Inner Calling

The Motorcycle Diaries - एक सिनेमा
सन १९५२. आटाकामा वाळवंटातल्या एक रात्री ते दोघं मित्र एका अत्यंत गरिब कष्टाळु नवरा-बायकोला भेटले.

ते दोघं म्हणजे - २९ वर्षाचा एक biochemist - अल्बेर्टो, आणि २३ वर्षाचा final semester मधे शिकणारा एक medical student - अर्नेस्टो. दोघं Buenos Aires चे रहिवासी.
अल्बेर्टोची इच्छा - आयुष्याची ३० वर्ष पूर्ण व्हायच्या आत, संपूर्ण लॅटिन अमेरिका पाहुन घ्यायचं.
जानेवरी १९५२ मध्ये दोघं त्यांच्या "The Mighty One", ह्या 1939 500cc Norton मोटरसायकलवर प्रवास सुरु करतात. चार महिन्यात ८००० कि.मि. पेक्षा जास्तीचे अंतर कापायचे होते.
अर्जेन्टिना, चिले, पेरु, ब्राज़िल आणि वेनेजुएला हे देश पहायचे होते.
कधी Andes पर्वतरांगातला हिमवर्शाव, कधी आटाकामाच्या वाळवंटातला निर्जीव प्रवास. खिशात जास्ती पैसे नाहीत. खायला-प्यायला काही नाही. आजारी पडलं तरी काही औषध-पाणी नाही. ती मोटरसायकल २ पेक्षा जास्ती देश पाहु शकली नाही. मग पायी किंवा hitchhiking करुन प्रवास.
मधेच अर्नेस्टोच्या प्रेयसीचं पत्र येतं.. ती त्याची वाट पाहु शकत नाही... तिच्या प्रेमा खातर तिनी दिलेले पैसे त्यानी उपाशी/आजारी असुन खर्च केलेले नसतात..

आटाकामा वाळवंटात भेटलेल्या त्या गरिब नवरा-बायकोची शेत-जमीन जप्त झालेली होती. नोकरीच्या शोधात ते एका copper mineला जात होते.
बायकोनी ह्या दोघांना विचारलं,
"आम्ही नोकरी करता प्रवास करतोय. तुम्ही?"
तर अर्नेस्टो आणि अल्बर्टोनी एकमेकांकडे बघितलं, आणि मग अर्नेस्टो म्हणाला,
"आम्ही प्रवासा करता प्रवास करतोय!" (we travel for travel!)

प्रवासात बरेच चांगले-वाईट अनुभव आले दोघांना. वेगवेगळे देश, तिथली संस्कॄती, त्यांचं जेवण, तिथली लोकं आणि त्यांच्या बरोबर केलेली मजा न मस्ती.. प्राचीन Inca civilization चे माचु-पिचु (Macchu Picchu) ह्या शहरात पाहिलेले अवशेष.. आणि तेव्हा निघालेले अर्नेस्टोचे उद्गार,
"How is it possible to feel nostalgia for a world I never knew?"

त्याच बरोबर पाहिलेलं दारिद्र्य, रोगराई, हाल-अपेष्टा.. लेप्रसी हॉस्पिटल मधे केलेलं काम.. लेप्रसी पेशंट्सना मिळणारी छूत-अछूत वागणुक.. आणि स्वत:चा वाढदिवस त्यांच्या बरोबर साजरा करायला Amazon नदी पोहुन जाणारा अर्नेस्टो!

तो एक प्रवास त्या दोघा मित्रांच्या आयुष्यात एक मोठा टप्पा होता. फक्‍त जगच नाही, तर स्वत:ची ओळख करुन दिली त्या प्रवासानी. स्वत:च्या देशाची सीमा पहिल्यांदा ओलांडताना, अर्नेस्टोचे ते शब्द विशेष लक्षात राहतात,
"What do we leave behind when we cross each frontier? Each moment seems split in two; melancholy for what was left behind and the excitement of entering a new land."

This frontier could well be between two countries, between two cultures or even between two people.. or maybe even between two parts of life of a single person..

हाच २३ वर्षाचा अर्नेस्टो पुढे क्युबन क्रांतीकारक "चे गुएवेरा" (Che Guevera) म्हणुन प्रसिद्ध झाला...

*******************

"ब्र" - एक पुस्तक

ब्र संपवलं. म्हणजे वाचायला सुरु केलं, आणि कधी संपवतो असं झालेलं.
त्यातली central character प्रफुल्ला मला कळली नाही, झेपली नाही.
एक तर तिच्या आयुष्यात चांगलं काही झालं किंवा होतंच नाही, असं सतत वाटत राहिलं.
म्हणजे नवऱ्याशी घटस्फोट झाला, मुलगा तिला सोडुन गेला (इथे वपुंच्या "ही वाट एकटीची" आठवण झालेली); मग ती जिथे नोकरी करते, ती संस्था सुद्धा ती सोडते.. आणि आदिवासींच्या एका गावात जायचं ठरवते, तिथे त्यांची मदत करायला..

