कशी मुलगी पाहिजे?
तसा फारच सोपा वाटणारा प्रश्न आहे.
उत्तर तितकंच अवघड.
हा प्रश्न आम्हाला कोण विचारतं, कधी विचारतं त्यावर आमचं उत्तर अवलंबुन असतं.
म्हणजे आईनी रविवारी दुपारी मस्त आम्रस-पुरीचं जेवण झाल्यावर विचारलं की आमचं उत्तर असतं,
"असंच मे महिन्यात रविवारी दुपारी आम्रस-पुरी जेवायला घालणारी मुलगी पाहिजे."
पण जरा serious उत्तर द्यायचं झालं, तर आईला दाखवायला घरी घेऊन जाण्यासारखी ideal पोरगी जशी असते - शांत, सोज्वळ ("सोज्वळ" अशा पोरी आणि पोरं आता अस्तित्वातच नसतात), सगळ्यांशी मिळुन-मिसळुन राहणारी, घरातलं आणि बाहेरचं उत्तमरित्या सांभाळणारी, घरातल्या थोरल्यांचा मान राखणारी, लहानांचे लाड पुरवणारी, सणासुदीला उत्साहानी पुढाकार घेणारी, ई. हे सर्वोत्तम उत्तर असतं. थोडक्यात म्हणजे काय, ही मुलगी म्हणजे 'बायको कॅटेगरी'!
जवळच्या नातेवाईकांनी विचारलं की तेव्हा थोड्याफार फरकानी आईला दिलेलं उत्तरातली 'बायको कॅटेगरी' उपयोगी पडते. हं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या लग्नात गेल्यावर आईच्या मावशीच्या पुतण्याच्या आत्यच्या नव्वदीच्या पुढच्या सासुनी विचारलं तर जोरात त्यांच्या कानात जाऊन म्हणायचं,
"घरातल्या देवाची पुजा तिनी मनोभावानी करायला पाहिजे, आणि रविवारी दुपारी जेवण झाल्यावर आमच्या आजीचे पाय चेपुन द्यायला पाहिजे - अशी मुलगी मला हवी आहे!"
~"मिळेल हो, नक्की मिळेल!" असा आशीर्वाद हमखास मिळतोच!
मित्रांपैकी कुणी विचारलं की उत्तर 'बायको कॅटेगरी' (BC) वरुन 'अप्सरा कॅटेगरी' (AC) मधे बदलतं. शेवटी लग्न करायचं असतं म्हणुन 'माल कॅटेगरी'तली मुलगी कितीही आवडली तरी लग्न AC किंवा BC शीच करायचं असतं.
'अप्सरा कॅटेगरी' म्हणजे रोमन हॉलिडे मधली अतिशय ग्रेसफुल आणि रॉयल दिसणारी ऑड्रे हेपबर्न, किंवा 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' अशा सुंदर खळीतुन प्रेमात पाडणारी प्रिटी झिंटा, किंवा 'पल, पल, हर पल' मधे आपल्याकडे हर पल प्रेमाच्या अपेक्षेने पाहणारी विद्या बालन!
चुकुन जर हे AC-वालं उत्तर आईला दिलं की,
"अरे! जमिनीवर उतर! स्वत:कडे पाहिलं आहेस का कधी आरशात? अरे, त्या फक्त सिनेमात असतात. खरं आयुष्य खूप वेगळं असतं!"
सगळ्यात अवघड परिस्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा एखादी मैत्रिण असा प्रश्न विचारते.
कशी मुलगी पाहिजे?
तिला पण बिन्दास्त AC-वालं उत्तर देऊन टाकायचं.
मित्राला 'AC' म्हट्लं की पटकन समजतं, पण मैत्रिणीला त्यातले बारकावे पाहिजे असतात.
मग ते बारकावे सांगीतले, की ती तिची कोण एक 'जवळची' मैत्रिण ती तुम्हाला सुचवते.
मग स्वत:हूनच सांगते,
'ती तशी छान आहे, पण अप्सरा नाहीये रे... साधीच आहे...' (म्हणजे तुमचा शोध पुन्हा सुरु)
किंवा
'अरे! अगदी अप्सरा आहे! ऐश्वर्याच!' (अशी शक्यता जवळ-जवळ शून्य असते - तुम्हाला भेटेपर्यंत सलमान, विवेक नाहीतर अभिषेकचा नंबर आधीच लागलेला असतो)
म्हणजे एवढं सगळं करुन उपयोग काहीच नाही!! :-(((
अप्सरा आणि बायको कॅटेगरी दोन्ही वेगवेगळ्या असतात का?
Can I not have best of both the worlds?
आम्हाला कशी मुलगी पाहिजे?
