"सिनेमा पारादिसो"

आज रविवारी दुपारी एक ईटालियन चित्रपट पाहिला.
सिनेमा पारादिसो.

कुठेतरी ह्या सिनेमा बद्दल वाचलं होतं, तेव्हा पासुन बघायची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली.

कहाणी आहे ईटली मधल्या एका नामांकित सिनेमा दिग्दर्शकाची, नाव 'साल्वटोर डि विटा'.
त्याचा खूप जुना मित्र 'अलफ्रेडो', ह्याचं निधन झाल्याचं कळल्यावर तो अलफ्रेडोच्या अंतयात्रेत सहभागी व्हायला तब्बल तीस-एक वर्षांनी स्वत:च्या गावी परत येतो.

चित्रपट बहुतांश flashback mode मध्येच आहे.
अलफ्रेडो त्या गावातल्या 'सिनेमा पारादिसो' नामक सिनेमा-हॉल मध्ये film projectionist असतो. अगदी बालवयापासुन साल्वटोर, म्हणजे 'टोटो'ला सिनेमाचे वेड असते. तास न तास, दिवस-रात्र, वर्षानुवर्ष तो अलफ्रेडो बरोबर त्या सिनेमा पारादिसोच्या projection रूम मध्ये बसुन त्याच्याकडुन सिनेमा आणि त्याच्या बरोबरीने आयुष्याचे धडे शिकतो.

त्या projection रूम मध्ये एकदा आग लागते आणि अलफ्रेडो आंधळा होतो. त्यानंतर, त्या गावातल्या नव्या सिनेमा हॉल मध्ये film projectionist चे काम अलफ्रेडोच्या हाताखाली तयार झालेल्या लहानश्या टोटोवर येतं.

वर्ष सरतात आणि युवा टोटो गावात नविन आलेल्या एलेना नावाच्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो.
प्रेमात पडलेल्या टोटोला अलफ्रेडो कडुन एक आगळा-वेगळा सल्ला मिळतो, ते सुद्धा एका परीकथेच्या रुपात,

"फार फार वर्षांपूर्वी, एका राज्यात एक विलक्षण सुंदर राजकुमारी होती.
त्या राजकुमारीवर त्या राज्याच्या सेनेतला एक मामुली शिपाई मनापासुन प्रेम करतो.
एक दिवस, तो शिपाई त्या राजकन्येजवळ आपल्या मनातलं प्रेम व्यक्‍त करतो.

त्याच्या प्रेमाची परीक्षा घेण्याकरता ती राजकुमारी त्याला म्हणते,
'तु जर १०० दिवस माझ्या महालासमोर माझी वाट पाहिलीस,
तर मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेल, आणि जन्मा-जन्मा करता मी तुझीच होईल.'

तिचे हे शब्द ऐकुन, तो शिपाई खुश होतो.
त्याला स्वत:च्या प्रेमावर जबरदस्त विश्वास असतो.

मग दिवस-रात्र तो शिपाई त्या राजकुमारीच्या महालासमोर उभा राहातो - उन, पाऊस, थंडी, वारा - कशाची, कशाचीही तो तमा बाळगत नाही.
दिवस सरतात...९० दिवस होऊन जातात, आणि त्याचं सगळं शरीर पांढरं-फटक पडलेलं असतं, झोपायचा त्राण देखिल राहिला नसतो त्याच्यात...

९९व्या दिवशी ती राजकुमारी त्याच्याकडे पाहुन आश्चर्यचकीत असते - आता फक्‍त एकच रात्र राहिली असते - पुढच्या दिवशी ती त्याची होणार असते.

आणि १००व्या दिवशी तो शिपाई तिथे नसतो!! तो तिथुन निघुन गेलेला असतो!!"

तो शिपाई का जातो, हे अलफ्रेडो टोटोला सांगत नाही.
ते उत्तर तो त्याचं त्यालाच शोधायला सांगतो.

