगदी हळु स्वरात.. एखादा कप पण दिसला नाही आस-पास.. मी शोधाशोध करत असतानाच.. त्यानी फोन ठेवला..

"सर, रुको.. मैं चाय देता हूं आपको.."
~"बरं.."
कप विसळता-विसळता..
"वह मैं अभी अपनी सेटींग से बात कर रहा था.."
~"ह्म्म...(मनातल्या मनात... च्यायला... ह्याची पण ’सेटींग’... किती साधा दिसतो...).. सेटींग? कोण सेटींग?"
"सर.. वह नेपाल से आयी हैं.. उसके भैय्या-भाभी, यहां दिल्ली में रहते हैं.."
~"अरे वाह! फिर मिले की नहीं उसको? कितने दिन हैं वह यहां पर?"
"नहीं सर! अभी तक नहीं मिला.. ड्युटी सुबह ८ बजे से शाम ६ बजे तक रहती हैं.. वैसे वह हैं यहां पर एक महिने के लिये आयी हैं.."
~"तो कब मिलोगे??"
"सर.. यहां गुडगाव से दिल्ली जाने में बहुत टाईम लगता हैं ना.. तो मैं उसको sunday मिलुंगा.."
~"अरे sunday तर ४ दिवस नंतर आहे.. इतके दिवस वाट बघणार... आधी कधी भेटलेलास तिला?"
"हां सर.. sunday तक wait करना पडेगा.. उससे मिले हुये एक साल हो गया हैं.. अब sunday तक रोज थोडा ओवर-टाईम भी करुंगा.. उसके extra पैसे मिलते हैं.."
~"अच्छा हैं.. फिर sunday कहा मिलोगे उसे?"
"उसके भैय्या के घर जाऊंगा.. वह लोग जानते हैं मुझे.. हम नेपाल में एकही गांव के हैं.. फिर शाम को उसको India Gate दिखाना हैं.."
~"वाह! अच्छा आईडिया हैं.. India Gate च्या जवळचे लॉन्स मस्त आहेत फिरायला.. मस्त एन्जॉय कर रे..."
काही म्हणा.. पठ्ठ्याची date करता venueची choice आवडली मला..

सगळं बोलताना तो इतका लाजत होता... मला खुप हसु येत होतं.. फारंच कावरा-बावरा झाला होता.. त्याच्या डोळ्यातला आनंद लपत नव्हता...

----------------------------------------------
आज रात्री जेवल्या नंतर सहज एक चक्कर मारली गेस्ट-हाऊस बाहेरच्या लॉन वर.. एकटाच चालत होतो.. थंडी सुरु झाली आहे.. स्वेटर काढला पाहिजे.. रविवार म्हणजे आज उत्तम नक्की त्याच्या सेटींगला भेटला असणार..त्याची आठवण आली आणि माझं मलाच हसु आलं..

बाकावर बसुन मी समोरच्या चंद्राकडे बघत बसलो.. नुकतीच पोर्णिमा झाली आहे.. छान तांबुस रंगाची छटा पांघरली आहे त्यानी आज..थंडी मुळे मी दोन्ही हात फोल्ड करुन बघत होतो.. स्वेटर घालायला पहिजे होता..

मनात विचार चालुच..उद्यापासुन एक नविन आठवडा सुरु.. पुन्हा एक सोमवार.. पुन्हा ते कधीच न संपणारं काम..पुन्हा रोज सकाळी लवकर उठुन स्वत:ला ऑफिस मधे पोचवायचं.. मीटिंग-मीटिंग खेळायची..वेळ कसा जातो.. ह्याचं पुन्हा भान हरपुन बसायचं.. स्वत:ला विसरायचं..

मी पुन्हा त्या आकाशातल्या चंद्राकडे पाहु लागलो..
शुन्य अपेक्षेनी.. ना तो सुंदर वाटत होता, ना उदास..
त्याच्या आजुबाजुला काहीच नव्हतं.. एकही चांदणी नव्हती.. एकटाच होता तो...
तांबुस रंगाची छटा ओढुन, निर्विकार नजरेनी शुन्यात पाहणारा..
थंडी जाणवु लागली म्हणुन मी हात आणखिन घट्ट फोल्ड केले..
माझ्या नकळत काल पाहिलेल्या दोस्तानाचं गाणं आठवलं..

