सकाळी पुण्याहून डेक्कन क्वीन सुटली. गाडीचा वेग वाढत गेला, तसं खिडकीत बसलेल्या माझ्या डोळ्यात झोप दिसु लागली. काल रात्री खूप वेळ गप्पा झालेल्या. डोळे मिटलेले, पण डोक्यात विचार तिचेच येत होते सारखे.
सप्टेंबरचा शेवटचा आठवडा. पावसाळा तसा संपत आलेला. त्या दिवशी थोडंसं उघडलं होतं. मधेच एखादी सर पडायची, आणि नावाला खिडकीतुन मला भिजवुन पुन्हा गायब व्हायची - जसं काही झालंच नाही मुळी! अतिशय खोडकर. का थोडी लाजाळु? अगदी माझ्या हिच्या सारखी!
प्रत्येक वेळेस तिची आणि माझी भेट सुद्धा अशी ओझरतीच. कदाचित आईन्स्टाईन म्हणतो तसं सगळं सापेक्ष असतं.
गरम तव्यावर बोट २ सेकंद धरा, ते २ सेकंद २ तासांच्या वर्ताण वाटतात.
एका सुंदर मुली बरोबर २ तास गप्पा मारा, ते २ तास २ सेकंद एवढे देखिल वाटत नाहीत.
पण खरं आहे. आम्ही दोन तास भेटलो काय किंवा चार तास एकत्र गप्पा मारल्या काय. मला ते कमीच वाटतं. कालची भेट पण तशीच. ओझरतीच.
पावसानी चहु बाजुला एक अविस्मर्णीय जादु केली होती. सगळं कसं हिरवंगार, किती सुंदर दिसत होतं. ट्रेन धावत होती त्या ट्रॅकच्या बाजुला पिवळी, केशरी, लाल रानफुलं मनमोकळेपणे माझ्याकडे पाहुन हसत होती. सह्याद्रीच्या ह्रुदयात उसळणारा आनंद धबधब्यांतुन ओसंडुन वाहत होता. खंडाळा स्टेशनवर डेक्कन क्वीन थांबली. प्लॅटफॉर्मवर उतरलो, आणि दोन्ही हात उंचावुन एक मस्त आळस दिला, तोच एका गार वाऱ्याच्या झोक्यानी मला गाठलं. a few early autumn leaves rolled over beautifully, dancing in gay abandon along with that morning breeze to stop peacefully at my feet... and i knew... i am in love...
फूल पर ओंस जैसे गिरती हैं
लहर साहिल से जैसे मिलती हैं
खुशबु जैसे फिज़ा में छाती हैं
दिल में ऐसे मोहब्बत आती हैं
धडकनो में यह छुपके डोलती हैं
रंग सा ज़िंदगी में घोलती हैं
आंखों आंखों में जैसे बोलती हैं
हौले से.. धीरे से...
कितनी नरमी से.. कितने धीरे से...