VoF ट्रिप : Part V

दिवस ५: बुधवार, २७/८/०८ हेमकुंड-साहिब

एक महिना उलटुन गेला आहे.. आज विश्वास बसत नाहीये.. आम्ही खरंच हेमकुंड-साहिब चढलेलो का??
त्या दिवशी सकाळी ६.३०च्या सुमारास मी आणि DJ नी हेमकुंड-साहिबची वाट पकडलेली..गेल्या दोन दिवसात जवळ-जवळ ३० किलोमिटर ट्रेक केले होते.. घांगरिया ते हेमकुंड फक्‍त ६ कि.मि..
प्रश्न अंतराचा नव्हता.. challenge होतं उंचीचं... ९५०० फुटांवरुन १४००० फुट गाठायचं होतं!
ट्रिपच्या आधी गुल्लुनी सांगितलेलं.. हेमकुंडचा ट्रेक अवघड आहे.. पण तुम्ही दोघं करु शकाल.. आदल्या दिवशी महेंद्र गाईडनी पण तसाच विश्वास दाखवला होता आम्हा दोघांवर..

आदल्या संध्याकाळी फूलो की घाटी वरुन परत येताना अचानक बंगलोरच्या माझ्या फ्रेंच मदाम, लक्ष्मी, भेटलेल्या.. तब्बल ४.५ वर्षांनी!! आणि गंमत म्हणजे त्यांनी मला पूर्ण नावानिशी ओळखलं.. त्या आणि त्यांचा नवरा सूर्या दोघं बंगलोरच्या एका ग्रुप बरोबर आलेले.. आमच्या आदल्या दिवशी फूलो की घाटी आणि त्या दिवशी हेमकुंड! दोघं नवरा-बायको वयानी ४५-५० असतील.. उल्लेखनीय गोष्ट होती ती म्हणजे सूर्या हेमकुंडचा ट्रेक चढुन गेलेले!! मदामला विचारलं तेव्हा त्या म्हटल्या की सूर्या रोज ८ कि.मि. जॉगिंग करतात!!

जगाच्या एका कोपऱ्यात असं कोणी जुनं ओळखीचं व्यक्‍ती भेटणं (पुण्यात मला कुठेही, कोणीही ओळखीचं भेटतं.. पण ह्या ठिकाणी कोणी भेटेल असं वाटलं नव्हतं).. मग काही जुन्या आठवणी येतातच..शिवाय ४-४.५ वर्ष भेट नव्हती.. अधुन-मधुन लक्ष्मी मदामशी ई-मेलवर संपर्क होतो.. तरी त्यांनी चौकशी केली.. फ्रेंच एकत्र शिकणारे बाकीचे मित्र, कोण, कुठे काय करत आहे.. अशा गप्पा झाल्याच... मदामनी पण आम्हा दोघांना हेमकुंडच्या ट्रेक करता शुभेच्छा दिल्या... बंगलोरला कधी गेलो की त्यांना भेटायचा वादा झालाच...

प्रॉब्लेम एकच होता.. दिल्ली मधे गेल्या ३ महिन्यात कंपनीच्या गेस्ट-हाऊस मधे राहुन - नाश्त्याला छोले-पुरी, ऑमलेट-ब्रेड, आलु पराठा; लंच/डिनरला पनीर, काली दाल, राजमा, आलु, मलई केक, गुलाब-जाम, आईस-क्रिम ई. खाऊन वजन ५-६ किलो वाढलेलं.. सकाळी ८.३०/९ ते रात्रीचे ९/१० वाजे पर्यंत ऑफिस मधे दिवसातुन सहज चहा/कॉफीचे १०-१२ कप होतात... शिवाय जॉगिंग बंद (not that i ever jogged regularly in life).. त्यामुळे स्टॅमिनाची वाट!!

स्वत:ला एकच सांगत होतो... slowly, but surely.. हा ट्रेक पूर्ण करायचा आहे..ट्रेक सुरु केला, तेव्हा हलका पाऊस पडत होता.. चहु बाजुचे पर्वत ढगांमागे लपलेले होते..आमच्या बरोबर एक सरदारजी चाचा-भतिजा जोडगोळी होती.. सुरुवातीचीच वाट प्रचंड steep.. आणि त्यात हवा फारशी चांगली नाही..

ते चाचा खड्या पंजाबी मधे आम्हाला म्हणाले,
"आज मौसम भी बडा खराब हैं.. और रास्ता भी कठिन.. लेकिन कोई गल नहीं.. इसे भी पार कर लेंगे.. वाहे गुरु की क्रिपा हैं.. वाहे गुरु दा खालसा! वाहे गुरु दी फतेह!"

ह्या ट्रेक मधे ९०% सगळे सरदारजी मंडळी भेटणार होते आम्हाला.. कोणी पंजाबच्या कानाकोपऱ्यातुन आलेले.. तर कोणी दिल्ली, मुंबईहून, तर कोणी कनेडाहून!! कोणी आमच्या सारखं पायी चढत होतं.. तर कोणी घोड्यावरुन.. तर कोणी पालखीतुन.. कोणी ७-८ वर्षाचं.. तर कोणी ६०-६५ वर्षांचं!! कोणी पायात आमच्या सारखं मजबुत ग्रिप असलेले बूट घातलेले.. बाटा, रीबॉक, नाईके, ऍडिडास.. तर कोणी साध्या स्लिपर्स किंवा रबरी/प्लॅस्टिकचे काळे पावसाळी बूटांमधे! कोणी आमच्या सारखं ट्रॅक पॅन्ट, स्वेटर/जॅकेट घालुन.. तर कोणी पायजमा-झब्ब्या मधे.. अंगावर एखादं ब्लॅन्केट ओढलेलं.. किंवा ते देखिल नाही!

दमलो किंवा खचलो की डोंग्रातुन कुठुनतरी एक जोरदार आवाज निनादायचा.. आणि आम्ही पण त्या आवाजाला तितक्याच ताकदीनिशी उत्तर द्यायचो,
"बोले सो निहाल! सतस्रियकाल!!"
आणि मग सगळी दमछाक सारुन पुन्हा चढाई सुरु व्हायची!