क्यों मेरी सांस भी कुछ फीकी सी हैं..
दूरीयों से हुयी नज़दिकी सी हैं..
जाने क्या यह बात हैं..
हर सुबह अब रात हैं..

कुछ कम.. रौशन हैं रौशनी..
कुछ कम.. गीली हैं बारीशें..
कुछ कम.. लहराती हैं हवा..
कुछ कम.. हैं दिल में ख्वाहीशें..

थम सा गया हैं.. यह वक्‍त ऐसे..
तेरे लिये ही ठहरा हो जैसे...

थंडी वाढली.. तसा मी थोडा कापु लागलो..
हात आणखिन घट्ट आवळले स्वत:भोवती..
थंडी कधीच आवडली नाही मला.. पण आता सवय केली पाहिजे..
समोरच्या चंद्राकडे पाहत बसलो..
शांत.. निर्विकार.. थंडपणे..

रेजिंग बुल


बॉक्सिंग रिंग मधली त्याची शेवटची लढत.. प्रतिस्पर्ध्याचे एका नंतर एक असे अगणिक मुक्के अंगावर झेलतो.. चेहऱ्यावर.. छातीवर.. पोटावर.. नुसता मार खात बसतो.. काहीच उत्तर देत नाही.. डोळे सुजलेले असतात.. चेहऱ्यावर आणि डोळ्यावर येणाऱ्या प्रत्येक मुक्क्यानी रक्‍त उडत असतं.. प्रतिस्पर्धी मारुन दमला की तो त्याला आणखिन चिथवतो..
"C'mon!! Hit me!!!"

तो चिडुन आणखिन मारु लागतो.. आणि तरी हा काहीच उत्तर देत नाही..रिंग जवळच्या प्रेक्षकांवर रक्‍त उडु लागतं.. पण जेक खाली कोसळत नाही.. रिंगच्या दोरांच्या आधाराने उभा राहतो.. आणि आणखिन मार, म्हणुन खुणावतो समोरच्याला..

शेवटी रेफरी मॅच थांबवतो.. आणि रेला विजेता घोषीत करतो..मारुन, मारुन दमलेल्या रेला जेक शांतपणे जाऊन सांगतो,
"You didnt get me, Ray!"

बॉक्सिंग रिंगच्या दोरीवरुन त्याच्या रक्‍ताचे थेंब सांडत राहतात.. स्लो मोशन मधे.. ब्लॅक अन व्हाईट रंगात...
जेक ला मोटा नावाचा रेजिंग बुल.. प्रचंड चिडचिड करणारा.. खुप लवकर राग यायचा त्याला.. ना तोंडावर ताबा, ना हातावर.. मग समोर कोणी असो.. बायको, भाऊ.. किंवा बॉक्सिंग रिंग मधला प्रतिस्पर्धी..
बॉक्सिंग रिंग मधे त्याच्या ह्याच अनियंत्रीत राग, मत्सर आणि त्वेषामुळे तो जगजेत्ता झाला..

आणि ह्याच सगळ्यामुळे रिंग बाहेरच्या जगात तो सगळं हरुन बसला.. बायकोनी सोडलं.. भाऊ दूर झाला..पैसा गेला.. जेल मधे गेला..

जोईनी - त्याच्या भावानी त्याला जगाच्या रिती-रिवाजापासुन, पद्धतीपासुन दूर ठेवलेलं.. त्याच्या ट्रेनिंग मधे सिंहाचा वाटा उचललेला.. त्याच्या बायकोला त्याच्या मत्सरापासुन वाचवायचा प्रयत्न केलेला...
पण जेकचं डोकं म्हणजे खोकं.. शेवटी सगळं हरला..एके काळचा जगजेत्ता शेवटी न्युयॉर्कच्या एका हॉटेल मधे stand-up entertainer झाला..

