"Today is a beautiful day" or "paraskavedekatriaphobia"?
गेले २ आठवडे खुप काम चालु आहे. काल तर ऑफिस मधे चक्क १६ तास होतो. काल रात्री झक्कास साखर झोप झाली. आज सकाळी गज़र वाजायच्या अगोदर ६.३० लाच जाग आली.
उठल्या-उठल्या मस्त इलायची चहा घेतला. चहाचा मग हातात धरुन पॅटियो मधे उभा राहिलो.
सुर्योदय नुकताच झालेला. हळुहळु सगळ्यांना जाग येत होती.
पक्षांची किलबिल चालु झालेली. कोवळ्या उन्हात खारुताई गवतावर इकडुन-तिकडे पळत होत्या.
सकाळच्या गार हवेत त्या गरम चहाच्या वाफेनी मला इतकी तरतरी आली, की त्या खारुताई बरोबर पकडा-पकडी खेळावीशी वाटत होती.
ऑफिसला शानचं गाणं ऐकत आलो.
चुपचाप करती हैं बातें जब तेरी यह खामोशीयां,
चुपचाप सुनती हैं दिल की हल्की हल्की सरगोशीयां
बेचैनसी हर सांस हैं, अंजाना सा एहसास हैं
बेखुदी सी क्या हैं, हर लम्हा ठहरा हैं
कितनी मुद्दत से कोई ख्वाब ना देखा हैं
गाडीतुन उतरल्यावर 'ती' दिसली. तिच्या नेव्ही ब्लु ऑडी कनव्हर्टिबल मधुन उतरुन 'तिनी' डोळ्यांवरचा गॉगल डोक्यावर बसवला.
चुपचाप 'तिची' नज़र माझ्यावर पडली, तेव्हा बेहोशच झालो.
सकाळच्या गार वाऱ्यावर उडणारे तिचे सोनेरी केस फार मोहक वाटले.
मनातल्या मनात शान गात होताच.
चुपचाप जो नजरें तुम्हारी बरसाये बेहोशीयां
चुपचाप बेखुदी में हम भूल आये दो जहां
बेचैनसी हर सांस हैं, अंजाना सा एहसास हैं
हसत हसत ऑफिस मधे पाउल ठेवलं.
स्वत:ला आणि जो भेटेल, त्याला आज मी हेच म्हणत आहे,
Today is a beautiful day.
आज तो बहुत खुश होगे तुम!
incidentally आज "Friday, the 13th" देखिल आहे.
wikipedia tells me that the fear of Friday the 13th is called paraskavedekatriaphobia ( word that is derived from the concatenation of the Greek words Παρασκευή, δεκατρείς, and φοβία, meaning Friday, thirteen, and phobia respectively).
paraskavedekatriaphobia गेलं टोकावर, आज मला फक्त एकच गोष्ट माहित आहे -
Today is indeed a beautiful day.
क्या तुम्हें भी ऐसा ही लगता हैं?
Posted by
Monsieur K
on Tuesday, April 10, 2007
/
Comments: (3)
सुडोकु
राजुकाकांना शब्दकोडी सोडवायचा प्रचंड नाद. तसे ते नेहमीच कामात गर्क असतात - मग ते काम ऑफिसचं असो किंवा घरातलं - इतका उत्साही माणुस शोधुन सापडणार नाही. ऑफिसमधुन आलं, की चहा घेता-घेता म्हणा, किंवा सुट्टीच्या दिवशी म्हणा, त्यांना जर चुकुन वेळ मिळाला तर पेपर उघडुन त्यातले शब्दकोडे सोडवणार.
४०शीत लागलेला चष्मा नाकावर लावलेला, हातात पेन आणि पेपर, आंगणात कापडी आराम-खुर्चीत बसलेले राजुकाका, गुरुवारी आत्याकडे गेलं की दिसतात. मी बंगल्याचं फाटक उघडलं की हळुच वर बघुन मला म्हणतात,
"काय केतन, कसा आहेस?"
~ "मी छान! तुम्ही कसे आहात? आज सुट्टी ना."