१) सर्व प्रथम म्हणजे ती हुशार, confident आणि independent पाहिजे - ती कशी ओळखायची? ह्या करता "हीथ्रो टेस्ट" वापरायची. समज ती मुलगी हीथ्रो एरपोर्टवर एकटीच मागे राहिली. तर हीथ्रो वरुन तिला एकटं घरी येता आलं पाहिजे. मग आमचं घर लंडन मधे असो, मुंबई मधे असो, किंवा झुमरीतलैय्या मधे! तिला तिथे एकटं येता आलं पाहिजे! म्हणजे ही टेस्ट करायाला आम्ही तिला मुद्दामुन एकटं नाही सोडणार, पण मुद्दा हा आहे की ती तेवढी हुशार, confident आणि independent पाहिजे.
२) दुसरं महत्त्वाचं म्हणजे तिला मस्त चहा करता आला पाहिजे. स्वयंपाक जमला, नाही जमला तरी चालेल. पण रोज सकाळी एक कप, आणि संध्याकाळी घरी परत आलं की एक कप असा तिच्या हातचा बुंगाट चहा मिळाला, तर स्वर्ग-सुखच लाभलं असं समजायचं. आणि चहा बरोबर तिला मस्त गप्पा मारता आल्या पाहिजेत!
३) आम्हाला लग्नात हुंड्यात ३ नव्या गाड्या पाहिजेत - एक काळी BMW, एक सिल्वर मर्सिडीज, आणि एखादी तिच्या आवडीची - ह्या सगळ्या गाड्या Leo Mattel कंपनीच्याच पाहिजेत, आणि आकार इतका मोठा पाहिजे की त्यातली प्रत्येक गाडी आमच्या तळहातावर मावली पाहिजे! म्हणजे काय की आमच्या घरच्या शोकेस मधे त्या गाड्या पार्क करता येतील. शोकेस मधे आमच्या बालपणातल्या इतर गाड्या आहेत, आणि आताच्या जगात पार्किंगच्या जागेचा इतका अभाव आहे, त्याला आम्ही तरी काय करणार?
४) आवडतं पुस्तक आणि सिनेमाबद्दल विचारलं की तिनी पहिलंच उत्तर 'प्राईड आणि प्रेजुडाईस' आणि 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सोडुन काहीही सांगितलेलं चालेल. "चंपक / चांदोबा" आणि "डॉक्टर कोतनीस की अमर कहानी" हे उत्तर पण चालेल! अहो, जशी आमची अप्सरा अस्तित्वात नाही तसाच तो जेन ऑस्टेनचा "मिस्टर डार्सी" आणि शाहरुखचा "राहुल" फक्त पुस्तकात किंवा सिनेमा विश्वातच सापडतो हो!
५) तिला आमचं टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, बास्केटबॉल ह्या खेळांबद्दलचं असीम प्रेम चाललं पाहिजे - तिला पण हे खेळ आवडत असतील, तर उत्तमच! खेळता येत असतील तर absolutely nothing like it!
६) तिला फ्रेंच येत असेल तर लई भारी, कारण फ्रेंच इतकी romantic भाषा नाही. आमच्या तुटक्या-फुटक्या फ्रेंचचे शब्द तिला एखाद्या शायरी किंवा प्रेमगीतातले भासले पाहिजेत. अहो शेवटी म्हणतात ना,
"nothing else, but an honest intent matters".
७) आम्हाला salsa, jive हे नृत्य प्रकार येत नाहीत, पण शिकायची तीव्र इच्छा आहे. तिला येत असेल, तर आम्हाला शिकवायचं, किंवा आमच्या बरोबर शिकण्याची तयारी पाहिजे. नाहीतर आमचा भगवान स्टाईल गणपती डान्स चालला पाहिजे.
८) हिंदी सिनेमा बद्दलचं आमचं अफाट वेड तिला पटलं पाहिजे. अमिताभ, राहुल देव बर्मन, रेहमान, गुल्जार, किशोर हे आमचे दैवत आवडत नसतील तर निदान बघायची/ऐकायची तयारी पाहिजे. अधुन-मधुन आम्हाला गोविंदा आणि हिमेश पण आवडतो. (आधीच सांगितलेलं बरं!)
९) आमचं आयुष्यभराचा एकमेव मौल्यवान खजिना म्हणजे आम्ही बालपणापासुन जमवलेली पुस्तकं. आमच्या खोलीतल्या प्रत्येक कपाटात, बॅगेत, पलंगाखाली, डेस्कवर, बॉक्स मधे, माळ्यावर, फरशीवर, नजर जिथे जाईल तिथे आमचा खजिना पसरलेला आहे. त्या खजिन्याबद्दलचं आमचं प्रेम तिला पण असावं, नाहीतर "काय ही रद्दी जमा केली आहे" असले विधान आम्ही खपवुन घेणार नाही.
