दिवस २: रविवार, दि. २४/८/०८ ऋषिकेश -> जोशीमठ (२५० कि.मि.)
पहाटे ४.३० वाजता आम्ही दोघं हॉटेल बसेरा मधुन बाहेर पडलो.. आदल्या रात्री टॅक्सी ड्राईव्हरनी आम्हाला सुमो सुटतात, त्या चौकातच सोडलं होतं.. बसेरा हॉटेल त्याच चौकात होतं..चौकात एक चहाची टपरी चालु होती.. टपरीवाल्याला विचारलं,
"जोशीमठ के लिये सवारी/गाडी यहीं से मिलेगी?"
- "हां साब!"
"भैय्या एक चाय पिला दो....ह्म्म्म... साथ में यह बिस्किट भी दे दो.."
चहाच्या टपरीवरची बिस्किटं मला का कुणास ठाऊक, पण सॉलिड आवडतात.. एखाद्या स्थानिक बेकरीची असतात.. एक मस्त चव असते..
चहात बिस्किट बुडवुन, त्याला विचारलं..
"भैय्या, आप इतनी सुबह-सुबह दुकान खोल देते हो?"
-"अरे साहब! मैं तो रात भर दुकान चलाता हुँ... शाम को ७-८ बजे आता हुँ.. फिर सुबह ९-१० बजे तक रहता हुँ.."
"रात को कौन आता हैं?"
-"साहब.. रात को काफी लोग आते-जाते हैं.. काफी गाडियां आती-जाती हैं इस रस्ते पर.."
मग कळलं.. की तो १५-२० फुटी रस्ता NH-५८ चा भाग आहे!!!
त्या भागात सुमो म्हणजे फक्त सुमो नाही, तर सुमो, ट्रॅक्स, बोलेरो, स्कॉर्पियो.. ह्या सगळ्या गाड्या सुमो असतात...जोशीमठ सांगितल्या वर आम्हाला एक गाडी मिळाली.. आम्ही पहिले/दुसरेच असल्यामुळे, आम्हाला पुढची सीट मिळाली, म्हणुन आम्ही खुष...
एका सुमो मध्ये १० लोकं बसवतात.. पुढे दोन, मधे ४ आणि मागे ४!!
सीट भरवण्या करता आम्ही थांबलेलो.. एक तास झाला... दोन झाले.. शेवटी ६.३०-७ वाजता निघालो! आधी माहिती असतं तर निदान झोप तरी काढली असती हॉटेल मधेच! तशी आपली आणि झोपेची मस्त गट्टी आहेच.. कधीही, कुठेही झोपु शकतो मी...
ऋषिकेशहून गाडी सुटली.. पुढे बसुन माझी अधुन-मधुन झोप चालुच होती.. सगळा पहाडी रस्ता.. एका बाजुला पहाड.. तर दुसऱ्या बाजुला खाली वाहणारी गंगा... नागमोडी वळणं घेत घेत एक पहाड चढायचा.. तो ओलांडुन, पुढचा पहाड आपल्या तयारी करता उभा सज्ज दिसायचा.. रसत्यात एखादं छोटं गाव.. किंवा छोटंसं शहर..
९-९.१५ वाजता आम्ही घाटातल्या एका ढाब्यावर नाश्त्या करता थांबलो.. जाम भूक लागली होती.. रात्री जेवलो नव्हतो.. DJच्या आईनी बेसनाचे लाडु दिले होते त्याच्या बरोबर.. ते खालले होतेच..
ढाब्यावाल्याला विचारलं.. काय आहे नाश्त्या करता.. तर म्हणाला.. आलु पराठा और छोले!
म्हटलं येऊ देत दोन प्लेट!
ढाब्याच्या समोर उभं राहुन दोन्ही हात वर करुन एक मस्त आळस दिला.. ढाब्याच्या मागे एक खोल दरी होती.. दोन्ही-तीन्ही बाजुला उंच डोंगर.. आणि त्या डोंगरांवर खेळणारे पांढरे शुभ्र ढग.. पावसाची काही चिन्हं नव्हती.. it was a beautiful, bright sunny sunday...
sunday आणि आलु पराठा ह्यावरुन बंगलोरची आठवण झाली.. दोन वर्ष कॅम्पस मधे हे combination अगदी अटूट होतं.. रविवारी ब्रेकफास्टला आलु पराठा हमखास असायचा.. पराठ्यावर अमुल बटर.. सोबत दही.. आहाहाहा!!
ताबडतोब मुंबईला अमितला फोन लावला.. अमित, मी, DJ होस्टेल मधे शेजारी-शेजारी.. तो पण यायचा होता ह्या ट्रिप करता.. पण जमलं नाही.. त्याला आमच्या रविवारच्या ब्रेकफस्ट बद्दल सांगितलं.. आणि आजुबाजुच्या सुंदर परिसराचं वर्णन केलं..
देवप्रयाग, श्रीनगर आणि रुद्रप्रयाग ओलांडुन आम्ही कर्णप्रयागला दुपारी १२.३०ला पोचलो.. आमची गाडी तिथपर्यंतच जाणार होती.. ह्या प्रत्येक प्रयागाला गंगाच्या दोन नद्या एकत्र येतात.. ’प्रयाग’ ह्या शब्दाचा साक्षात्कार मला तेव्हा झाला! :)
कर्णप्रयागला गाडी मिळाली ती चमोली करता.. पुढच्या सीटवरुन आम्ही ४ लोकांच्या मधल्या सीटवर आलो.. मी आणि DJ दोघंही खात्या-पित्या घरचे!! त्यामुळे हे जरा अवघड प्रकरण होतं.. मागे-पुढे बसुन, श्वास रोखुन बसुन.. काहीतरी करुन आम्ही adjust केलं.. करावंच लागलं!