मग एलेनाला मनवण्या करता टोटो कित्येक रात्र तिच्या खिडकी खाली तिच्या एका इशाऱ्याची वाट पाहतो, आणि एक दिवस ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते.
त्यांच्या प्रेमकथेमध्ये मग नेहमीचाच जुना-पुराणा अडथळा येतो - तो निव्वळ गरीब, ती गर्भश्रीमंत!

प्रेम सफल न झाल्याने टोटो पुन्हा अलफ्रेडोकडे येतो आणि म्हणतो,
"मला आज कळलं की तो शिपाई का निघुन जातो. १००व्या दिवशी जर ती राजकुमारी हो म्हणाली असती, तर त्याला जणु स्वर्गच लाभलं असतं.
पण जर तिनी तिचा शब्द मोडला असता, तर मग त्या शिपायाकडे काहीच राहिलं नसतं.
तो निघुन गेला, म्हणुन निदान तिच्याबद्दलचं प्रेम तरी त्याच्याजवळ राहिलं."

मग अलफ्रेडो त्याला सल्ला देतो,
"टोटो, तु इथुन निघुन जा. ह्या गावात तु राहिलास, तर तुझी प्रगती कधीच होणार नाही.
तुझ्यात जे गुण आहेत, त्याची खरी पारख बाहेरच्या जगात होईल.
प्रेम, घर, परिवार, मित्र - ह्या सर्व बांधिलकींना विसरुन तु तुझ्या मार्गावर जा.
तुझी योग्यता आणि तुझी क्षमता ह्यांना तुझ्या अपार कष्टांच्या जोडीनी तु यश संपादन कर.
तु कधी इथे परत येऊ नकोस, अन आम्हाला एखादं पत्र पण लिहु नकोस.
उलट मला जगाकडुन, दुसऱ्यांकडुन तुझ्याबद्दल, तुझ्या यशाबद्दल कळु दे, असं काहीतरी कर!"

समुद्रतटावर तो हे सांगत असताना, background मध्ये जमीनीवर पडलेले लंगर (anchors) दिसतात.
एक-एक लंगर जणु जीवनातली एक-एक बांधिलकी.
ह्या सर्वांना झुगारुन, टोटो आपलं गाव, आपलं प्रेम, आपली माणसं सोडुन जातो.
आणि आपलं ध्येय गाठतो. नामांकित दिग्दर्शक बनतो.
अद्वितिय असं यश संपादन करतो.

३० वर्षांनंतर परत आपल्या गावी येतो तेव्हा पुन्हा एलेनाशी भेट होते.
तिच्याकडुन कळतं की ती सगळं सोडुन त्याच्याकडे येणार होती.
पण अलफ्रेडो तिला समजावतो की असं केल्यानी तिचं आणि टोटोचं नुकसान होईल.

हे ऐकुन टोटोला धक्का बसतो.
अलफ्रेडोनी असं का केलं?
यश आणि कीर्ती तर आपल्याला भरपुर मिळाली, पण खऱ्या प्रेमापासुन आपण वंचित राहिलो.
ते सुद्धा आयुष्यभर.

अलफ्रेडोच्या बायकोकडुन टोटोला अलफ्रेडोनी त्याच्याकरता ठेवलेली एक भेट मिळते. जुन्या चित्रपटांतील गावाच्या पाद्रीने सेन्सर म्हणुन कापलेले जे-जे kissing scenes होते, त्या kissing scenes च्या तुकड़्यांची एक रीळ असते. लहानपणी ते तुकडे टोटोनी मागीतले होते, तेव्हा अलफ्रेडोनी दिले नव्हते.

आणि आता तो यशस्वी झाल्यावर, इतक्या वर्षांनंतर त्याला जे पाहिजे होतं, ते मिळालं होतं.
जणु अलफ्रेडो त्याचं प्रेम, त्याला हवं-हवंसं वाटणारं जगच टोटोला परत देत होता.
नकळत टोटोच्या डोळ्यांत अश्रु जमा होतात.