नागमोडी वळणांच्या असंख्य गणती मधे एक कट्टा आठवतो.. तिथे बसुन पाणी प्यायलो.. DJच्या आईनी पाठवलेले बेसनाचे लाडु हाणलेले एक-एक.. आणि DJच्या फोनवरुन ऐकलेलं ते भजन..
अबीर गुलाल, उधळीत रंग।
नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंग॥

डोळे मिटलेले.. स्वत:ची जाणीव फक्‍त स्वत:च्या श्वासातुन होत होती... देह हरपणं कशाला म्हणतात, ते जाणवलं तेव्हा..life offers some sublime moments.. when you forget yourself.. and become one with your surroundings.. that was one such moment..

पालखी धरणारे ते चार गडी विश्रांती करता थांबले, तेव्हा पालखीत बसलेले ते वृद्ध सरदारजी स्वत: एका हातात काठी घेऊन, आणि दुसरा हात एका गडीच्या खांद्यावर टाकुन, हळु-हळु करत, जवळ-जवळ एक किलोमिटर चढलेले!
DJ म्हणतो तसं.. faith can indeed help move mountains!

जस-जसं आम्ही हेमकुंडच्या जवळ पोचत होतो.. तसं ऑक्सिजन कमी होत होतं.. धुकं आणखिन दाट होत होतं.. थंडी वाढत होती.. ब्रम्हकमळं दिसु लागली.. ज्या पर्वतांकडे आम्ही घांगरियातुन आ वासुन बघत होतो, ते आमच्या समोरासमोर आले होते..

तब्बल ४-४.३० तासानी आम्ही आमचं ध्येय गाठलं!
दोघांच्या चेहऱ्यावर आलेली खुशी की लहर खरंच जबरदस्त होती!

गुरुद्वारामधे जायच्या आधी हेमकुंडात एक डुबकी घ्यायची होती.. हेमकुंड म्हणजे बर्फाचं कुंड.. वर्षातल्या १२ पैकी ८ महिने त्या कुंडाचं पाणी म्हणजे बर्फ असतो.. आणि त्या दिवशी तर त्या कुंडावर इतकं दाट धुकं होतं की ३-४ फुट समोरचं काहीच दिसत नव्हतं!!!अशा अवस्थेत, इतक्या गार पाण्यात डुबकी मारायला मी अजिबात तयार नव्हतो..

DJ डुबकी मारुन आला.. चक्क डोकं पाण्याखाली ठेऊन!!
इतकं लांब येऊन, फक्‍त ते पाणी प्रचंड गार आहे म्हणुन त्यात डुबकी मारायची नाही - हे काहीसं पटलं नाही..
म्हणुन मग मी पण पाण्यात गेलो.. मोजुन ५-७ सेकंद असेल मी त्या पाण्यात.. म्हणतात की जेव्हा मरण समोर येतं, तेव्हा एका क्षणात तुम्हाला तुमचं सगळं आयुष्य दिसतं.. तसंच काहीसं झालेलं..

गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.. शेजारच्या लक्ष्मण-मंदिरात पण दर्शन घेतलं.. गुरुद्वाराचं लंगर मधे मिळणारी तांदळाची खिचडी खालली.. दमुन-भागुन आलेलो आम्ही दोघं.. आणि त्या गार, misty, पावसाळी वातावरणात त्या गरम खिचडीची वाफ.. कुछ और ही मज़ा था.. आणि त्या नंतर लंगर मधेच मिळणारा स्टीलच्या पेल्यातला तो गरम चहा!!

हेमकुंडच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या ग्लेसियर कडे जायचं होतं.. पण हेमकुंडावर धुकं इतकं दाट होतं.. समोरचं काहीच दिसत नव्हतं.. तिथल्या लोकांनी आडवलं.. पलीकडे जाणं फारच धोकादायक होतं..
दुपारी २-२.३० नंतर हेमकुंड-साहिबला थांबु देत नाहीत.. म्हणतात की ऑक्सिजनची पातळी फारच कमी होते..दर्शन आणि लंगर तर झालेलं.. आणि पावसाचं सावट होतच.. १२-१२.३० ला आम्ही खाली उतरायला लागलो..

अतिशय steep slope असलेला पांढऱ्या दगडांचा रस्ता.. चढताना जितकं दमायला होतं.. उतरताना तितकीच काळजी घ्यावी लागते.. कुठे पाय घसरला.. किंवा कड्यावरुन खाली दरी पाहिली.. हलक्या पावसामुळे तसंही सगळं निसरडं झालेलं.. आणि त्या दाट धुक्यात समोरचं फारसं काहीच दिसत नव्हतं.. मधेच जर कधीतरी उघडुन आलं, तर मात्र तो खाली उतरणारा नागमोडी वळणांचा सुंदर रस्ता नुसताच पाहत बसावा असं वाटायचं..

३ कि.मि. खाली उतरलो, तसा पावसाचा जोर प्रचंड वाढलेला.. समोरचं काहीच दिसत नव्हतं.. मग, तिथेच एका ढाब्यावर थांबलो.. मस्त गरम एक कॉफी घेतली.. पलीकडच्या बाकावर ३ जवान दिसले.. विचारलं, तर ते तिघं IFS (Indian Forest Service) ऑफिसर्स होते.. देहरादुनला त्यांचं ट्रेनिंग चालु होतं एक वर्षाचं.. फूलो की घाटी आणि हेमकुंड-साहिबचा ट्रेक हा त्यांच्या अभ्यास-क्रमाचा एक भाग होता..but the most amazing thing was.. त्या दिवशी सकाळी तो २५-३० ऑफिसर्स चा ग्रुप गोविंदघाट ते घांगरिया असा १३ कि.मि.चा ट्रेक चढुन, लगेच घांगरिया वरुन हेमकुंडला जात होते!!! ते सुद्धा अशा हवामाना मधे!!

तिघांपैकी दोघं कर्नाटकाचे होते, तर तिसरा झारकंडचा... त्यांना त्यांचं पोस्टिंग मिळालेलं.. एक आसामला, दुसरा छत्तिसगढला, तर तिसरा कर्नाटकात.. बदली कुठेही होवो, पण पुढचे ३५-३६ वर्ष तेच त्यांचं नविन डोमिसाईल राज्य होतं.. २४-२५ वर्षांचं वय त्यांचं.. UPSC अशा अवघड परीक्षेत यश मिळवणारे भारतातले सगळ्यात हुशारांपैकी असे ते तिघं.. felt really proud after meeting them..

