२/३० (दोन बाय तीस)..

काही वर्षांपूर्वी Somerset Maughamचं एक पुस्तक वाचलेलं. Of Human Bondage. फिलिपची गोष्ट आहे. म्हणतात की ही Maughamची आत्मकथा देखिल आहे. Before Sunset मधे Ethan Hawke ला एक पत्रकार विचारतो की त्यानी लिहिलेलं पुस्तक ही आत्मकथा आहे का?
त्यावर, तो म्हणतो, "Um.. well.. isnt everything autobiographical?"

तसंच असेल Maughamचं पुस्तक सुद्धा. तर फिलिप बद्दल सांगत होतो. बोलता-बोलता, किंवा लिहिता-लिहिता असंच related दुसरंच काहीतरी आठवत राहतं...

फिलिप लहानपणीच अनाथ झाल्यावर त्याचे uncle-aunt त्याला बोर्डींग स्कुलला पाठवतात. त्यांची इच्छा असते की शाळे नंतर त्यानी Oxfordला पुढे शिकावं आणि clergyman व्हावं. पण त्या ऐवजी फिलिप जर्मनीला जातो. तिथे काही दिवस राहतो, मग लंडनला परत येतो. तिथे तो CA व्हायचा प्रयत्न करतो. पण त्यात त्याचं मन रमत नाही. म्हणुन मग पॅरिसला जातो, चित्रकार व्हायला. तिथे एक मुलगी त्याच्या प्रेमात पडते, पण तो प्रतिसाद देत नाही.

त्याच्या लक्षात येतं की तो काही चांगला चित्रकार नाही, म्हणुन मग लंडनला परत येतो... आणि ह्या वेळेस डॉक्टर व्हायचं ठरवतो.. मग मिल्ड्रेड नावाच्या वेट्रेसच्या प्रेमात पडतो.. तिचं त्याच्यावर प्रेम नसतं..

मी गोष्ट का सांगतोय सगळी?? अतिशय depressing गोष्ट आहे. प्रेम, मैत्री, पैसा, करियर - सगळ्यातच फिलिपच्या नशीबी उतार-चढाव येतात. पण त्यात काय विषेश - सगळ्यांचच होतं की.. शेवटी त्याचं त्याला कळतं की त्याला आयुष्यात काय पाहिजे...

खरं म्हणजे त्या पुस्तकातलं एक वाक्य त्या वेळेस खूप मनाला भिडलं होतं..
"There are three things to find out: man’s relation to the world he lives in, man’s relation with the men among whom he lives, and finally man’s relation to himself."

तो शोध अविरत चालुच आहे.. आजही..

-------------------------

मागच्या महिन्यात एक Argentine सिनेमा पाहिला. Cleopatra. क्लिओपात्रा ही एक म्हातारी रिटायर्ड school teacher असते - लग्नाला ३७ वर्ष झालेली. तिला मिलाग्रो नावाची एक young soap opera star भेटते. दोघी त्यांच्या नेहमीच्या आयुष्याला कंटाळुन एका विकेंडला एकत्र प्रवास करतात; त्या तीन दिवसाची गोष्ट आहे.. शहरा पासुन दूर... अर्जेन्टिनाच्या छोट्या-छोट्या गावातुन... रस्त्यावरुन गाडी जात असते..तसं रेडियो वर एक सुंदर गाणं लागतं..

"y tan contenta"... खूप शोधलं पण ह्या गाण्याचे english lyrics मला सापडलेच नाहीत..नक्की शब्द माहित नाहीत.. पण गाण्याचा अर्थ काहीसा असा आहे...

जंगलातली एक स्वच्छंद मनस्वी पायवाट.. जी लवकरच अदृष्य होईल...
तशीच मी ही ह्या आयुष्याच्या वाटेवरुन चालत राहील...शोधत राहील..
माझ्या नशीबात काय आहे ते..
हवं आहे ते स्वप्नातलं एक मोकळं आभाळ...
माझं मन जिथे रमेल..
आणि त्या वेळेस मी किती खुश असेल.. किती आनंदी असेल..

सिनेमाच्या शेवटी, शहरातल्या घरी परतणाऱ्या बस मधुन क्लिओपात्रा उतरते.
आणि रस्त्यावरच्या बाकावर बसुन स्वत:ला विचारते,
"माझ्या पुढे दोन पर्याय आहेत - मी जे करायला पाहिजे, ते करु? की मला जे आवडते, ते करु?
का नुसतीच, काही न करता, अशीच इथे या बाकावर बसुन राहु?"
आणि मग ते गाणं गुणगुणत बसते...