"काही नाही रे, आपलं नेहमीचंच! गुरुवारी सुट्टी असली की सगळी कामं कशी छान होतात. तुमच्या सारखी आम्हाला रविवारी कुठे आली सुट्टी. आजच सकाळी तुझ्या आत्याला घेऊन मंडईतुन भाजी आणली. मग इलेक्ट्रिक बिल, फोन बिल भरलं. बॅंकेत काम होतं, ते झालं. दुपारचं जेवण झालं, मग गाडीचं थोडं काम होतं म्हणुन जोशांच्या गॅरेज मधे जाऊन आलो. आताशी ४-४:३० वाजता कुठे थोडा वेळ मिळाला, म्हणुन ह्या आरामखुर्चीत हवा खात बसलो आहे."
~"तुम्ही सुट्टीच्या दिवशीसुद्धा सकाळी ५:३० ला कसे उठता हो? मला तर रोज सुद्धा एवढ्या पहाटे जाग येत नाही, सुट्टीच्या दिवशी तर सोडुनच द्या! ....आता, तुम्ही शब्दकोडं सोडवताय ना?"
"हो रे! आयुष्याचं कोडं आपल्याचानी नाही सुटत लवकर, पण हे मात्र पटदिशी सुटतं.
अगं सुनंदा, केतन आला आहे. चहा टाकतेस ना!"
मग चहा आणि नाश्त्यावर आत्या आणि काकांबरोबर गप्पा रंगतात.
आयुष्याचं कोडं तर दूरंच राहिलं, पण मला शब्दकोडी तर कधीच झेपली नाहीत.
लहानपणी "word search", "jumble" बरेच सोडवलेले.
पहिल्या नोकरीत काम काय केलं ते नीटसं आठवत नाही, पण वेळ मिळाला की dictionary.com वर "word search" सोडवायचो, ते अजुनही आठवतं. कमीतकमी वेळात कसं सोडवता येईल, ह्या करता बऱ्याच वेळा प्रयत्न करायचो.
सध्या वेड लागलं आहे ते सुडोकुचं. पण माझं वेड जरा कंट्रोल मधे आहे.
ऑफिसमधल्या एका प्रचंड हुशार मुलानी तर सुडोकु सोडवायच्या algorithmचा एक C program पण लिहिला आहे. त्याला क्रिकेट खेळायला बोलवलं की तो म्हणतो,
"तुम्ही आधी सुडोकु सोडवा, मग मी तुमच्या बरोबर क्रिकेट खेळायला येईल!"
"घरी जा!" - ही आमची प्रतिक्रिया त्याला फारशी रुचत नसेल, पण झक मारत अधुनमधुन तो क्रिकेट खेळायला येतोच आमच्याबरोबर.
सुडोकु किंवा कुठलंही कोडं सोडवायचं एक पॅटर्न असतं, एक algortihm असतं. ते ज्याला कळलं, त्याला ते कोडं सहजासहजी सोडवता येतं. गंमत ह्याची वाटते की मी पण ते पॅटर्न शोधत असतो, किंवा ते algorithm वापरत असतो.
प्रॉब्लेम मग हा आहे की मग माझ्यात आणि ते पॅटर्न/algorithm वापरणाऱ्या इतर व्यक्तीमधे फरक एवढाच आहे का, की जास्ती लवकर ते कोण करु शकतं?websudoku.com वरच्या easy level सुडोकु सोडवायचं median time ५ मिनिटं ४९ सेकंद आहे, आणि मी बऱ्याच वेळा त्याहुन जास्ती वेळ घेतो.
कोडं, मग ते कोणतंही असो, आधी तर सुटतच नाही, आणि सुटलंच तर लवकर सुटत नाही!
असं माझ्याबरोबरंच का होतं बरं, असं प्रत्येकालाच का वाटत राहतं?
आहे कुणाकडे ह्या कोड्याचं उत्तर?