पावसाचा जोर कमी झाला तसं आम्ही खाली उतरायला निघालो.. ते तिघं वर जायला..
life makes you meet so many different people.. at so many crossroads... and the meeting ranges from a few fleeting moments...to a lifetime.. and you fondly remember and cherish each & every memory.. each and every conversation...

घांगरियाला पोचलो, तेव्हा मी आणि DJ प्रचंड खुष होतो.. we had "actually" done it!!
we had overcome all obstacles.. we had triumphed against every challenge..
३ दिवसात आम्ही ४२ कि.मि. ट्रेकिंग पुर्ण केलं होतं..
अब बाकी था.. सिर्फ १३ कि.मि. का रास्ता.. घांगरियासे गोविंदघाट तक!
VoF trip : Part IV

दिवस ४: मंगळवार, २६/८/०८ फुलों की घाटी

रात्री जोरदार पाऊस पडलेला.. गांगरिया मधे पहाटे जनरेटरवर फक्‍त दीड तास दिवे.. ४.३० ते ६..

६.३० वाजता महेंद्र आला.. महेंद्र आमचा गाईड.. गुल्लूनी त्याच्याबद्दल माहिती दिली होती.. निघताना बरोबर दुपारच्या जेवणाकरता आलु पराठे पॅक करुन घेतले..

गांगरियाहून ३ किलोमिटरचा ट्रेक.. फुलों की घाटी म्हणजे एखादी बाग नव्हे.. म्हणजे बागेत शिरल्यावरच फुलं दिसतात.. तसं इथे नाही.. वादी मधे पोचायच्या आधीच महेंद्रनी ट्रेकच्या रस्त्यातच फुलं दाखवायला सुरु केली.. सुरुवातीलाच दिसलं ते ब्लु पॉपी.. छोटंसं, नाजुकसं निळं 'forget me not'.. किंवा aster सारखी दिसणारी, पण वेगळीच असणारी फुलं.. एका पाठोपाठ एक, फुलांची नावं तो सांगत होता..

मधेच रस्त्यात सतत खिदळणारी पुष्पावती भेटली.. खूप हसरी आहे ती.. वर कुठल्यातरी एका ग्लेसियर मधुन जी धावत सुटते ती गांगरियाला तिच्या मैत्रिणीला, लक्ष्मण-गंगेला भेटते..

महेंद्र सांगत सुटला होता.. हे फळ आम्ही जिऱ्या ऐवजी वापरतो.. ही वन-तुलसी आहे.. ह्या टेक्सस ब्राटाला आम्ही आमच्या भाषेत 'थुनेर' म्हणतो.. ह्याच्या पानांचा आम्ही चहा पीतो.. ह्या झाडाच्या पालांची पावडर करुन दुधातुन पीतो, एखादी अंधृनी चोट (internal injury) वर उपाय म्हणुन...

पावलं पुढे पडत होती.. गाईड म्हणुन तो एक-एक सांगत होता.. आणि अजुन तर वादी सुरु पण झाली नव्हती.. हळु-हळु उंचावर पोचल्यावर ती समोर आली.. तिच्या चारही बाजुला उंच-उंच पर्वत.. मधे वाहणारी पुष्पावती.. एका बाजुला दिसणारा प्रचंड नर पर्वत.. लांब समोर दिसणारा गौरी पर्वत आणि त्याच्या अलीकडे दिसणारा ग्लेसियर.. बाजुला दिसणारे सप्तश्रिंगी पर्वत..

एकीकडे दिसत होता एका स्लोपवर पसरलेला पांढऱ्या फुलांचा गालीचा.. समोर होतं पुष्पवतीचं एक बर्फाळ रुपांतर.. नुकतीच जागी झालेली सकाळ जांभया देत होती.. तिचे डोळे ढगांनी झाकलेले..

पांढऱ्या दगडांनी तयार केलेली एक छोटी पायवाट..थेट वादीच्या मधुन जाणारी..चहुबाजुला पसरलेल्या वेगवेगळ्या रंगबिरंगी फुलातुन जाणारी एक वाट.. महेंद्र नावं सांगत होता.. हे जेरानियम.. ते ऱ्ह्युम.. ही लाल-पिवळी आहेत ती वज्रदंती.. हे ऍनेमोने.. ते सायनेनथस.. गंमत वाटली.. भारतातली फुलं.. त्यांची नावं बरीचशी इंग्रजी किंवा लॅटिन.. म्हणजे उद्या तुमचं किंवा माझं नाव असं काहीतरी भन्नाट लाटिन-बिटिन वगैरे असतं तर.. का शेवटी शेक्सपियर म्हणतो तसं.. नावात काय आहे..

गाईड लोकं कहानी मस्त सांगतात.. एक पर्पल रंगाचं फुल दाखवलं त्यानी.. ते म्हणे विषारी असतं.. म्हणे पाकिस्तानी क्रिकेट कोच वुल्मरला ह्या फुलाच्या झाडाच्या मुळांचं विष दिलेलं.. किंवा भूल देणारं फुल.. बरेच लोकं विचारत येतात.. की वादी मधल्या ह्या फुलाचा वास घेतला, तर तुम्ही खरंच झोपुन जाता का.. लगेच वास घेऊन बघितलं.. पण आपल्याला बुवा तसं काही झालं नाही.. अतिशय गोड नैसर्गिक मिनरल वॉटरचा तो झरा.. भोजपत्राच्या (बिर्च) एका वाळलेल्या सालावर पेनानी लिहुन पाहिलं.. कागदापेक्षा किती मुलायम.. आणि महेंद्रनी खायला दिलेली ती छोटी निळी फळं.. आयोडेक्स खाललं असं वाटलेलं.. आणि वाटेवरुन चालत-चालत, सहज फिरवत हात लावलेले ते उत्कट ’टच मी नॉट’..

वर्षातले ७-८ महिने ही वादी बर्फाची जाड अशी दुलई पांघरते.. तेव्हा ही ४००-५०० प्रकारची फुलं दिसत नाहीत.. दिसतात ती बर्फाच्या पांढऱ्या बॅकग्रॉउंडवर सुंदर लाल, पिवळी, हिरवी ऱ्होडोडेन्ड्रॉन्स..