**************************************************

ह्या सिनेमाबद्दल विचार करत असतानाच मागच्या आठवड़्यात पाहिलेला 'गुड विल हंटींग' आठवला.

त्यात मॅट डेमन एक २०-२१ वर्षांचा eccentric जिनियस दाखवला आहे.
जगातलं कुठलंही गणित तो चुटकीसरशा सोडवु शकतो.
आणि मग तो प्रेमात पडतो. फक्‍त ते प्रेम, किंवा ती बांधिलकी त्याला नकोशी असते.

सिनेमा पारादिसो आणि ह्या सिनेमात फरक हा आहे की ह्यात मॅट डेमनचा mentor रॉबिन विल्यम्स त्याला प्रोत्साहन देतो की 'follow your heart'.
आणि मग मॅट डेमन आपलं प्रेम मिळवण्याकरता बाकी सगळं सोडुन देतो.

**************************************************

दोन दृष्टीकोण. दोन पर्याय.
प्रेम, करियर.
बांधिलकी, अबद्धता.
साध्यता, विवंचता.
दोन्ही कधी सुसंगतरित्या एकत्र होऊ शकत नाहीत का?
सुवर्ण-मध्य कधी येऊ शकत नाही का?

प्रेम, करियर.
प्रश्न? उत्तर.
का उत्तर, प्रश्न?
डोक्याला हात!

प्रत्येक सोमवारी सकाळी-सकाळी ऑफिसला जायच्या आधी महेशचा ठरलेला कार्यक्रम - इस्त्री!
वीकेंडला कितीही वेळ मिळाला, तरी इस्त्री सारख्या गचाळ (CAPITAL गचाळ) कामात वीकेंड waste करायचा नाही, अशी त्याची फिलॉसॉफी होती. मग ओढुन-ताणुन, सोमवारी सकाळी इस्त्री करावीच लागायची त्याला - हा काही आपला देश नाही की घरी धोबी येऊन कपडे घेऊन जातो, किंवा निवांत laundry मधे जाऊन कपडे देऊन यायचे, आणि पैसे भरले की १-२ दिवसात इस्त्री-बंद कपडे मिळाले!

असो! 'आलीया भोगासी असावे सादर' म्हणत महेश सोमवारी सकाळी हातात इस्त्री घेऊन उभा होता. इस्त्रीची wire त्या socket मधे घालुन, शर्टला इस्त्री सुरु केली. motivation करता, नविन डॉनचे 'आज की रात' गाणं लावलेलं.

क्यों धडकता हैं दिल,
क्यों यह केहता हैं दिल,
दिवानों को अब तक नहीं हैं यह पता

आज की रात, होना हैं क्या
पाना हैं क्या, खोना हैं क्या...

होना क्या था? त्या गाण्याच्या धमाल beats वर त्याचा हात शर्टावर मागे-पुढे फिरु लागला. गाणं slowly by slowly build up होत होतं, and as it hit the crescendo, त्याची इस्त्री पण एकदम मस्त चालु होती. नाचत-नाचत, हिसके देत शर्टची बाही आणि कॉलर संपवुन टाकलेली!

आता राहिलेली फक्‍त शर्टाची समोरची बाजु! हसत-हसत त्याच्यावर पण इस्त्री बडवायला सुरुवात केली, और उसके थिरकते हुए कदम रुकने का नाम ही नहीं ले रहे थे. थोड्या अवकाशानी गाणं संपलं, तसं शर्टाची इस्त्री पण संपली. पण पाहतो तर काय, शर्टाची समोरची बाजु तशीच बिना इस्त्रीची!!!! :-(((

knock!knock!!
कौन?
- Don!

हे SRK म्हणत असतानाच, एकदा नजर इस्त्रीच्या wire वर गेली, आणि प्रियंका, इशा आणि SRK बरोबर नाचताना, ती wire त्या socket मधुन कधी बाहेर पडली, त्याला कळलंच नव्हतं.
आणि महेशनी डोक्याला हात लावला!

