Inner Calling
The Motorcycle Diaries - एक सिनेमा
सन १९५२. आटाकामा वाळवंटातल्या एक रात्री ते दोघं मित्र एका अत्यंत गरिब कष्टाळु नवरा-बायकोला भेटले.
ते दोघं म्हणजे - २९ वर्षाचा एक biochemist - अल्बेर्टो, आणि २३ वर्षाचा final semester मधे शिकणारा एक medical student - अर्नेस्टो. दोघं Buenos Aires चे रहिवासी.
अल्बेर्टोची इच्छा - आयुष्याची ३० वर्ष पूर्ण व्हायच्या आत, संपूर्ण लॅटिन अमेरिका पाहुन घ्यायचं.
जानेवरी १९५२ मध्ये दोघं त्यांच्या "The Mighty One", ह्या 1939 500cc Norton मोटरसायकलवर प्रवास सुरु करतात. चार महिन्यात ८००० कि.मि. पेक्षा जास्तीचे अंतर कापायचे होते.
अर्जेन्टिना, चिले, पेरु, ब्राज़िल आणि वेनेजुएला हे देश पहायचे होते.
कधी Andes पर्वतरांगातला हिमवर्शाव, कधी आटाकामाच्या वाळवंटातला निर्जीव प्रवास. खिशात जास्ती पैसे नाहीत. खायला-प्यायला काही नाही. आजारी पडलं तरी काही औषध-पाणी नाही. ती मोटरसायकल २ पेक्षा जास्ती देश पाहु शकली नाही. मग पायी किंवा hitchhiking करुन प्रवास.
मधेच अर्नेस्टोच्या प्रेयसीचं पत्र येतं.. ती त्याची वाट पाहु शकत नाही... तिच्या प्रेमा खातर तिनी दिलेले पैसे त्यानी उपाशी/आजारी असुन खर्च केलेले नसतात..
आटाकामा वाळवंटात भेटलेल्या त्या गरिब नवरा-बायकोची शेत-जमीन जप्त झालेली होती. नोकरीच्या शोधात ते एका copper mineला जात होते.
बायकोनी ह्या दोघांना विचारलं,
"आम्ही नोकरी करता प्रवास करतोय. तुम्ही?"
तर अर्नेस्टो आणि अल्बर्टोनी एकमेकांकडे बघितलं, आणि मग अर्नेस्टो म्हणाला,
"आम्ही प्रवासा करता प्रवास करतोय!" (we travel for travel!)
प्रवासात बरेच चांगले-वाईट अनुभव आले दोघांना. वेगवेगळे देश, तिथली संस्कॄती, त्यांचं जेवण, तिथली लोकं आणि त्यांच्या बरोबर केलेली मजा न मस्ती.. प्राचीन Inca civilization चे माचु-पिचु (Macchu Picchu) ह्या शहरात पाहिलेले अवशेष.. आणि तेव्हा निघालेले अर्नेस्टोचे उद्गार,
"How is it possible to feel nostalgia for a world I never knew?"
त्याच बरोबर पाहिलेलं दारिद्र्य, रोगराई, हाल-अपेष्टा.. लेप्रसी हॉस्पिटल मधे केलेलं काम.. लेप्रसी पेशंट्सना मिळणारी छूत-अछूत वागणुक.. आणि स्वत:चा वाढदिवस त्यांच्या बरोबर साजरा करायला Amazon नदी पोहुन जाणारा अर्नेस्टो!
तो एक प्रवास त्या दोघा मित्रांच्या आयुष्यात एक मोठा टप्पा होता. फक्त जगच नाही, तर स्वत:ची ओळख करुन दिली त्या प्रवासानी. स्वत:च्या देशाची सीमा पहिल्यांदा ओलांडताना, अर्नेस्टोचे ते शब्द विशेष लक्षात राहतात,
"What do we leave behind when we cross each frontier? Each moment seems split in two; melancholy for what was left behind and the excitement of entering a new land."
This frontier could well be between two countries, between two cultures or even between two people.. or maybe even between two parts of life of a single person..
हाच २३ वर्षाचा अर्नेस्टो पुढे क्युबन क्रांतीकारक "चे गुएवेरा" (Che Guevera) म्हणुन प्रसिद्ध झाला...