१०) सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही पत्रिका पाहतो. आम्हाला मुलगी फक्त "हास्य" राशीची पाहिजे. आणि तिचा रक्तगट कोणताही असु दे, पण attitude मात्र 'B+' पाहिजे.
चला, आजच आमच्या मातोश्रींना ही १० गुणांची यादी आम्ही कळवतो. म्हणजे त्यांना शोधायला बरं. आणि तुमच्या पैकी कोणाला ह्या "अप्सरा + बायको" कॅटेगरीत मोडणारी एखादी मुलगी माहिती असेल, तर आम्हाला त्वरीत कळवावे, म्हणजे पुढच्या बोलणीला सुरुवात करता येईल.
तो पर्यंत आम्ही गुल्जार भाईंच्या नविन गाण्यावर झूम बराबर झूम करत बसतो,
धागे तोड लाओ चांदनी से नूर के,
घुंघट ही बना लो रौशनी से नूर के,
शर्म आ गयी तो आघोष में लो,
हो सांसों से उलझी रहें मेरी सांसें,
बोल ना हलके, हलके
बोल ना हलके, हलके...
...झूम बराबर झूम...झूम बराबर झूम....
Posted by
Monsieur K
on Wednesday, May 16, 2007
/
Comments: (10)
बटरफ्लाय ड्रिम (Butterfly dream)
किती दिवसांनी भेटत आहेस सोना! कशी आहेस?
आहे ओळख, का विसरलीस मला? मी केदार! आहे का गं मी तुझ्या लक्षात?
परगावी गेलेलीस? कुठे? आणि मला काही सांगीतलंच नाहीस :-(
बरं, अचानक ठरली का तुझी ट्रिप? मग तुला वेळंच नसेल मिळाला मला सांगायचा. जाऊ दे...
मी कसा आहे? तसा छान आहे गं, पण खरं सांगु सोनाली - तुला खूप-खूप miss केलं. सारखी तुझीच आठवण येत होती. अगं खरंच! तुला नाही पटणार, पण रोज सकाळी उठलो रे उठलो, की मनात पहिला-वहिला विचार तुझाच येतो.
सकाळी माझ्या ह्या खोलीची खिडकी उघडली, की तु बाहेर माझी वाट पाहताना मला दिसतेस रोज. तुला हात करुन मी वर यायला खुणावतो, पण तु त्या गुलमोहराच्या झाडामागेच लपतेस.
असं का गं करतेस तु?
अजुन किती दिवस असा लपंडाव खेळणार आहेस माझ्याबरोबर?
कधी लपंडाव खेळतेस, तर कधी-कधी कट्टीच घेतेस.
मग मी असाच कित्येक दिवस ह्या माझ्या खिडकीपाशी बसतो. त्या माझ्या लाडक्या गुलमोहराकडे एक टक बघत, तुझी वाट पाहतो मी.
पण मग कधीतरी lady luck does smile upon me.
अशाच एखाद्या संध्याकाळी मग, तु त्या झाडामागुनच मला बोलवतेस.
त्या झाडामागे तुझं एक वेगळंच विश्व आहे. ते विश्व मी कधी पाहिलं नाहीये. त्या विश्वात तु नेहमी व्यस्त असतेस.
पण त्या संध्याकाळी थोडा वेळ का होईना, तु माझ्याशी मनसोक्त गप्पा तरी मारतेस. तु सोबत असलीस की मला वेळेचा, काळाचा, कसलाच भान रहातच नाही. स्वत:लाच विसरुन बसतो मी. खूप आनंद होतो मला, तुझ्याशी गप्पा मारताना.
आपल्या बोलण्याला काही विशेष विषय लागत नाही. आवडीची पुस्तकं, गाणी किंवा सिनेमा ह्या बद्दल तर सगळेच बोलतात. काही जणं एकेमेकांशी गेलेल्या दिवसाची चौकशी करतात. किंवा उद्याच्या स्वप्नांबद्दल बोलतात. आपण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बोलतो. जणु एकमेकांच्या मनात काय आहे, हे माहितच असतं आपल्याला, त्या बद्दल जास्ती काय बोलायचं. आपल्या आवडी-निवडी आणि विचार - काही जुळतात, तर काही एकमेकांना प्रगल्भ करतात, आपल्याला शिकवतात. In a way, you complete me.
तु काय बोलतेस, ते ऐकताना मी बाकी सगळंच विसरुन जातो.
ऐकताना? हो, मला माहित आहे, तसं तु बोलत काहीच नाहीस.
तरी तु न बोललेलं, मला सगळं ऐकु येतं.
जशी झाडामागे लपल्यामुळे तु दिसत नाहीस असं तु म्हणतेस.
पण तु विसरतेस राणी - प्रत्यक्षात जरी तुला कधी पाहिलेलं नाहीये; पण सांझ वेळी, तुझी ती सावली झाडामागे लपत नाही. ती सावली ह्या केदारला दिसते आणि त्याच्याशी बोलते देखिल.