---------------------------------

फ्रेंच ओपन संपली. सुरु व्हायच्या आधी जस्टिन हेनिन retire झाली. अवघी २५ वर्षांची. जगात ती अव्वल क्रमांकावर. शिवाय रोलांड गारोस हे तिचं घरचं मैदान. तिथे तिला कोण टक्कर देणार. पण तिनी निर्णय घेतला. retire व्हायचा. आपण कधी थांबायचं हा निर्णय घेणं किती अवघड असेल.
तिचं motivation संपलं असेल का?नक्कीच! नाहीतर ती खेळत राहिली असती...

फेडरर नडाल कडुन पुन्हा हरला. आणि ह्या वेळेस तर अगदी बेकार हरला. skill, talent, जिद्द, fitness, motivation - ह्यात कुठेही फेडरर कमी नाही. पण तो फॉर्म मधे नाही. आणि त्याहीपेक्षा, नडालला आपण क्ले कोर्टवर हरवु शकतो, हा confidence तर दिसतच नव्हता. गपचुप नांगी टाकली..

खेळणारा कितीही निष्णात खेळाडु असला (किंवा नसला), तरी जिंकण्या करता आत्मविश्वास पाहिजे.. आणि कधी थांबायचं हे ही ओळखता आलं पाहिजे ना?

----------------------------------

काल "अमेरिकानो" हा सिनेमा पाहिला. क्रिस नावचा एक अमेरिकन युवक स्पेनला जातो. तो नुकताच ग्राज्युएट झालेला असतो. अमेरिकेत परतल्यावर त्याला एका चांगल्या नोकरीवर रुजु व्हायचं असतं.
स्पेन मधे त्याला वेगवेगळे लोकं भेटतात, एक वेगळी संस्कृतीशी त्याचा परिचय होतो.
त्याचं त्याला कळत नसतं, की त्यानी घरी परतावं आणि एक fast-track career निवडावं.. का एक वेगळी वाट पकडावी..

ह्या पेचात पडलेल्या क्रिसला स्पेन मधे भेटलेली अडेला सांगते,
"Promise me one thing - do what you are scared of doing."

----------------------------------

मेघनानी ’आपण का लिहितो’ हा प्रश्न केला होता. आज दोन वर्ष झाली आहेत, हा ब्लॉग लिहित आहे.पुढच्या महिन्यात तीस वर्ष होतील - श्वास घेण्याला.

Somerset Maughamच्या वाक्यातला अविरत शोध चालुच आहे... क्लिओपात्राचं गाणं मी पण गुणगुणत आहे.. फेडरर सारखा आत्मविश्वास अधुन-मधुन ढासळतो...हेनिन सारखं कधी थांबायचं हे अजुन तरी कळत नाहीये... आणि अडेलाची सूचना पाळावीशी वाटत नाहीये...

Somerset Maughamचं अजुन एक वाक्य आहे,
"We write not because we want to, but because we have to."
म्हणुनच मी लिहित आहे कदाचित...
आणि कदाचित तसंच, मी श्वास देखिल घेत आहे...

18 comments:

.... said...

surekh uttar dilas.... surekh ha shabd chapkhal basatnahi ithe mahit aahe pan shabd aani denyachi padhat surekh vaatalii..

aanii ho vaadhadiwasaachya hardik shubhechya aagau (agaaupane dekhil;))


...snehaa

Anand Sarolkar said...

Jaane kya chahe mann bawara...
Akhiyan mein re sawan chala...

Anonymous said...