*******************
"ब्र" - एक पुस्तक
ब्र संपवलं. म्हणजे वाचायला सुरु केलं, आणि कधी संपवतो असं झालेलं.
त्यातली central character प्रफुल्ला मला कळली नाही, झेपली नाही.
एक तर तिच्या आयुष्यात चांगलं काही झालं किंवा होतंच नाही, असं सतत वाटत राहिलं.
म्हणजे नवऱ्याशी घटस्फोट झाला, मुलगा तिला सोडुन गेला (इथे वपुंच्या "ही वाट एकटीची" आठवण झालेली); मग ती जिथे नोकरी करते, ती संस्था सुद्धा ती सोडते.. आणि आदिवासींच्या एका गावात जायचं ठरवते, तिथे त्यांची मदत करायला..
आयुष्यात वेगवेगळी लोकं आणि संस्थेंशी आपला संबंध येतो. परिचयात येणाऱ्या एखाद्या व्यक्ति किंवा संस्थेबरोबर आपलं जे नातं निर्माण होतं, ते नातं बऱ्याच parameters वर अवलंबुन असतं - सर्व प्रथम गरज, मग विश्वास, आधार, प्रेम, communication, understanding, commitment.. अशा कितीतरी गोष्टी असतात.. and each of these parameters - be it need, trust, support, love, commitment or anything - it has to be mutual and not one sided... ज्यावरुन ठरतं की ते नातं किती जवळचं, किती घट्ट बनेल..
फिक्शन असल्यामुळे प्रफुल्लाचा नवरा, मुलगा किंवा तिची संस्था - सगळेच एकदम shade of black आहेत. खऱ्या आयुष्यात तर ना कोणी complete white असतं ना black.. फक्त shades of grey असतात...म्हणुन कदाचित तिचं character फारसं पटलं नाही.. एक गोष्ट मात्र आवडली.. तिला पुढे काय करायचं आहे, हे उशिरा का होईना, तिचं तिला ठरवता येतं..
*******************
अर्नेस्टो असो किंवा प्रफुल्ला - त्यांना त्यांचं-त्यांचं "inner calling" कळलेलं.. an inner calling that drives you, that motivates you.. the passion of your life.. that defines what you want to achieve, and keeps you working towards it..
अर्नेस्टो, म्हणजे एक सिनेमातलं पात्रं.. पण एक असामान्य व्यक्ति.. त्या उलट प्रफुल्ला म्हणजे पुस्तकातलं एक काल्पनिक पात्र.. खऱ्या किंवा सामान्य आयुष्यात अशी जाणिव होते का कधी?
टेकडीवर शंतनु भेटलेला.. तो सध्या practice/training करतोय.. लेह ते सियाचेन असं ५००-६०० कि.मि. सायकलिंग करायचं ठरवलं आहे त्यानी.. altitude ranging only between 11500 to 18500 ft above sea level!! तुमच्या-माझ्या सारखाच आहे शंतनु - BE करुन पुण्यात नोकरी करणारा.. पण Mt Everest base चढलेला आहे.. Enduro3 ह्या २ दिवसाच्या टीम triathlon event मधे बक्षिस मिळवलं आहे.. तुमच्या-माझ्या सारखा नोकरी करणारा, तरी पण स्वत:ला सतत अशा पद्धतीने challenge करत असतो तो.. हेच त्यांचं "inner calling" असेल का??
नुकतेच भेटलेले पुण्यातल्या एका ऑटो कंपनीचे MD - त्यांच्या कंपनी तर्फे ते NRI डॉक्टर्स कडुन मोफत सर्जरी organize करत आहेत. भारता मधे ज्या ३-४ छोट्या शहरांमधे त्यांच्या कंपनीचे कारखाने आहेत, त्या शहरातल्या हॉस्पिटल्स मधे ते हा प्रोजेक्ट कार्यरत करणार आहेत. कंपनी नफा करत आहे की नाही, हे पाहता-पाहता आपलं सामाजिक कर्तव्य आपण पाळतोय का? आपल्या देशातल्या गरीब अथवा गरजु लोकांची आपण मदत करु शकतो का? हेच त्या माणसाचं "inner calling" असेल का?