तु कितीही लपलीस आणि गप्प राहिलीस, तरी ती सावली कशी लपेल माझ्यापासुन.
सोनाली. सोना. माझी(?) सोना?
"अरे केदार! संध्याकाळी कसला झोपतोस रे! ऊठ ना रे! आपल्याला बाहेर जायचं आहे ना रे!विसरलास का? अरे मी सिनेमाची तिकिटं काढली होती आपल्या दोघांची."
- "ह्म्म्म...सिनेमा??? कुठला?? सोना..."
"अरे, असं काय करतोस? आणि सोना नाही आणि काही नाही. पुष्कळ झालं तुझं 'सोना'. खरंच! तुला माझ्या इतकी चांगली गर्ल-फ्रेंड मिळाली आहे ना - जी स्वत:हून सिनेमाची तिकिटं काढुन आणते; जी तुला उठवायला येते; जी सारखी तुला फोन करते; तुला काय पाहिजे, काय नको ह्याची दखल घेते - त्याचं काही नाहीच तुला!"
- "अगं सोना... नाही... मीनल.. मला ५ मिनिट दे.. मी जरा फ्रेश होतो.. मग सिनेमाला जावुयात..."
"बरं.. पण लवकर तयार हो. आणि पुन्हा 'सोना' नको. झाली झोप, तेवढी पुरी आहे. ये लवकर. मी बाहेर वाट पाहते."
शॉवर खाली केदार उभा राहिला. गरम पाण्याच्या धारा वाहत होत्या तसा तो विचार करत होता.
मघाशी 'सोना' भेटलेली, तिच्याशी मारलेल्या गप्पा - ते सगळं, स्वप्न होतं; की आता मिनल सिनेमाची तिकिटं घेऊन बाहेर उभी आहे, हे स्वप्न आहे.
सोनालीला कधी पाहिलं देखिल नाही, तरी ती अशी वारंवार स्वप्नात का येते? लपंडाव आणि कट्टीचा आमचा खेळ-खंडोबा चालत असुन देखिल, एकदा भेट झाली की तिच्याशी इतकं समरस होऊन गप्पा कशा होतात माझ्या? न बोलता, आम्ही एकेमेकांना ओळखतो आणि पूर्णपणे समजुन घेतो.
पण... पण, ती एक सावली आहे... एक स्वप्न आहे...
आणि मग मीनलचं काय? तिच्याशी असलेलं नातं, त्याला काय म्हणायचं? ती माझ्यावर जीवापाड प्रेम करते. माझंही कदाचित प्रेम आहे तिच्यावर. पण ती मला पूर्णपणे ओळखत नाही. आणि कदाचित मला कधी पूर्णपणे समजु पण शकणार नाही.
पण शेवटी ती खरी आहे... ती एक सावली नाहीये... एक जिवंत व्यक्ती आहे... एक सत्य आहे...
नक्की मी कोणाला शोधत आहे?
नक्की मी कोणता केदार आहे?
मी मीनलला परिचित असलेला केदार आहे का,
जो क्षणोक्षणी सोनालीची वाट पाहतो?
का मी सोनालीचा केदार आहे,
ज्याची वाट ह्या क्षणी मीनल पाहत आहे?
स्वप्न नक्की कोणतं आहे... आणि सत्य तरी नेमकं काय आहे?
सावली कोणती... खरी व्यक्ती कोणती... आणि माझं नातं, माझं अस्तित्व, नेमकं कोणाबरोबर आहे?
एका व्यक्तीबरोबर... का एका....सावलीबरोबर...
"अरे केदार! अजुन किती वेळ लागणार आहे तुला?? चल ना रे, already किती उशीर झाला आहे आपल्याला. आणि काय करतोयस तिथे??"
शर्टाची बटन लावता-लावता, केदार मीनलला उत्तर देतो,
"काही नाही गं! झालंच माझं!... बस्स, ह्या माझ्या खिडकीतुन, माझ्या त्या लाडक्या गुलमोहराकडे बघत होतो... तुला ती झाडामागची मोहक सावली दिसते का गं?"
मागे वळुन केदारनी होकाराच्या अपेक्षेनी मीनलकडे पाहिलं. पण ती त्याच्या बोलण्यानी चक्रावुन गेली होती. काय होत होतं, तिला काहीच कळत नव्हतं.
"काय बोलतोयस काय तु केदार?? कुठलं झाड??? कुठली सावली??? अरे ते गुलमोहराचं झाड गेल्या वर्षीच पावसाळ्यात पडलं ना? त्या दिवसापासुनच तर तु तुझी ती खिडकी कायमची बंद करुन टाकलीस..."