वादीच्या दुसऱ्या टोका पर्यंत जाणारी ती दगडी वाट जवळ-जवळ ८-१० किलोमिटर लांब आहे.. पुष्पावती तर अगदी एखाद्या झऱ्या सारखी वाहते शेवटी तिथे.. तिच्या पात्रात गेलो.. आजुबाजुला त्या गुलाबी, लाल, पांढऱ्या फुलांची शाल.. शूज काढुन, एकमेकांशी bet लावुन त्या अतिशय थंड-गार पाण्यात उभे राहिलेलो मी आणि DJ.. आणि मग तिथेच नदीच्या पात्रात बसुन जेवलेलो.. आणि त्याहून मस्त म्हणजे.. तिथे जमिनीवर काढलेली ती एक तासभर झोप.. वादी मधे एक मस्त गार वारा सुटलेला.. त्या वाऱ्यावर ती सगळी फुलं हसत-डुलत होती.. दुपारचे १२ वाजलेले.. आणि ढगातुन सूर्य वाट शोधत डोळ्यावर येऊ पहात होता.. डोळ्यांवर हलकाच एक हात आडवा ठेऊन झोपलेलो.. इतकी छान झोप सिर्फ नसीबवालों को मिलती हैं..

त्या जागेला जन्नत म्हणु.. की paradise..
so serene, so calm, so beautiful, so pristine..
मदहोष झालेलो.. अजुन काय म्हणु.. नेमक्या शब्दात वर्णन करणं किती अवघड आहे..

उस हसीन वादी में जैसे वक्‍त थम गया हो..
कानो तक पहुचनेवाली हर आवाज़ जैसे उस एक पल में शांत हो गयी हो..
स्वत:शी एकरुप झालो होतो मी.. आणि स्वत:हून अलिप्त देखिल..
निसर्गाशी संवाद साधत होतो मी.. त्याच्याशी मौन पाळत..
वाऱ्याबरोबर हसत होतो मी.. गालावरची रेष न रेष अविचलत ठेवत..
मनात एक तिव्र इच्छा जन्म घेत होती.. कुठलीही असुया न बाळगता..
स्वत:चा शोध घेत होतो.. स्वत:ला त्या वादी मधे हरवुन..
डोळे बंद केले मी.. नजरेत ते अविस्मर्णीय सुख सगळंच्या सगळं सामावुन घ्यायला..

क्यों हैं यह आरजु.. क्यों हैं यह जुस्तजु..
क्यों दिल बेचैन हैं.. क्यों दिल बेताब हैं..

दिन बदले.. रातें बदली..
बातें बदली.. जीने के अंदाज़ भी बदले..

इन लम्हों के दामन में.. पाकीझा से रिश्ते हैं..
कोई कलमा मुहब्बत का.. दोहराते फरिश्ते हैं...

खामोश सी हैं ज़मीन.. हैरान सा फलक हैं..
एक नूर ही नूर सा अब आसमा तलक हैं..

नगमे ही नगमे हैं जागती-सोती फिजाओं में..
हुस्न हैं सारी अदाओं में..
इश्क हैं जैसे हवाओं में..

इश्क हैं जैसे हवाओं में...
VoF: Part III

दिवस ३: सोमवार, दि. २५/८/०८ गोविंदघाट -> गांगरिया १३ कि.मि.

दिवस, तारीख, स्थळ.. इथुन पुढे सगळंच अगदी बेमतलब वाटत आहे.. जन्नतचा एक हसीन रस्ता तो.. गोविंदघाटला जायला मग बद्रिनाथला जाणाऱ्या गुज्जु भक्‍तांच्या बस मधली केबिन देखिल पुरेशी आहे.. त्या भक्‍त मंडळींचे स्तोत्र किंवा प्रार्थना 'तो' ऐकतो तरी का.. का ही त्यांची भाभडी समज.. लख्ख आठवतो तो वळणा-वळणांचा ८-१० फुटी अरुंद रस्ता.. इंच न इंच महत्त्वाचा.. एक इंच सुद्धा गाडी इकडे-तिकडे झाली तरी गेम खल्लास! म्हणुनच प्रार्थना कामास येत असावी...

गोविंदघाट ते गांगरिया.. फक्‍त १३ किलोमिटरचा ट्रेक.. ६००० फुटांवरुन ९,५०० फुटांवर पोचायचं.. तरी बरं.. राजिंदर कुली होता.. आमच्या बॅग्स उचलुन न्यायला.. आणि दिलासा देणारी रस्त्याच्या बाजूनीच वाहणारी लक्ष्मणगंगा.. सतत खळखळणारी.. तिचा आवाज, तिची लय, तिचं रुप.. सगळंच कसं रौद्र.. तरी मोहक..भितिदायक, तरी आकर्षक..

चढताना ह्रुदयाचे ठोके इतके जबरदस्त वाढतात की तिचा तोच खळखळणारा आवाज त्यांच्या पुढे कमी तीव्र वाटतो.. वाटतं की छाती मधे तीच गंगा धडधडायला लागली आहे का.. असेल ही.. तिच्या वाटेत येणाऱ्या दगडांवर फेसाळुन, कोसळुन वाहत राहते.. तेच पाहुन आपल्या ह्रुदयातला रक्‍तप्रवाह प्रभावित होत असेल..

रस्त्यात ठिकठिकाणी ढाबे आहेत.. पराठे, जूस, चहा, कॉफी, पेप्सी, कोक, पार्ले, बिसलेरी, क्रॅक-जॅक.. सगळं काही मिळतं.. अजब आहे.. सगळं सामान घोड्यावरुन पोचतं इथे..

ट्रेकचे शेवटचे ३ किलोमिटर तर खरंच खूप जास्ती दमवतात.. पण एकदा गांगरियाला पोचलो की स्वर्ग सुख अनुभवायला मिळतं..

गांगरिया.. अर्धा-एक किलोमिटर लांबीचं एक अत्यंत छोटं गाव.. ९५०० फुटांवर असणारी थंडी लगेच जाणवणारी.. गावात एकच गल्ली.. गल्लीच्या दोन्ही बाजुला हॉटेल्स, दुकानं.. आणि बऱ्यापैकी शेवटी एक गुरुद्वारा.. वर्षातल्या १२ महिन्यांपैकी फक्‍त ४ महिने गावात लोकं असतात.. बाकीचे ८ महिने ४-५ फुटी बर्फ!