टेकडीवर पळताना उन्हाळ्यातला तो पश्चिमेचा सूर्य देखिल माझ्या बरोबर त्या वाळलेल्या निश्पर्ण झाडांच्या मागुन खाली-वर पळत असतो. टेकडी उतरुन मी कांचन गल्लीत उतरतो, तेव्हा तिथले दोन गुलमोहर बघुन छान वाटतं.. those seem to be the only trees which are flowering fiery, flaming red in this hot summer.. आणि जणु मला ओरडुन ओरडुन म्हणतात,
स्वत:चं "inner calling" शोध केतन! don't merely exist, start living!
नुसतंच गुणगुणत राहु नकोस, काहीतरी कर!
लिये सपने निगाहों में, चला हूं तेरी राहों में
ज़िन्दगी आ रहा हूं मैं..
कई यादों के चेहरे हैं, कई किस्से पुराने हैं,
तेरी सौ दास्ताने हैं, तेरे कितने फसाने हैं
मगर एक वो कहानी हैं, जो अब मुझको सुनानी हैं
ज़िन्दगी आ रहा हूं मैं..
मेरे हाथों की गर्मी से, पिघल जायेंगी ज़ंजीरें,
मेरे कदमों की आहट से, बदल जायेंगी तकदीरें,
उम्मीदों के दिये लेकर, ये सब तेरे लिये लेकर
ज़िन्दगी आ रहा हूं मैं..
कभी तुझको गिला मुझसे, कभी मुझको शिकायत हैं,
मगर फिरभी तुझे मेरी, मुझे तेरी ज़रूरत हैं,
मैं ये इकरार करता हूं, मैं तुझसे प्यार करता हूं,
ज़िन्दगी आ रहा हूं मैं..
13 comments:
Sahi!
thanx parat ekda swatahcha "inner calling" shodhanyachi, aikanyachi athavan karun dilyabaddal! mast lihilays! :)
इनर कॉलिंग शोधण्यासाठी तर सगळा आटापिटा... कुणी सायकलवरून भटकायला निघतं, तर कुणी स्वतःला चार भिंतींच्या आत कोंडून घेतं. प्रत्येकाचे रस्ते निरनिराळे.
खूप दिवसांनी लिहिलं आहेस. मजा आली..c
खऱ्या किंवा सामान्य आयुष्यात होतं का असं कधी? हा खरा प्रश्न!
उत्तर आहे - हो, आणि नाही ही!
हो अशासाठी, की असं धूमकेतू दिसल्यासारखं वेळोवेळी इनर कॉलिंग सामोरं येऊन जातंही. पण ते आयुष्याच्या तेवढ्या क्षणांपुरतंच, तेवढ्या फ़ेज पुरतंच असतं. आयुष्यभर पुरून उरेल इतकं वाईड रेंजचं इनर कॉलिंग येणं केवळ असामान्य.
दुसऱ्याच्या इनर कॉलिंगला भुलून आपलं त्यावर बेतणं ही तर घोडचूकच. शंतनुला एव्हरेस्टचा बेस भावतो, त्याला लेह मध्ये ६००किमी सायकलिंग करावंसं तीव्रतेने वाटतं - ते त्याने केल्यावर तो ग्रेट आहे असं आपल्याला वाटेल, म्हणून आपणही ते करणं (कारण आपल्याला तसं त्या तीव्रतेने काही वाटलेलंच नाहीये, फ़क्त म्हणून) - निव्वळ चूक. कारण ती सायकलिंग ट्रिप करून आल्यावर शंतनुच्या चेहऱ्यावर महत्त्वाकांक्षापूर्तीचं समाधान असेल, आणि आपण बावचाळलेले असू, हे मी नक्की काय आणि कशाकरता करून आलोय? बाठेंच्या कुप्रसिद्ध ’च्यु...’ शब्दाला योग्य अशा स्थितीत.
या समस्येवरचं ठोस उत्तर माहीत नाही. पळवाट माहीतीये, ती अशी : मूडचा ’लो’ येवुन गेल्यावर जो ’हाय’ येतो, त्या लाटेत जे जमेल तेवढं उत्साहानं करून घ्यावं - जे आवडतं ते. जे करतोये ते आयुष्यभर पुरेल एवढं भव्यदिव्य असायचा सोस नको. दोन घडी साथ देवून मनमुराद आनंद मिळवून दिला तरी पुरे. लवकरच त्याचाही कंटाळा येईल, व्यर्थ वाटेल. मग पुढच्या ’हाय’ लाटेवर दुसरं काहीतरी..
