VoF ट्रिप : Part V
दिवस ५: बुधवार, २७/८/०८ हेमकुंड-साहिब
एक महिना उलटुन गेला आहे.. आज विश्वास बसत नाहीये.. आम्ही खरंच हेमकुंड-साहिब चढलेलो का??
त्या दिवशी सकाळी ६.३०च्या सुमारास मी आणि DJ नी हेमकुंड-साहिबची वाट पकडलेली..गेल्या दोन दिवसात जवळ-जवळ ३० किलोमिटर ट्रेक केले होते.. घांगरिया ते हेमकुंड फक्त ६ कि.मि..
प्रश्न अंतराचा नव्हता.. challenge होतं उंचीचं... ९५०० फुटांवरुन १४००० फुट गाठायचं होतं!
ट्रिपच्या आधी गुल्लुनी सांगितलेलं.. हेमकुंडचा ट्रेक अवघड आहे.. पण तुम्ही दोघं करु शकाल.. आदल्या दिवशी महेंद्र गाईडनी पण तसाच विश्वास दाखवला होता आम्हा दोघांवर..
आदल्या संध्याकाळी फूलो की घाटी वरुन परत येताना अचानक बंगलोरच्या माझ्या फ्रेंच मदाम, लक्ष्मी, भेटलेल्या.. तब्बल ४.५ वर्षांनी!! आणि गंमत म्हणजे त्यांनी मला पूर्ण नावानिशी ओळखलं.. त्या आणि त्यांचा नवरा सूर्या दोघं बंगलोरच्या एका ग्रुप बरोबर आलेले.. आमच्या आदल्या दिवशी फूलो की घाटी आणि त्या दिवशी हेमकुंड! दोघं नवरा-बायको वयानी ४५-५० असतील.. उल्लेखनीय गोष्ट होती ती म्हणजे सूर्या हेमकुंडचा ट्रेक चढुन गेलेले!! मदामला विचारलं तेव्हा त्या म्हटल्या की सूर्या रोज ८ कि.मि. जॉगिंग करतात!!
जगाच्या एका कोपऱ्यात असं कोणी जुनं ओळखीचं व्यक्ती भेटणं (पुण्यात मला कुठेही, कोणीही ओळखीचं भेटतं.. पण ह्या ठिकाणी कोणी भेटेल असं वाटलं नव्हतं).. मग काही जुन्या आठवणी येतातच..शिवाय ४-४.५ वर्ष भेट नव्हती.. अधुन-मधुन लक्ष्मी मदामशी ई-मेलवर संपर्क होतो.. तरी त्यांनी चौकशी केली.. फ्रेंच एकत्र शिकणारे बाकीचे मित्र, कोण, कुठे काय करत आहे.. अशा गप्पा झाल्याच... मदामनी पण आम्हा दोघांना हेमकुंडच्या ट्रेक करता शुभेच्छा दिल्या... बंगलोरला कधी गेलो की त्यांना भेटायचा वादा झालाच...
प्रॉब्लेम एकच होता.. दिल्ली मधे गेल्या ३ महिन्यात कंपनीच्या गेस्ट-हाऊस मधे राहुन - नाश्त्याला छोले-पुरी, ऑमलेट-ब्रेड, आलु पराठा; लंच/डिनरला पनीर, काली दाल, राजमा, आलु, मलई केक, गुलाब-जाम, आईस-क्रिम ई. खाऊन वजन ५-६ किलो वाढलेलं.. सकाळी ८.३०/९ ते रात्रीचे ९/१० वाजे पर्यंत ऑफिस मधे दिवसातुन सहज चहा/कॉफीचे १०-१२ कप होतात... शिवाय जॉगिंग बंद (not that i ever jogged regularly in life).. त्यामुळे स्टॅमिनाची वाट!!
स्वत:ला एकच सांगत होतो... slowly, but surely.. हा ट्रेक पूर्ण करायचा आहे..ट्रेक सुरु केला, तेव्हा हलका पाऊस पडत होता.. चहु बाजुचे पर्वत ढगांमागे लपलेले होते..आमच्या बरोबर एक सरदारजी चाचा-भतिजा जोडगोळी होती.. सुरुवातीचीच वाट प्रचंड steep.. आणि त्यात हवा फारशी चांगली नाही..
ते चाचा खड्या पंजाबी मधे आम्हाला म्हणाले,
"आज मौसम भी बडा खराब हैं.. और रास्ता भी कठिन.. लेकिन कोई गल नहीं.. इसे भी पार कर लेंगे.. वाहे गुरु की क्रिपा हैं.. वाहे गुरु दा खालसा! वाहे गुरु दी फतेह!"