गावात ना वीज आहे, ना फोन.. येणाऱ्या लोकांपैकी ९०% लोकं शीख समाजाचे.. तिथुन हेमकुंड-साहिबला जाणारे...हेमकुंड-साहिबला गुरु गोबिंद सिंहनी तपश्चर्या केली होती.. वर्षातले ८ महिने ते कुंड बर्फाच्छादित असतं.. जून ते सप्टेंबर शीख भक्‍त त्या हेमकुंडाचं दर्शन घ्यायला येतात.. त्या पवित्र कुंडात स्नान करतात..

गांगरिया हे गाव आहे एका वादी मधे..वादी मधुन रस्ता दोन बाजुला जातो.. डाव्या हाताला फुलों की घाटी.. तर उजवीकडे हेमकुंड-साहिब.. फुलों की घाटी हा ३ किलोमिटरचा ९५०० ते ११५०० फुट असा सोपा ट्रेक.. तर हेमकुंड-साहिब हा ६ किलोमिटरचा ९५०० ते १४००० फुट असा थोडा अवघड असा ट्रेक..

मनात ठरवलं होतं, ते लक्ष्य फार जवळ होतं.. समोरच दिसत होतं.. दोन दिवसात, ह्या दोन ठिकाणी जायचं होतं.. practice, stamina.. ह्या सगळ्याच्या पलीकडे, खरं म्हणजे अभावापुढे.. एक जिद्द असते.. एक मनाची तयारी असते.. एक आत्मविश्वास असतो.. एक इच्छा असते.. हेच सगळं तारुन नेणार होतं..

रात्री झोपलो, तेव्हा ढग देखिल वादी मधे येऊन आमच्या कुशीतच झोपले.. आमच्या सारखे ते पण दमलेले, थकले असतील.. पुढचे दोन दिवस त्यांना देखिल आमच्या बरोबर फिरायला यायचं होतं.. फुलों की घाटी आणि हेमकुंड-साहिब बघायला...

अंधारात दिसत होते ते गांगरियाच्या वादीला सामावुन घेणारे विशाल पर्वत.. ज्यांच्यापुढे आपण माणुस म्हणुन किती क्षुद्र आहोत..ह्याची जाणिव क्षणा-क्षणाला होत राहते.. अगदी स्वप्नात सुद्धा..डोळे मिटताना आठवले ते त्या संध्याकाळी भेटलेल्या, चेन्नईहुन आलेल्या एका रिटायर्ड तमीळ काकांचे शब्द..
"ह्या पर्वतांसमोर एका नास्तिकाला उभं केलं.. तर तो देखिल परमेश्वरावर विश्वास ठेवायला सुरु करेल.."
VoF trip: Part 2

दिवस २: रविवार, दि. २४/८/०८ ऋषिकेश -> जोशीमठ (२५० कि.मि.)


पहाटे ४.३० वाजता आम्ही दोघं हॉटेल बसेरा मधुन बाहेर पडलो.. आदल्या रात्री टॅक्सी ड्राईव्हरनी आम्हाला सुमो सुटतात, त्या चौकातच सोडलं होतं.. बसेरा हॉटेल त्याच चौकात होतं..

चौकात एक चहाची टपरी चालु होती.. टपरीवाल्याला विचारलं,
"जोशीमठ के लिये सवारी/गाडी यहीं से मिलेगी?"
- "हां साब!"
"भैय्या एक चाय पिला दो....ह्म्म्म... साथ में यह बिस्किट भी दे दो.."
चहाच्या टपरीवरची बिस्किटं मला का कुणास ठाऊक, पण सॉलिड आवडतात.. एखाद्या स्थानिक बेकरीची असतात.. एक मस्त चव असते..

चहात बिस्किट बुडवुन, त्याला विचारलं..
"भैय्या, आप इतनी सुबह-सुबह दुकान खोल देते हो?"
-"अरे साहब! मैं तो रात भर दुकान चलाता हुँ... शाम को ७-८ बजे आता हुँ.. फिर सुबह ९-१० बजे तक रहता हुँ.."

"रात को कौन आता हैं?"
-"साहब.. रात को काफी लोग आते-जाते हैं.. काफी गाडियां आती-जाती हैं इस रस्ते पर.."
मग कळलं.. की तो १५-२० फुटी रस्ता NH-५८ चा भाग आहे!!!

त्या भागात सुमो म्हणजे फक्‍त सुमो नाही, तर सुमो, ट्रॅक्स, बोलेरो, स्कॉर्पियो.. ह्या सगळ्या गाड्या सुमो असतात...जोशीमठ सांगितल्या वर आम्हाला एक गाडी मिळाली.. आम्ही पहिले/दुसरेच असल्यामुळे, आम्हाला पुढची सीट मिळाली, म्हणुन आम्ही खुष...
एका सुमो मध्ये १० लोकं बसवतात.. पुढे दोन, मधे ४ आणि मागे ४!!

सीट भरवण्या करता आम्ही थांबलेलो.. एक तास झाला... दोन झाले.. शेवटी ६.३०-७ वाजता निघालो! आधी माहिती असतं तर निदान झोप तरी काढली असती हॉटेल मधेच! तशी आपली आणि झोपेची मस्त गट्टी आहेच.. कधीही, कुठेही झोपु शकतो मी...

ऋषिकेशहून गाडी सुटली.. पुढे बसुन माझी अधुन-मधुन झोप चालुच होती.. सगळा पहाडी रस्ता.. एका बाजुला पहाड.. तर दुसऱ्या बाजुला खाली वाहणारी गंगा... नागमोडी वळणं घेत घेत एक पहाड चढायचा.. तो ओलांडुन, पुढचा पहाड आपल्या तयारी करता उभा सज्ज दिसायचा.. रसत्यात एखादं छोटं गाव.. किंवा छोटंसं शहर..

९-९.१५ वाजता आम्ही घाटातल्या एका ढाब्यावर नाश्त्या करता थांबलो.. जाम भूक लागली होती.. रात्री जेवलो नव्हतो.. DJच्या आईनी बेसनाचे लाडु दिले होते त्याच्या बरोबर.. ते खालले होतेच..
ढाब्यावाल्याला विचारलं.. काय आहे नाश्त्या करता.. तर म्हणाला.. आलु पराठा और छोले!
म्हटलं येऊ देत दोन प्लेट!

