एक irony, एक गंमत
रोज ऑफिसला जाताना रस्त्यामधे एक दुकान दिसतं. चिकन विकतो तिथला माणुस.
दुकाना बाहेर टेबला खाली त्यानी एक भला मोठा पिंजरा ठेवला आहे.
त्यात सगळ्या इंग्लिश कोंबड्या दाटुन बंदिस्त ठेवल्या असतात.
त्यांना पंख उघडायला जागा नाही, उभं राहिला जागा नाही.
वाट पाहत असतात कदाचित. कधी एखादा customer येईल, कधी आपण सुऱ्या खाली जाऊ, कधी आपली सुटका होईल, आणि कधी हा खेळ संपेल एकदाचा.
नेमकं त्याच वेळेस त्या दुकाना समोर BESTची बस जाताना दिसली. ती बस जणु मला त्या चिकनच्या पिंजऱ्यासारखीच वाटली.
मावतील त्यापेक्षा जास्ती लोकं कोंबुन ती पुढे जात होती.
बसमधे जो उभा असेल, त्याला हलायला किती जागा मिळत असेल.
ज्याला बसायला मिळाली असेल जागा, तो तर नशीबवानच!
आणि ज्याला आतमधे जागा नाही, तो वेड्यासारखा दारातुनच लटकुन जात होता!
कदाचित हाच एक फरक होता त्या बस आणि पिंजऱ्या मधे.
बसमधे लोकं स्वखुशीने लटकत प्रवास करातात. गर्दी मधे प्रवास करतात. सगळी धावपळ कशा करता? तर शाळेत किंवा कॉलेजला जायला, कामावर जायला, ऑफिसमधे पोचायला.
पिंजऱ्यातुन बाहेर पडल्यावर चिकन का खेल खतम!
बसमधुन उतरल्यावरच तर माणसाचा खरा खेळ सुरु होतो... how ironical???
**********************************
परवा पुण्याहून डेक्कन क्वीननी येत होतो दादरला. वाटेत पलिकडच्या रुळावर एक मालगाडी दिसली.
एक-एक विटकरी रंगाच्या डब्यावर २-३ अक्षरी काहीतरी लिहिलं होतं. "CR", "SW", "SEC"...
एक अर्ध्या-एक मिनिटांनी लक्षात आलं.. की प्रत्येक डबा कुठल्या ना कुठल्या तरी zonal रेल्वेचा असणार - Central Railway, South Western Railway, South East Central Railway...
गंमत वाटली. सगळे डबे एकाच गाडीला लावलेले. प्रत्येक डब्यात सामान वेगळं असु शकतं, पण इंजिन एकच आहे त्या सगळ्यांना ओढणारं.. एकाच दिशेनी जायला..एकाच destination ला पोचायला..
आमच्या सध्याच्या प्रोजेक्ट मधे पण असंच काहीतरी आहे ना?
टीम मधे मी एकटा मराठी, एक राजस्थानी आणि दोघं कलकत्त्याचे. माझा बॉस कोकणी.
client टीम मधे एक बोहरी मुसलिम, एक Goan Christian, एक पंजाबी, एक UPचा, एक सिंधी, एक तेलगु...
सगळे वेगवेगळे डबे... प्रत्येक जण वेगवेगळं सामान वाहुन नेणार.. एकाच गाडीला लावलेले...पळत आहेत...एका मालगाडी सारखे...
hopefully, लवकरच कधीतरी आमची गाडी देखिल तिच्या destinationला पोचेल!
Amen!!
आजा रे आजा रे, आजा रे आजा रे,
भले कितने लंबे हो रस्ते हो,
थके न तेरा यह तन, हो!
आजा रे आजा रे,
सुन ले पुकारे डगरिया
रहे न तरसते यह रस्ते हो, तु आजा रे!
इस धरती का हैं राजा तु, यह बात जान ले तु
कठिनाई से टकरा जा तु, नहीं हार मान ले तु!
मितवा! सुन मितवा, तुझको क्या डर हैं रे
यह धरती अपनी हैं, अपना अंबर है रे
तु आजा रे...