Starry, starry night



शुक्रवारची रात्र. वॉल्वो संथ गतीने मुंबईतलं ट्रॅफिक कापत पुण्याच्या दिशेनी. नेहमी झोप काही कष्ट न करता येते. पण त्या दिवशी नव्हतीच येत. दादर, चेंबुर, वाशी, फुड-मॉल... सगळं मागे गेलं... घाट सुरु झाला... खिडकीचा पडदा सरकवला... बाहेर मिट्ट अंधार... काळोखच... फक्‍त अधुन-मधुन गाड्यांचे दिवे... वर आकाशात पाहिलं...मस्त टपोरं चांदणं... टिम-टिमणारे तारे... त्यांची पण झोप उडालेली...खाली खोपोलीतले दिवे...अगदी literally तारे ज़मीन वर असल्या सारखे... खंडाळ्याच्या अलिकडे तो माझ मित्र दिसलाच... the Duke proudly showing off his nose under the shimmering moonlight... नजर कुठेतरी... विचार अजुन कुठेतरी...

त्रिवेंद्रम जवळचा एक समुद्र किनारा... तो आणि ती कितीतरी वेळ त्या पांढऱ्या, मऊ वाळुवर तसेच शेजारी-शेजारी बसुन होते.. समोर त्या अथांग सागराकडे बघत.. मधेच एकमेकांशी काहीतरी बोलत... एखादी जुनी आठवण कदाचीत... आठवणच असावी...स्वप्न पहायचे दिवस आता तसे राहिलेच नव्हते जास्ती शिल्लक...सूर्यास्त होत आला, तेव्हा दोघं एकमेकांचा आधार घेऊन उभे राहिले... पाण्यापाशी गेले.. हलकंच समुद्रात खेळुन घेतलं २-४ मिनिटं.. तिनी तिची साडी हलकीच उचलुन फक्‍त पावलं ओली केली... तो तिचा हात पकडुन तिच्या नकळत तिच्याकडे तसाच प्रेमानी पहात राहिला... त्याच्या मनात आलं की हळुच ओंजळीत पाणी भरुन तिच्या चेहऱ्यावर मारावं.. पण त्याचे गुढगे नाही म्हट्ले.. तिनीच त्याच्या मनातलं ओळखलं.. एक हात त्याच्या हातात होता... आणि हळुच खाली वाकुन दुसऱ्या हातानी त्याच्यावर थोडं पाणी शिंपडलं... दोघं मनापासुन हसले..
समुद्राच्या लाटा त्यांच्या जवळ येत होत्या.. परत जात होत्या.. आणि किंचितच ते दोघं ओले होत होते... मावळत्या सूर्याकडे बघत.. एकमेकांचा हात आपापल्या हातात धरत...

पुण्यातला गजबजलेला फर्ग्युसन रस्ता... वैशालीतुन ते दोघं बाहेर आले... त्यानी बाईक सुरु केली.. वेग घेतला, तशी ती आणखिन पुढे सरकली... त्याला घट्ट मिठी मारली...त्यानी पण वेग आणखिनच वाढवला... वाऱ्यालाही मागे टाकत होता तो... आणि ती तितकीच जास्ती बिलगली त्याला... बाजूनी वाहु पाहणाऱ्या वाऱ्याला देखिल त्या दोघांमधे शिरकाव न करु द्यायला...her lips firmly pressed on his neck... her embrace as tight as it could ever get... his hands rock steady on the bike handle.. and his eyes set firmly on the road ahead...

सकाळची ऑफिसची जायची वेळ... टॅक्सी आणि चार-चाकी गाड्यांच्या गराड्यात दादरच्या टिळक ब्रिजवर कदाचित असलेली ती एकमेव स्कुटर.. तो सिग्नलची वाट पहात होता... तिच्या डोक्यात कसलेतरी संसारी समस्येचे विचार... मुलांचं शिक्षण, नविन घर, नविन मोटार, नोकरी...कितीतरी व्याप होते त्यांच्या मागे... नकळत तिनी तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवला... हात ठेवताच, तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान दिसु लागलं... आणि तो? त्याच्यात एक आत्मविश्वासाचं रुप...

तो... केरळच्या समुद्रावरचा... फर्ग्युसन रस्त्यावरचा... किंवा टिळक ब्रिजवरचा... in each case, तो तिला म्हणतच होता...

"युं तो अकेला भी अक्सर गिरके संभल सकता हुं मैं,
तुम जो पकड लो हाथ मेरा, दुनिया बदल सकता हुं मैं...
मांगा हैं तुम्हे, दुनिया के लिये...
ओ मेरे दिल के चैन, चैन आये मेरे दिल को दुवा किजिये..."

त्या दोघांचं प्रेम...कधी उत्कट.. कधी संवेदनशील.. कधी आधार देणारं...

प्रेम ह्य concept वर विश्वास ठेवायचा का नाही?
the faith on the concept ranges over a continuum... starting with...
कधी त्रिशुल मधल्या अमिताभ सारखं अतिशय निराशावादी,
"किताबो में छपते हैं चाहत के किस्से, हकिकत कि दुनिया में चाहत नहीं हैं..."

तर कधी DCH मधल्या आमिर सारखं प्रश्नात्मक,
"जाने क्यों लोग प्यार करते हैं?"