आयुष्यात वेगवेगळी लोकं आणि संस्थेंशी आपला संबंध येतो. परिचयात येणाऱ्या एखाद्या व्यक्‍ति किंवा संस्थेबरोबर आपलं जे नातं निर्माण होतं, ते नातं बऱ्याच parameters वर अवलंबुन असतं - सर्व प्रथम गरज, मग विश्वास, आधार, प्रेम, communication, understanding, commitment.. अशा कितीतरी गोष्टी असतात.. and each of these parameters - be it need, trust, support, love, commitment or anything - it has to be mutual and not one sided... ज्यावरुन ठरतं की ते नातं किती जवळचं, किती घट्ट बनेल..

फिक्शन असल्यामुळे प्रफुल्लाचा नवरा, मुलगा किंवा तिची संस्था - सगळेच एकदम shade of black आहेत. खऱ्या आयुष्यात तर ना कोणी complete white असतं ना black.. फक्‍त shades of grey असतात...म्हणुन कदाचित तिचं character फारसं पटलं नाही.. एक गोष्ट मात्र आवडली.. तिला पुढे काय करायचं आहे, हे उशिरा का होईना, तिचं तिला ठरवता येतं..

*******************

अर्नेस्टो असो किंवा प्रफुल्ला - त्यांना त्यांचं-त्यांचं "inner calling" कळलेलं.. an inner calling that drives you, that motivates you.. the passion of your life.. that defines what you want to achieve, and keeps you working towards it..

अर्नेस्टो, म्हणजे एक सिनेमातलं पात्रं.. पण एक असामान्य व्यक्‍ति.. त्या उलट प्रफुल्ला म्हणजे पुस्तकातलं एक काल्पनिक पात्र.. खऱ्या किंवा सामान्य आयुष्यात अशी जाणिव होते का कधी?

टेकडीवर शंतनु भेटलेला.. तो सध्या practice/training करतोय.. लेह ते सियाचेन असं ५००-६०० कि.मि. सायकलिंग करायचं ठरवलं आहे त्यानी.. altitude ranging only between 11500 to 18500 ft above sea level!! तुमच्या-माझ्या सारखाच आहे शंतनु - BE करुन पुण्यात नोकरी करणारा.. पण Mt Everest base चढलेला आहे.. Enduro3 ह्या २ दिवसाच्या टीम triathlon event मधे बक्षिस मिळवलं आहे.. तुमच्या-माझ्या सारखा नोकरी करणारा, तरी पण स्वत:ला सतत अशा पद्धतीने challenge करत असतो तो.. हेच त्यांचं "inner calling" असेल का??

नुकतेच भेटलेले पुण्यातल्या एका ऑटो कंपनीचे MD - त्यांच्या कंपनी तर्फे ते NRI डॉक्टर्स कडुन मोफत सर्जरी organize करत आहेत. भारता मधे ज्या ३-४ छोट्या शहरांमधे त्यांच्या कंपनीचे कारखाने आहेत, त्या शहरातल्या हॉस्पिटल्स मधे ते हा प्रोजेक्ट कार्यरत करणार आहेत. कंपनी नफा करत आहे की नाही, हे पाहता-पाहता आपलं सामाजिक कर्तव्य आपण पाळतोय का? आपल्या देशातल्या गरीब अथवा गरजु लोकांची आपण मदत करु शकतो का? हेच त्या माणसाचं "inner calling" असेल का?

टेकडीवर पळताना उन्हाळ्यातला तो पश्चिमेचा सूर्य देखिल माझ्या बरोबर त्या वाळलेल्या निश्पर्ण झाडांच्या मागुन खाली-वर पळत असतो. टेकडी उतरुन मी कांचन गल्लीत उतरतो, तेव्हा तिथले दोन गुलमोहर बघुन छान वाटतं.. those seem to be the only trees which are flowering fiery, flaming red in this hot summer.. आणि जणु मला ओरडुन ओरडुन म्हणतात,

स्वत:चं "inner calling" शोध केतन! don't merely exist, start living!
नुसतंच गुणगुणत राहु नकोस, काहीतरी कर!

लिये सपने निगाहों में, चला हूं तेरी राहों में
ज़िन्दगी आ रहा हूं मैं..

कई यादों के चेहरे हैं, कई किस्से पुराने हैं,
तेरी सौ दास्ताने हैं, तेरे कितने फसाने हैं
मगर एक वो कहानी हैं, जो अब मुझको सुनानी हैं
ज़िन्दगी आ रहा हूं मैं..

मेरे हाथों की गर्मी से, पिघल जायेंगी ज़ंजीरें,
मेरे कदमों की आहट से, बदल जायेंगी तकदीरें,
उम्मीदों के दिये लेकर, ये सब तेरे लिये लेकर
ज़िन्दगी आ रहा हूं मैं..

कभी तुझको गिला मुझसे, कभी मुझको शिकायत हैं,
मगर फिरभी तुझे मेरी, मुझे तेरी ज़रूरत हैं,
मैं ये इकरार करता हूं, मैं तुझसे प्यार करता हूं,
ज़िन्दगी आ रहा हूं मैं..