जवळ जवळ एक वर्षापूर्वी मी मराठीत हा ब्लॉग लिहायला सुरु केला.June 12, 2006
"नेहमी डोक्याने विचार करु नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा
~ मी माझा, चंद्रशेखर गोखले
एका वेडया मनाची आणि एका व्यवहारी डोक्याची अजन्म चाललेल्या द्वंद्वाची एक कहाणी. स्वप्नांच्या गावाचे खरे अस्तित्व कुठेशी आहे, ते ह्या मनाला ठाऊक नाही, तरी देखील भरकटलेल्या विचारांच्या सहाय्याने तो आपले प्रयत्न चालु ठेवत आहे.
का केला होता? परदेशात त्या वेळी एकटं वाटत होतं कदाचित.
खरं म्हणजे चं गो च्या त्या चार ओळी खूप जास्ती भिडलेल्या मनाला.
आयुष्यातल्या एका क्रॉसरोडला उभा होतो मी.
काय करावं सुचत नव्हतं. कुठला रस्ता घ्यायचा कळत नव्हतं...
सुरुवात त्या दिवशी केलेली. पण मी मराठी मधे लिहु शकतो, असा अजिबात विश्वास नव्हता. कसा असणार?
एक तर सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमातुन. शिवाय शाळेत असतानाच मराठी सोडुन high scoring फ्रेंच घेतली होती. माझं मराठी वाचन इयत्ता ४थी ते ७वी ह्या ४ वर्षातच काय झालं ते झालं - चंपक, चांदोबा, राजकुमार-राजकुमारी, जादुगार, चेटकीण अशा परीकथा; महाराष्ट्राचे संत, महापुरुष, भारतीय स्वतंत्र संग्रामातले मराठी वीर पुरुष, शिवाजी महाराज, फास्टर फेणे अशी गोष्टींची पुस्तकं एवढंच होतं. शाळेत मराठी सुटली, आणि मग मराठी वाचन दैनिक सकाळ पर्यंतच मर्यादित झालं.
५ वर्षांपूर्वी पुणे सोडल्यावर सकाळ पण बंद झाला.
मग गेल्या २-३ वर्षात पु ल, व पु आणि अजुन मोजुन २-३ पुस्तकं वाचली. त्यामुळे मराठीत ब्लॉग लिहायचा म्हणजे आपण खूप मोठं धाडसाचं काम करत आहोत, ही भिती किंवा जाणिव होती.
मराठीतले ब्लॉग वाचायला सुरुवात केली होती. ट्युलिपचा ब्लॉग पहिल्यापासुन वाचत होतो. ती जितक्या सहज सुंदरपणे तिच्या रोजच्या आयुष्यातलं लिहिते.. ते काही आपल्याला जमणार नव्हतं... मामा बाठे, बाबा ठाकुर आणि अभिचकुल ह्या मित्रांच्या त्रिकुटाचा मला हेवा वाटायचा.. एकमेकांच्या ब्लॉग्स वर त्यांचे कमंट्स वाचण्यात मजा यायची... स्नेहलची बडबड.. प्रियभाषिणीच्या गूढकथा... सुमेधाच्या कविता आणि निरीक्षण... हे आणि अजुन बरेचसे चांगले, चांगले ब्लॉग्स वाचुन मनात धडकी भरलेली...
मी डायरी कधी लिहिली नव्हती.
ब्लॉग लिहायचा, पण तिथे "अनुदिनी" (ह्या शब्दाचा अर्थ मला अजुनही माहित नाहीये) किंवा "दैनंदिनी" नाही लिहायची एवढंच माहित होतं.
मग विषय काय घ्यायचा लिहायला? काही आठवणी...काही विचार... एखादं आवडलेलं पुस्तक.. किंवा सिनेमा.. नाटक... आयुष्यात भेटलेली आणि न भेटलेली काही माणसं... कधी एखादा प्रसंग.. मग तो खरा असो वा fictional...
लिहिताना शुद्धलेखनाच्या चुका, शब्द आठवत नाहीत, मी विचार इंग्रजीत करतो, आणि मग मराठी मधे ते उतरवतो.. असे कितीतरी अडथळे आले मग वाटेत...
पण मी 'असंच आपलं' काहीतरी लिहित गेलो...
