संभ्रम आणि प्रेम..

आज सकाळची ६.४५-७ची वेळ. ७.१५ वाजता सुटणारी डेक्कन क्वीन पकडायची होती. आई उठवताना म्हणाली,"अरे, लवकर आवर. रिक्षा मिळायला पाहिजे, नाहीतर ट्रेन चुकेल."
आणि मी म्हणजे एकदम जब वी मेट मधल्या करीनाच्या style मधे,
"आज तक अपुन की कोई भी ट्रेन, बस या flight कभी miss नहीं हुई हैं!!" ह्या आत्मविश्वासात राहणारा. another story that i have been "this" close to missing not just a train but even an international flight - airport पर अपने नाम की announcement सुनने में बहुत मज़ा आता हैं. ;-)

तर आवरुन ७च्या सुमारास डेक्कनवर Archies च्या चौकात रिक्षा करता पोचलो. तिथे गुडलक समोर उभी असणारी रिक्षा कधीच स्टेशनला येत नाही. पण thankfully, दुसरी रिक्षा येतेच. आणि ती तशी आलीच.

बसताना, रिक्षावाल्या काकांना म्हट्लं,"स्टेशनला चला."
-"बरं... पण कुठलं स्टेशन - शिवाजीनगर की पुणे स्टेशन?. नाहीतर मी तुम्हाला एकीकडे न्यायचो, आणि तुम्हाला दुसरीकडेच जायचं असेल.. म्हणुन विचारलेलं बरं..."
"hmm... बरोबर! पुणे स्टेशनला घ्या - तिथेच जायचं आहे मला.."

बालगंधर्व, कॉर्पोरेशन वरुन रिक्षा नदीच्या बाजूनी धावु लागली. जानेवारीचं हल्कंसं धुकं जमा होतं. सुर्याची पहिली किरणं आकाशात आळसावत होती. आणि मला रिक्षावाल्या काकांचं म्हणणं पटलं - एका व्यक्‍तीवर दुसऱ्याला अमुक एका ठिकाणी घेउन जायची जबाबदारी असेल, तर destination बद्दल संभ्रम नको. अगदी clear cut माहिती पाहिजे - दोघांना ही! मगच प्रवास छान होईल, आणि दोघं इच्छित स्थळी पोचतील, नाही का?

-----------------------------------------------

मला कोल्हापुरी चप्पल आवडते. फारशी चप्पल घालायची वेळ येत नाही, त्यामुळे सध्या जी चप्पल आहे, ती तशी वापरण्याच्या द्रुष्टीने जुनी नसली, तरी घेऊन पुष्कळ दिवस झाले आहेत. जेव्हा पण मी ती चप्पल घालतो, ती मला नेहमी चावते. मागच्याच आठवड्यात घातली, आणि ती मला चावली. मलाच चालायचा enthu, मग ती चप्पल घालुन २-३ किलोमिटर चाललो - सुरुवातीला त्रास झाला, पण नंतर काही वेळानी काहीच त्रास जाणवत नव्हता. उलट त्या कोल्हापुरीच्या त्या आवाजानीच मी खुश झालेलो.

आपल्या आवडीची वस्तु किंवा व्यक्‍ती बाबत असंच होतं का?ती चावली किंवा आपल्याला त्रास दिला, तर तो त्रास सुरुवातीला थोडा जाणवतो, आणि मग काही वेळानी आपल्याला जाणवतच नाही. उलट थोड्या वेळानी त्या बद्दलचं आपलं प्रेम आणखिन वाढतच जातं का?

असंच असेल कदाचित...

Happy new year, everyone :)