********************************************
ऑफिसला जायला महेश घराबाहेर पडला, तर पावसाची एक हलकीशी सर चालु होती. पावसानी भिजलेल्या मातीचा गंध त्याच्या मनातल्या मनात आपसुक दरवळू लागला. त्यानी गाडी सुरु केली; समोरच्या काचेवर wipers हलकेच फिरु लागले, ऑफिसचा रस्ता गाडीनी पकडला आणि CD player वर गाणं सुरु झालं,

कुछ तो हुआ हैं, कुछ हो गया हैं
दो-चार दिनसे लगता हैं ऐसे,
सब कुछ अलग हैं, सब कुछ नया हैं
कुछ तो हुआ हैं, कुछ हो गया हैं...

सिग्नल करता थांबलेला असताना महेशनी खिडकीची काच थोडी खाली केली, आणि पावसाचे काही थेंब अंगावर घेतले. गार वाऱ्याची एक झुळुक आपल्या बरोबर एका प्रिय व्यक्‍तीची आठवण घेऊन आली, आणि महेश गालातल्या गालात हसला.

ती आता काय करत असेल; मी आठवण काढली, तर तिला उचकी लागली असेल का? छ्य्या! मला तर कित्येक दिवसात उचकीचा 'उ' सुद्धा नाही आला, म्हणजे मग तिला माझी आठवण अजिबातच होत नसेल का?

अचानक मागच्या गाडीचा हॉर्न वाजला, तेव्हा लक्षात आलं की सिग्नल 'ग्रीन' झाला आहे;
आणि महेशनी पुन्हा डोक्याला हात लावला!

********************************************

रोज दुपारी ३ वाजता न चुकता महेश ऑफिसच्या कॅफेटेरियातुन एक फ्रेंच वनिला कॉफी घेऊन यायचा. एका हातात कॉफी घेऊन, ऑफिस मधे परत येताना त्यानी access card दाखवुन लाकडी दरवाजा दुसऱ्या हातानी उघडला, तर नेमकी तेव्हाच त्याच्या floor वर बसणारी त्याला (खरं म्हणजे ऑफिस मधे सगळ्यांनाच) आवडणारी अतिशय सुंदर मुलगी त्याच वेळेस घाईत बाहेर पडत होती. मागच्या वेळेस त्याच ठिकाणी झालेली त्या दोघांची भेट पुन्हा त्याला आठवली!

मागच्या वेळेस, तीनी दार उघडलेलं, आणि she had almost walked into him! १ सेकंद सुद्धा इकडे-तिकडे झाला असता, तर ती आदळलीच असती त्याला. महेशच्या हातातली कॉफी तर तेव्हा almost पडलीच होती! त्या वेळेस ती पण खूप दचकलेली आणि महेशला म्हट्लेली,

"Ohhh!! I am so sorry!! I almost killed you!! Are you OK? I apologise. I didnt see you coming."

त्या वेळेस तिच्या नजरेनी आणि आवाजानीच घायाळ झालेल्या महेशला काय बोलायचं काहीच कळलं नव्हतं.

ह्या वेळेस मात्र तीनी त्याच्याकडे चक्क मिनिटभर पाहिलं, उनकी पिछली मुलाकात की याद में त्याला एक मस्त पैकी मोठा smile दिला आणि "excuse me" म्हणत बाजुनी निघुन गेली.

यह मुलाकात एक बहाना हैं,
प्यार का सिलसिला पुराना हैं...

तिचा तो angel face, आणि त्याच्यावर पडलेली ती सुंदर खळी ह्याच्यानीच आपण किती मोहुन गेलो; भान हरपुन जसेच्या तसेच, असे उभे राहिलो की तिला काही बोललोच नाही!