*******************************************
गेल्या शनवारी शिकागो मधे 'अरण्यक' नावाचं मराठी नाटक पाहिलं. नाटकाची कथा 'बटरफ्लाय ड्रिम', ह्या एका चिनी फिलॉसॉफीवर आधारीत होती. त्याच फिलॉसॉफीवर एक गोष्ट लिहिण्याचा हा एक प्रयत्न...
Once upon a time, I, Chuang Chou (Chuang Tse), dreamt I was a butterfly, fluttering hither and thither, to all intents and purposes a butterfly. I was conscious only of my happiness as a butterfly, unaware that I was Chou. Soon I awaked, and there I was, veritably myself again. Now I do not know whether I was then a man dreaming I was a butterfly, or whether I am now a butterfly, dreaming I am a man.
~Chuang Tse, Chinese philosopher

on Wednesday, May 09, 2007
/
Comments: (6)
चेसिंग डेलाइट (Chasing Daylight)
नाव - युजिन ओ'केली (Eugene O'Kelly)
वय - ५३
व्यवसाय - CEO, KPMG (जगातल्या ४ मोठ्या "Big Four" ऑडित कंपन्यांपैकी एक)
मुदत - १०० दिवस!
कसली मुदत??
अखेरची मुदत.
ब्रेन ट्युमर अखेरच्या स्टेजला पोचला आहे. इलाज काहीच नाहीये.
रेडियेशन किंवा केमोथेरपीनी शेवट केवळ थोडा लांबवला जाईल.
पण अंतिम परिणाम बदलता येणार नाही.
अगर मंज़िल पता हो, तो सफर शायद सुहाना बनाया जा सकता हैं.
फिर चाहे मंज़िल पसंद की हो, या ना हो.
लेकिन सफर अगर सुहाना बनाओ, तो साथ चलनेवाले मंज़िल पहुचने के बाद भी तुम्हें याद रखेंगे.
युजिन ओ'केली कडे फक्त शंभर दिवस होते.
त्या शंभर दिवसांचं काय करायचं?
प्रत्येक माणसाला जबाबदाऱ्या असतात - व्यावसायिक, आर्थिक आणि वैयक्तिक.
ओ'केलीच्या पण होत्या.
व्यावसायिक बोलायचं झालं तर सगळ्यात पहिलं काम म्हणजे ऑफिसची सुत्रं त्यानी दुसऱ्या व्यक्तीवर सोपवली. त्या व्यक्तिला जेवढी मदत करता येईल, तेवढी आपण असे पर्यंत करायची हे ठरवलं आणि केलं.
आर्थिक जबाबदारी देखिल संभाळुन घेतली.
उरली ती वैयक्तिक जबाबदारी.
वैयक्तिक दृष्टीकोनातुन पाहिलं तर ओ'केलीनी तीन वर्तुळं काढली - concentric circles.
सगळ्यात बाहेरच्या वर्तुळात त्याच्या आयुष्यातले जितके ओळखीचे होते, जे त्याची नंतर आठवण काढतील - त्या सर्व लोकांना ह्या वर्तुळात समाविष्ट केलं.
मधल्या वर्तुळात जवळचे मित्र, सहकारी, नातेवाईक हे सर्व आले.
आणि सगळ्यात आतल्या वर्तुळात, ज्याला "inner circle" म्हणु - त्यात आले त्याची बायको आणि दोन मुली.
ह्या तीन वर्तुळात येणारी मंडळी ही त्याची आयुष्यभराची कमाई होती.
ह्या सर्वांना त्याला अखेरचा निरोप द्यायचा होता. सगळ्यात बाहेरच्या वर्तुळातुन सुरुवात करुन शेवट "inner circle" वर करायचा ठरवला.
मग कोणाशी पत्राद्वारे, कोणाशी फोनवर, कोणाला प्रत्यक्ष भेटुन;
कोणाला त्याची एखादी आवडती वस्तु भेट करुन, किंवा कोणाबरोबर बाहेर जेवायला जाऊन;
प्रत्येक निरोप घेण्यात ध्येय एकच होता - to create a "perfect moment" with that person.
हे पुस्तक वाचता-वाचता सहज मनात विचार येतोच.
मित्र, नातेवाईक, सहकारी आणि अगदी जवळचे लोकं - ह्या पैकी कित्येकांबरोबर मी खरोखरच असे "perfect moments" knowingly निर्माण करतो? किंवा निदान ते निर्माण करायचे प्रयत्न करतो.
ओ'केलीचा आवडता खेळ म्हणजे गोल्फ. दिवसभर तुम्ही गोल्फच्या मैदानावर एका पाठोपाठ एक होल (hole) cover करायचा प्रयत्न करत असता. सूर्य मावळायच्या अगोदर तुम्हाला तुमचा १८ होल्सचा खेळ संपवायचा असतो. संध्याकाळ झाली की तो खेळ लवकरात लवकर संपवायचा म्हणुन आपण प्रयत्नांची शर्थ करतो. संधीप्रकाशात चालणाऱ्या खेळाच्या ह्या शेवटच्या सदराला "चेसिंग डेलाइट" म्हणतात.
