२/३० (दोन बाय तीस)..
काही वर्षांपूर्वी Somerset Maughamचं एक पुस्तक वाचलेलं. Of Human Bondage. फिलिपची गोष्ट आहे. म्हणतात की ही Maughamची आत्मकथा देखिल आहे. Before Sunset मधे Ethan Hawke ला एक पत्रकार विचारतो की त्यानी लिहिलेलं पुस्तक ही आत्मकथा आहे का?
त्यावर, तो म्हणतो, "Um.. well.. isnt everything autobiographical?"
तसंच असेल Maughamचं पुस्तक सुद्धा. तर फिलिप बद्दल सांगत होतो. बोलता-बोलता, किंवा लिहिता-लिहिता असंच related दुसरंच काहीतरी आठवत राहतं...
फिलिप लहानपणीच अनाथ झाल्यावर त्याचे uncle-aunt त्याला बोर्डींग स्कुलला पाठवतात. त्यांची इच्छा असते की शाळे नंतर त्यानी Oxfordला पुढे शिकावं आणि clergyman व्हावं. पण त्या ऐवजी फिलिप जर्मनीला जातो. तिथे काही दिवस राहतो, मग लंडनला परत येतो. तिथे तो CA व्हायचा प्रयत्न करतो. पण त्यात त्याचं मन रमत नाही. म्हणुन मग पॅरिसला जातो, चित्रकार व्हायला. तिथे एक मुलगी त्याच्या प्रेमात पडते, पण तो प्रतिसाद देत नाही.
त्याच्या लक्षात येतं की तो काही चांगला चित्रकार नाही, म्हणुन मग लंडनला परत येतो... आणि ह्या वेळेस डॉक्टर व्हायचं ठरवतो.. मग मिल्ड्रेड नावाच्या वेट्रेसच्या प्रेमात पडतो.. तिचं त्याच्यावर प्रेम नसतं..
मी गोष्ट का सांगतोय सगळी?? अतिशय depressing गोष्ट आहे. प्रेम, मैत्री, पैसा, करियर - सगळ्यातच फिलिपच्या नशीबी उतार-चढाव येतात. पण त्यात काय विषेश - सगळ्यांचच होतं की.. शेवटी त्याचं त्याला कळतं की त्याला आयुष्यात काय पाहिजे...
खरं म्हणजे त्या पुस्तकातलं एक वाक्य त्या वेळेस खूप मनाला भिडलं होतं..
"There are three things to find out: man’s relation to the world he lives in, man’s relation with the men among whom he lives, and finally man’s relation to himself."
तो शोध अविरत चालुच आहे.. आजही..
-------------------------
मागच्या महिन्यात एक Argentine सिनेमा पाहिला. Cleopatra. क्लिओपात्रा ही एक म्हातारी रिटायर्ड school teacher असते - लग्नाला ३७ वर्ष झालेली. तिला मिलाग्रो नावाची एक young soap opera star भेटते. दोघी त्यांच्या नेहमीच्या आयुष्याला कंटाळुन एका विकेंडला एकत्र प्रवास करतात; त्या तीन दिवसाची गोष्ट आहे.. शहरा पासुन दूर... अर्जेन्टिनाच्या छोट्या-छोट्या गावातुन... रस्त्यावरुन गाडी जात असते..तसं रेडियो वर एक सुंदर गाणं लागतं..
"y tan contenta"... खूप शोधलं पण ह्या गाण्याचे english lyrics मला सापडलेच नाहीत..नक्की शब्द माहित नाहीत.. पण गाण्याचा अर्थ काहीसा असा आहे...
जंगलातली एक स्वच्छंद मनस्वी पायवाट.. जी लवकरच अदृष्य होईल...
तशीच मी ही ह्या आयुष्याच्या वाटेवरुन चालत राहील...शोधत राहील..
माझ्या नशीबात काय आहे ते..
हवं आहे ते स्वप्नातलं एक मोकळं आभाळ...
माझं मन जिथे रमेल..
आणि त्या वेळेस मी किती खुश असेल.. किती आनंदी असेल..
सिनेमाच्या शेवटी, शहरातल्या घरी परतणाऱ्या बस मधुन क्लिओपात्रा उतरते.
