Scattered Thoughts (Post # 50)
डेक्कनवरचं क्रॉसवर्ड. तुला माहित आहे ना, महिन्यातुन दोन-तीन वेळा तरी मी तिथे जातोच. छान वाटतं. सिनेमा आणि पुस्तकांच्या त्या दुनियेत स्वत:ला विसरायला. अशाच एका रविवारी सकाळी चालत, चालत गेलो तिथे. पावसाची भुरभुर चालुच होती. भिजत-भिजतच पोचलो. भिजायला मला किती आवडतं, माहित आहे ना तुला..
पुस्तकं चाळता-चाळता हातात इशिगुरोचं "The Remains Of The Day" आलं. बोटानी पानं फिरवत होतो, तेवढ्यात तु समोर दिसलीस. ब्लु जीन्स, पांढरा शुभ्र स्लिवलेस लखनवी कुर्ता, एकाच पायातलं चांदीचं तुझं ते नाजुक anklet... पाठमोरी उभी होतीस, तरी पण मी तुला ओळखलंच.. उजव्या हातात नेहमी सारखा तुझा तो फोन चालु होता.. डाव्या हातानी तुझे भिजलेले केस तु सावरत होतीस.. बोलता-बोलता अचानक वळलीस... माझ्याकडे बघुन छान हसलीस.. you looked so mesmerisingly beautiful as always.. नेहमी सारखे तुझे ते सुंदर डोळे छोटे केलेस आणि न बोलता इशारा केलास.. "Hey hiiii!! सॉरी..२ मिनिटच.. आलेच मी"...
मी उगीच हातातल्या पुस्तकात काहीतरी वाचतोय असा अभिनय करत बसलो..
"अरे आदित्य!! कसा आहेस?? किती दिवसांनी!! मला वाटलेलंच.. तु इथे भेटशील म्हणुन.. हे दुकान जर रात्री बंद केलं नाही तर तु इथेच राहशील दिवस-रात्र... आणि काय वाचतोयस? बघु तरी दे मला..."
उत्तराची अपेक्षा नव्हतीच तुला...मी काही बोलायच्या आत, माझ्या हातातलं पुस्तक घेतलस...
"हं... मला जरा ह्याची स्टोरी सांग ना... कसं आहे??"
- "अगं नुपुर... सांगतो, सांगतो... एका इंग्लिश बटलरची गोष्ट आहे. आयुष्याच्या संध्याकाळी तो एका प्रवास करतो, त्या प्रवासात त्याचं सगळं आयुष्य त्याच्या डोळ्या समोरुन जात असतं.."
"आई गं!! म्हणजे फारच फिलॉसॉफिकल असणार... मला काहीतरी रोमॅन्टिक सुचव ना..pleaasssseee!"
- "आहे ना.. त्याच बटलरची गोष्ट रोमॅन्टिक पण आहे.. त्याची एक जुनी सहकारी असते, जी त्याच्या प्रेमात असते.. तिचं लग्न होऊन २० वर्ष झाली असतात.. लग्ना आधी ती त्याच्या प्रेमात असते.. त्याला देखिल ती आवडत असते.."
"म्हणजे extra-marital affair!!!"
-"चूक!! उलट तो नोकरीच्या मर्यादेत स्वत:च्या वैयक्तिक भावनांना कधीच प्राधान्य देत नाही.. इतकं की त्याचे वडिल जातात, त्या क्षणाला सुद्धा तो हातातलं काम आधी संपवतो... आणि मग वडलांना भेटायला जातो.. the most important aspect of his life is his 'dignity' as an English butler.. that is the only thing what he respects and cares for in his life.. मग प्रेम वगैरे सगळं बाजुला..."
"मग असं असताना... तब्बल २० वर्षांनी तो परत तिच्याकडे का जातो? प्रेम काय असतं हे म्हातारपणी लक्षात येतं का त्याच्या?"
-"तिचं एक पत्र येतं.. ते वाचल्यावर त्याला असं वाटतं की ती सुखी नाहीये.. त्याला तिला पुन्हा स्वत: बरोबर नोकरीवर रुजु करायचं असतं.. ही संधी असते.. तिला पुन्हा भेटायची.."
"जबरी!! एकदम हिंदी फिल्म स्टोरी आहे.. मला वाचायला आवडेल"
-"नक्कीच!! छानच आहे...ह्याच पुस्तकावर, ह्याच नावानी सिनेमा देखिल आहे... ऍन्थनी हॉपकिन्स आणि एम्मा थॉम्पसन आहेत त्यात.. तो पण मस्त आहे.."
"ह्म्म... आधी हे पुस्तक वाचते.. मग सिनेमा पाहते.. सिनेमा वरुन आठवलं.. बरं झालं तु भेटलास आदित्य...मला एखादा चांगला सिनेमा देखिल सुचव ना..बऱ्याच दिवसात काही चांगलं पाहिलं नाहीये.. पण त्या आधी एक मस्त कॉफी घेऊयात.."
