आठवणींचा तरंग
मार्च महिन्यातला पाऊस तो. जुलै-ऑगस्टचा जोर कुठे त्याला.
नुसती भुर-भुरच म्हणायची खरं म्हणजे! पण छान गोष्ट म्हणजे आपल्यासोबत तो पाऊस एक दिलखुश गारवा घेऊन आलेला. बेधुंद गार वाऱ्यानी उन्हाचे चटके कुठल्या कुठे पळवले. कुठलीच पूर्व सुचना न देता त्याच्या येण्यानी, ऑफिसच्या समोरच्या तळ्यातल्या पाण्यालासुद्धा अगदी हायसं वाटलं असेल.
पावसाचे छोटे-छोटे थेंब त्या तळ्यातल्या पाण्यावर पडत होते. पडता क्षणीच पाण्यावर असंख्य तरंग उठत होते. थेंब ज्या ठिकाणी पडतो तिथे तरंग सुरु होतो खरा; आणि हळु-हळु जरी त्याची तिव्रता कमी होते, तरी परीघ वाढतच जातो.
मनातल्या आठवणींचं पण असंच असतं का? हळुवार पावसाच्या त्या थेंबांनी राजीवच्या मनातदेखिल शीतलच्या पहिल्या काही भेटींच्या आठवणींचे तरंग उठले.
***********************************
गेल्या मार्च मधलाच दिवस होता तो. त्या दिवशी देखिल पावसाची अशीच हलकीशीच सर होती. पावसाची काहीच चिन्हं नव्हती. उलट छान कोवळं ऊन पडलं होतं, त्यामुळे बरोबर जाकीट किंवा छत्री काही घेतली नव्हती. आणि अचानक पावसाची हलकीशी एक सर आली. गाडीतुन बाहेर पडताच, पार्किंग लॉट मधुन मॉलच्या दिशेनी दोघं पळु लागले.
पळता, पळता राजीव मधेच थांबला. शीतलनी तिचे लांब केस मोकळे सोडलेले. पळताना तिचे केस वाऱ्यावर झुलत होते. पावसाचे काही थेंब त्या केसांवर अलगदपणे विसावले. हलकंसं ऊन पडताच ते इवले-इवलेसे थेंब टपोऱ्या मोत्यांप्रमाणे चमकु लागले.
"अरे! थांबलास काय? भिजतोयस कशाला?... काय पाहतोयस?... मी ठीक दिसतीये ना? का अवतार झाला आहे?.. तरी मी विचार करतच होते, केस मोकळे नको, बांधायलाच पाहिजे होते..."
- "अगं नाही! हे असेच मोकळेच छान दिसत आहेत.... मी असंच थांबलो मधेच.. विशेष काही नाही.. चल, जाऊ मॉल मधे.."
मॉलच्या कॉफी-शॉपमधे मग चक्क ३ तास बसुन मस्त गप्पा मारलेल्या. वेळ कसा गेला कळलंच नाही. दोघांची ओळख तशी नविनच होती. एका कॉमन मित्रानी ओळख करुन दिलेली. तिच्या शहरात तो एक meeting attend करायला आला होता. नविन शहरात सुट्टीच्या दिवशी कंपनी पाहिजे, म्हणुन त्यानी तिला फोन केलेला, आणि तिनी सुचवलेलं की चल, कॉफी प्यायला जाऊ.
राजीवच्या कामाच्या स्वरुपामुळे तो सारखाच touring करायचा. महिन्या-दोन महिन्यातुन शीतल रहायची तिथे त्याची चक्कर व्हायची. तिथे गेलं की तिची भेट व्हायची. कधी एखादा सिनेमा, कधी एखादं नाटक, कधी आवडत्या एखाद्या पुस्तकावर चर्चा - दोघांत एक सुंदरशी नवी मैत्री फुलु लागली.
लंच घेउन रेस्तरॉ मधुन बाहेर पडताना,
"अरे रे! किती जोरात आहे रे हा पाऊस, राजीव! मघाशी आपण आत आलो, तेव्हा ह्याचा पत्ताच नव्ह्ता रे कुठे? एकदम अचानक कसा पडला - छ्य्या! काही लाजच नाही ह्याला!"
गळ्यात बांधलेला स्वेटर adjust करत राजीवनी तळहातावर पावसाचे काही थेंब वेचले, आणि शीतलच्या चेहऱ्यावर मारत म्हट्ला,
"म्हणजे काय? जुलै चालु आहे ना? आत्ता नाही पडणार तर केव्हा पडणार?"
आणि तो समोरच्या तळ्याच्या दिशेनी पळु लागला. अचानक चेहऱ्यावर पडलेल्या तुशारांनी शीतल जरा दचकलीच. मग लक्षात येताच, भर पावसात ती त्याच्या मागे धावु लागली. दोघं पावसात मनसोक्त भिजत होते. कसलीच पर्वा नव्हती जणु. काही केल्या शीतल राजीवला पकडु शकत नव्हती. शेवटी तिथल्या एका बाकापाशी ती थांबली. दम खात तिथेच बसली. तिच्या जवळ बसुन, राजीव म्हट्ला,
"मग आता तरी गेला का पावसा वरचा राग तुझा?"
