फ्लोरिडात टॅम्पातल्या मॅकफारलिन पार्कवर शेवटची क्रिकेटची मॅच.
रजनीशनी फेकलेला शेवटचा बॉल.
fast, short ball.
आंधळीच मारला.
स्क्वेर लेगच्या दिशेनी भिरकवलेला.
शेवटच्या चेंडुवर षटकार!!

फ्लोरिडातल्या शेवटच्या त्या आठवड्यात ऑफिसमधल्या मित्रांकडुन मिळालेले वेगवेगळे स्नेहभोजन.
कुणी रडलं.. कुणी येऊन प्रेमानी खांद्यावर हात ठेवले.. कुणी हस्तांदोलन केलं.. कुणी छान farewell messages पाठवले..
सगळ्यांना पुन्हा कधीतरी नक्की भेटु.. असा पोकळ वादा केला..

एखाद्या जागेच्या मी इतका प्रेमात पडेल, कधी वाटलं नव्हतं.
आयुष्यातली जवळ-जवळ २ वर्ष मी दिली होती त्या जागेला.
तिथल्या लोकांबरोबर एवढं प्रेम वाटेल, इतकी आपुलकी, जवळीक होईल...सोडताना इतका त्रास होईल..वाटलं नव्हतं..

टॅम्पातली जूनची माझी ती शेवटची पावसाळी संध्याकाळ.
गाडीचे wipers काचेवरुन हलकेच फिरत होते.
खिडकीची काच खाली करुन मी पावसाचे थेंब ओंजळीत भरले.
सूर्य मावळायच्या दिशेनीच वाटचाल करत होता.

गाडीत CD वाजत होती... RD ची instrumental hits..
व्हायलिनचे सूर हलकेच उमटत होते...
"दिल तेरे बिन कहीं लगता नहीं..
वक्‍त गुजरता नहीं...
क्या यही प्यार हैं..."
क्षितिजावर एरपोर्टच्या जमीनीवरचे मिणमिणते छोटे-छोटे लाल, निळे, हिरवे दिवे आकाशात झेपणाऱ्या विमानाला जमीनीवरचे त्याचे धागेदोरे दाखवत होते.

डरहमचे युनिव्हर्सिटीचे पार्किंग लॉट.
निखिलच्या मित्रांबरोबर खेळताना झालेला माझा English cricket debut.
पहिला नो-बॉल सोडुन दिला, आणि त्यानंतरच्या दुसऱ्याच बॉलवर माझा त्रिफळा उडाला.
first ball duck!!

आई आणि निखिलबरोबरची स्कॉटलंड ट्रिप.
गेले वर्षभर घरातली तीन माणसं, तीन वेगवेगळ्या continents वर राहिलेले.
तब्बल ४ वर्षांनी जमुन आलेली आमची family trip.
इन्वरनेसच्या नेस नदीच्या बाजुचा सुंदर रस्ता.
लॉकनेसचा न पाहिलेला monster.
आईशी आणि भावाबरोबर मारलेल्या गप्पा.. कितीही मारल्या तरी कमीच.
बरोबर केलेला ट्रेनचा प्रवास. वेगवेगळ्या रेस्तरॉ मधे जेवलेलो जेवण.
पाहिलेले स्कॉटलंडचे अप्रतिम castles, churches, palaces, gardens, musuems...

हीथ्रोवर अचानक समोर पाहिलेला सनी देओल आणि तोंडातुन जोरात निघालेलं,
"आईला! सनी देओल!!"
हे जोरदार "आईला" ऐकुन सनीच्या हातातुन almost पडलेला त्याचा sandwich.
आणि मग कसं-बसं, "sorry!!... oh, hello!!.. ok, bye!!" बोललेलो! :D

माधुरीला किती दिवसांनी ’एक, दोन, तीन’ वर टिव्हीवर नाचताना पाहिलं.
तिच्याबरोबर पावलांनी ठेका धरला तर मधेच पुण्यातले दिवे गेले!
मग निराश होऊन रेडियो लावला, आणि रानी-सैफच्या "चक दे, चक दे सारे गम" वर पुन्हा नाचु लागलो.
मेणबत्तीच्या प्रकाशात समोरच्या भिंतीवर माझ्याच अक्राळ-विक्राळ नाचणाऱ्या सावलीची सोबत मनापासुन आवडलेली.