आणि रस्त्यावरच्या बाकावर बसुन स्वत:ला विचारते,
"माझ्या पुढे दोन पर्याय आहेत - मी जे करायला पाहिजे, ते करु? की मला जे आवडते, ते करु?
का नुसतीच, काही न करता, अशीच इथे या बाकावर बसुन राहु?"
आणि मग ते गाणं गुणगुणत बसते...
---------------------------------
फ्रेंच ओपन संपली. सुरु व्हायच्या आधी जस्टिन हेनिन retire झाली. अवघी २५ वर्षांची. जगात ती अव्वल क्रमांकावर. शिवाय रोलांड गारोस हे तिचं घरचं मैदान. तिथे तिला कोण टक्कर देणार. पण तिनी निर्णय घेतला. retire व्हायचा. आपण कधी थांबायचं हा निर्णय घेणं किती अवघड असेल.
तिचं motivation संपलं असेल का?नक्कीच! नाहीतर ती खेळत राहिली असती...
फेडरर नडाल कडुन पुन्हा हरला. आणि ह्या वेळेस तर अगदी बेकार हरला. skill, talent, जिद्द, fitness, motivation - ह्यात कुठेही फेडरर कमी नाही. पण तो फॉर्म मधे नाही. आणि त्याहीपेक्षा, नडालला आपण क्ले कोर्टवर हरवु शकतो, हा confidence तर दिसतच नव्हता. गपचुप नांगी टाकली..
खेळणारा कितीही निष्णात खेळाडु असला (किंवा नसला), तरी जिंकण्या करता आत्मविश्वास पाहिजे.. आणि कधी थांबायचं हे ही ओळखता आलं पाहिजे ना?
----------------------------------
काल "अमेरिकानो" हा सिनेमा पाहिला. क्रिस नावचा एक अमेरिकन युवक स्पेनला जातो. तो नुकताच ग्राज्युएट झालेला असतो. अमेरिकेत परतल्यावर त्याला एका चांगल्या नोकरीवर रुजु व्हायचं असतं.
स्पेन मधे त्याला वेगवेगळे लोकं भेटतात, एक वेगळी संस्कृतीशी त्याचा परिचय होतो.
त्याचं त्याला कळत नसतं, की त्यानी घरी परतावं आणि एक fast-track career निवडावं.. का एक वेगळी वाट पकडावी..
ह्या पेचात पडलेल्या क्रिसला स्पेन मधे भेटलेली अडेला सांगते,
"Promise me one thing - do what you are scared of doing."
----------------------------------
मेघनानी ’आपण का लिहितो’ हा प्रश्न केला होता. आज दोन वर्ष झाली आहेत, हा ब्लॉग लिहित आहे.पुढच्या महिन्यात तीस वर्ष होतील - श्वास घेण्याला.
Somerset Maughamच्या वाक्यातला अविरत शोध चालुच आहे... क्लिओपात्राचं गाणं मी पण गुणगुणत आहे.. फेडरर सारखा आत्मविश्वास अधुन-मधुन ढासळतो...हेनिन सारखं कधी थांबायचं हे अजुन तरी कळत नाहीये... आणि अडेलाची सूचना पाळावीशी वाटत नाहीये...
Somerset Maughamचं अजुन एक वाक्य आहे,
"We write not because we want to, but because we have to."
म्हणुनच मी लिहित आहे कदाचित...
आणि कदाचित तसंच, मी श्वास देखिल घेत आहे...
Posted by
Monsieur K
on Wednesday, June 04, 2008
/
Comments: (12)
बूंदें
काल मेसेज आला.. तुला माहितिये, पुण्यात जोरात पाऊस पडतोय..
किती वाट पाहत होतो मी.. शेवटी पडलाच एकदाचा.. आणि मला नाहीच भिजवलं.. पहिल्या पावसात स्वच्छंद, मनसोक्त भिजायचं.. राहुनच गेलं.. परत पडला की भिजेल मी.. पण ते सॉक्रेटस म्हणतो तसं,
"Life contains but two tragedies. One is not to get your heart's desire; the other is to get it."
