फिर वही रात हैं...
वेडेपणा
"तु वेडा आहेस का?? एक-दोन आठवड्यांपुर्वी तुला ताप होता. प्रॅक्टिस काहीच केली नाहीस! आणि direct half marathon?"
- "अरे! टॉम करु शकतो, तर मी का नाही?"
"कोण टॉम?"
- "माझा US मधला बॉस! ५२ वय आहे त्याचं. गेल्या वर्षी न्युयॉर्क, बॉस्टन आणि शिकागो मॅरेथॉन पळाला तो. वयाच्या ४५व्या वर्षी त्यानी मॅरेथॉन पळायला सुरुवात केली. मी तर २९ आहे. ४५ पर्यंत वाट बघु का?"
"पळ बाबा! चुकीच्या लोकांकडे बघत असतोस तु. आमच्याकडे बघायचं. निवांत जगायचं...पण तुला नाही पटणार.. जाऊ दे.. पण निदान प्रॅक्टिस तरी करायची.."
- "हो! ते खरंच चुकतय! पण पुढच्या वेळेस प्रॅक्टिस करेल. ह्या वेळेस असंच पळुन बघतो."
असं होतं ना आपलं. कुठुन तरी, कोणा कडुन तरी आपल्याला प्रेरणा मिळते. काहीतरी वेगळं करुन बघायला. स्वत:ला challenge करायला.
मराठीत लिहायला घेतलं, ते सुद्धा असंच काहीतरी. दुसऱ्यांचे ब्लॉग्स वाचुन, त्यावर कमेंट्स लिहुन.. कुठेतरी असं वाटलं.. आपण पण लिहुन बघावं..प्रॅक्टिस नव्हतीच काही.. मराठीत लिहिण्याची..त्या आधी इंग्रजी मधे लिहित होतो, ते सुद्धा e-mails पुरतंच..पण कुठेतरी, कधीतरी वेडेपणा करतोच आपण... आणि तसंच मराठीत लिहायला सुरु केलं..
खाज़
चहाच्या टपरीवर ते दोघं बाकावर बसले होते. सकाळची ९.३०-१०ची वेळ. दोघं ९-१०वीतले वाटत होते.
"छ्य्या!! मला नाही जमत! कितीही प्रयत्न केला, तरी मला नाही जमत. तु लई भारी! कसं जमतय तुला?"
-"अरे, सोपं तर आहे! हे बघ, असं कर! एक मोठा पफ आत घे.... "
पुढंचं सगळं explain करुन पठ्ठ्यानी मस्त रिंग्स काढले. त्याचा मित्र proudly त्या सिगरेट पफच्या रिंग्सकडे बघत होता.
नविन काही सुरु केलं की एक खाज़ असते ना.
काहीतरी वेगळं करायची.
लिहिण्याचं पण असंच असतं ना.
एखादा वेगळा विषय निवडायचा.
किंवा एखादी वेगळी style.
काही नविन शब्द वापरायचे.
सिगरेट सगळेच फुकतात. रिंग्स फार कमी जणं काढु शकतात.
सगळेच लिहितात, म्हणुन आपण लिहितो - पण आपल्याला रिंग्स जमतात का?
ही खाज़ असतेच प्रत्येकात.
faith/dreamy attitude
परवा Zee Studio वर एक सिनेमा पाहिला.
Miracle on the 34th Street.
स्टोरी अतिशय साधी आहे. X'mas Holiday Season मधे एका departmental store मधे Kris Kringle नावाचा एक म्हातारा Santa Claus म्हणुन काम करतो. स्टोरची मॅनेगर Doris Walkerचा Santa Claus अस्तित्वात असतो, ह्यावर विश्वास नसतो. तिच्या ६ वर्षांच्या मुलीला देखिल ती तेच सांगते, की Santa Claus काही खरा नाही.
त्यांचं संभाषण असं काही होतं,
Kris Kringle: You think I'm a fraud, don't you?
Dorey Walker: Fraud is a bit too strong of a word.
Kris Kringle: But you don't believe in me.
Dorey Walker: I believe that Christmas is for children.
Kris Kringle: Well your daughter doesn't believe in me, either.
Dorey Walker: I don't think that there's any harm in not believing in a figure that many do acknowledge to be a fiction.
Kris Kringle: Oh, but there is. I'm not just a whimsical figure who wears a charming suit and affects a jolly demeanor. You know, I... I... I'm a symbol. I'm a symbol of the human ability to be able to suppress the selfish and hateful tendencies that rule the major part of our lives. If... you can't believe, if you can't accept anything on faith, then you're doomed for a life dominated by doubt.
"faith" नसेल, तर फक्त "doubts" राहतील का आयुष्यात?
मी लिहितो, त्याला बऱ्याचदा मला म्हणतात, की "it has a dreamy edge".
की लिहिताना एका "parallel" जगात जातो मी.
असेल, खरंच असेल तसं.
स्वप्नात रहायला प्रत्येकालाच आवडतं, म्हणुनच तर आपण स्वप्न पाहतो.
काही खरी ठरतात. काही नाही ठरत.
निदान तसं काहीतरी स्वप्नवत लिहिलं.. तरी तेवढं तरी satisfaction मिळतं..
कांच के ख्वाब हैं, आंखों में चुभ जायेंगे,
पलकों में लेना इन्हें, आंखों में रुक जायेंगे..
यह रात हैं ख्वाब की, ख्वाब की रात हैं,
फिर वही रात हैं...
रात भर ख्वाब में, देखा करेंगे तुम्हे..
फिर वही रात हैं...