मुंबईत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या झोपडपट्टीतली ती लहान, लहान उघडी-नागडी मुलं.
सतत एकमेकांचे केस साफ करणाऱ्या त्या बायका. रस्त्यावरच आंघोळ करणारे साबण फेसलेले ते पुरुष.
प्लॅस्टिक, अल्युमिनियम, स्टीलची भांडी, कळशा, बादल्या भरायला ठेवलेली ती कधी न संपणारी पाण्याची रांग.

रस्त्याच्या मधल्या divider वर बसलेले १०-१२ कावळे.
त्यांचं लक्ष रस्त्याच्या मधोमध पडलेल्या त्या एका मेलेल्या उंद्रावर.
येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रॅफिकमधल्या गाड्यांना चुकवुन आपले भक्ष्य साधणारे ते कावळे.

आणि हे पाहताना मनाला झालेला सत्याचा साक्षात्कार,
"बडे-बडे देशो में ऐसी छोटी-छोटी बातें होती रहती हैं..."

शनवार-रविवार मिळणारी सुट्टी. पाऊस थांबायचं नाव घेत नाही.
कधी एकदा माझ्या लाडक्या लॉ कॉलेजच्या टेकडीवर जातो, ती होणारी अधिरता.
भर पावसात चिंब भिजत मग चढलेली ती टेकडी.
चिखलानी जड झालेली ती पावलं.

टेकडीवर नित्यनियमानी येणारे ओळखीचे चेहरे.
इतक्या दिवसात प्रत्येकात काही ना काही बदल तर नक्कीच झाले आहेत.
पुर्वी टेकडीवर नुसताच चालणाऱ्या लहान सिद्धार्थला त्याच्या आई-बाबांकडुन नविन सायकल मिळाली आहे.
त्याची सीटची उंची त्याला adjust करुन दिली; आपण पडणार नाही असा आत्मविश्वास त्याच्यात निर्माण झाला.
तेव्हाच त्याचं नाव कळलं. ओळखीच्या अजुन एका चेहऱ्याला नाव मिळालं.
(ह्या ब्लॉग द्वारे झालेली ओळखीची नावं... त्या नावांचे चेहरे कसे असतील.. असो!)
सगळंच बदललय असं नाही. टेकडीवर चतु:श्रिंगीजवळ उभं राहिलं की वारं तसंच प्रचंड जोरात वाहतं. stone quarry जवळ सूर्यास्त अजुनही तितकाच सुंदर दिसतो.

दादरला शिवाजी पार्कवर पावसाळ्यात मुलं फुटबॉल किती मस्त खेळतात.
आणि आपण ऑफिसमधे बसुन काम करायचं!! ह्या परम दु:खातच आपण त्या मुलांकडे बघत-बघत पुढे चालायचं, आणि समोरच्या कुत्र्याच्या पायात पाय अडकुन दचकुन जायचं!

शनवारी किंवा रविवारी रात्री पुण्यातल्या शाळेतल्या जुन्या ३-४ मित्रांबरोबर कॉफी टाकायची. गप्पा मारायच्या.
कुणी नविन गाडी घेतली आहे. कुणाचं लग्न ठरलं आहे. कुणी नोकरी बदली आहे.

सोमवारी सकाळी मुंबईची गाडी पकडायची..
आणि रविवारी रात्री हा ब्लॉग लिहायचा...

बरंच काही घडत आहे.. विचार केला तर तसं खास काहीच नाही..
कुछ, कुछ होता हैं... बहुत कुछ हो रहा हैं.. तुम नहीं समझोगे.. कभी नहीं समझोगे..

जुन्या जागा.. तिथली लोकं.. तिथल्या आठवणी.. आणि सध्या भेटणारी लोकं.. नव्या वाटणाऱ्या जुन्याच जागा.. वाटेत येणारे अनुभव...
the violin murmurs softly in some little corner of the heart..
कैसे भुलुंगा.. तु याद बहुत तो आयेगी..
शब्द-विरहीत हलके स्वर रात्रीच्या काळोखात उमटत राहतात..
दिल तेरे बिन कहीं लगता नहीं..
वक्‍त गुजरता नहीं...
क्या यही प्यार हैं...
क्या यही प्यार हैं...