ह्या ट्रेक मधे ९०% सगळे सरदारजी मंडळी भेटणार होते आम्हाला.. कोणी पंजाबच्या कानाकोपऱ्यातुन आलेले.. तर कोणी दिल्ली, मुंबईहून, तर कोणी कनेडाहून!! कोणी आमच्या सारखं पायी चढत होतं.. तर कोणी घोड्यावरुन.. तर कोणी पालखीतुन.. कोणी ७-८ वर्षाचं.. तर कोणी ६०-६५ वर्षांचं!! कोणी पायात आमच्या सारखं मजबुत ग्रिप असलेले बूट घातलेले.. बाटा, रीबॉक, नाईके, ऍडिडास.. तर कोणी साध्या स्लिपर्स किंवा रबरी/प्लॅस्टिकचे काळे पावसाळी बूटांमधे! कोणी आमच्या सारखं ट्रॅक पॅन्ट, स्वेटर/जॅकेट घालुन.. तर कोणी पायजमा-झब्ब्या मधे.. अंगावर एखादं ब्लॅन्केट ओढलेलं.. किंवा ते देखिल नाही!
दमलो किंवा खचलो की डोंग्रातुन कुठुनतरी एक जोरदार आवाज निनादायचा.. आणि आम्ही पण त्या आवाजाला तितक्याच ताकदीनिशी उत्तर द्यायचो,
"बोले सो निहाल! सतस्रियकाल!!"
आणि मग सगळी दमछाक सारुन पुन्हा चढाई सुरु व्हायची!
नागमोडी वळणांच्या असंख्य गणती मधे एक कट्टा आठवतो.. तिथे बसुन पाणी प्यायलो.. DJच्या आईनी पाठवलेले बेसनाचे लाडु हाणलेले एक-एक.. आणि DJच्या फोनवरुन ऐकलेलं ते भजन..
अबीर गुलाल, उधळीत रंग।
नाथा घरी नाचे माझा, सखा पांडुरंग॥
डोळे मिटलेले.. स्वत:ची जाणीव फक्त स्वत:च्या श्वासातुन होत होती... देह हरपणं कशाला म्हणतात, ते जाणवलं तेव्हा..life offers some sublime moments.. when you forget yourself.. and become one with your surroundings.. that was one such moment..
पालखी धरणारे ते चार गडी विश्रांती करता थांबले, तेव्हा पालखीत बसलेले ते वृद्ध सरदारजी स्वत: एका हातात काठी घेऊन, आणि दुसरा हात एका गडीच्या खांद्यावर टाकुन, हळु-हळु करत, जवळ-जवळ एक किलोमिटर चढलेले!
DJ म्हणतो तसं.. faith can indeed help move mountains!
जस-जसं आम्ही हेमकुंडच्या जवळ पोचत होतो.. तसं ऑक्सिजन कमी होत होतं.. धुकं आणखिन दाट होत होतं.. थंडी वाढत होती.. ब्रम्हकमळं दिसु लागली.. ज्या पर्वतांकडे आम्ही घांगरियातुन आ वासुन बघत होतो, ते आमच्या समोरासमोर आले होते..
तब्बल ४-४.३० तासानी आम्ही आमचं ध्येय गाठलं!
दोघांच्या चेहऱ्यावर आलेली खुशी की लहर खरंच जबरदस्त होती!
गुरुद्वारामधे जायच्या आधी हेमकुंडात एक डुबकी घ्यायची होती.. हेमकुंड म्हणजे बर्फाचं कुंड.. वर्षातल्या १२ पैकी ८ महिने त्या कुंडाचं पाणी म्हणजे बर्फ असतो.. आणि त्या दिवशी तर त्या कुंडावर इतकं दाट धुकं होतं की ३-४ फुट समोरचं काहीच दिसत नव्हतं!!!अशा अवस्थेत, इतक्या गार पाण्यात डुबकी मारायला मी अजिबात तयार नव्हतो..
DJ डुबकी मारुन आला.. चक्क डोकं पाण्याखाली ठेऊन!!
इतकं लांब येऊन, फक्त ते पाणी प्रचंड गार आहे म्हणुन त्यात डुबकी मारायची नाही - हे काहीसं पटलं नाही..
म्हणुन मग मी पण पाण्यात गेलो.. मोजुन ५-७ सेकंद असेल मी त्या पाण्यात.. म्हणतात की जेव्हा मरण समोर येतं, तेव्हा एका क्षणात तुम्हाला तुमचं सगळं आयुष्य दिसतं.. तसंच काहीसं झालेलं..
गुरुद्वारात जाऊन दर्शन घेतलं.. शेजारच्या लक्ष्मण-मंदिरात पण दर्शन घेतलं.. गुरुद्वाराचं लंगर मधे मिळणारी तांदळाची खिचडी खालली.. दमुन-भागुन आलेलो आम्ही दोघं.. आणि त्या गार, misty, पावसाळी वातावरणात त्या गरम खिचडीची वाफ.. कुछ और ही मज़ा था.. आणि त्या नंतर लंगर मधेच मिळणारा स्टीलच्या पेल्यातला तो गरम चहा!!