स्टेजवर जायच्या आधी तो आरशासमोर प्रॅक्टिस करत असतो..
"On The Waterfront" मधे टेरी म्हणजे मार्लोन ब्रान्डोचा dialogue..
टेरी त्याच्या भावाला चार्लीला म्हणतो.. जे गुलाम मधे आमिर रजतला म्हणतो तेच...
Terry: You was my brother, Charley, you shoulda looked out for me a little bit. You shoulda taken care of me just a little bit so I wouldn't have to take them dives for the short-end money.
Charlie: Oh I had some bets down for you. You saw some money.
Terry: You don't understand. I coulda had class. I coulda been a contender. I coulda been somebody, instead of a bum, which is what I am, let's face it. It was you, Charley.

सिनेमा संपल्यावर सुद्धा डोक्यात त्याचं ते वाक्य येत-जात राहतं...
आयुष्यात सगळंच हरलेल्या एका विजेत्याची ओळ..
I coulda been a contender...
I coulda been a contender...

थोडासा बादल.. थोडासा पानी.. और एक कहानी...

शेवटी त्यानी त्याला गाठलंच.. आणि मागे देखिल टाकलं.. दोघांच्या शैलीमधे फरक होताच..
एक स्वैर, बेफिकिर, स्वच्छंद, मनस्वी.. तर दुसरा अत्यंत जबाबदारीने, संयमानी, नज़ाकत के साथ त्याची कुशलता दाखवणारा..
दोघांत तुलना होणं साहजिकच.. कोण डावा, कोण उजवा.. प्रत्येकाचं मत वेगळं..
आणि ती तुलना दिलिप प्रेमचंद्रननी स्वत:च्या शब्दात किती अचुक टिपली..
http://content-ind.cricinfo.com/magazine/content/story/374367.html

"If Lara's career was It's a Wonderful Life, Tendulkar's has been a Kieslowski, shot painstakingly and sometimes weighed down by the cares of the world."

सचिन वर खरंच किती ओझं आहे अपेक्षांचं...
Kieslowski.. कुठेतरी नाव वाचल्या सारखं वाटलं..Kryzsztof Kieslowski.. पॉलिश सिनेमा निर्देशक..

मधे World Cinema वर त्याचे दोन चित्रपट पाहिलेले.. "Trois Couleurs" (Three Colors) ह्य नावाच्या फ्रेंच सिनेमा trilogyचे पहिले दोन भाग.. तीन भाग म्हणजे "Trois Couleurs: Bleu" (Three Colors: Blue); "Trois Couleurs: Blanc" (Three Colors: White); "Trois Couleurs: Rouge" (Three Colors: Red)..Bleu, Blanc, Rouge.. फ्रान्सच्या झेंड्याचे तीन रंग.. that stand for the three ideals.. liberty, equality, fraternity..

खरं म्हणजे ह्या पैकी फक्‍त पहिला भागच नीट पाहिला.."Trois Couleurs: Bleu".. निळा रंग म्हणजे liberty.. म्हणजे स्वातंत्र्य.. नाही, ते म्हणजे freedom झालं..
मग? liberty.. म्हणजे.. सुटका? की मुक्‍ती?

जुलीची गोष्ट (http://www.filmref.com/directors/dirpages/kieslowski.html#blue)..
एका कार accident मधे तिचा नवरा आणि मुलगी जातात...
मागे राहते ती एकटी.. मागे राहतात त्या नको असलेल्या तिच्या आठवणी..
आणि नको असलेले तिचे पाश..
त्या सगळ्यातुन स्वत:ला सोडवायचा प्रयत्न करत राहते ती..

शहर बदलते.. घर बदलते.. ओळखीचे, पाळखीचे सगळ्या लोकांपासुन दूर जाते.. एका वेगळ्या विश्वात.. जिथे जुनं काही तिच्या समोर येणार नाही..
she becomes oblivious and indifferent to physical pain.. खडबडीत भिंतीवरुन बोटं फिरवत, ते रक्‍तबंबाळ होई पर्यंत चालत राहते..
पोहताना अचानक कानात घुमु लागतात तिच्या संगीतकार पतीच्या compositions...

मूक भावनांना आवाज नसतो तिच्या.. मनातलं सगळं दु:ख तिच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर...
नको असलेल्या आठवणींशी संवाद साधण्यात त्याच नकोशा आठवणीं मधे चुरस लागते...
ह्या सगळ्यात ती शोधत राहते तिला हवी असलेली ती दुर्लभ, elusive मुक्‍ती...