Ketan,

far chhan lihitos re tu. Asach lihit ja. Tujhe barech post wachle ani asa janawala ki tula kasala complex ajun tari nahiye. Ani tula pudhe hi complex yewoo dewoo nako.
Pan eka complex madhe ghar matra nakki ghe. Aso...
Ha blog uttam aahe...wachun ek gosht athawalee..sangawishee watate.
Ekda ek Raja asto..far kahi famous nasto ..pan kharach ek raja asto. Tyala kahi ek udyog nastat ..karan to raja asto...
Tar asa ha raja ek diwas ranichya shodhat jato. Tyala watet ek Rani bhetate. Doghancha ekmekanwar prem jadata. Raja khoosh hoto ...karan to ek Raja asto. Rani kahi far khoosh hot nahee ...karan te ek female character aste..thodakyat Rani aste.
Raja ha basically marathi asto ani Rani bong aste. Rani he baryapaike famous aste pan Raja is locally recognized. Tyamule tyancha lagna kahi hot nahee.
Karan to Raja asto ..ani tyala complex asto.
mala asa andaaj aahe ki tu olakhala asawas ha raja kon ani he rani kon te?
Tar to Raja dusra tisra koni nahee tar Aapla Raja Gosavi ani te rani tar apli Rani Mukhrajee aste.
tyamule Rani kahi Rajashi lagna karat nahee.
Tar hey jug asa chalala aahe mitra..Ata tula watel hya comments cha ani blog cha relevance kai??
neet wichar kar mitra...far goodh aahe hyamdhe. (tula hint deto ...welecha ek motha ganit/maths aahe hyamage :))
mala mahitey ki tu mala ata Blog lihayala jabaradasti karsheel.
Pan me lihinar nahee..karan me anonymous rahaycha tharawala aahe.
Me asach padadya-aad rahun tula comments pass kareen.

Tujha ladka/shefarlela,
Anonymous2

स्नेहल said...

k10,

mast lihila aahes.... chhote chhote pieces wachayala maja aali...ani te sagal shewati jas gumphal aahe te tar khaas ch!

rayshma said...

some of us find what they're looking for in life... some of us don't. we all know there's someplace we want to be... some objective...some goal we wish to achieve. we don't always know where or what that is. but we keep looking.
sometimes, that's the most beautiful part of life. sometimes, the most futile. depends on how u look at it.

the piece was rather well-timed for me... :)

Dhananjay said...

Ekandar tujhe prashna kahi sampat nahit:
Inner calling madhey tu Manus jagto kasha saathi cha sodh ghet hotas tar
aata tu lihito kasha saathi aahes yacha sodh ghet aahes.

Parat ekda same thought:
Too much thought blunts the action

Dhananjay said...

Anonymous 2 la ek prasha:
Raja shi lagna jhalya shivay Rani, Rani hotey ka?

कोहम said...

हम. छान लिहिलयस. वेगवेगळ्या अनुभवात असलेला एक समान धागा.

पण खरंच काही कारण असायला हवं का? लिहिण्याला? किंवा जगण्यालादेखील? अंगावर आलेला दिवस शिंगावर घ्यावा आणि मस्तीत जगावं. तसंच लिहावंसं वाटलं तर मस्तीत लिहावं. एक गरज म्हणून कशाला? आणि कसली गरज? expression ची? नाही पटत.

Jaswandi said...

hey ketan,
sahich re! mala tuza mhanunch kayam heva vatato!!

TheKing said...

Bhidoo, mere dil kee baat bol dee!

Meghana Bhuskute said...

jabara.

Monsieur K said...

@Sneha,
Thanks for your wishes :)

@Anand,
thats a fantastic song!

@Anon2,
kaayko khaali-pili dimaag ka dahi banaa relaa hai! apne ko maalum hai ki tension lene ka nahin, dena ka!!

@Snehal,
thanks again! :)

@Rayshma,
couldnt have expressed it in better words...

@Dhananjay,
writing is just one trivial activity... breathing is more important... anyways, as u say.. too much thot... :D

@Nilesh,
point accepted :)

@Jaswandi,
mala pan tujhaa hevaa vaatat aahe. mala aambe naahi milaale :(

@TheKing,
bhidu, bole to thanq :)

@Meghana,
aabhaar!

Parag said...

Sahi ahe ekdum....

vaishnavi said...

hey, i was searching for marathi vibhakti pratyay n accidently cqame on your blog......

Chan Lihta apan.... ek ek para wachatana nitsa kahi lakshat ala nahi pan indivisually te chan watale........

last para is awesome....
kiti chan tumhi te sagla ekatra kel ahe kupach mast......

keep it up :)

Monsieur K said...

Thanks Parag & Vaishnavi :)

mimo said...

Ekdam chhan

Deep said...

saaheb tumhee GREAT lihitay! :)

Monsieur K said...

@mimo,
thanks :)

@deep,
u flatter me ;-)