आणि महेशनी पुन्हा डोक्याला हात लावला!
********************************************
~ वरिल नमुद केलेल्या काही काल्पनिक आणि काही घडलेल्या गोष्टींवर प्रतिक्रिया वाचताना, मी नक्कीच डोक्याला हात लावेल, असं अत्ता का बरं वाटत आहे?
त्यागराज आराधना

ईनवरनेसचे (Inverness) शिर्डी-साईबाबा मंदिर - टॅम्पाहून उत्तरेच्या दिशेला ७०-७५ मैल अंतरावर स्थित आहे. तिथे जातानाची सव्वा-दीड तासाची drive खूपच refresing आहे. I-७५ ला exit २८५ घेतला की त्यापुढे साधारण पन्नास-एक मैलांची एक मस्त चक्कर! ह्या रस्त्यात बरंच काही छान-छान पाहायला मिळतं - रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठीच्या मोठी झाडं - त्यातली काही वडाची नाही, पण वडासारखीच वाटतात - त्यांच्या फांद्यांवरुन पारंब्यांसारख्या भल्या-मोठ्या दाढी-मिशा लोंबकाळत असतात; खुल्या मैदानातल्या गवतावर आरामात चरणारी गुऱ्हं, ranchवर फिरणारे घोडे, काही प्रशस्त american ranch houses - त्यांचे मोठाले दरवाजे; त्या भल्या-मोठ्या iron gateच्या बाजुच्या भिंतीवर अतिशय कोरीव अक्षरात लिहिलेलं त्या estateचं नाव आणि त्यावरचे सुंदर lamps; आणि गेटपासुन mansion पर्यंत जाणारा ३००-४०० फूट रस्ता, ज्याच्या दोन्ही बाजुला palm trees - अगदी टिपिकल american countryside! काही ठिकाणी छोटेसे एखादे तळे दिसतं, आणि त्याच्या अवती-भवती उभी असतात काही RV (recreational vehicles) - इथल्या लोकांचा हा camping करता favorite spot असतो! मधेच एखादा american eagle आकाशात आरामात, स्वछंदपणे आपले पंख न हलवता circle करताना दिसतो; कधी गाडीची काच खाली केली, तर चेहऱ्यावर येणारा बेधुंद गार वारा; मधेच आपला रस्ता theme parkच्या एखाद्या topsy-turvy ride प्रमाणे झटदिशी खाली जातो, आणि वर येता-येता पोटात छोटासा गोळा येतो (अशा वेळेस गाडीचा वेग जितका जास्ती, तितकी मजा जास्ती येते).

ईनवरनेस हे तसं लहानसं town आहे. शिर्डी-साई मंदिर जिथे आहे, त्याच्या आजुबाजुला काही विशेष वस्ती नाहीये - एखाद-दोन ranches आहेत, नाहीतर mostly खुलं मैदान. मंदिरात रोज दुपारी १२ वाजता आरती असते - वीकेंडला एखाद्या मोठ्या सणाचा अपवाद सोडला, तर १२च्या आरती करता २०-२५ पेक्षा जास्ती लोकं नसतात. आम्ही रविवारी १०-१०.१५च्या सुमारास निघालो, आणि ११.३०-११.४५ला आरती करता अगदी वेळेत पोचलो. खरं म्हणजे तिथे कधी पार्किंगचा प्रॉब्लेम नसतो, पण ह्या वेळेस बऱ्याच गाड़्या होत्या.

म्हणुन गाडीतुन उतरताना, मी सहजच अंशुमनला म्हट्लं,
"३ options हैं,
१ - आज Super Bowl हैं, इसलिये अमरिका के रोड पर traffic कम होगा, इसलिये आज जनताSSS मंदिर आयी हैं.
२ - फ्लोरिडा में जितने देसी हैं - सब के पापो का घडा अचानक भर गया हैं, इसलिये सब भगवान के पास माफी मांगने आये हैं.
३ - शायद आज कोई त्यौहार या फिर कोई धार्मिक दिन हैं (आईनी आठवणीने २००७ सालाचे कालनिर्णय दिलं आहे, ते मी कधी पाहणार आहे, कुणास ठाऊक!), इसलिये आज मंदिर में इतनी गर्दी.. अं... भीड.. हैं.."