मुक्‍ती..
तेच शोधत होता का तो पण?
तो म्हणजे टॉमस.. मिलन कुंडेराच्या "The Unbearable Lightness of Being" (http://en.wikipedia.org/wiki/The_Unbearable_Lightness_of_Being) मधला टॉमस..
कुंडेराची concept - आपलं अस्तित्व म्हणजे एक "unbearable lightness" आहे कारण प्रत्येक जण एकच आयुष्य जगतो.. एकच आयुष्य म्हणजे "einmal ist keinmal".. म्हणजे एकदा जे घडतं, ते कधीच घडलं नाही.. आणि म्हणुनच आपलं अस्तित्व क्षुद्र आहे.. निरर्थक आहे.. अर्थहीन आहे.. मग त्यामुळे घेतलेला कुठलाही निर्णय, आणि त्यातुन उत्पन्न होणारे परिणाम.. कुठलंही दु:ख किंवा सुख.. ह्याचा सगळ्याचा आपल्या अस्तित्वावर काहीच परिणाम नाही.. आणि मग आपल्या अस्तित्वाची "being" हीच निरर्थकता ("lightness") असह्य ("unbearable") वाटु लागते...

टॉमस एक डॉक्टर.. टेरेसा त्याची बायको.. त्याचं प्रेम असतं तिच्यावर.. टॉमस पूर्णपणे "einmal ist keinmal" आणि अस्तित्व निरर्थक आहे, ह्या विचारशैलीचा.. त्यामुळे जरी बायकोवर प्रेम असलं, तरी तो एक मोठा "womanizer" असतो.. love and sex are two completely unrelated things or entities for him.. he believes that you may want to have sex with many women.. but you will want to sleep and wake up in the arms of only the woman you love.. आणि हे कशा मुळे तर "es muss sein!!".. अर्थात "it must be" (that way)!!
नोकरी, व्यवसाय, sex - हे सगळं त्याच्या करता "es muss sein" असतं...
पण हळु, हळु.. त्याला त्याचं हेच निरर्थक अस्तित्व असह्य होतं..
"es muss sein" वरुन त्याचा विश्वास उठतो... सगळं सोडुन तो टेरेसा बरोबर खेड्यात राहायला जातो.. जिथे त्याला मुक्‍ती मिळते...

सचिन, जुली, टॉमस.. काय साम्य आहे ह्या तिघांमधे.. का बरं मला सचिननी लाराचा रेकॉर्ड मोडल्यावर ह्या दोघांची आठवण झाली.. जुली आणि टॉमस तर काल्पनिक पात्रं..

सचिनवर अपेक्षांचं ओझं.. इतरांच्या अपेक्षा सोडा...त्याच्या स्वत:च्याच अपेक्षा..
जुली तिच्या पूर्व आयुष्यातल्या आठवणींच्या ओझ्याखाली दबलेली...
आणि टॉमस.. तो तर एक बेभान, बेफिकिर, मनस्वी आयुष्य जगणारा... आणि तीच निरर्थकता नकोशी वाटत राहते त्याला.. टोचत राहते..

शेवटी हवं काय प्रत्येकाला.. मुक्‍ती...सुटका.. की अजुन काही...
माहित नाही..पण अस्वस्थ जरुर केलं...

तिघांची गोष्ट.. का कुणास ठाऊक.. पण हे सगळं लिहिताना आठवलं हे गाणं..

दो नैना.. और.. एक कहानी...
थोडासा बादल.. थोडासा पानी..
और.. एक कहानी...

छोटीसी.. दो झीलों में वह..
बहती रहती हैं...
कोई सुने.. या ना सुने...
कहती.. रहती हैं..
कुछ लिखके.. और कुछ जुबानी...

थोडीसी हैं.. जानी हुई..
थोडीसी नयी...
जहां रुके.. आंसुं वहीं..
पुरी हो गयी..
हैं तो नयी.. फिर भी हैं पुरानी..

एक खत्म हो.. तो दूसरी..
याद आ जाती हैं..
होटों पे फिर.. भुली हुयी..
बात आ जाती हैं..
दो नैनो की... हैं यह कहानी...

थोडासा बादल.. थोडासा पानी.. और.. एक कहानी...