ढाब्याच्या समोर उभं राहुन दोन्ही हात वर करुन एक मस्त आळस दिला.. ढाब्याच्या मागे एक खोल दरी होती.. दोन्ही-तीन्ही बाजुला उंच डोंगर.. आणि त्या डोंगरांवर खेळणारे पांढरे शुभ्र ढग.. पावसाची काही चिन्हं नव्हती.. it was a beautiful, bright sunny sunday...

sunday आणि आलु पराठा ह्यावरुन बंगलोरची आठवण झाली.. दोन वर्ष कॅम्पस मधे हे combination अगदी अटूट होतं.. रविवारी ब्रेकफास्टला आलु पराठा हमखास असायचा.. पराठ्यावर अमुल बटर.. सोबत दही.. आहाहाहा!!

ताबडतोब मुंबईला अमितला फोन लावला.. अमित, मी, DJ होस्टेल मधे शेजारी-शेजारी.. तो पण यायचा होता ह्या ट्रिप करता.. पण जमलं नाही.. त्याला आमच्या रविवारच्या ब्रेकफस्ट बद्दल सांगितलं.. आणि आजुबाजुच्या सुंदर परिसराचं वर्णन केलं..

देवप्रयाग, श्रीनगर आणि रुद्रप्रयाग ओलांडुन आम्ही कर्णप्रयागला दुपारी १२.३०ला पोचलो.. आमची गाडी तिथपर्यंतच जाणार होती.. ह्या प्रत्येक प्रयागाला गंगाच्या दोन नद्या एकत्र येतात.. ’प्रयाग’ ह्या शब्दाचा साक्षात्कार मला तेव्हा झाला! :)

कर्णप्रयागला गाडी मिळाली ती चमोली करता.. पुढच्या सीटवरुन आम्ही ४ लोकांच्या मधल्या सीटवर आलो.. मी आणि DJ दोघंही खात्या-पित्या घरचे!! त्यामुळे हे जरा अवघड प्रकरण होतं.. मागे-पुढे बसुन, श्वास रोखुन बसुन.. काहीतरी करुन आम्ही adjust केलं.. करावंच लागलं!

तरी मी खिडकीत बसलेलो, त्यामुळे मस्त वारा खात-खात तो २ तासाचा प्रवास केला.. रस्त्याच्या कडेच्या इतक्या जवळुन आमची गाडी जात होती.. कितीतरी वेळा असं वाटायचं की आता आपण खाली दरी मधे गेलोच!!

चमोली मधे आम्ही आणखिन तिसऱ्या सुमो मधे ट्रॅन्सफर झालो! ह्या वेळेस तर एकदम मागाच्या सीट्स वर! and the ride does get quite bumpy when you are sitting on those last seats that face each other!!

जोशीमठ मधे कुठे रहायचं हे आमच्या बरोबर बसलेल्या एका माणसाला विचारलं.. हॉटेलं तर चिक्कार आहेत.. पण त्यानी GMVNच्या गेस्ट-हॉऊस बद्दल सांगितलं.. GMVN म्हणजे गढवाल मंडल विकास निगम.. similar to our MTDC..

४.३०-५ वाजता जोशीमठला पोचलो.. तेव्हा अंगातली सगळी हाडं मस्त शेकुन निघाली होती.. सुमोच्या टपावरुन आमच्या rucksacks घेतल्या.. समोरच GMVN गेस्ट-हाऊस होतं.. नशीब चांगलं होतं.. बुकिंग नव्हतं आमचं, तरी रुम मिळाली...

थोडं फ्रेश होऊन त्या गावात एक चक्कर मारली.. बऱ्यापैकी मोठं होतं.. प्रत्येक घराच्या समोर एक छोटा बगीचा.. बगीच्या मधे सुंदर फुलं.. गावात शंकराचार्यांचा एक मठ आहे.. नरसिंहाचं एक मंदिर आहे.. तिथे दर्शन घेतलं.. गावाचं एक टोक दुसऱ्या टोकापर्यंत एखादं किलोमिटर.. चालता-चालता DJ फोटो काढत होता.. समोरच्या पहाडावर एक नागमोडी रस्ता दिसला.. त्याच अफलातुन रस्त्यावरुन आम्ही पुढच्या दिवशी गोविंदघाटला जाणार होतो..

रात्री जेवायला GMVN गेस्ट-हाऊस मधेच बसलो होतो.. जेवताना खास गढवाली म्हणुन आलु ठेंचवानी ही भाजी घेतली होती..तेव्हा तिथे गुज्जु पर्यटकांचा एक ग्रुप आलेला.. ग्रुप मधे सगळे ३०-४० ह्या वयोगटातले.. ग्रुप मधल्या एका गुज्जु काकांकडे बघत मी म्हट्लं,
"DJ, हे काका फुल-टु GTM आहेत!"
-"GTM?"
"गावठी turned modern! अरे कॉलेज मधे नेहमी पंजाबी ड्रेस घालणारी पोरगी एक दिवस अचानक जीन्स घालते, तेव्हा तिला GTM म्हणायचो.. तसेच हे काका आहेत.."
-"क्यों?"
"अरे बघ ना... काकांनी शॉर्ट्स घातल्या आहेत.."
-"त्यात काय विशेष? शॉर्ट्स कितीतरी लोकं घालतात..."

"अरे टि-शर्ट बघ.. एक तर पिंक कलर.. आणि कसलं ढिनचाक design आहे..."
-"ते गुज्जु आहेत!"

"बरं.. कमरेला काळं पॉऊच..."
-"ते काका आहेत..."

काही केल्या DJ मानत नव्हता की ते काका GTM आहेत..शेवटी मी ब्रम्हास्त्र काढलंच..
"DJ, काकांनी फॉर्मल काळे नायलोन सॉक्स आणि काळे लेदर शुज घातले आहेत! आता बोल!!"
-"येस्स, Mr Kulkarni!! गुज्जु काका नक्कीच GTM आहेत!! कोई शक नहीं!!" :)))

************************
DJनी पिकासा वर ट्रिपचे फोटो टाकले आहेत.
त्याची लिंक: http://picasaweb.google.com/dhananjays02/ValleyOfFlowers
I am sure you will love the pictures - Nikon D80 खरंच जबरदस्त आहे.. आणि DJ सुद्धा!! :)
you will notice that both of us dont feature in the snaps - DJ doesnt feature since he was clicking the snaps; and we did not want the beauty of any of the pics to be distorted by my presence :D

And here's a link to a short post from him on our trip -
http://a-reluctantbloggers-blog.blogspot.com/2008/09/valley-of-flowers.html
as per a mutual decision on the division of labour, while he was to click the pictures, I am supposed to do the write-up... i am still trying to finish the same.. wonder if I can do justice to this beautiful place.. nevertheless, u guys have the pictures now, to marvel at one of Mother Nature's beautiful creations!
Valley of Flowers trip: Part 1

कहानी शुरु होती हैं करीब दो साल पहले..