हेमकुंडच्या दुसऱ्या बाजुला असलेल्या ग्लेसियर कडे जायचं होतं.. पण हेमकुंडावर धुकं इतकं दाट होतं.. समोरचं काहीच दिसत नव्हतं.. तिथल्या लोकांनी आडवलं.. पलीकडे जाणं फारच धोकादायक होतं..
दुपारी २-२.३० नंतर हेमकुंड-साहिबला थांबु देत नाहीत.. म्हणतात की ऑक्सिजनची पातळी फारच कमी होते..दर्शन आणि लंगर तर झालेलं.. आणि पावसाचं सावट होतच.. १२-१२.३० ला आम्ही खाली उतरायला लागलो..
अतिशय steep slope असलेला पांढऱ्या दगडांचा रस्ता.. चढताना जितकं दमायला होतं.. उतरताना तितकीच काळजी घ्यावी लागते.. कुठे पाय घसरला.. किंवा कड्यावरुन खाली दरी पाहिली.. हलक्या पावसामुळे तसंही सगळं निसरडं झालेलं.. आणि त्या दाट धुक्यात समोरचं फारसं काहीच दिसत नव्हतं.. मधेच जर कधीतरी उघडुन आलं, तर मात्र तो खाली उतरणारा नागमोडी वळणांचा सुंदर रस्ता नुसताच पाहत बसावा असं वाटायचं..
३ कि.मि. खाली उतरलो, तसा पावसाचा जोर प्रचंड वाढलेला.. समोरचं काहीच दिसत नव्हतं.. मग, तिथेच एका ढाब्यावर थांबलो.. मस्त गरम एक कॉफी घेतली.. पलीकडच्या बाकावर ३ जवान दिसले.. विचारलं, तर ते तिघं IFS (Indian Forest Service) ऑफिसर्स होते.. देहरादुनला त्यांचं ट्रेनिंग चालु होतं एक वर्षाचं.. फूलो की घाटी आणि हेमकुंड-साहिबचा ट्रेक हा त्यांच्या अभ्यास-क्रमाचा एक भाग होता..but the most amazing thing was.. त्या दिवशी सकाळी तो २५-३० ऑफिसर्स चा ग्रुप गोविंदघाट ते घांगरिया असा १३ कि.मि.चा ट्रेक चढुन, लगेच घांगरिया वरुन हेमकुंडला जात होते!!! ते सुद्धा अशा हवामाना मधे!!
तिघांपैकी दोघं कर्नाटकाचे होते, तर तिसरा झारकंडचा... त्यांना त्यांचं पोस्टिंग मिळालेलं.. एक आसामला, दुसरा छत्तिसगढला, तर तिसरा कर्नाटकात.. बदली कुठेही होवो, पण पुढचे ३५-३६ वर्ष तेच त्यांचं नविन डोमिसाईल राज्य होतं.. २४-२५ वर्षांचं वय त्यांचं.. UPSC अशा अवघड परीक्षेत यश मिळवणारे भारतातले सगळ्यात हुशारांपैकी असे ते तिघं.. felt really proud after meeting them..
पावसाचा जोर कमी झाला तसं आम्ही खाली उतरायला निघालो.. ते तिघं वर जायला..
life makes you meet so many different people.. at so many crossroads... and the meeting ranges from a few fleeting moments...to a lifetime.. and you fondly remember and cherish each & every memory.. each and every conversation...
घांगरियाला पोचलो, तेव्हा मी आणि DJ प्रचंड खुष होतो.. we had "actually" done it!!
we had overcome all obstacles.. we had triumphed against every challenge..
३ दिवसात आम्ही ४२ कि.मि. ट्रेकिंग पुर्ण केलं होतं..
अब बाकी था.. सिर्फ १३ कि.मि. का रास्ता.. घांगरियासे गोविंदघाट तक!
10 comments:
Dude, you forgot about the image of the "Nar parvat", it was Nar right? But it was one of the most pristine experiences I ever had. Something so pure.
Faith can indeed move mountains, but as you can it can't take a bunch of ***** over a mountain ;)
yeah.. i remember that sight.. when we could see only the peak of the snow-capped mountain through the clouds :)
and i think, u have also captured it in your camera :)
wowwwwwwwwww...
Hemkund sahib la 5 parvat aahet ani lake madhye tyancha pratibimba padat na!
mahaan aahaat tumhi dogha :) great!
http://picasaweb.google.com/dhananjays02/ValleyOfFlowers#5242006516154826978
Khoop chan... Even it was one of my memorable trek
Mastach :)
Let the next post come quickly!
Let the next post come quickly!
super
kata aala re...
Post a Comment