वेडेपणा म्हणा.. खाज़ म्हणा.. faith म्हणा.. dreamy attitude म्हणा..
आपल्याला मुळात लिहावंसं का वाटतं?
एका लहान मुलाला विचारलं, तर तो खरं उत्तर देईल,
"माझं कौतुक होतं म्हणुन मी लिहितो."
हा खेळ मेघना नी सुरु केला, आणि मला खो निमिष कडुन मिळाला - त्या दोघांना धन्यवाद. माझा खो विद्या ला..
15 comments:
भारी!!!!!
पण "चुकीच्या लोकांकडे बघत असतोस तु." हे अगदी खरंय :) DJ म्हणाला का तसं तुला??
actually, chronological order मधे मला विद्या आणि प्रिय कडुन "जे जे उत्तम" बद्दल खो मिळाला आहे. तो लिहायचा अजुन बाकी आहे.
ह्या पोस्ट बद्दल काही मनातलं.
बंग्लोरला inter-hostel singing competition होती.
त्या मधे एका मित्रानी उत्सव सिनेमातलं एक अवघड गाणं अतिशय सुंदर म्हट्लं.
"सांझ ढले, गगन तले.. हम कितने एकाकी.."
त्याचं गाणं संपलं.. आणि आम्ही ऐकणारे सगळे भारावलेले असतानाच.. त्यानी दुसरं गाणं सुरु केलं..
अल्ताफ़ राजाचं, "तुम तो ठहरे परदेसी..."!!!!!
मेघना, संवेद, ट्युलिप, राज आणि निमिष नंतर मी लिहायचं म्हणजे एकुन तसलाच प्रकार झाला. :D
आपली खो देण्याची पध्दत मला फ़ार आवडली
वेडेपणाची खाज, आव्हान, कौतुक...
आणि किती उत्तरं सापडतायत आता...
मजा येतेय. जाम मजा येतेय!
sahich!!
very true... what we have faith in may differ, but i think having faith is absolutely essential...
nice piece. and btw, i still like to believe in santa claus and x'mas! :0) guess there's a part of me that refuses to grow up! :D
sahich...tuzya pratyek postmadhe mala vaTata yatla kahi na kahi Dokavat asata...nemaka kay te aaj tuzyakaDunach kaLLa...chhan vaTla vachun...ni meghana mhantey tasa...kharach maja yetey! :)
btw...mala ekdam meghana, samved, tulip, raj chya rangecha man miLalyacha pahun jara harabharyachya zaDavar chaDhalyasarkha zala...khali aalo paN lagech...:D
Chaan. Avadala. :-) ekach prashnach asa vegla uttar vachayla sahi vatatay ekdam. :-)
Bagh tu dilela kho me lagech ghetla unlike you. hahaha :-)
-Vidya.
सुंदर लेख. मला वाटतं प्रत्येकाच्या लिहीण्यामागे ही किंवा अशी बेसिक कारणे असावीत. त्यातील 'खाज' हे तर इतके मूलभूत कारण आहे की बस्स. बाय द वे, नेहेमी मराठी शब्द सापडत नाहीत, पण इथे खाजला इंग्रजी शब्द सापडत नाहिये :) फिर वही रात है विस्मृतीत गेलं होतं. किती दिवसांनी आठवलं, सुरेखच. यूट्यूबवर नाही मिळालं :-(
वरची प्रशंसा वाचून थोडे दडपण आल्यासारखे होतेय. मित्रांनो, मनःपूर्वक आभार.
hmm...khaj he sarvat paTala. pan pratyekachi khajahi vegavelgali...kaay?
हं. आपण का लिहितो ह्या विषयावर सगळे लिहीत सुटलेत. पण वाचायला मजा येतेय. मस्त!! विद्याला तू दिलेला खो आधी वाचला आणि अता तुझा लेख वाचतेय..
jio!! mastch re..ekdum honest
Ekdum jhakas! Kho-kho agdi mast rangto ahe!
@Snehal,
i know i keep looking at wrong ppl as source/inspiration - it wasnt DJ who told me :D
@Morpees,
thanks! but actually, have seen others give 'kho' in the same fashion.
@Meghana,
you have started a wonderful game. kudos to you!
@Jaswandi,
thanks! :D
@Rayshma,
yup - having faith is what keeps us going - i believe completely in that. :)
i dont believe that much in Santa Claus, but i believe in our parents - they are our very own Santa Claus, bringing us joy & happiness always.
@Nimish,
thanks for giving me the 'kho'. and i do mean every word when i say you are in the same league as the rest. what u guys write - its a completely different level!
@Vidya,
tu sahi aahes! patkan 'kho' ghetlaas. thanks. :)
ushiraa ka hoeenaa, mi pan tujha 'kho' ghetlaa bara ka.
@Raj,
equivalent english word for 'khaaz'? ummmm...i cant remember either :(
yeah, even i love the song 'phir wahi raat hai' - the credit for the title of this post, and for reminding me about this beautiful song, goes to my friend, dhananjay.
@Nilesh,
agdi barobar! pratyekaachi khaaz nishchit-ch veg-vegali asnaar.
@Samvaadini,
tu pan hya khelaat saamil jhaali aahes. tu lihila aahes, tyaavar pratikriyaa deto tithe.
@Samved,
thanks! as they say, honesty is the best policy ;-)
@Anand,
thanks again for coming here.
chhhan!!
ajun ek chhan shabd aahe .."naavinyachi Odh.."
ashii odh asli ki saglaa kaahi possible vataylaa lagata
Post a Comment