on Sunday, April 08, 2007
/
Comments: (2)
"कलेक्टर्स आयटम्स"
शुक्रवारी सकाळी कॅफेटेरियातुन रोजची फ्रेंच वानिला कॉफी घेताना एका पर्डीत रचुन ठेवलेल्या रंग-बिरंगी इस्टर एग्ग्स वर नजर गेली. डेस्कवर परत आल्यावर केव्हिनकडुन इस्टर एग्ग्सचा फंडा मागीतला. आमच्या टीम मधे कोणालाही काही प्रश्न असला - अमेरीकेत $१ ची कोणती नाणी आहेत, अमेरीकेतल्या कुठल्या शहरात gas prices काय आहेत, एखाद्या नावाजलेल्या अमेरीकन गाडीचा इतिहास, अमेरीकन फुटबॉल कसं खेळतात, हातात आलेली $१ चि नोट कुठे-कुठे फिरुन आली आहे, फ्लोरिडा मधे रेड इंडियन लोकांचं वास्तव्य कुठे आणि कधी पर्यंत होतं, इत्यादी वेगवेगळ्या "अमेरीकेतलं अमुक-तमुक तुम्हाला माहित आहे का?" प्रश्नांची उत्तरं हवी असली, तर हमखास केव्हिनला गाठायचं. त्याला माहित तरी असतं किंवा तो गुगल/विकिपिडियावर शोधुन पटकन सांगतो. विकिपिडियावर आम्ही दोघं इस्टर एग्ग्स बद्दल वाचत असताना केव्हिन म्हट्ला,
"उद्या माझी बायको गॅरेटला घेऊन इस्टर एग्ग हंटला जात आहे."
गॅरेट हा त्याचा ३ वर्षांचा मुलगा.
बोलता बोलता केव्हिनला त्याच्या बालपणाची आठवण झाली. त्याच्या आईनी त्याला इस्टर करता एक ऑस्ट्रिच एग्ग अतिशय सुंदररित्या सजवुन दिलं होतं. ते कितीतरी दिवस त्यानी त्याच्या छोट्याश्या एका काळ्या बॉक्स मधे जपुन ठेवलं होतं. त्या अंड्यावरचं डिज़ाइन आणि रंग त्यानी अगदी मंत्रमुग्ध होऊन मला सांगितलं. मग त्या काळ्या बॉक्स मधल्या त्याच्या अमुल्य खजिन्याबद्दल केव्हिन बोलु लागला.
"तशा मी बऱ्याच गोष्टी साठवायचो. पण एक-दोन अशा गोष्टी होत्या ज्या फारशा कुणी गोळा करत नसेल. एक म्हणजे रॅटल-स्नेकचे रॅटल्स आणि दुसरं म्हणजे शार्क माशाचे दात!"
हे ऐकुन मी थक्क नाही गाSSSSSर झालो!
म्हट्लं, "बाबा रे! ह्या असल्या गोष्टी कुठुन गोळा केल्यास तु??"
(का केल्यास, हे विचारणं खूप चुकीचं, त्या वयात ते करणं अगदी योग्य असतं)
"अरे आम्ही मुलं खेळायचो तिथल्या मैदानात एक दिवस एक मेलेला रॅटल-स्नेक सापडला. मग सगळी मुलं त्याची रॅटल्स तोडु लागली, तेव्हा मी पण २-३ घरी घेऊन आलो. आणि घरी गुपचुप कोणाला न सांगता माझ्या खजिन्याच्या पेटीत ती ठेवुन दिली."
~ "छान! आणि शार्क-दंत? मला हे नको सांगुस की मेलेल्या शार्कचे दात काढत बसलेलास तु!"
"नाही रे! आम्ही मुलं कॅम्पिंगला एका नदीवर गेलेलो. पुर्वी इथल्या फ्लोरिडातल्या नद्यांमधे सुद्धा काही शार्क मासे असायचे. बऱ्याच वेळा त्यांचे दात नदी काठी मातीत सापडायचे. तेव्हा आम्ही काहीतरी माती मधे खरडत असताना काही दात मिळाले, ते घरी घेऊन आलो."
~ "पुन्हा न सांगता ते दात त्या काळ्या पेटीत गेले."
