clueless

सोमवारी सुखदीप ऑफिसला आला नाही. मी पण काही विशेष चौकशी केली नाही. मंगळवारी भेटला. सकाळी ९.३० वाजता तो भेटला तेव्हा काहीतरी odd वाटलं. नेहमी एकदम enthu मधे भेटणारा सुखदीप, त्या दिवशी प्रचंड निरुत्साही, दमलेला वाटला.
"काय रे, काय झालं? any problem?"
-"यार.. अब कैसे बताऊं...."
"म्हणजे??"
मग त्यानी जे घडलं, ते सांगीतलं...

सुखदीप आणि मनप्रीतचं गेल्या वर्षी डिसेंबर मधे लग्न झालं.
सुखदीप - IIT BTech, IIM MBA; तर मनप्रीत डॉक्टर - gynaecologist.
दोघं दिल्ली मधे राहतात - सुखदीप एका मोठ्या MNC मधे काम करतो, तर मनप्रीत एका शासकीय रुग्णालयात.

गेल्या रविवारी मनप्रीतनी एका बाईची डिलिवरी handle केली. डिलिवरीच्या वेळेस त्या बाईचे रक्‍त मनप्रीतच्या गॉउनवर अचानक उडाले. त्यामुळे ती एकदम दचकली.
तिची डिलिवरीची दुसरीच केस होती. पण ग्लव्स घातलेल्या हातानीच तिनी ते रक्‍त पुसलं आणि हाती घेतलेलं काम संपवलं.

डिलिवरी नंतर का कुणास ठाऊक.. पण मनात एक शंकेची पाल चुकचुकली...
म्हणुन मग भीत-भीत मनप्रीतनी त्या बाईला आणि तिच्या नवऱ्याला विचारलं..
"कहीं आपको कुछ ऐसी-वैसी बीमारी तो नहीं हैं ना?"
दोघं आधी काही बोललेच नाही... मग झालेल्या मुलाच्या तब्येतीचा प्रश्न आला, तेव्हा नवरा म्हटला की तो HIV+ आहे.. पण बायको HIV- आहे!!!!!

ऐकल्यावर मनप्रीत तिथल्या तिथे कोसळली!!! दुपारचे २ वाजले होते... तिने लगेच सुखदीपला फोन लावला..फोनवर काहीच बोलवेना..नुसतीच रडायला लागली..

दोघं एका डॉक्टरला भेटले..त्या बाईचे blood रिपोर्ट्स पाहिले.. गेल्या २-३ महिन्यात ती HIV- होती... पण, असा एक interim phase असतो.. जेव्हा तो virus detect होत नाही.. post pregnancy n delivery, १-२ महिन्या नंतर blood टेस्ट मधे जर ती HIV- असेल.. तर काही काळजी नाही...through sexual intercourse, the chances of her acquiring it from her husband are less than 2-5%..
पण.. पण ह्या टक्केवारी मधे कोण विश्वास ठेवणार.. १-२ महिन्या नंतर जर ती बाई सापडलीच नाही.. तर तिची blood टेस्ट कशी घेणार??

डिलिवरीच्या वेळी जे रक्‍त उडालेलं, त्यात जर virus असेल तर?
मनप्रीतच्या अंगावर कुठेही काही cut/wound नव्हता.. पण चेहऱ्यावर उडालेलं रक्‍त पुसताना जर डोळ्यात ते रक्‍त गेलं असेल.. तर it could be a problem...apparently, the eye is the most sensitive to the virus!!
कामाच्या गडबडीत तिला आठवत नव्हतं की डोळ्यात काही गेलं की नाही.. ती तसंच चेहरा पुसुन काम करत राहिली..

मग डॉक्टर म्हटले.. की infection चे chances ०.३% असु शकतात... एकदा तर एका डॉक्टरनी एका ऑपरेशन मधे एक infected needle चुकुन स्वत:ला टोचुन घेतली.. but he recovered..

मग उपाय काय?? २४ तासाच्या आत एका औषधाचा २१-दिवसाचा डोस सुरु करायचा... आणि side-effects??
केस गळणं.. स्किन कोरडी पडणं.. पोट बिघडणं.. आणि एका स्त्रीला होणारे अन्य gynaec प्रोब्लेम्स...
औषध सुरु नाही केलं.. तर virus infection चा धोका पत्करणं.. a big risk!!

सगळं इतक्या झटपट घडत होतं... स्वत: एक डॉक्टर असुन मनप्रीतला काहीच सुचत नव्हतं..
अवघी २६ वर्षांची ती.. लग्नाला ७ महिने झालेले.. रविवारी नवऱ्याला सुट्टी, पण ती काम करत होती.. आणि स्वत:ची काही चूक नसताना ही अशी शिक्षा???

"occupational hazard" हा शब्द बोलायला खूप सोपा..
but when you go through it yourself, thats when you realize.. WTF!!

सोमवारी मनप्रीत आणि सुखदीप - दोघांचं counselling झालं.
मनप्रीतला कोणाला सांगायचं नव्हतं.
"there is a social stigma associated with this - तुझ्याशी आणि माझ्याशी कोणी नीट वागणार, बोलणार नाही..."
नको-नको ते विचार त्या बिचारीच्या डोक्यात येऊ लागले...

मंगळवारी सगळं सांगताना सुखदीपच्या चेहऱ्यावरचा ताण दिसत होता...
२१ दिवसाचा कोर्स ऑगस्ट १७ ला संपेल.. तेव्हा मनप्रीतची एक blood टेस्ट असेल..
तेव्हा कळेल...काय निकाल असेल ते..

नुसतं घरी बसुन, विचार करुन वेड लागेल.. म्हणुन तो ऑफिसला आलेला.. तशीच ती पण तिच्या क्लिनिकला गेली होती..आदल्याच दिवशी तिची आई चंदीगडहून आलेली.. सोबतीला...

ऐकुन सुन्न झालेलो...आज हे लिहितोय तसं टिव्ही वरची ती शबाना आठवत आहे.. "यह छुने से नही फैलती.." म्हणणारी...
"फिर मिलेंगे" मधली शिल्पा आठवत आहे...Philadelphia मधला Tom Hanks आठवतोय... basketball player Magic Johnson आठवतोय..
TV, सिनेमा, sports celebrtities.. किंवा newspaper... AIDSशी तेवढाच एक संबंध आला होता आयुष्यात... प्रत्यक्षात काहीच नाही...

सुचत नाहीये काही...
why do bad things happen to good people?? why??
नेहमी प्रमाणेच.. मी निरुत्तर...clueless...

*******************************************************
The entire incident is real - have only changed names. I dont know why I am posting this, but I am still clueless on why such a thing has happened to Manpreet & Sukhadeep.