
५.५५चा गजराच्या १०-१५ मिनिट आधीच डोळे उघडतात..
रुममधे wireless सिग्नल येत नाही, म्हणुन मी ground floorच्या lounge मधे लॅपटॉप घेउन बसतो.. "इतक्या सकाळी कसा ऑनलाईन?" असं एक मैत्रिण विचारते.. "काम" हे माझं नेहमीचं उत्तर..
गेस्ट-हाऊस मधला नंदु रोजचा एक चमचा साखर आणि आलं घातलेला चहा आणुन देतो..
तेवढ्यात रविंद्र येतो..
"केतन.. थोडा बाहर लॉन पर जाके देखो.. कितना बढिया हैं.."
पगडी शिवाय सकाळी-सकाळी रविंद्र वेगळाच भासतो.. गेस्ट-हाऊस मधेच नुकतीच ओळख झालेली आमची.. आयुष्यात मोजुन १५-२० मिनिटांपेक्षा जास्ती कधी बोललो नाही आम्ही..
पण सरदार लोकं चटकन मैत्री करणारे..
त्याच्या सहकाऱ्याशी ओळख करुन देताना म्हटला,
"अजय, इनसे मिलो.. यह हैं केतन.. हमारे परम मित्र..." पुढे मी सध्या काय काम करत आहे, इत्यादी, इत्यादी..
रविंद्रनी खुप जोर दिला, म्हणुन बाहेर लॉनवर गेलो.. सकाळच्या ६.४५-७ वाजताची वेळ.. थोडंसं ढगाळ वातावरण.. आकाशात पाखरांचा एक थवा एका मस्त rhythm मधे उडत होता.. दोन बंगल्यांच्या मधल्या बोगनवेलावर चिमण्या खेळत होत्या.. समोरच्या घराच्या कौलांवर दोन कबुतरं सकाळच्या गप्पा मारत बसले होते.. गेस्ट-हाऊसच्या कंपाउंडच्या भिंतीवर एक खार सैर-वैर जॉगिंग करत होती..
स्लिपर्स काढुन मऊ गवतावर चालु लागलो.. पावलांना गवताचा तो स्पर्श आवडलेला.. चालत-चालत लॉनच्या एका टोकाला पोचलो आणि वळलो..
तेव्हा नजरेत आले माझ्याच पावलांचे, दवामुळे उठलेले गवतावरचे ठसे..
मला तरी माझं ते चालणं स्वच्छंद, मनमोकळं वाटलेलं.. पण ते ठसे सगळे एकाच सरळ रेषेत उमटलेले..
मला तरी माझं ते चालणं स्वच्छंद, मनमोकळं वाटलेलं.. पण ते ठसे सगळे एकाच सरळ रेषेत उमटलेले..
माझ्या नकळत मी मनमोकळेपणे सरळ रेषेत चालत होतो..
**********************************************
गेल्या वर्षीची जन्माष्टमी.. शिवाजी पार्कला सेना-भवना समोरची दही-हंडी.. ऑफिसमधुन रात्री ८.३०-९ ला निघुन तिथेच एक तास गर्दीत उभा होतो.. ढोल-ताशे आणि प्रचंड जोरात वाजणारं music...
दही-हंडी फोडणाऱ्या ४-५ टीम्स पाहिलेल्या.. लक्षात राहिली अदिती.. यशस्वी टीमला स्टेजवर बोलवुन बक्षिस देत होते.. गोपाळांच्या एका टीम मधे अदिती होती.. सगळ्यात वर चढुन तिनी हंडी फोडलेली!
तिला स्टेजवर बोलवुन विचारलं एकानी..
"तुझं नाव काय?"
-"अदिती निलेश धांडे!"
"तु कितवीत आहेस?"
-"२रीत!"
"किती दिवस प्रॅक्टिस केलीस? प्रॅक्टिस करता शाळा बुडवलीस? कुठली शाळा तुझी?"
-"१ महिना आम्ही प्रॅक्टिस केली. शाळा नाही बुडवली. माझ्या शाळेचं नाव आहे..."
"तु एकटी एवढ्या सात मजली पिरामिडवर चढलीस - एवढ्या उंचावर तुला भिती नाही वाटली?"
-"नाही!"
"का गं?"