गाडीचा दरवाजा बंद करत अंशुमन म्हट्ला,
"केकु!! सुधर जा!! obviously, it is option 3 - आज कुछ तो हैं, जो हमको नहीं मालुम!"

मंदिरात प्रवेश केला तर आतमध्ये कमीतकमी ५०-६० लोकं तरी होते! हॉलच्या एका बाजुला साई-बाबांची मुर्ती - अगदी शिर्डीला आहे तशीच! त्यांच्या दोन्ही बाजुला, आपल्या हिंदु धर्माचे देव - गणपती, शंकर, विष्णु, सरस्वती, दत्त, राम - प्रत्येकाची मुर्ती आहे. मंदिरातले २-३ पुजारी नियमितपणे सर्व देवांची पूजा-अर्चा करतात; देवांना फुलांचे हार अर्पण केलेले; उदबत्तीचा सुवास दरवळत होता; समोर भाविकांनी आणलेले वेग-वेगळे फळं, प्रसाद ठेवलेले; काचेचं मोठंसं झुंबर आणि घंटा अगदी समोरच आहे; समईंच्या प्रकाशात देवांच्या प्रसन्न मुद्रेवर स्मित-हास्य झळकत होतं. वातावरण कसं नेहमी सारखं एकदम प्रसन्न होतं!

हॉल मधे सर्व भक्‍तांना बसायला भारतीय बैठकीची सोय आहे - काही ज्येष्ठ नागरिकांसाठी भिंतीला लागुन खुर्च्या आहेत, पण बाकीचे सर्व लोकं खाली घातलेल्या गालिच्यांवर बसतात. हॉलच्या दुसऱ्या बाजुला एका लाकडी प्लॅटफॉर्मवर बैठक तयार केली होती - बसायला गादी आणि त्यावर पांढरी स्वच्छ चादर; त्याच्या समोर ३-४ mikes आणि बाजुला sound system आणि speakers. बाजुला पेटी, तबला, मृदंगम, वीणा, व्हायलिन असं सर्व काही ठेवलेलं. मंदिरात नेहमी येणाऱ्या एका doctor uncle ना विचारलं, तर त्यांनी सांगितलं,
"कर्नाटकी संगीताचे थोर संत त्यागराजांच्या स्मृतीमधे आज इथे 'त्यागराज आराधना', हा संगीत महोत्सव आयोजित केला आहे."

आज हा कार्यक्रम आहे, ह्याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. विकिपिडियावर नंतर शोधलं, तेव्हा कळलं की संत त्यागराज राम-भक़्त होते आणि कर्नाटकी संगीताला त्यांचे खूप मोठे योगदान आहे.

माझ्या बरोबर राहणारा अंशुमन साई-बाबांना जबरदस्त मानतो - त्यामुळे त्याच्याबरोबर ह्या मंदिरात मी गेल्या वर्ष-दीड वर्षात आता पर्यंत १०-१२ वेळा आलो असेल; आणि प्रत्येक वेळेस मला जाणवलं की तिथे येणाऱ्या सर्व भारतीयांपैकी 'north indian' category मधे मोडणारा मी एकमेवच असेल - actually नाही, माझ्या जोडीला आहे अंशुमन जो ओरिसाचा आहे, आणि ह्या वेळेस प्रवीणदेखिल जो कलकत्त्याचा आहे! पण बहुतांशी तर सर्व गुल्ट (तेलगु) असतात! ह्याच कारणामुळे आरती संपल्यावर जो प्रसाद असतो (भक़्त लोकं आपापल्या घरुन तयार करुन आणतात), त्यात generally आंध्र cuisine मधले curd rice, पुलिओग्रे, lemon rice, २-३ प्रकारची लोणची आणि त्याच्या जोडीला केळ/सफरचंद असतं!