- नाक मुरडत, "हो! त्याच्या पेक्षा जास्ती दुष्ट माणुस भेटला आहे मला."
"कोण गं? कुठे आहे? सांग मला, लवकर सांग. आपण त्याचं घर ना उन्हात.. नाही उन्हात नको, पावसात बांधुया!"
- "नकोच मुळी. त्याचं घरंच नको बांधायाला. ऊन काय, पाऊस काय - त्याला बाहेरच राहु दे."
असं म्हणत तिनी त्याला ढकललं, आणि बाकावरुन तो एकदम जमीनीवर खाली पडला.
"आता कसं वाटतय? गार-गार वाटतय ना? मघाशी माझ्यावर पावसाचे थेंब का बरं मारले?"
- "बरं, बरं. गलती से mistake हो गयी. पण, खरं-खरं सांग.. मी तुला पाणी मारलं हे तुला आवडलं नाही का?"
"ह्म्म्म... that depends... मी तुला ढकललं, आणि तु पडलास - हे तुला आवडलं असेल, तर मला पण ते आवडलं."
- "नुसतं आवडलं? आवडलं is an understatement, i simply loved it. especially considering the fact that i got a chance to sprinkle some raindrops on your lovely face, and then you chase me all around this pond, and finally, we sit together on this bench in this rain. then you push me to the ground, and ask me if i like it? it is this very earnest look in your eyes after you ask me this question, and you watch me with bated breath while these sweet little raindrops trickle down your face - all this mesmerises me. you ask me if i like this? i have to say - i simply LOVE it."
"ईश्श्श!"
- "ईश्श्श काय अगं? लाजतेस काय? हं... तुला हे सगळं आवडलं की नाही, माहित नाही बुवा.."
"मला आवडलं ना!" म्हणताच शीतलनी स्वत:ची जीभ चावली.
आणि मग राजीव मनमुराद हसु लागला. त्याला हसताना पाहुन तिच्या गालावरची खळी देखिल खुलली. तिनी हळुच त्याच्या खांद्यावर तिचं डोकं ठेवलं. आणि मग दोघं मनापासुन हसत बाकावर बसले. गप्पा मारत. एकमेकांची चेष्टा करत. दोघांनाही वेळेचा आणि पावसाचा विसर पडलेला.
बोलता-बोलता, पावसाचा जोर थोडा कमी झालेला. समोरच्या तळ्यात त्या दिवशी पण पावसाच्या थेंबांनी असेच तरंग उठलेले.
***********************************
"काय पाहतोयस रे राजीव?" म्हणत मकरंदनी राजीवच्या पाठीवर जोरदार थाप मारली. थाप मारताच राजीव दचकुन खुर्चीवरुन खाली पडला; एकदम बाकावरुन शीतलनी पुन्हा ढकललं असंच वाटलं त्याला.
- "काय गं शीतल? परत कशाला ढकललस मला?" असं पुटपुटत तो जमिनीवरुन उठला.
"काय रे राजीव? एवढा काय दचकलास? आणि मी शीतल नाही. मी मकरंद आहे!"
-"उम्म्म.. मी... सॉरी, सॉरी! काही नाही... असंच, पावसाची गंमत पहात होतो रे..बोल मकरंद, काय काम आहे?"
"नक्की का?? शीतलला सांगायला पाहिजे! लग्नाला जेमतेम ३ महिने पण झाले नाहीयेत, आणि तु आत्तापासुनच घसरतो आहेस! दचकतो आहेस! बघु तरी खिडकीतुन काय पहात होतास?.... अरे वाह! ते समोरचं तळं किती छान दिसतंय ना पावसात... anyways, मला तो रिपोर्ट पाठवतोयस ना? अर्धा तास झाला मी वाट पहात आहे. मार्च-end जवळ आला आहे रे. लवकर पाठव तो रिपोर्ट मला."
- "yes boss, पाठवतो. एक १० मिनिटात पाठवतो."
राजीवनी पुन्हा एकदा बाहेर पडणाऱ्या पावसा आणि तळ्याकडे पाहिले. किती खरं आहे नाही? काळाच्या ओघात त्या तरंगाचा सुखाचा परीघ वाढतो, तिव्रता कमी होते, आणि कालांतरानी तो नाहीसा देखिल होतो... मागे उरतात त्या फक्त आठवणी... काही सुखाच्या, काही हसण्याच्या, काही रुसण्याच्या, काही प्रेमाच्या...
पाऊस असाच पुन्हा पडत राहतो, तरंग असेच उठत राहतात...
"Memory is a wonderful thing if you dont have to deal with the past."