"तु बोस्टन/न्यु हॅम्पशायरचे फॉल कलर्स पाहुन इतका खुष झाला आहेस... Valley of Flowers बद्दल ऐकलं आहेस का? तिथे जाऊया कधीतरी.." - इति धनंजय, उर्फ DJ..

मी आणि DJ MBA ला बरोबर होतो.. २ वर्ष एकत्र राहिलो होस्टेल वर.. आणि सध्या एकाच कंपनीत.. ६ साल की दोस्ती हमारी..

VoF ला जायचं तर होतं.. पण तिकडे फक्‍त जून ते ऑगस्ट महिन्यात जाता येतं.. बाकीचे महीने संपूर्ण valley बर्फाच्छादित असते.. दर वर्षी फक्‍त ३ महिने ती बहरुन येते..

गेल्या जून मध्ये मी अमेरिकेहुन परत आलो, तेव्हा DJ मेलबर्नला जाऊन बसला.. शेवटी ह्या वर्षी योग जुळुन आला..मी तर गेले २-३ महिने गुडगावमधेच.. ट्रिपची logistics organisation ची जबाबदारी माझी होती.. म्हणजे तिकिटं.. हॉटेल बुकिंग्स... त्या मधे मी फक्‍त DJचं मुंबई -> दिल्ली, दिल्ली -> मुंबई ही तिकिटं... आणि आमचं दोघांचं दिल्ली -> हरीद्वार एवढंच बुकिंग केलं होतं.. बाकी सगळं run-time decision-making!!

कसं जायचं.. हे सगळं एका website वरुन ठरवलं होतं..
http://www.flowersofindia.net/vof-trek/index.html

१५ ऑगस्टला DJ मेलबर्नहून परत आला..
ट्रिप आठ दिवसाची ठरवली होती.. शनिवार २३ ऑगस्ट ते शनिवार ३० ऑगस्ट..

**************************

दिवस ०: शुक्रवार, दि. २२/८/०८ गुडगाव

संध्याकाळी ५.३०-६ च्या सुमारास, माझा फोन वाजला:
DJ: "केतन! मी राजधानी मधे बसलो आहे. उद्या सकाळी ८.३० ला पोचतो. स्टेशनला ये. तयारी झाली का ट्रिपची?"
मी: "हो..झालीच आहे.. थोडंसं बाकी आहे.. उद्या भेटुया सकाळी.."

DJ: "जाड्या!! नक्की वेळेवर पोच... नाहीतर मला वाट पहायला लावशील.. नेहमी सारखं!"
मी: "u know me well! dont worry, i'll be there... on time.." :))

फोन ठेवला.. काम संपवायला घेतलं.. ऑफिस मधेच १० वाजले... ९ वाजता अंशुमनचा फोन आला.. अंशुमन, उर्फ गुल्लु.. another MBA batchmate, working in Gurgaon.. गेल्याच आठवड्यात तो VoF ट्रिप करुन आला होता.. त्याच दिवशी सकाळी त्याला फोन केला होता.. ट्रिप बद्दल विचारायला..

"केकु, कल मेरे घर पे अपने ३-४ दोस्त आ रहे हैं.. तु भी आ जा.."
~"अरे गुल्लु!! मैं तो कल VoF जा रहा हुँ.. भूल गया साले... और तु मुझे उसके trip details email करने वाला था.. वह कर दिये तुने??"

"ohh shucks!! मैं तो भूल ही गया.. चलो कोई नहीं.. तेरे पास कागज़ और पेन हैं? लिख ले.. मैं बताता हुँ.."
मग कुठे रहायचं.. कुठे गाईड करायचा.. अशा ४ ओळी लिहुन घेतल्या...

गुल्लुचा फोन ठेवला.. तर USहून बॉसचा फोन..
"केतन, तुम अगले हफ्ते छुट्टी पर जा रहे हो?"
~"हाँ!"
"actually, अगले हफ्ते, thursday को एक important client meeting हैं.. उसके लिये थोडा जल्दी वापस आ सकते हो?"
~"नहीं!"
"कोई chance नहीं जल्दी वापस आने का?"
~"बिल्कुल नहीं!"

फोन ठेवला.. काम थोडं संपवलं.. राहिलेलं घरी घेऊन गेलो.. जेवण, काम आणि मग पॅकिंग मधे रात्रीचा १.३० वाजला.. सकाळी लवकर उठायचं होतं..

पिछले दो साल जिस ट्रिप के ख्वाब देखे थे.. वह ट्रिप सच बनने जा रही थी..

**************************

दिवस १: शनिवार, दि. २३/८/०८ नवी दिल्ली -> हरीद्वार -> ऋषिकेश

नवी दिल्ली स्टेशनवर मला ऑफिस मधल्या एका मित्रानी सोडलं.
DJ पण सकाळी ८.३०-९ वाजता वेळेवर पोचला. आमची हरीद्वारची गाडी दुपारी होती.

मधल्या वेळेत tp केला.
"DJ, मला थोडी शॉपिंग करायची आहे. ट्रिप करता शुज घ्यायचे आहेत. आणि गुल्लुनी सांगीतल्या प्रमाणे एखादा स्वेटर घ्यायचा आहे!"

दिल्ली मेट्रोनी कॉनॉट प्लेसला पोचलो..
दिल्ली मधे सध्या ३५-३६C temperature आहे.. इतक्या गरम हवेत इथे स्वेटर कोण देणार...
मित्राला फोन लावला,
"अबे सिद्धार्थ! इस गर्मी के सिझन में यहां CP में स्वेटर कहां मिलता हैं.. बता जरा..."

उन्हात फिरुन खरेदी झाली... आपलं सगळं नेहमीच असं last minute shopping असतं...