एखाद्या ढं माणसाला जर स्टॉक मार्केट मधे किंवा एका मोठ्या रीसर्च लॅब मधे उभं केलं, तर तो आधी थोडासा कावरा-बावरा होतो, मग ढिम्मपणे जे काही समोर होत असेल, त्याकडे निर्विकारपणे पाहत राहतो. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामधे माझी अवस्था अशीच काहीशी होते. त्यातलं कळत तर काहीच नाही, गपचुप बाकीचे लोकं जाणकार असल्यामुळे जशा माना डोलवतात आणि जेव्हा टाळ्या वाजवतात, तसंच मी पण मानेची कसरत करतो आणि माझे हात बडवतो! आरतीच्या अगोदर १०-१५ मिनिटं होती तेवढ्यात २-३ काकुंनी कर्नाटकी राग-धारीतली काही भजनं म्हट्ली (आता ते कर्नाटकी होती की आणखिन काही, हे माझ्या भाषेच्या अभावामुळे आणि संगीताच्या अज्ञानामुळे सोडुन देऊ), पण त्या भजनांमधे एक वेगळीच गोडी होती. कितीही अजाण असलो, तरी ते भजन खूपच भावुन गेलं.

आरतीच्या वेळेस अंशुमननी मला नेहमी प्रमाणे त्याच्याकडचे आरती-पुस्तक दिले - साई-बाबांची आरती मराठीत आहे, पण मंदिरात तुम्हाला आरतीचे पुस्तक तमीळ, तेलगु, कन्नड, गुजराती, हिंदी, मराठी, इंग्रजी - ह्या सर्व भाषेत मिळेल. आरती जवळ-जवळ अर्धा तास चालते, ती संपल्यावर बाबांचं दर्शन घ्यायचं आणि बाहेरच्या पटांगणात प्रसाद घ्यायचा! ह्या वेळेस फारच छान होता प्रसाद - curd rice, lemon rice, पुलिओग्रेच्या बरोबर छोले-पुरी, शेवयाची खीर, शिरा आणि वेगवेगळी फळं होती! इतका भारी प्रसाद मिळाला, त्यामुळे आम्ही तिघं bachelor लोकं तर सॉलिड खुश!

सगळ्यांचा प्रसाद घेउन झाल्यावर, पुन्हा सगळी मंडळी आतल्या हॉलमधे परत आले. दुपारच्या कार्यक्रमात सगळ्या लहान मुलांचे performances होते. वय वर्ष अंदाजे ५-६ ते १२-१३ असावे - प्रत्येक जण पुढे यायचा, स्वत:चं नाव सांगणार, आपण कितवीत आहोत, कुठल्या शाळेत जातो, आई-बाबांचं नाव काय, आज कुठलं गाणं/भजन म्हणणार आहोत, ते कुठल्या रागातलं आहे, "संत त्यागराजांचं composition आहे"; वाद्य वाजवणार असेल, तर ते कुठल्या रागातलं कोणतं composition आहे - अशी इत्थमबुत माहिती देणार. काही मुलं थोडीशी nervous होती, काही supremely confident होती.

मृदंगम वाजवणारा एक मुलगा, डोळ्यांवरच्या चिमुकल्या चष्म्यातुन बघत-बघत, मान खाली घालुन अतिशय तनमयतेनी वाजवत होता. त्याचे हात लहान असल्यामुळे वाजवण्यात जास्ती जोर नव्हता, पण कुठेही त्याचं वाजवणं चुकलं नाही (अंशुमन तबला खूप छान वाजवतो, त्यामुळे त्याच्या expert opinion मधे the kid's performance was flawless)! सगळ्यांचे performances खरंच खूप छान झाले. एवढ्या लहान मुलांना गाताना, वाद्य वाजवताना पाहिल्यावर मला व्हायची ती हळहळ झालीच - "काश! मुझेभी ऐसा कुछ आता! मुझ में भी कुछ ऐसा talent होता!"