-"माझा बाबा होता ना.. तो दुसऱ्या माडीवर होता पिरामिड मधे.. पडले असते तर त्यानी पकडलं असतं मला.."
भिती.. ही भिती नसेल, तर काय-काय करु शकतो.. आणि भिती नसण्याचं प्रत्येकाचं कारण वेगळंच..
आणि ज्याची भिती वाटते, ते झालंच.. तर सावरायला जवळचं कोणीतरी पाहिजेच ना..
**********************************************
ऑगस्ट मधला एक रविवार.. ऑफिस मधे रिशी भेटला..
"काय रे! तुम्ही लोकं कधी घरी जाता की नाही?"
रिशी clientच्या मार्केटिंग टीम मधे.. काहीतरी काम होतं त्याचं म्हणुन आलेला..
-"अरे! चाललोच आहे.. बोल, काय काम आहे?"
त्याला पाहिजे होतं ते दिलं.. आणि दुकान बंद केलं..
client ऑफिस गुडगावच्या एका कॉर्पोरेट पार्क मधे.. तिथे आणखिन १५ कंपन्यांचे ऑफिस..
रविवार सुट्टीचा दिवस.. त्यामुळे जास्ती वर्दळ नाही..
कदाचित पहिल्यांदाच दिवसा उजेडी ऑफिस मधुन निघत होतो..
चालत चालत कॉर्पोरेट पार्कच्या गेट बाहेर आलो.. समोर एक छोटंसं मैदान - पार्किंग लॉट..
एका बाजुला सायकल स्टॅन्ड, मोटर-सायकल स्टॅन्ड.. आणि पलिकडे सगळ्या गाड्या असतात, तो भाग आज बराचसा रिकामा..
नेहमी तिथे ३-४ सिक्युरिटी गार्ड्स असतात.. आज १०-१२ जणांचा एक ताफाच उभा होता..
मी आलो, तर सगळे एकदम सावध झाले..
रोज सकाळी "गुड मॉर्निंग सर" म्हणत मला visitor's card देणाऱ्या जतिंदरकडे बघुन मी हसलो, आणि म्हटलं,
"काय रे, आज काय चालु आहे? काय special?"
-"कुछ नहीं सर! हम लोग तो बस ऐसे ही.. आप भी देखो.."
तिथे थांबलो.. समोर २५-३० फुटांवर एक ऍटलस गोल्डलाईन सायकल आडवी पार्क केली होती..
कडक युनिफॉर्म, जड काळे बुट घातलेला एक सिक्युरिटी गार्ड धावत गेला आणि त्या सायकल वरुन यशस्वीरित्या उडी मारली!
सगळ्यांनी लगेच टाळ्या वाजवल्या..
बीजिंग मधे तेव्हा ऑलंपिक चालु होते, तसं इथे ह्यांचं high-jump चालु होतं..
रोजच्या त्याच-त्या आयुष्यात ते लोकं स्वत:चं एक साधं-सरळ सुख शोधत होते..
’शोधत’ शब्द चुकिचा वाटतो.. सुख शोधत नाही, मिळवत होते.. उपभोगत होते..
**********************************************
जून मधे गुडगावला आल्या पासुन काम मस्त चालु आहे.. ते आवडतय सुद्धा.. खरं म्हणजे त्याची नशा झाली आहे.. एखाद्या रविवारी जर काम नसेल, तर मग भिती वाटते.. स्वत:ची भिती.. स्वत:च्या रिकाम्या मनाची.. त्याच्या वेगवेगळ्या विसंगत विचारांची.. वेळ घालवायला सिनेमा, पुस्तकं, गाणी असतातच.. पण त्यात मन रमत नाही.. किंवा ब्लॉग लिहायचा option.. तो option मी जेवढं जमेल तेवढं टाळतो.. कारण रिकामं मन.. काय लिहायचं हे त्या रिकाम्या विसंगत मनाला कळत नाही..
मित्र-मैत्रिणी-नातेवाईक.. सगळेच लांब.. प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात गुंतलेलं..
सप्टेंबरच्या शेवटच्या शुक्रवारी मेल-बॉक्स मधे रजिस्ट्रेशन confirmationची मेल आली.. Standard Chartered Mumbai Marathon २००९ बद्दल.. half marathon जानेवरी १८ तारखेला आहे..