तुझं कॉफी प्रेम मला माहित होतं.. तरी बरं ह्या बुकशॉप वाल्यांनी कॉफी सुरु केली..कॉफीचे मग्स घेत तु आणि मी movies section मधे गेलो.
"नुपुर, एखादा क्लासिक सुचवु का तुला?"
-"कुठला रे बाबा?"
"’सिटिझन केन’ पाहिला आहेस?"
-"नाही बाबा!! पहिल्यांदाच ऐकत आहे... काय विषेश आहे ह्यात??"
"१९४१ सालचा ऑस्कर विनर.. असं म्हणतात की हॉलिवुड मधला हा आता पर्यंतचा सर्वोत्तम सिनेमा आहे..now, that can be debated, but २६ वर्षाच्या Orson Welles ने ह्याची पटकथा लिहिली, दिग्दर्शन केलं आणि मुख्य पात्राचा अभिनय देखिल केला!!! सिनेमा फारसा चालला नाही.. पण अफलातुन आहे.."
-"seems interesting..काहीतरी सांग ना, ह्या सिनेमा बद्दल.."
"चार्ल्स केन नावाचा एक newspaper tycoon असतो.. मरताना त्याच्या तोंडातुन एक शेवटचा शब्द निघतो ’rosebud’.. त्या शब्दाचा उलगडा व्हावा म्हणुन पत्रकार मंडळी त्याच्या आयुष्याची चिरफाड करतात.. त्याची बायको, त्याचा एकुलता एक मित्र, त्याचे सहकारी, नोकर.. सगळ्यांना भेटुन ’rosebud’ बद्दल विचारतात.."
-"मग काय सापडतं त्यांना?"
"केन हा एक वेगळाच माणुस असतो.. he lives life on his own terms - defying everything and everyone.. आयुष्यात पैसा खूप कमावतो.. पण प्रेम असो वा मैत्री असो.. त्याच्या नशीबी ते जास्ती दिवस टिकत नाही.. शेवटी त्याच्या आलिशान महालात तो एकटाच राहतो.. सगळे त्याला सोडुन जातात.. जवळचं कोणीच नसतं.. ना त्याची बायको, ना त्याचा मित्र... कोणालाच 'rosebud' बद्दल काहीच माहित नसतं.. वरवर अतिशय श्रीमंत आणि successful वाटणारं त्याचं आयुष्य म्हणजे एक jigsaw puzzle असतं.. आणि ’rosebud’ त्या puzzle चं एक missing piece.."
-"आई ग!! मग शेवटी तो ’rosebud’चा सस्पेन्स उलगडतो की नाही?"
"त्या करता नुपुर, तु हा सिनेमा पहा... मला खात्री आहे, तुला आवडेल.."
-"चालेल! मला आता सॉलिड कुतुहल आहे.. एक तर तुझा तो ’The Remains Of The Day’ मधला इंग्लिश बटलर.. आणि आता हा केन.. दोघं एकदम interesting characters आहेत.. चल, आता निघायचं.."
"yup, both of them are very well told stories... in either case, the life of each person unfolds in a series of flashbacks.."
तेवढ्यात पुन्हा तुझा फोन वाजला... पुस्तक आणि VCD घेत मी कॉउन्टरच्या दिशेला गेलो..
तुला ऐकु यावं, असं कॉउन्टरवरच्या मुलाला मी म्हटलं,
"मॅडमचा सस्पेन्स वाढत जात आहे.. त्यांच्याकरता ह्या दोन गोष्टी पटकन द्या..."
-"कोण मॅडम??"
मी तुझ्याकडे बोट दाखवत मागे वळलो.. तर तु नव्हतीस.. वाटलं तु फोनवर तिथेच movies section मधे बोलत असशील.. पण तिथे देखिल तु नव्हतीस.. bookstore मधे सगळीकडे तुला शोधलं.. अचानक जशी भेटलीस, तशीच अचानक गायब झालीस... मी फोन केला, तर ’no answer’ मेसेज आला..
मी काहीच न घेता बाहेर पडलो.. सिनेमा आणि पुस्तकांच्या त्या मायाजालातुन बाहेर.. एकटाच..
पावसाचा जोर एव्हाना वाढला होता.. भिजलेल्या डोळ्यातुन मला चार्ल्स केनचा मित्र लेलंड बोलताना दिसत होता..
"I can remember everything. That's my curse, young man. It's the greatest curse that's ever been inflicted on the human race: memory."
कहीं तो.. कहीं तो.. हैं नशा..
तेरी मेरी हर मुलाकात में...
जाने ना कहां वह दुनिया हैं..
जाने ना वह हैं भी या नहीं..
जहां मेरी ज़िन्दगी मुझसे..
इतनी खफा नहीं..