संधीप्रकाशात आपली सावली मोठी होत जाते.
शेवटी असा एक क्षण येतो की सूर्य मावळतो.
आणि त्याच क्षणी आपलीच सावली आपल्याला एकटी सोडुन जाते.
खेळ संपतो...
...."चेसिंग डेलाइट" (Chasing Daylight)....
पुस्तकाचा विषय तसा फार डिप्रेसिंग होता.
पण मला वाचायचं होतं. पुस्तक संपवायला वेळ खूप लागला. १६० पानंच होती खरं. तरी तब्बल ३ महिने लागले. विषयंच असा होता की पुस्तक उचलावसं वाटत नव्हतं. पण शेवटी गेल्या वीकेंडला वाचुन काढलं. अशा डिप्रेसिंग विषयावरचं पुस्तक वाचताना माझी ही अवस्था झाली होती. ज्यानी ते सगळं अनुभवलं, त्याचं काय?
मरण समोर असताना त्याच्या मनात येणारी भिती, किंवा दु:ख ह्याचं ओ'केलीनी अजिबात बोभाटा केला नाहीये. उलट त्यानी एक आगळा-वेगळा आशावाद दाखवला आहे. शांतपणे आयुष्याचा शेवट करताना, his single minded focus & effort was to achieve those elusive "perfect moments".
कसं जमलं असेल त्याला?
कदाचित, त्याचा तो ठाम विश्वासच त्याच्या कामी आला असेल,
"May you live every day of your life."
~Jonathan Swift

on Tuesday, May 01, 2007
/
Comments: (11)
क्रॉसरोड
हीथ्रो (Heathrow) विमानतळावरचं ब्रिटिश एरवेजचं प्रशस्त लॉउन्ज. ब्रिटिश एरवेजच्या फर्स्ट क्लॅस आणि बिज़नेस क्लॅस प्रवाशांकरता इथे उत्तम सोय केलेली असते. आराम करायला सोफा, लेदर खुर्च्या; काम करायचं असेल तर डेस्क, फोन, इंटरनेटची सुविधा; खायचं-प्यायचं असेल तर तयार ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्नॅक्स, जुस, वाईन, ड्रिंक्स; हवं असेल तर तिथल्या कुकला ऑर्डर देऊन फ्रेश पास्ता किंवा काहीतरी मागवता देखिल येतं; फ्रेश व्हायचं असेल तर मस्तपैकी शॉवर आणि मसाज घ्यायचा; आणि नुसताच वेळ घालवायचा असेल तर पेपर, मासिकं नाहीतर टिव्ही. वेळ उरलाच तर बसल्या बसल्या एक छोटीशी झोप काढायची. तसंही लॉउन्ज म्हट्लं म्हणजे कोणताही प्रवासी इथे काही तासांपेक्षा जास्ती थांबतच नाही. फक्त कनेक्टिंग फ्लाईटची वेळ होण्यापुरतंच प्रवासी इथे येतात.
२ मिनिट अगोदर हातात घेतलेला पेपर श्रीरंगनी लगेच बाजुला ठेऊन दिला. समोर होते तेवढे सगळे पेपर त्याचे गेल्या अर्ध्या तासात चाळुन झाले होते. जून २००५ मधे जिंकलेले ऍशेस डिसेंबर २००६ मधे इंग्लंड पुन्हा राखु शकणार का, ह्यावर टेलिग्राफ, टाईम्स, गार्डियन आणि इतर वृत्तपत्रात तेच-तेच वाचुन तो कंटाळलेला!
आपल्या ब्लॅकबेरीत त्यानी पुन्हा नविन काही ई-मेल आली आहे का पाहिलं. तसं १० मिनिटापूर्वीच त्यानी चेक केलं होतं. मुंबई ऑफिसहून आलेली समीरची उद्याची मिटिंग invite त्यानी accept केली. त्याची ४ दिवसाची न्युयॉर्कची बिजनेस ट्रिप अगदी मनासारखी झाली होती. त्याबद्दलच समीरला उद्या सकाळी ९ वाजता अपडेट करायचं होतं. रात्री घरी पोचायला १ वाजणार होते. तो पर्यंत तर रिया कदाचित झोपुन पण जाईल. तिला पाहुन ५ दिवस झाले आहेत. ५ दिवस!