~Celine (Julie Delpy), "Before Sunset"
Posted by
Monsieur K
on Tuesday, March 06, 2007
/
Comments: (14)
चॉकलेटवाली नानी
आज सकाळी ऑफिसच्या पार्किंग लॉट मधुन येताना "नानी" दिसली. तिच्या लाल मुस्टांग मधुन ती बाहेर पडली. आरथ्रायटीस मुळे सावकाश तिची पावले ऑफिसच्या दिशेनी पडत होती. लाल स्वेटर घातलेला, हातात एक लाल पर्स. पुर्वी एकदा तिची लाल लॅपटॉप बॅग बघुन मी तिला म्हट्लेलं,
"अहो, लाल तुमचा आवडता रंग का?"
तेव्हा "तुला कसं माहित?"चा केवढा मोठ्ठा सुखद धक्का बसलेला "नानी"ला!
नानीचं नाव मारिलिन कॅपियेलो. ६ महिने आधी, ऑफिसमध्ये आम्ही शेजारी-शेजारी बसायचो. रोज सकाळी ८.३० ला नानी न चुकता येणार; दुपारी १२-१ लंच टाईम मधे खालच्या कॅफे मधुन सलाड घेउन येणार, आणि त्याबरोबर कुठलं तरी पुस्तक वाचणार; डेस्कवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी मृदु बोलणार; अगत्यानी चौकशी करणार; दुपारी कधीतरी कुठल्यातरी मैत्रिणीला फोन करणार आणि थोडा वेळ गप्पा मारणार; ५.३० झाले की घरी जायची तयारी तिची!
ऑफिसमधे बसायची ती सर्वात मस्त जागा होती आमची - टॉप फ्लोरवरची कोपऱ्यातली जागा - आम्हा दोघांचे डेस्क window facing - खाली छोटंसं तळं, दूर पाहिलं तर एका बाजुला टॅम्पाचं रेमंड जेम्स अमेरिकन फुटबॉल स्टेडियम, त्याच्या पाठीमागे टॅम्पा विमानतळावरुन येणारी/जाणारी विमानं.
सकाळी आलं की खिडकीतुन बाहेर पाहुन मी आणि नानी हमखास weather वर गप्पा मारायचो.
"आज काय मस्त sunny आहे."
"आज पाउस पडणार."
"आज थोडं dull आहे - पाउस नाही, पण sunnyदेखिल नाही."
"आज खूप छान आहे - nice, clear, blue skies - इथे ऑफिस मधे बसण्यापेक्षा कुठेतरी पिकनिकला जायल हवं."
अशा आमच्या गप्पा.
पाउस सुरु झाला की कॉफीचा मग घेउन मी त्या काचेपाशी उभा रहायचो. काचेवर पडणाऱ्या पावसाच्या धारांकडे पहात रहायचो. गरम कॉफीच्या वाफेतुन मधेच मागे वळुन नानीला म्हणायचो,
"किती छान आहे ना?"
ती पण हसुन मानेनी होकार द्यायची.
Mothers Dayला "नानी" खूप खुश होती.
"माझ्या मुलानी न्युजर्सीहून मला गिफ्ट पाठवली आहे.
पण मी ती गिफ्ट आज नाही उघडणार.
संडेला उघडणार आहे.
He loves me so much."
हे मला सकाळी-सकाळी सांगीतलं.
आणि मग दुपारी डेस्क वरुन आपल्या २-३ मैत्रिणींना सांगीतलं, तेव्हा प्रत्येक वेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.
नानीच्या डेस्कवर एका काचेच्या बोल मधे ती चॉकलेट्स ठेवते.
जो भेटायला येईल, तो हवं तर एक-एक उचलतो.
मी तर बाजुलाच बसायचो.
आणि माझी नजर नेहमीच असायची त्यावर.
न चुकता, रोज तिला विचारुन २-३ चॉकलेट्स मागुन घ्यायचो.
हे तर विचारुन.
आणि न विचारता अजुन कितीतरी ढापायचो.
कधी-कधी तिनी मला ढापताना पाहिलं सुद्धा होतं.
पण प्रत्येक वेळेस आमची नजरा-नजर झाली, की नानी तिचे डोळे मिचकवत,
"घे रे! तुला आवडतात ना! मग लाजतोस कसला."
हे न बोलताच सांगायची.
आज ती समोर आली तेव्हा हे सगळं आठवलं.
किती दिवस झाले आहेत, नानीशी weatherबद्दल गप्पा मारुन, तिच्या डेस्कवरुन चॉकलेट्स घेउन.
गेल्या पावसाळ्यात जुलै मधे शेवटचं भेटलेलो तिला. त्यानंतर मी आता दुसऱ्या बिल्डिंग मधे बसु लागलो आहे. पुर्वीच्या जागी जायची कधी संधीच मिळाली नाही.
मध्यंतरात autumn has gone by, winter is also behind us.
spring has now come back at our doorstep.
पण नानी बदलली नाहीये. अजुनही लाल रंग तिला तितकाच आवडतो.
आजही तिनी पाहिल्यावर डोळे मिचकवलेच.
आणि न बोलता हसत-हसत सांगुन गेलीच,
"काय रे? कुठे गायब आहेस इतके दिवस?
चॉकलेट्स आवडत नाहीत का तुला आता?
मला भेटायला आलाच नाहीस."