नाही म्हट्लं तरी लहानपणी मी संगीत शिकायचा एक प्रयत्न केला होता, तेव्हा गाण्याच्या class मधे मी एकमेव मुलगा असल्यामुळे, आणि बाकी सर्व पोरी असल्यामुळे (तेव्हा माझं वय ९-१० वर्षांचं होतं - आज अशी सुवर्णसंधी मला मिळाली, तर पुन्हा अशी चूक मी कदापी करणार नाही - कदाचित म्हणुनच मला अशी संधी मिळत नाहीये - असो!); पण खरं म्हणजे गाण्याची आपल्याला अजिबात कुवत नाही, ह्याची जाणिव त्याच वेळेस झाली होती, त्यामुळे तो class सोडुन दिला होता.

लक्षात राहिला तो अशाच एका लहान मुलाचा व्हायलिन performance.
त्याचं वय अंदाजे ६-७ असावं. निळा झब्बा आणि पांढरा पायजमा अशी त्याची वेषभुषा! एका मोठ्या काळ्या पेटीतुन त्यानी आपली व्हायलीन काढली. तो इतका चिमुरडा होता की ती व्हायलिन त्याला कशी पेलवेल असा मला प्रश्न पडला. पण त्यानी अगदी सफाईनी ती व्हायलीन हातात आणि खांद्यावर घेतली; समोरचा mike adjust करुन घेतला... स्वत:चं introduction दिलं... आणि वाजवायला सुरुवात केली. मधुनच त्याची नजर त्याच्या आईकडे जायची, त्याची आई त्या बैठकीच्या बाजुलाच बसली होती. मुलानी पाहिलं की ती मान डोलवायची, तिच्या नजरेतच ती त्याला सांगत होती,
"बाळ, छान वाजवतोयस!"

वाजवता-वाजवता मधेच कुठेतरी काहीतरी त्याचं चुकलं - मला तर कळलंच नाही, पण अंशुमननी ते लगेच हेरलं. मला फक्‍त जाणवलं, ते म्हणजे तो वाजवता-वाजवता अचानक थोडासा unsettled झाला... आपण 'छ्य्या!' म्हणतो तसं त्यानी मानेला एक झटकाच दिला! त्याचं performance तेव्हा संपतच आलं होतं, पण त्याच्या चुकीमुळे त्याची intensity कुठेतरी कमी झाली... त्याचं rhythm कुठेतरी बिघडलेलं... थोड़्या वेळानी त्याचं वाजवणं थांबलं... प्रेक्षकांकडुन त्याला हव्या होत्या तशा टाळ्या नाही मिळाल्या.. त्याचा चेहरा खूपच पडलेला.. डोळ्यात किंचितसं पाणी होतं... त्याच्या आईला त्यानी जाऊन गच्च मिठी मारली...त्याची आई त्याला म्हणाली,

"बाळ, छान वाजवलस!"
- "नाही गं! माझं मधेच चुकलं! ते चुकायला नको होतं! मी practise केली होती! it should not have happened. i know i can do better than this."
"अरे राजा! चुका होतात म्हणुन तर आपण शिकतो. पुढच्या वेळेस तु ह्या पेक्षा नक्कीच छान वाजवशील." पण त्याला काही पटेना!

त्याचे बाबा आले, आणि त्यांनीपण त्याच्या भवती आपले हात घालुन त्याला दिलासा दिला. त्याच्या आजीने सुद्धा "छान वाजवलस" असं सांगितलं! पण he was feeling mighty unsatisfied with his performance.

त्याच्याकडे बघुन मला त्या दिवशी जाणवलं, under achievement with respect to your true capabilities हे आपल्या मनाला सगळ्यात जास्ती लागतं. त्याची जाणिव झाली, आणि आपल्या ध्येयाकरता आपले प्रयत्न आपण चालु ठेवले, तो मंजिल दूर नहीं!

आज तो लहान मुलगा आठवल्यानंतर नकळत मनात हेच सुर उमगलेले,

"हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा,
जब भी खुलेगी, चमकेगा तारा!
कभी ना ढले जो, वो ही सितारा,
दिशा जिस से पहचाने संसार सारा!"