@Jaswandi,
shodh, shodh, tu pan shodh :)
@Meghana,
completely agree - e'one has a different inner calling - it has to be one that makes you feel passionate about u.
@Circuit,
terrific comment! even i had the same question - do normal people, or does everyone realise his/her own inner calling? most of us tend to go with the flow.
some people like shantanu find their inner calling and challenge themselves physically; some do social work - they do this along with their normal life routine.
your other point of view is valid - if we blindly follow such heroes, we might not have the same passion; and would never really appreciate this inner calling.
tujha ajun ek point aavadla - does our "inner calling" last a lifetime? maybe, earlier, it did. today, with so many attention-seeking activities, attractions - we rarely involve ourselves in something that can be ever lasting. tolerance levels, patience, etc have gone down - we love to "reinvent" ourselves, our likings, etc every year, or 2 years.
your point about taking the "high" reminded me of this Shakespeare quote,
"There is a tide in the affairs of men, which, taken at the flood, leads on to fortune; Omitted, all the voyage of their life Is bound in shallows, and in miseries. On such a full sea are we now afloat; And we must take the current when it serves, or lose our ventures." (Julius Caesar, Act IV, Scene 3: Within the tent of Brutus)
the search continues, the struggle continues...
केतन - कमेंट लिहाविशी वाटावी असं पोस्ट आहे.
’मोटरसायकल डायरीज’ पाहुन मलाही बरंच काही वाटलेलं - जे वाटलेलं ते यापेक्षा वेगळं होतं कि नाही यावर इथे चर्चा अप्रस्तुत. ही कमेंट लिहिताना ’Roman Holidays' परत एकदा बघतोय. ही राजकुमारी पळुन जाते - inner calling मुळे?
च्यायला हे inner caling - inner calling क्या फंडा है?
काल बायकोबरोबर The Truman Show बघत होतो - Truman ला फिजी ला जायचंय - तर त्यावर त्याची बायको म्हणते - अरे वेडा बिडा आहेस का? ही mortgage payments, car payments...फिजी म्हणजे काही खाऊ आहे का? आणि इथे आमच्या डोक्यात किडा - च्यायला आपणही सेटल व्हायचं वगैरेच्या नादात अधिकाधिक अडकत चाललोय का? जेवढा पैसा जास्त तेवढी restrictions पण वाढत चाललिएत!
Coming back to inner calling - एका मित्राबरोबर पळुन गेलेलो घरुन. आणि आमचा प्रवास motorcycle diaries पेक्षा फारसा वेगळा नव्हता (यावर पुस्तक लिहायचं असं प्रवास संपल्या संपल्या ठरवलं होतं - लिखाण मागचे १३ वर्ष डोक्यात चालु पण कागदावर उतरायचंय...)
एनीवे - आपण instincts टाळत रहातो. आणि आपल्यातलाच कुणीतरी कधीतरी उठतो आणि म्हणतो कि गेलं बोच्यात - मला जे वाटतंय ते मी करणार. आणि आपण आपापले आ वासुन - च्यायला कसं जमतं एकेकाला करत बसणार....
माझा एक मित्र म्हणाला होता (अभ्या - कळ्या म्हणाला होता) - कि कुठल्याही नविन कल्पनेबद्दलचं fascination हे ती कल्पना मनात येते तेवढा क्षणच असतं. तिथुन पुढे ती कल्पना वास्तवात आणणं आणि fascination याचा सुतराम काही संबंध नसतो. मग उरतं ते फक्त hard work.
तुला सांगतो - हा तुझा जो कुणी मित्र आहे ना - लेह ते लडाख जाणारा - त्याच्या जागी स्वत:ला imagine कर. कि मस्तपैकी कॅन्टीन्मध्ये चहा मारत बसलायस आणि मनात विचार येतो - खडकी दापोडी नाही - लेह पासुन लद्दाख पर्यंत सायकल वर जायचं - एका झटक्या आख्खा हिमालय आणि समस्त (गारेगार) वाळवंट डोळ्यात तरळतं.