रिया. माझी सुंदर मुलगी. कधी ती ३ वर्षांची झाली, कळलंच नाही. काळ किती झपाट्यानी गेला. ४ वर्षांपुर्वी मी आणि वैदेही त्याच न्युयॉर्क मधे राहात होतो. आम्हाला तिथे ५ वर्ष झालेली. पण रिया होणार, तेव्हा वैदेहीनी ठरवलं, की आपलं मूल आपल्या देशातच वाढवायचं - आपल्या लोकांत, आपल्या संस्कृतीत, आपल्या भाषेत, आपल्या बरोबर.
आणि मग आम्ही मुंबईला परत आलो. रिया झाली त्या दिवशी किती आनंद झालेला आम्हा दोघांना. त्या दिवसापासुन घरात एक वेगळंच सुख नांदायला लागलं आहे.
मी न्युयॉर्क मधेच राहिलो असतो, तर कदाचित आजच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर असतो, जास्ती पैसे तर नक्कीच कमवले असते. मुंबईतलं सुख निश्चित नाही, पण अमेरिकेतलं एक वैभवसंपन्न आयुष्य नक्कीच असतं. पण का कुणास ठाउक, तेव्हा बरं झालं मला वैदेहीचं म्हणणं पटलेलं.
कदाचित कारण हे असेल की MBA झाल्यानंतर माझी पहिली ७-८ वर्ष मी माझ्या करियरकडेच लक्ष केंद्रित केलं होतं. त्या ७-८ वर्षात मी बरंच काही मिळवलं - पण ते मिळवताना, मी बऱ्याच गोष्टी सोडल्या सुद्धा होत्या. त्या सोडलेल्या गोष्टीच मला हव्या होत्या. त्या न्युयॉर्कला नसत्या मिळाल्या मला.
आणि मुख्य म्हणजे मला वैदेहीला कधीच दुखवायचं नव्हतं. तिच्यामुळेच माझ्या आयुष्यात एक स्थैर्य आलेलं; एक निश्चित अशी दिशा मिळालेली. मग न्युयॉर्क असो, किंवा कुठेही असो, तिला जिथे रहायचं होतं, जिथे आमच्या मुलाला/मुलीला वाढवायचं होतं, तिथेच मला जायचं होतं.
आज विचार केला तर एकच feeling येतं - no regrets. whatever happens, happens for the best.
मी, वैदेही आणि रिया. आम्ही तिघं एकमेकांपासुन कधीच दूर राहु शकत नाही.
"Excuse me! Can I have the newspaper in front of you, if you are not reading it?"
हे ऐकताच श्रीरंग दचकला. मग लक्षात येताच, टेबलावरच्या पेपरवरचा हात बाजुला केला, आणि म्हट्ला,
"Oh sure! Why not. I am sorry, I am done reading it."
पेपर तिला देताना त्यानी तिला पाहिलं तर तो चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कुठे बरं पाहिलं आहे आपण हिला?
ती देखिल श्रीरंगकडे पहात होती, आठवायचा प्रयत्न करत होती.
"Hi, I am Shrirang Joshi. I am not sure, but you seem familiar. Do we know each other?"
~"श्रीरंग जोशी!!... तरीच मी म्हट्लं की तुम्हाला कुठे पाहिलं आहे. अरे! मला नाही ओळखलंस? मी अपर्णा! अपर्णा दिक्षित. आठवले का, का विसरलास तु मला?"
"अपर्णा दिक्षित! तरीच मी म्हणत होतो, कसं नाही ओळखलं मी तुला. शाळेतली १० वर्ष, आणि पुढे कॉलेजची ४ वर्ष - अशी सलग १४ वर्ष जी मुलगी नेहमी पहिली यायची, आणि मला नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लावायची - तुला मी कसं विसरु शकेल."
~"वाह! अजुन लक्षात आहे म्हणजे तुझ्या. काय अरे? ते शाळा-कॉलेजचे दिवस संपुन आता १२-१३ वर्ष झाली की आपल्याला. आणि तरी तुझं - तु पहिली, मी दुसरा - हेच चालु आहे."
"१३ वर्ष? खरंच की!... कॉलेज नंतर लगेचच तु लग्न केलंस आणि गायब जी झालीस, ती आज अशी अचानक हिथ्रो वर भेटत आहेस. कशी आहेस? कुठे जात आहेस?"
~"मी मजेत आहे रे. माझ्या कंपनीनी मला नुकतंच प्रमोशन दिलं आहे. नविन पोस्टिंग २ वर्षाकरता आहे. म्हणुन न्युयॉर्कला जात आहे."
"२ वर्षाकरता म्हणजे? तु लग्न झाल्यापासुन तिथेच होतीस ना? न्युयॉर्कला?"
~"चूक! लग्नानंतर आम्ही अशुतोशची नोकरी होती म्हणुन न्युयॉर्क मधे फक्त २-३ वर्षच होतो. मग पुढे.. जाऊ दे...चल, आपण आधी कॉफी घ्यायची का? गप्पा काय होतंच राहतील. there's so much to catch up on about the last 13 years, and we can certainly enjoy a cup of coffee while we do that. what say?"
