White Nights

रशियात St. Petersburg मधे जून महिन्यात म्हणे "white nights" असतात. सूर्यास्त रात्री १० नंतर होतो. सांझवेळ बऱ्याच अवकाशानी होते, आणि नेहमीपेक्षा थोडी प्रदिर्घ देखिल असते. अशा रम्य श्वेत रात्री त्या शहरातल्या नदी किनारच्या promenades वरुन, त्या नदीवरच्या छोट्या-छोट्या पुलांवरुन, तिथल्या सुंदर canals वरुन आपल्या एका प्रिय व्यक्‍ती बरोबर चालत जायचं, in broad daylight, no matter what time of the day... wonder what could be more romantic than this...

निसर्गाच्या ह्या जादुई पार्श्वभूमीवर डोस्टोवस्कीची "white nights" नावाची एक शॉर्ट स्टोरी आहे...गोष्ट अजुन वाचायची संधी मिळाली नाहीये.. पण त्या गोष्टीवर आधारीत ’सावरिया’ पाहिला...

पाहिला तेव्हा खरं म्हणजे विशेष आवडला नाही.. पण आजच त्यावर बॉम्बे टाइम्स मधला हा प्रश्न वाचला...


Did anyone see how the male protagonist’s relationship with three generations of women (Zohra Sehgal, Rani Mukherjee and Sonam Kapoor) qualified and accentuated the separate and yet synthesised components in a man’s growth from sexual innocence to romantic disillusionment?

सिनेमा पाहिला तेव्हा खरंच ही गोष्ट लक्षात आली नव्हती. पण आज प्रश्न वाचल्यावर मनात विचार सुरु झालेच.

रणबीरचे व्यक्‍तिमत्व मला आवडलेलं. स्वत:च्या प्रेमावर त्याचा प्रचंड आत्मविश्वास होता. इतकं की सोनमचे खरं प्रेम त्याला उमगलंच नाही. किंवा उमगलं तरी त्यावर विश्वास बसत नव्ह्ता त्याचा. सोनम ही आपलीच प्रेयसी आहे, ह्याच भाभड्या किंवा स्वपनाळू जगात राहणं पसंत होतं त्याला. Is that precisely why someone has said,
"Love is the triumph of imagination over intelligence. "

ज़ोहराशी त्याचं नातं आईशी असतं तसंच होतं कदाचित - मी सोनमला घरी घेउन येतोच, अगं ती लाजत आहे, तिला पटवुन मी घरी घेउन येतो - हे फोनवर ज़ोहराला सांगत बसतो तो - why does he prefer to paint a picture different from reality in front of the mother-like woman?

आणि रानी बरोबर मैत्रिणीचं नातं. ती त्याला वेळोवेळी guide करते; she keeps his conscience in check - something that only a true friend can do, especially when you are in love. त्याला सांगते की तो सोनमशी खोटं बोलला ते त्यानी नव्हतं करायला पाहिजे. आणि प्रेमात येणाऱ्या नैराश्यात जेव्हा तो तिला मैत्रीणीच्या ऐवजी तिच्या खऱ्या वेष्या रुपात भेटायची इच्छा व्यक्‍त करतो, तेव्हा ती एक खरी मैत्रिण म्हणुन त्याला दूर करते. Will he ever realise the true value of this friendship?

गंमत वाटली. डोस्टोवस्कीची शॉर्ट स्टोरी जवळ-जवळ दीडशे वर्ष जूनी आहे. पण एक वयात येणाऱ्या आणि प्रेमात पडणाऱ्या मुलाच्या संदर्भात तितकीच relevant.
आणि especially.. तो बॉम्बे टाइम्स मधला प्रश्न...

कुठली शॉर्ट स्टोरी, कुठली गोष्ट, कुठली दास्तां... काय सांगेल... काय प्रश्न पाडेल... सांगणं खरंच अवघड आहे..माझ्याच विचारात चलबिचल झाली तर आहे... म्हणुनच कदाचित..

अजीब दास्तां हैं यह,
कहां शुरु, कहां खतम,
यह मंज़िलें हैं कौनसी...
समझ सके ना हम ना तुम...