अशी स्वप्न पैशाला पाच पडतात रे....
पण तो आत्ता जे करतोय ते hard work.
For him, it doesnt matter if he will ever see लेह काळा कि गोरा ते. तो करतोय तो एका स्वप्नाचा पाठलाग. त्याच्यासाठी लागणारी शरिरयष्टी, stamina, साधनं, पैसा - याचे हिशोब आणि आडाखे त्याच्या मनात पक्के असणार. होत असणार.
वर्षभराने त्याला भेट - त्याचे ते सगळे आडाखे तुटलेले असतील, त्याच्या बजेटचे तीन तेरा वाजलेले असतील, त्याने निम्मा प्रवास punctured cycle डोक्यावर घेऊन केलेला असेल - थोडक्यात सांगायचं तर त्याची गांड लागलेली असेल.
विचार डोक्यात येऊन कृती प्रत्यक्षात उतरेपर्यंत त्याचे हाल झालेले असतील. पण तो त्याचं उरलेलं आयुष्य ’been there - done that' च्या सुखद अनुभवात घालवायला मोकळा झालेला असेल.
त्याच्या जगण्यात - ’भेंचोत वांझोटं स्वप्न मी कधी बघणारंच नाही’ ची मस्ती असेल....
Dont get me wrong - त्याच टेकडीवरुन तोच सिंहगड बघुन मलाही - ’आत्ताच्या आत्ता गेलंच पाहिजे’ असं feeling येऊन गेलंय. १० पैकी ९ वेळा मी त्यावर काहीच केलेलं नाहिए आणि त्या ९ पैकी ९ वेळेस माझी प्रचंड चिडचिड झालिए - न गेल्याबद्दल नाही - जावंसं वाटल्याबद्दल.
As usual मी परत एकदा भरकटलोय.
Inner calling.....
च्यायला मला तर असं वाटतं कि हे inner calling असं हळुचकन येऊन ’काय रे - ओळखलंस का?’ वगैरे विचारत नाही - असं कधीच होत नाही.
ते येऊन म्हणतं - भोसडीच्या, मागचे वीस वर्ष येऊन रोज कानफाडात मारुन जात होतो - तेव्हा झोपला होतास का? आता काय कप्पाळ आपटणार?
न झेपणारी instincts निर्माणच न होऊ देणं आणि निर्माण झालेली insticts जगाची फुल टु मोडतोड करुन प्रत्यक्षात आणणं - याच्यापेक्षा मोठं inner calling काय असु शकेल?
असं inner calling आपल्याला येत नाही असं नाही. त्यावर अंमल करणं ’तोंडावर सपकन पाणी मारण्या’ एवढंच सोपं आहे, आणि ’आज उठलंच पाहिजे का?’ म्हणत उठण्याएवढं अवघड.
च्यायला एवढ्या virtuous गप्पा ठोकुन मी स्वत: केवढा मोठा hypocrite....
Delete this comment pronto.
Abhijit,
thanks for your comment - yeah, i know very few of my posts are ones that display the turmoil in the mind, and would appeal to you and would deserve your comment - and i write this with utmost sincerity - please dont get me wrong :)
i have been trying to figure out what exactly is this "inner calling"?
as u say, there are a 1000 thoughts that come to our mind and go away - they are just a wish list, a fantasy which may not be practically feasible - your friend is right - once the initial fascination wears off, all that remains is hard work.
a few months ago, when i wrote about bhavik - the guy who crossed the atlantic ocean - i told my friends i would love to do that - a friend said,
"start with a small pond - dont go to the atlantic directly - its an ocean, after all!"
when you read about such fantastic people, you obviously are in awe of them and their achievement. the next thing is if you get actually inspired.
given a choice, i would love to put a tick mark of "been there, done that" against the following items in my "bucket list" (another movie i want to watch):
1. run & finish a full marathon
2. participate and complete the mumbai-pune cycle race (do u know that this year in march, out of the 87 participants, only 7 or 30 finished the race?)