एका आळसावलेल्या दुपारी बंग्लोरमध्ये होस्टेल-रूमच्या खिडकीवर तो बरसायचा... होस्टेल आणि इन्स्टिट्युटचं बांधकाम दगडी... कॅम्पस मध्ये चहुबाजुला वर्षभर हिरवंगार वातावरण.. a meandering road that traversed through the small woods from the main gate to the back of the hostel blocks.. आणि पावसाळ्यात तर काही विचारायलाच नको... the whole place seemed like heaven on earth..
दुपारी रूममध्ये अंगावर शाल ओढुन पडुन राहायचो.. अर्धवट झोपेत रेडियो ऐकायचो.. गाण्यातल्या romantic कल्पनेनीच बेहोश व्हायचो.. पावसाची रिपरिप चालुच असायची.. आणि बॉम्बे जयश्रीचा तो sensuous आवाज़..
युहीं बरस-बरस, काली घटा बरसे,
हम यार भीग जाये, इस चाहत की बारिश में
मेरी खुली, खुली लटों को सुलझाये,
तु अपनी उंगलियों से, मैं तो हूँ इस ख्वाहिश में
सर्दी की रातों में, हम सोये रहे एक चादर में,
हम दोनो तनहा हों, ना कोई भी रहे इस घर में..
ज़रा, ज़रा बहकता हैं, महकता हैं..
टॅम्पातलं अपार्टमेंट तळमजल्यावर. संध्याकाळी बाल्कनीच्या बाहेरच्या मऊ हिरवळीवर पावसात अनवाणी चालायचं. एखादी खारुताई पळत असे इकडुन तिकडे. पावसाचे थेंब अंगावर झेलायचे. समोरच्या तळ्यात त्या रंगबिरंगी बदकांची गंमत बघायची. घरात परत यायचं आणि आलं घातलेल्या एका कडक चहाच्या वाफेत बेहोश व्हायचं...
बिछड के भी मुझसे जुदा तो नहीं,
खफ़ा हैं मगर बेवफा तो नहीं,
मेरे हाथ में ही तेरा हाथ हैं,
मेरे हाथ में ही तेरा हाथ हैं...
मेरे पास हैं तु, मेरे पास हैं...
मेरे साथ हैं, मेरे साथ हैं...
नहीं सामने, यह अलग बात हैं...
मुंबईतली रात्र.. घाई-गर्दीतुन घरी पोचायचं.. मेघानी लिहिलेली ही पोस्ट वाचुन कितीतरी महिने झाले होते.. का वर्ष? माहित नाही.. पण तेव्हा पासुन इजाज़त पहायचा होता.. शेवटी एका रात्री पाहिला.. एका पावसाळ्या रात्रीची कहाणी.. महेन, सुधा आणि मायाची कहाणी.. मेघानी इतकं सुंदर लिहिलं आहे की मी त्यावर काय लिहु.. शिवाय गुल्ज़ारचे ते शब्द, RDचं संगीत आणि आशाचा आवाज़.. हे सगळं पावसाळ्या रात्री बेचैन नाही करणार तरी कसं...
एक अकेली छत्री में जब आधे-आधे भीग रहे थे,
आधे सूखे, आधे गिले, सूखा तो मैं ले आयी थी
गिला मन शायद, बिस्तर के पास पडा हो,
वह भिजवा दो, मेरा वह सामान लौटा दो...
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं...
the raindrops fall pitter patter on my window sil.. कधी दुपारी, कधी संध्याकाळी, कधी रात्री.. कधी जोरात, तर कधी हलकेच पडतात ते थेंब.. and bring with them a myriad of emotions.. some sensuous, some romantic.. some happy, some melancholic.. and i just watch them silently with open eyes...
आजही, गाडी रस्त्यावर पळत राहतीये... काच खाली करुन ते पावसाचे थेंब मी आजही ओंजळीत पकडतोय... and even today, the heart smiles wryly as the violin murmurs faintly in the background..
कैसे भुलुंगा, तु याद हमेशा आयेगी
तेरे जाने से जीना मुश्किल हो जायेगा
अब कुछ भी हो, दिल पे कोई जोर तो चलता नहीं...
दिल तेरे बिन कही लगता नहीं, वक्त गुज़रता नहीं..
क्या यही प्यार हैं...
क्या यही प्यार हैं...
... as i watch those raindrops fall silently on my window sil... pitter patter, pitter patter..