मेल वाचुन प्रचंड खुष झालो (तसंही बऱ्याच दिवसात ना मी कोणाला एखादी मेल टाकली, ना मला कोणी पाठवली).. रोजच्या एक सारख्या आयुष्याला एक वेगळी, मनासारखी दिशा मिळालेली..
त्याच दिवशी रेडियोवर दिल्ली half marathon बद्दल ऐकलं..
"बचपन में खुशी थी.. हर बात पर दौडने की..आओ.. दौडे.."
ही half marathon नोवेम्बर ९ तारखेला..लगेच online रजिस्ट्रेशन करुन टाकलं!
मग डोक्यात आलं.. डिसेम्बर मधे पुण्यात half marathon असेलच..
नवेम्बर, डिसेम्बर आणि जानेवरी.. ३ सलग महिन्यात ३ सलग half marathon!!
Now, that would certainly be a challenge worth trying or doing!
आधी कधीच केलं नाही!
आधी काय केलय?
फेब्रुवरी २००७.. टॅम्पा, फ्लोरिडा.. १५ कि.मि... ९६ मिनिटं..
फेब्रुवरी २००७.. टॅम्पा, फ्लोरिडा.. १५ कि.मि... ९६ मिनिटं..
जानेवरी २००८.. मुंबई, महाराष्ट्र.. २१ कि.मि. (half marathon).. २ तास, ४८ मिनिटं..
३ महिन्यात ३ half marathon.. ठरवायला काहीच हरकत नाही.. पण म्हटलं एक SWOT analysis करुन पाहु..
Strength: नक्कीच ’endurance’!
टॅम्पा मधे अंशुमन, प्रविण आणि शंतनु मला ’दानव’ म्हणायचे..
रोज संध्याकाळी मॅकफारलिन पार्क वर आधी १-१.३० तास क्रिकेट, आणि मग १-१.३० तास टेनिस.. जमलं तर पार्कच्या १.१ मैल जॉगिंग ट्रॅकवर २-३ राउन्डस..
टॅम्पा मधे १५ कि.मि. धावलेलो, तेव्हा स्टामिना बऱ्यापैकी होता.. ह्या वर्षी मुंबई मधे half marathon धावलेलो, तेव्हा ’endurance’ कामी आलं होतं..
Weaknesses: ligament behind right knee आणि स्टामिना
स्टामिना बद्दल न बोललेलंच बरं..
मुंबई half marathon नंतर जवळ-जवळ ३-४ महिने उजव्या गुडघ्या मागचं ligament दुखत होतं.. रोज नाही.. पण पुण्यात टेकडीवर गेलं, तिथे जॉगिंग केलं.. की अर्ध्या तासा नंतर ते ligament दुखायचं..
VoF ट्रेक वर त्या ligament दुखण्याचीच भिती होती.. पण thank God! तसं काही झालं नाही..
Opportunity: motivation/challenge आणि timing improvement
३ पैकी निदान २ तरी half marathon पूर्ण करायच्या आहेत.. rather, तीनही पूर्ण करायच्या आहेत..
मागच्या वेळेस मुंबई मधे २ तास ४८ मिनिट लागले होते.. ह्या वेळेस निदान एक तरी २.३० तासात पूर्ण करायची आहे..
Threats: आळस आणि recovery time
सोमवार सप्टेम्बर २९ पासुन रोज सकाळी ६ वाजता उठुन जॉगिंग सुरु केलं आहे.. मधे फक्त ३ दिवस मनाली आणि रोहतांग पासला गेलो, तेव्हा जॉगिंग केलं नाही... दिल्ली half marathon करता ३१ दिवस राहिले आहेत.. रोज सकाळी प्रचंड आळस असतो.. तो आळस झटकुन प्रॅक्टिस करायची आहे.. स्टॅमिना वाढवायचा आहे.. आणि महत्त्वाचं म्हणजे एक half marathon झाली की नंतर लगेच लवकर वेळेत recover व्हायचं आहे.. पुढची half marathon पळायला..
सकाळी जॉगिंग करताना पूर्वेच्या उगवत्या सूर्याकडे पाहतो मी..
Every step that I run, I keep telling myself "no pain"..