"बरोब्बर! आज आठवलं की गंमत वाटते. माझा तो खजिना आज माझ्या आई-बाबांच्या घराच्या ऍटिक मधे धुळ खात बसला असेल. कधीतरी जाऊन बघतो आता."
ह्म्म्म... च्यायला! हा केव्हिन लई भारी दिसतोय. मोरपंख, समुद्रावरचे शंख-शिंपले, रंगीत पिसं, फिडो-डिडोचे सेव्हेन-अपचे स्टिकर्स हा माझा लहानपणीचा खजिना कुठे आणि ह्याचा अलिबाबालासुद्धा लाजवेल असा खजिना कुठे?
लहानपणी मी काय गोष्टी गोळा करायचो - एक-एक फेज होता तो - कधी ब्रेड मधे मिळणारे स्टिकर्स, कधी रंग-बिरंगी पिसं, कधी स्टॅम्प्स, कधी नाणी! पेप्सीनी सेव्हन-उप लॉन्च केलं तेव्हा ते फिडो-डिडोचे स्टिकर्स!
स्टॅम्प्स गोळा करण्यात तर अतिशय कहर केलेला - बाबांना सांगुन त्यांच्या ऑफिसच्या इन्टरनॅशनल डिव्हिजनमधे जेवढी पत्र यायची, त्याची सगळी एनव्हलप्स मग कुलकर्ण्यांच्या घरी पोचायची (आज सुद्धा आईला ऑफिसमधे एखादं फॉरेन स्टॅम्प असलेलं एनव्हलप मिळालं की ती न चुकता माझ्या करता घेऊन येते). संध्याकाळी बाबा घरी यायच्या वेळी किती आतुरतेनी त्यांची वाट बघायचो. ते घरी आले, की लगेच त्यांच्या हातात पाणी द्यायचं, त्यांच्या हातातली ब्रिफकेस आणि डबा घ्यायचा, मग त्यांनी ती ब्रिफकेस उघडुन मला एखादं अमेरीकेचं, रशियाचं किंवा दक्षिण अफ्रिकेचे स्टॅम्प असलेलं एनव्हलप हातात द्यायचं - ते एन्व्हलप घेऊन मग तो स्टॅम्प लगेच माझ्या कलेक्शन मधे मी दाखल करायचा! एक-एक स्टॅम्प मिळाल्याचा केवढा आनंद व्हायचा!
ओळखीचे जेवढे लोकं परदेशात जायचे, सगळ्यांना मी माझ्यकरता स्टॅम्प घेऊन यायला सांगायचो. बिल्डिंग मधल्या अभिजित काकांनी त्यांच्या स्टॅम्प कलेक्शन मधुन काही २००-२५० जुने स्टॅम्प्स दिलेले, तेव्हा तर एक साथ एवढे स्टॅम्प्स मिळालेलो आपण एकटेच - अख्ख्या जगात भारी असं वाटलेलं!
जे स्टॅम्प्स डुप्लिकेट होते, ते मित्रांबरोबर exchange करुन दुसरे घ्यायचो. कलेक्शन जरा बऱ्यापैकी झाल्यावर बाबांकडुन डेक्कनवरच्या महाराष्ट्र स्टोर्स मधुन एक महागातली स्टॅम्प ठेवायची वही विकत घेतलेली. नक्की आठवत नाही आता, पण माझं कलेक्शन दोन-तीन हजाराच्या घरात पोचलेलं तेव्हा! आणि एकही पेन-पॅल नसताना!
सकाळ मधे तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुर्मिळ स्टॅम्प्स बद्दल एक लेखमाला आलेली. अशा एखाद्या दुर्मिळ स्टॅम्प बद्दल पेपर मधे वाचलं, तर लगेच मी माझ्या कलेक्शन मधे पहायचो. तो स्टॅम्प कधीच माझ्या कलेक्शन मधे नसायचा, मग मी सकाळ मधुन तो कापुन ठेवायचो - स्टॅम्प नाही तर नाही, निदान त्याची छबी तरी असावी आपल्याकडे, कधी ओरिजनल मिळालाच तर छबी वरुन ओळखायला सोपं पडेल - ही भोळी-भाभडी समज होती त्यामागे.