3. complete a 16-day trek called "the shadow of kanchen-junga"
and many more items, which are purely driven by instinct. i know i have to first feel extremely passionate about them; and then follow it up with the hard work and dedication.
there's no use in worrying about the success or failure of these endeavours, and not doing them.
the problem is not lack of resources. the problem is that i am lazy. :D
being inspired by shantanu, i have got my brother's old cycle repaired - have started cycling on weekends - initially only between my place and tekdi, which is not more than 3km return trip - next step would be home to khadakwasla/sinhagad..and then, maybe one fine day, it'll be mumbai-pune (inshallah!!)
as they say, u gotta make a beginning somewhere. u gotta keep trying.
is it that after u have achieved something - u attribute it to that intangible thing called "inner calling"?
i believe that "inner calling" is a goal that helps you stay focused and does not let you give in or give up when you face obstacles.
when i met the MD of that auto company, he asked me a very interesting Q:
"our plan is to utilise the services of NRI doctors in performing special/high-end surgeries for the poor people. what do you think are potential pitfalls/obstacles? (he used the hindi word - dikkate)"
his company was going to cover the operating costs, medicine & supplies costs, etc.
plus operationalising it would involve checking with the NRI doctor when they would visit India, and when they could schedule the surgeries.
the project has started with a handful of doctors/surgeons from Germany - he told me that there are some 250,000 NRI doctors worldwide - who knows how many of them will participate in such a social cause - and how will it actually work out.
but they have made a small beginning.
the drive is there, the passion is there, they are willing to put in the hard work, the resources are there.
the point i have been trying to make is this - you keep leading your normal life (car payments, mortgage payments, etc) - but do you do something other than the normal course of life, something that is close to your heart? something that makes you feel proud about yourself?
is that something your "inner calling"?
your comment has put further clarity to my thoughts. have to make a small beginning somewhere. :)
thanks again.
Just a small correction: Motorcycle diaries is not fictional. They are based on the real life experieces of both the people. There might be slight tinkering of narrative to present it attractively but its not fiction.
About inner calling, well its inner, tyawar baherchya jaga barobar IM karnyat kahi artha nahi ;-)
Terrific comment, mama! maza aa gaya. :)
Post ani tyavarche comment vachtana asa vatata hota ki college katyavar basun mitranshi gappa marto ahe :)
Sahi post ani titkyach sahi comments...could relate to most of the things...especially laziness :)
paN kharaMch he 'inner calling' pratyekaalaa asata ka? 100 madhale 10 ch ase asateel jyanna swata:chya inner calling baddal jaaNeev aahe, aaNi te poorN karaNa tar hardly tyatale 1-2 karu shakat asateel. muLaat chaakoribaddha jagataanaa 'inner calling' la mahattva dyawa asa kiti jaNanna vaTat asel? ase zapatalele lok faar kami asatat. je he sadhya karoo shakatat he kharach great!
ketan, all the best! :)
@Dhananjay,
yup - Motorcycle Diaries is not fiction - i meant that the character in "Br" is fictional.
anyways, i know there's not much point in doing IM on this ;-)
@Circuit,
yeah - bathe's comment has been highly thought-provoking.
@Anand,
kharach rey! college madhe astaanaa kattyaavar basun ashaach gappaa vhaaychyaa... and laziness ruled then.. it rules even now :D
@Poonam,
i dont think i can agree with you. the Q is how do we define 'inner calling'. from the examples i have given in my blog, one will infer that 'inner calling' refers to doing something extraordinary or something heroic. obviously, not everyone does that. does that mean that inner calling refers to something that one wants to achieve, irrespective of whether it is heroic and extraordinary, or very simple and ordinary.
the other day, in a chat with a friend, he mentioned that eating "shrikhand-puri" could also be one's inner calling. and i disagreed with him too.
i said that eating "shrikhand-puri" could be the inner calling for a poor fellow who has not eaten it, not for someone who can easily have it any day he wants to.
well, we can go back n forth on this. shevti gappaa maaraaylaa, the only thing required is someone to play the devil's advocate. :)
thanks again for your comment n wishes.
te pustak aahe khar life chya kahiishaa black aspect ne jaanaar..but mala te avadalaa ki actually hey NGO madhe kaaam kartat...survey kartat.. mhnje nakki kaaay kaam karat astil
....inner calling...dreams..chhhan lihilas..asa madhe madhe athaavan karun dilyaa baddal dhanyavaad :)
@Vibha,
thanks for your comment :)
Post a Comment