नाहीतर DTPH मधल्या माधुरी सारखं overwhelmingly optimistic,
"वह सबकी जोडीयां पहले से ही बनाता हैं... उसने सब के लिये कोई न कोई बना के रखा हैं.. वह तुम्हे एक इशारा करेगा... और तुम समझ जाओगे.."

तो आणि ती प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्‍त करतात का?
कधी ती Notting Hill मधल्या Julia सारखी innocent होऊन म्हणते,
"I am just a girl, standing in front of a boy, asking him to love her."

आणि तो?
When Harry Met Sally मधल्या Bill Crystal सारखा- accepting all her idiosyncracies and desperately wanting to be with her -
"I love that you get cold when it's 71 degrees out. I love that it takes you an hour and a half to order a sandwich. I love that you get a little crinkle above your nose when you're looking at me like I'm nuts. I love that after I spend the day with you, I can still smell your perfume on my clothes. And I love that you are the last person I want to talk to before I go to sleep at night. And it's not because I'm lonely, and it's not because it's New Year's Eve. I came here tonight because when you realize you want to spend the rest of your life with somebody, you want the rest of your life to start as soon as possible."

प्रेम... कधी ते शोले मधल्या अमित-जया सारखं अबोलच राहतं... तर कधी त्याला Before Sunrise/Before Sunset मधल्या Julie-Ethan सारखं ८-९ वर्ष थांबावं लागतं...

एका रात्री बस मधे झोप नाही आली... Van Gogh च्या paintingचं एक PPT डोळ्यासमोर आलं... त्यातलं ते 'Starry, starry night' गाणं लक्षात राहिलं...FM रेडियो वरची गाणि... आकाशातले ते टिमटिमणारे तारे... आणि प्रेम-प्रेम म्हणजे नक्कि काय.. तुमचं आणि आमचं सेम असतं-नसतं.. साधं-सोपं असतं-नसतं... पाहिलेले सिनेमे.. त्यातले dialogues... कधीतरी, कुठेतरी पाहिलेले प्रेमात असणारी ती आणि तो...

It is the month of February, folks!
In advance, wish all of you a happy V-day :)

22 comments:

a Sane man said...

mast zalay lekh!

:)

स्नेहल said...

:)

k10....superb one! btw....volvo madhye shejari kon hot?? itak chhaan suchal te :P

Vibha said...

Ekdam ch chhan ani refreshing!!

Good one

Dhananjay said...

Shejari kauni asta tar, ha patya asle vichar ka karat basla asta ;)

स्नेहा said...

mastch 1kdam cute...:) keracha kissa mast vatala.... :)

पूनम छत्रे said...

khoopach surekh, taral aaNi haLava karaNaara lihila aahes ketan..

nusta vaachoonahi chhan vatala! prem hi bhavanach ashi ahe :)

स्नेहल said...

dhananjay, ho te pan aahech :) pan saheb ka yawar gappa basale?? ki nusatya athawani ne ch shabda gayab hotahet??? :))

Vidya Bhutkar said...

Chaanach. :-) Ur writing has a dreamy edge. :-) I like that very much. Very nice.
-Vidya.

Tulip said...

सुंदर!!

बाकी केतन तुला आता फ़ेब्रु.च कशाला पाहीजेय ? तुझा एवरी वीकेन्ड ’व्ही’केन्डच तर असतो:))

Jaswandi said...

:)
mala kahich words milenat re comment takayla!

pan 'V'aa mastch :D

dj said...

Maunam samati lakshanam ;)

Monsieur K said...
This post has been removed by the author.
Monsieur K said...

Thanks everyone :)

Snehal, Dhananjay - bus madhe shejari apsara hoti ek.. swapnaatli.. :D

Parag said...

Waw !!!!!!!

chandana said...

Most AWESOME!!!

सर्किट said...

क्या बात है! जीयो!!

असलं रोमॅण्टिक तर आजकालच्या मुलीही लिहू शकणार नाहीत. ;-)

अफ़लातून झालंय पोस्ट. त्याला सर्व सुरेख चित्रपटांचे, संवादांचे, व्हॅन-गॉह च्या चित्राचे, आणि त्या स्टारी-स्टारी गाण्याचे संदर्भही मस्त फ़िट बसलेत.

ह्यावेळेसचा तुझा व्ही-डे अजून खास स्पेशल असेलच, एन्जॉय ईट!

ट्युलिपची ’व्ही’केण्ड ची कोटी ही मस्त!

Samved said...

dangerously lovable

rayshma said...

happy val day to u too! u're so hopelessly in love, aren't u! :))
very well written... :) but then, that's usual, aint it!?

Monsieur K said...

Thanks again guys :)

प्रिया said...

आज खूप दिवसांनी तुझ्या ब्लॉगवर चक्कर मारली आणि आधीच्या तीन चार पोस्ट्स पण भराभर वाचून काढल्या. छानच लिहीतोयस. Analogies आणि लहान लहान गोष्टींचा केलेला विचार, दोन्हीचं कौतुक वाटलं! :)

हे पोस्ट तर खासच! Happy Valentine's to you too!

Aparna said...

Very late on my side, but Happy Valentine's day to you!
And no, you do not know me, but that did not stop me from wishing you for Valentine's and saying that I loved what you wrote here!
- Aparna

Monsieur K said...

@Priya,
Thanks :)

@Aparna,
Thanks for visiting :)