तरी मी खिडकीत बसलेलो, त्यामुळे मस्त वारा खात-खात तो २ तासाचा प्रवास केला.. रस्त्याच्या कडेच्या इतक्या जवळुन आमची गाडी जात होती.. कितीतरी वेळा असं वाटायचं की आता आपण खाली दरी मधे गेलोच!!
चमोली मधे आम्ही आणखिन तिसऱ्या सुमो मधे ट्रॅन्सफर झालो! ह्या वेळेस तर एकदम मागाच्या सीट्स वर! and the ride does get quite bumpy when you are sitting on those last seats that face each other!!
जोशीमठ मधे कुठे रहायचं हे आमच्या बरोबर बसलेल्या एका माणसाला विचारलं.. हॉटेलं तर चिक्कार आहेत.. पण त्यानी GMVNच्या गेस्ट-हॉऊस बद्दल सांगितलं.. GMVN म्हणजे गढवाल मंडल विकास निगम.. similar to our MTDC..
४.३०-५ वाजता जोशीमठला पोचलो.. तेव्हा अंगातली सगळी हाडं मस्त शेकुन निघाली होती.. सुमोच्या टपावरुन आमच्या rucksacks घेतल्या.. समोरच GMVN गेस्ट-हाऊस होतं.. नशीब चांगलं होतं.. बुकिंग नव्हतं आमचं, तरी रुम मिळाली...
थोडं फ्रेश होऊन त्या गावात एक चक्कर मारली.. बऱ्यापैकी मोठं होतं.. प्रत्येक घराच्या समोर एक छोटा बगीचा.. बगीच्या मधे सुंदर फुलं.. गावात शंकराचार्यांचा एक मठ आहे.. नरसिंहाचं एक मंदिर आहे.. तिथे दर्शन घेतलं.. गावाचं एक टोक दुसऱ्या टोकापर्यंत एखादं किलोमिटर.. चालता-चालता DJ फोटो काढत होता.. समोरच्या पहाडावर एक नागमोडी रस्ता दिसला.. त्याच अफलातुन रस्त्यावरुन आम्ही पुढच्या दिवशी गोविंदघाटला जाणार होतो..
रात्री जेवायला GMVN गेस्ट-हाऊस मधेच बसलो होतो.. जेवताना खास गढवाली म्हणुन आलु ठेंचवानी ही भाजी घेतली होती..तेव्हा तिथे गुज्जु पर्यटकांचा एक ग्रुप आलेला.. ग्रुप मधे सगळे ३०-४० ह्या वयोगटातले.. ग्रुप मधल्या एका गुज्जु काकांकडे बघत मी म्हट्लं,
"DJ, हे काका फुल-टु GTM आहेत!"
-"GTM?"
"गावठी turned modern! अरे कॉलेज मधे नेहमी पंजाबी ड्रेस घालणारी पोरगी एक दिवस अचानक जीन्स घालते, तेव्हा तिला GTM म्हणायचो.. तसेच हे काका आहेत.."
-"क्यों?"
"अरे बघ ना... काकांनी शॉर्ट्स घातल्या आहेत.."
-"त्यात काय विशेष? शॉर्ट्स कितीतरी लोकं घालतात..."
"अरे टि-शर्ट बघ.. एक तर पिंक कलर.. आणि कसलं ढिनचाक design आहे..."
-"ते गुज्जु आहेत!"
"बरं.. कमरेला काळं पॉऊच..."
-"ते काका आहेत..."
काही केल्या DJ मानत नव्हता की ते काका GTM आहेत..शेवटी मी ब्रम्हास्त्र काढलंच..
"DJ, काकांनी फॉर्मल काळे नायलोन सॉक्स आणि काळे लेदर शुज घातले आहेत! आता बोल!!"
-"येस्स, Mr Kulkarni!! गुज्जु काका नक्कीच GTM आहेत!! कोई शक नहीं!!" :)))
************************
DJनी पिकासा वर ट्रिपचे फोटो टाकले आहेत.
त्याची लिंक: http://picasaweb.google.com/dhananjays02/ValleyOfFlowers
I am sure you will love the pictures - Nikon D80 खरंच जबरदस्त आहे.. आणि DJ सुद्धा!! :)
you will notice that both of us dont feature in the snaps - DJ doesnt feature since he was clicking the snaps; and we did not want the beauty of any of the pics to be distorted by my presence :D
And here's a link to a short post from him on our trip -
http://a-reluctantbloggers-blog.blogspot.com/2008/09/valley-of-flowers.html
as per a mutual decision on the division of labour, while he was to click the pictures, I am supposed to do the write-up... i am still trying to finish the same.. wonder if I can do justice to this beautiful place.. nevertheless, u guys have the pictures now, to marvel at one of Mother Nature's beautiful creations!
5 comments:
surekh photographs! Lucky aahat re, asa mast bhatakaayalaa milala te! sahich!
saheb,
DJ ne naagmodi rastyacha kadhalela photo ha wegalyach rastyacha aahe ani govindghat la janaraa rastaa wegalach aahe....rather its a different hill altogether :)
Kulkarni the only reason you are not in the snaps because Size does matter :-) 35mm madhey kiti photo kadnar?
Kulkarni the only reason you are not in the snaps because Size does matter :-) 35mm madhey kiti photo kadnar?
@Yashodhara,
thanks! yup, i seriously consider myself & DJ very lucky to have done this fantastic trip!
@Snehal,
:-P
@DJ,
point well taken! u dont have to rub it in :D
Post a Comment