कॉफीवर गप्पा आणखिन रंगल्या दोघांच्या. जुन्या आठवणी, जुने मित्र-मैत्रीणी, दोघांचे संसार, मुलं, करियर - ह्यातच दोन तास कसे निघुन गेले कळलंच नाही. श्रीरंगच्या मुंबईच्या फ्लाईटची वेळ झाली आणि दोघांनी एकमेकांना गुडबाय केलं.
"चल गं! कधी नव्हे तो माझा नंबर पहिला लागला आहे, आणि तुझा दुसरा.
काय गंमत आहे नाही? मी न्युयॉर्क सोडुन येत आहे, आणि तु तिकडेच जात आहेस. तुला तुझ्या न्युयॉर्कच्या नविन assignment करता best of luck. तु यशस्वी होशीलच, मला खात्री आहे."
पुन्हा आपली भेट कधी होणार, दोघांनाही कल्पना नव्हती. कदाचित अशीच हिथ्रो वर होईल भेट. किंवा होणार पण नाही.
बसल्या-बसल्या अपर्णानी लॅपटॉप उघडला. न्युयॉर्कला पोचायाच्या अगोदर तिला काही महत्त्वाच्या गोष्टी संपवायच्या होत्या. पण काही केल्या, कामात मन लागत नव्हतं. मनोमनी तिला सरलेल्या १३ वर्षांचा काळ दिसत होता.
लग्न झाल्या-झाल्या न्युयॉर्कची ती २-३ वर्ष म्हणजे माझ्या आजवरच्या successful आयुष्यातली एक पोकळी! नविन देश, नविन संस्कॄती, नविन लोक - सुरुवातीला मी जरा घाबरलेलीच होते. आशुला ऑफिस मधुन परत यायला किती उशिर व्हायचा - दिवसभर मी घरी एकटीच बसुन असायची.
१ वर्ष सरलं, मग रोहन झाला. मग मी रोहनच्या मागेच व्यस्त झाले. त्याच्याकडे बघायचं, त्याची आंघोळ, त्याचं जेवण, त्याची झोप, घरातली आवरा-आवर, स्वयंपाक, नवऱ्याच्या सगळ्या गर्जा भागवायच्या - दिवस कधी सुरु व्हायचा, कधी संपायचा - मला कळतच नव्हतं.
हे सगळं करायलाच मला युनिव्हर्सिटी मधे gold medal मिळालं होतं का?
हेच सगळं मला आयुष्यभर करायचं होतं का?
का बरं मी करत होते ते?
आई-नानांना दुखवायचं नाही म्हणुन मी हातची नोकरी सोडुन, करियर सोडुन आशुशी लग्न केलं होतं. सगळं सोडुन परदेशात गेली होते.
३ वर्ष ते सगळं निभावलेलं.
with no complaints.
पण मग मला ती गाडी अजुन पुढे ढकलता येत नव्हती.
thankfully, आशुनी मला समजुन घेतलेलं.
आम्ही न्युयॉर्क सोडलेलं, माझ्याकरता.
आम्ही दिल्लीला आलो. मी नोकरी सुरु केली.
रोहनला सांभाळायला आई आणि नाना आमच्यासोबत राहु लागले.
१० वर्ष सरली. professionally, मला यश लाभत गेलं. मी कष्ट पण तसेच करत होते. आयुष्यात कधीच 'second best' यायचं पटलेलं नाहीये मला. नेहमीच मला सर्वप्रथम यायची सवय आहे.
आणि तेच मी माझ्या मुलाच्या भविष्याबाबत expect करते. त्याला सगळं उत्तमच मिळायला पाहिजे.
यंदा तो पाचवीत गेला आहे. म्हणुनच त्याला ह्या वर्षी पासुन 'Doon School' मधे admission घेतली आहे. तो तिथे होस्टेलवर राहील. स्वावलंबी होईल. confident होईल. आणि, most importantly, he will also learn to achieve nothing but the best in life, just like me.
खरं म्हणजे, आशुला माझ्याबरोबर न्युयॉर्कला येता आलं असतं. पण रोहन देहरादुनला आहे, म्हणुन त्याला दिल्ली सोडायचं नाहीये.
दोन वर्षांचीच तर गोष्ट आहे. अशी चुटकीसरशा जातील ही दोन वर्ष.
मग मी पुन्हा आशु आणि रोहन जवळ येईल.
"British Airways is pleased to announce the boarding for its flight BA179 flying from London Heathrow to JFK, New York..."
ही announcement ऐकताच अपर्णा भानावर आली.
लॅपटॉपची बॅटरी ड्रेन-आऊट झालेली.
तो तसाच बॅगेत टाकुन ती गेटच्या दिशेनी चालु लागली.
अजुन एक शिखर गाठायला.