दुपारी मस्त जेवलो... आणि स्टेशन वर जाऊन गाडी पकडली..
ट्रेन मधे DJ बरोबर गप्पा (नोकरी निमित्त crib session) आणि एक मस्त झोप काढली...

रात्रीचे ८ वाजता हरीद्वारला पोचलो..ऋषिकेश करता टॅक्सी पकडली..
सोबतीला एक NRI काका-काकु भेटले.. हरीद्वार-ऋषिकेश साधारण पंचवीस-एक किलोमिटर.. जायला एखादा तासच लागतो...

टॅक्सी मधे गप्पा सुरु झाल्या..
काका-काकु मलेशियाचे नागरिक.. हरे रामा, हरे कृष्ण वाले भक्‍त.. ऋषिकेशला त्यांचे कोण एक गुरु होते, त्यांच्या आश्रमात जात होते.. गोकुळाष्टमी निमित्त..

काका फारसे उंच नव्हते.. मध्यम बांधा.. काकु कदाचित काकांपेक्षा उंच.. आणि size तिप्पट!!
बोलण्या मधे सुद्धा काकु वरचढ.. काका बिचारे शांत.. फक्‍त बायको जे काही बोलेल, त्याला संमती किंवा दुजोरा देणार..

मग आम्ही स्वत:ची तारीफ केली.. आमच्या ट्रिप बद्दल सांगीतलं..ऋषिकेश हून आम्हाला दुसऱ्या दिवशी जोशीमठला जायचं होतं.. २५० किलोमिटरचं अंतर.. संपुर्ण पहाडी रस्ता.. ज्या वरुन फक्‍त दिवसा गाड्या चालतात.. कमीत-कमी ८-१० तासाचा प्रवास..

टॅक्सी ड्राईव्हरला विचारलं,
"भैय्या, हम को कल सुबह ऋषिकेशसे जोशीमठ जाना हैं.. कैसे जा सकते हैं?"
-"देखो साब! सरकारी बससे जाओगे तो १२ घंटे लगेंगे... सुमो से सवारी (seat basis) करके जाओगे तो गाडी बदल-बदलके ८-१० घंटे में पहुंच जाओगे.. नहीं तो आपको एक बढिया आईडिया देता हूँ.. आप press की गाडी से जाओ.. वह गाडी सुबह २-३ बजे निकलती हैं.. हर जगह अखबार डालती हैं.. और ५-६ घंटे में ही आपको जोशीमठ पहुंचा देगी.."

तेवढ्यात समोर एक ट्रक आला.. त्याला avoid करायला ड्राईव्हरनी आमची ambassador डावीकडे वळवली.. नेमकं त्या अरुंद रस्त्याच्या डाव्या बाजुला मातीच्या shoulder ऐवजी एक मोठा खड्डा होता.. पावसाच्या पाणी आणि चिखलाने भरलेला..गाडीची डावी बाजु त्यात जी अडकली, की बाहेर यायला तयारच नाही..

ड्राईव्हरनी जितका प्रयत्न केला बाहेर काढायचा, गाडी तितकीच खड्ड्यात आणखिन रुतली..कसं-बसं ड्राईव्हरच्या दारातुन बाहेर पडलो.. बाहेर रस्त्यावर मिट्ट अंधार.. रात्रीचे ९-९.३०ची वेळ..आजु-बाजुला जंगल.. नंतर समजलं की त्या भागात हत्ती असतात..रस्त्याच्या दोन्ही बाजुला निलगिरीची झाडं.. अधुन-मधुन येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या सोडल्या, तर अगदीच निर्मनुष्य जागा..ड्राईव्हरनी फोन करुन मदत मागवली..

आयुष्यात पहिल्यांदा (?) किंवा बऱ्याच वर्षांनी मी तिथे काजवे पाहिले.. मस्त दिसतात एकदम.. झाडांवर इकडुन-तिकडे उडत राहतात.. मधुनच दिसतात, मधुनच गायब होतात.. वर आकाशात इतक्या चांदण्या होत्या.. त्यांच्यातच हरवुन जावसं वाटत होतं..

ट्रिपची सुरुवात तर एकदम भारी झाली होती.. मदतीची गाडी केव्हा येणार.. ऋषिकेशला आम्ही कधी पोचणार.. कुठे राहणार.. उद्या सकाळी जोशीमठला कसं जाणार..
"DJ, अरे तुम हमारे साथ रहोगे, तो सब कुछ एकदम fantastic ही होगा".. असा हिंदी dialogue मी मारलाच.. नशीब त्यानी मला तिथेच गाडलं नाही..

तब्बल दीड-एक तासानी दुसरी टॅक्सी आली.. ऋषिकेश अर्ध्या तासावरच होतं..
काका-काकुंशी गप्पा सुरु होत्याच.. ते दोघं मलेशियात २nd-३rd generation indians होते.. भाषा, culture, lifestyle.. अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या.. दोघं घरी हिंदी शिकलेले.. हिंदी वाचता येत नव्हतं, पण बऱ्यापैकी बोलत होते..
आम्ही दोघं मराठी आहोत ऐकुन, काकु भलत्याच खुष झाल्या.. त्यांच्या music teacher मराठी होत्या.. त्यांच्या कडुन पण त्या मराठीतले काही शब्द शिकत होत्या..

ऋषिकेशला रात्री ११ वाजता पोचलो..
"बेटा, आप मलेशिया आओगे तो हमारे घर पक्का आना.. मेरा नाम हैं विरेंदर सुरी.. V K Suri.. यह मेरा मोबाइल नंबर.."
"और मेर नाम हैं आशा सुरी.. आप दोनो से मिलके बहुत अच्छा लगा.. all the best for your trip.. Hare Krishna.."

ऋषिकेशला हॉटेल तर मिळालं.. पण रात्री ११ वाजता जेवायला काहीच उघडं नव्हतं.. एका टपरीवर सफरचंद घेतली.. आणि लस्सी प्यायलो..

हॉटेलवर परत येऊन झोपलो.. उद्या आम्हाला जोशीमठ गाठायचं होतं.. प्रेसची गाडी नाही.. that would have been too dangerous.. सुमो सकाळी ४.३०-५ ला सुटते.. ती पकडायची होती.. डोळे मिटले..

ट्रिपचा पहिला दिवस तर थोडासा happeningच झाला होता.. पुढचं सगळं unplanned होतं..
पता नहीं आगे क्या होने वाला था..