स्टॅम्प्सच्या बरोबर मधेच कधीतरी मग नाणी देखिल गोळा करु लागलो. सुरुवातीला भारतीय नाणी - एक पैसा, दोन पैसे, तीन पैसे, ५-१०-२०-२५... अशी सगळी नाणी. आजोबांकडुन त्यांनी एका पत्राच्या डब्यात ठेवलेली ३०-४० वर्षांपुर्वीपासुनची नाणी, आईकडुन तिनी गुलाबी रंगाच्या प्लास्टिक जंबो हत्तीच्या आकाराच्या सुट्टे पैसे ठेवण्याच्या बॉक्स मधली नाणी - ही माझी पहिली दोन sources होती. मुंबईला मामाकडे गेलेलो तेव्हा पणजोबांकडुन ब्रिटिश काळातली नाणी मिळालेली. १ आण्याचं नाणं असतं हे तेव्हा मला कळलेलं. शाळेत नुसतंच इतिहासात शिकलेलो की १९४७च्या अगोदर ब्रिटिश लोकं भारतात होते, पण पणजोबांकडुन मिळालेल्या नाण्यांवर ब्रिटिश राज्याचं चिन्ह पाहुन एक वेगळीच feeling आलेली.
मग परदेशातली अमेरीकन सेंट, निकल, डाईम, क्वार्टर आणि एक डॉलर, ब्रिटनचा पौंड, जर्मनीचे दॉइश-मार्क, नेपाळी रुपये आमच्या सरकारी खजिन्यात यथावकाश जमा झालेले. का कुणास ठाऊक पण अकबर बादशाह किंवा शिवाजी महाराजांच्या काळातली एखादी सुवर्णमुद्रा आपल्या ह्या खजिन्यात पाहिजे अशी मनातली एक अतृप्त इच्छा, आजही अतृप्तच राहिली आहे.
तेव्हा तो एक नादच लागलेला - ओळखीचे-पाळखीचे कोणी केन्या, अमेरीका, रशिया, जर्मनी, ब्रिटन, सिंगापुर काय, अगदी नेपाळला सुद्धा गेलं की मी प्रत्येकाकडुन स्टॅम्प्स किंवा नाण्यांची अपेक्षा करु लागलो. आजोबा नेपाळला गेले होते, तेव्हा जायच्या अगोदर मी त्यांना सांगीतलं,"काहीही करा, पण मला वापरलेले जितके नेपाळी स्टॅम्प्स मिळतील तुम्हाला, तेवढे माझ्याकरता प्लीझ तुम्ही घेऊन या परत. हवं तर तिथल्या पोस्टात जाऊन घेऊन या - पण ते वापरलेले पाहिजेत, म्हणजे मग ते authentic वाटतात."
माझा तो खजिना पुण्यातल्या माझ्या कपाटात पडला आहे. किती वर्ष झाली आहेत, मी त्याच्याकडे पाहिलंच नाहीये. केव्हिन सारखा माझा खजिना इतका भन्नाट नाहीये, पण तो जमवण्यामागे जे कष्ट घेतले, जी जिद्द होती, जो आनंद होता - ते सगळं आठवलं की स्वत:लाच किती बरं वाटतंय आज.
आज स्वत: अमेरीकेत राहिल्यावर मी इथले स्टॅम्प्स कधी गोळा नाही केले. नाणी मिळत राहतात. मधे एकदा वेगवेगळ्या स्टेटचे क्वार्टर्स जमा करायला सुरुवात केली होती, ती पण नीटशी जमली नाही. कुठेतरी ते जमवलेले क्वार्टर्स खर्च पण झाले. मनापासुन गोळा करत असतो, तर खूप वाईट वाटलं असतं.
व पु म्हणतात तसं,
"खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..."
म्हणुनच मी कदाचीत हिशोब ठेवणं सोडुन दिलं आहे. :)