आंधियों से झगड रही हैं लौ मेरी..
अब मशालों सी बढ रही हैं लौ मेरी..
नामो निशान.. रहे ना रहे..
यह कारवां.. रहे ना रहे..
उजाले मैं पी गया..
रौशन हुआ जी गया..
क्यों सहते रहे..
रुबरु.. रौशनी....
पुढचे ३१ दिवस... रोज प्रॅक्टिस करायची आहे.. आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे..
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर Michael Clarke म्हट्ला तसं,
"the pain of discipline is preferable to the pain of disappointment"..
२१ कि.मि. पळताना प्रचंड आनंद आणि वेदना होतात..
एका ठराविक अंतरा नंतर, पाय दुखतात.. मधेच सोडावंसं वाटतं..
DJ म्हणतो तसं.. "after the body reaches its limit, the mind takes control over the body"..
अशा वेळेस मुंबई मधे पळताना रॉकी मधला Sylvester Stallone आठवलेला..
बॉक्सिंग मॅचची तयारी कराताना फिलाडेलफिया Musuem of Artच्या पायऱ्या, "Gonna Fly Now" गाण्यावर, पळत चढणारा रॉकी आठवलेला..
रॉकीच्या "eye of the tiger" गाण्यानी inspire झालेलो..
कितीही वेदना झाल्या तरी सारखं स्वत:ला रॉकी सारखं सांगत होतो.. "no pain".. "no pain"...
बऱ्याच वेळा self-doubt उदभवतो.. भिती वाटते.. आपण करु शकु का नाही..
मग आठवतो म्हातारा रॉकी.. आत्मविश्वास हरवुन बसलेल्या स्वत:च्या मुलाला सांगणारा..
I'd hold you up to say to your mother, "this kid's gonna be the best kid in the world. This kid's gonna be somebody better than anybody I ever knew." And you grew up good and wonderful. It was great just watching you, every day was like a privilige. Then the time come for you to be your own man and take on the world, and you did. But somewhere along the line, you changed. You stopped being you. You let people stick a finger in your face and tell you you're no good. And when things got hard, you started looking for something to blame, like a big shadow. Let me tell you something you already know. The world ain't all sunshine and rainbows. It's a very mean and nasty place and I don't care how tough you are it will beat you to your knees and keep you there permanently if you let it. You, me, or nobody is gonna hit as hard as life. But it ain't about how hard ya hit. It's about how hard you can get it and keep moving forward. How much you can take and keep moving forward. That's how winning is done! Now if you know what you're worth then go out and get what you're worth. But ya gotta be willing to take the hits, and not pointing fingers saying you ain't where you wanna be because of him, or her, or anybody! Cowards do that and that ain't you! You're better than that! I'm always gonna love you no matter what. No matter what happens. You're my son and you're my blood. You're the best thing in my life. But until you start believing in yourself, ya ain't gonna have a life. Don't forget to visit your mother.
३१ दिवस बाकी आहेत..
अदिती सारखं कुठलीही भिती न बाळगता मला एक उंची गाठायची आहे..
रोजच्या आयुष्यात एक छोटीशी वेगळी मजा करणाऱ्या त्या सिक्युरिटी गार्ड सारखं सायकल वरुन उडी मारुन ते सुख उपभोगायचं आहे..
रॉकी सारखं "no pain" म्हणत स्वत:चे दोन्ही हात आभाळाकडे उंचावुन उभं रहायचं आहे..
I wake every morning at 5.45 before the alarm thats supposed to go off at 5.55.. and I hit the ground.. listening to music.. breathing the fresh early morning air.. watching the gardeners watering the flower beds.. smile at the kids waiting for their school bus.. and tell myself with every step..
तुझमें अगर प्यास हैं..
बारिश का घर भी पास हैं..
रोके तुझे कोई क्यों भला..
संग संग तेरे आकाश हैं..
तु धूप हैं.. छम से बिखर..
तु धूप हैं.. छम से बिखर..
तु हैं नदी.. ओ बेखबर..
बह चल कहीं.. उड चल कहीं..
दिल खुश जहां... तेरी तो मंज़िल हैं वहीं...
as the guitar strings hit the crescendo, my pace increases too..
and I keep telling myself with every breath that I take..
"No Pain"..."No Pain"...