वाटेत प्रोत्साहन द्यायला बरेच मित्र-मैत्रिणी भेटले... ट्युलिप, अमित लागु, धनंजय, नंदन, योगेश, पराग, प्रियभाषिणी, सुमेधा, विद्या, स्नेहल, अभिजित बाठे, अभिजित कुलकर्णी, केदार, पूनम, आनंद सारोळकर, विद्या, मेघना, अर्चना, शैलेश, हरीकृष्णजी, "कोहम" निलेश, प्रिया, मंजिरी, गायत्री, VJ, स्नेहा आणि आणखिन सर्व जण - तुम्हा सर्वांच्या गोड प्रतिक्रियांबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार मानतो. (हे फारंच formal झालं). कुणाचं नाव लिहायला विसरलो असेल, तर blame it on my poor memory!
पण खरंच! तुम्हा सर्वांनी हा ब्लॉग वाचला, आणि जे लिहिलं त्या बद्दल तुम्हाला काय वाटलं.. ते वाचण्यात मला जास्ती आनंद झाला...
काही गोष्टी लिहायच्या राहुन गेल्या... Thanks-Giving ट्रिपच्या शेवटच्या दिवशीची की-वेस्टची संध्याकाळ... माझी नानी लहानपणी मला सांगायची ती उंदिरमामाच्या टोपीची गोष्ट... एका रविवारी पाहिलेला चेक सिनेमा "कोल्या" आणि त्या संध्याकाळी ३ वर्षांच्या शायोनीबरोबरचा संवाद... रोज संध्याकाळी जिथे आम्ही क्रिकेट, टेनिस खेळतो ते Macfarlin पार्क... थंडीतल्या सकाळी त्या पार्क मधला meandering jogging track... my associative memory that links the cities or places i visit with the people i meet, the movies i watch and the songs i hear there... मागच्या महिन्यात शिकागो आणि ओरलांडोच्या Disney Park मधे गेल्यावर माझे नोकरी बदलण्याचे प्लॅन (हो, मला सध्याची नोकरी सोडुन शिकागो मधे Architecture Tourचा टुरिस्ट गाईड किंवा Disneyच्या Magic Kingdom मधे Alladin बरोबर फिरणारा Genieचा जॉब हवा आहे)...मुंबई मधला ह्या वर्षीचा MRF Rainday जून-१ ला होता की नाही...
एक वर्ष होत आलं आहे... म्हट्लं तर बरंच काही घडलं, म्हट्लं तर काहीच नाही..
अमेरीकेतलं माझं दीड-एक वर्षांचं वास्तव्य ह्या महिन्यात संपेल... बरोबर राहणारे मित्र एक-एक करुन घराबाहेर पडले आहेत.. सध्याच्या घरात मी एकटाच राहिलो आहे... मी पण हे घर लवकरच सोडत आहे..
गेल्या ३ वर्षातलं माझं हे पाचवं घर.. चवथं शहर होतं..
एक वर्ष सरलं आहे... मी पुन्हा एका क्रॉसरोडला पोचलो आहे... कदाचित होतो तिथेच उभा आहे...
जून महिना नेहमी असाच असतो. आयुष्याच्या शाळेत दर वर्षी ह्या महिन्यात एक इयत्ता पुढे जातो..
नविन वर्ग, नविन पुस्तकं, नविन स्कुल-बॅग, नविन युनिफॉर्म..
सगळं काही नविन...
मी पण इयत्ता बदलत आहे.. पुढची की मागची ते माहित नाही..
पण पुन्हा घर बदलतोय.. शहर बदलतोय..
स्वप्नांचं ते माझं गाव मी अजुनही शोधतोय...
25 comments:
केतन,
बऱ्याचवेळा अनुदिनी/ब्लॉग सारख्या गोष्टी फक्त नव्याचे नऊ दिवस काढतात, पण तू वर्षभर नियमितपणे लिहीत राहिलास त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि यापुढील लिखाणालाही मनापासून शुभेच्छा.
बाकी स्वप्नांचा गाव अजूनही मिळाला नसेलही, पण तुझ्या या आधीच्या पोस्ट ('कशी मुलगी पाहिजे?') मध्ये तर तुला रस्ता मिळालेला दिसतोय. :-))त्याच रस्त्याने चालत रहा, पण जरा सावधान.:-)
ऑल द बेस्ट!
-विद्या.
Ketan,
Chaan lihilays.....tuzya medium of education cha manat suddha anu nakos, mazyasarakhya marathi madhyamat shikalelya anekanpeksha saras lihitos tu....keep it up..
tuzya swapnanch gaw tula lawkar molude... (pan he farach formal zal!!!) You know Ketan, 'When you reach there, there is no 'there' there'.
mipan confuse zaley, pan bahutek, it suits here well!
पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा :)
Tujya blog la ek varsha jhalya badal nahi pan tujya americatil ghar sodnyabadal, Chan Go chi ek kavita:
Bhatuklichi bochaki milali,
Parwa kapat lawtana,
Maji kiti udali dhandal,
Gelya kaal maghe dhawatana
Americatil awara avara kartana :-)
It was always a pleasure reading your blog. During onsite people generally have more time at hand. Hopefully even when you are back home you will continue with your blog.
ketan, chhan lihilayes re. he post hi, ani ya adhichi tuzya blog varachi sarva posts hi. :-)
nilesh mhanato tyapramane tuzya english-medium chya shikshanacha tuzya marathi blogging var bilkul kahi asar zalela nahiye, shuddha ani askhalit marathi lihitoyes tu.
tu US madhun move zalyanantar hi regularly blog lihun marathi blog-wishwa shi samparkat rahashil ashi asha ahe!
puDhachya iyatte sathi shubhechchha! :-)
Hi Ketan, varsh-poortibaddal abhinandan. Pudheel lekhanasathi/vaaTachaaleesaaThee shubhechchhaa :)
केतन,
तु तुझं पहिलं मराठी पोस्ट लिहिलंस त्या दिवशीचा तुझा उत्साह आणि आनंद मला स्पष्ट आठवतोय. तोच उत्साह तु संपूर्ण वर्षभर टिकवलास ही खूप मोठी अचिवमेन्ट आहे. तुझ्या प्रत्येक पोस्ट मधून तुझ्यातला प्रांजळपणा आणि रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद टिपत जाण्याची तुझी वृत्ती इतकी सुंदरपणे प्रतीत होते की त्यापुढे तु म्हणत आहेस त्या तथाकथीत त्रुटी मला तरी कधी जाणवल्याच नाहीत.
तुझी सगळीच पोस्ट्स मला मनापासून आवडली. तुझ्यासारखीच साधी आणि सरळ भाषेत लिहिलेली आहेत ती.
पण तरीही तुझं सर्वात मोठं वैशिष्ट्य तुझ्या पोस्ट्स मधून नाही तर तु इतरांच्या ब्लॉग्जवर देत असलेल्या सुंदर, मार्मिक, आणि रसग्रहणात्मक प्रतिक्रीयांमधून जाणवतं. माझा खूप चांगला मित्र तर तु आहेसच. त्यामुळे बरेचदा तुझ्या कमेन्ट्स येणारच आणि त्या अगदी मनापासून कौतुक करणा-याच असणार हे मी गृहीतच धरते ह्यात नवल नाही. पण इतरही अनेक ब्लॉग्जवर तु ज्या सुरेख कमेन्ट्स देतोस त्या वाचत रहाण्यासारख्या असतात हे अनेकजण सांगतील ह्यात शंका नाही.
स्वप्नातलं गाव शोधत रहाण्यातच मजा असते. त्या गावाला जायच्या वाटेवर प्रत्येकजण पुढे जात असताना आपल्या मागे छोट्या छोट्या, काही पूर्ण झालेल्या, काही अधु-या स्वप्नांच्या पाऊलखुणा मागे उमटवत जात असतो. वाट पुढेच जाणारी असते नेहमी हे लक्षात ठेवणं महत्वाचं.
हे मागे पडलेलं वर्ष तुझ्या पुढच्या प्रवासाच्या वाटेवरचं फ़क्त एक पाऊल आहे. तुझ्या स्वप्नाच्या अधिकाधिक जवळ तुला नेणारं.
तुझ्या पुढच्या वाटचालीस माझ्या मनापासून शुभेच्छा!!
सुंदर..सहज..सोप्पा आणि अट्टहासाविना...
लोक पुर्वी पेरते व्हा म्हणायचे..मी आता लिहीते व्हा म्हणतो..
BTW, तो अल्लादिन वाला job असेल तर माझापण reference देशील:) माझी बायको हसत असते तरी पण मला ती gang भयं्कर आवडते
Ketan , aadhi ek varsh satatyane lihit rahilyabaddal abhinandan! Ani Tulipshi sahmat ki tujhya comments itakya surekh asatat ki kadhikadhi tyatun tee post navyane kalate. Aataparyant vel hota mhanun lihit asashil tar aata vel kadhun lihi!! :)
केतन,
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! लिहीत रहा, तुझे लेखन वाचतांना मस्त वाटते, :)
शैलेश
केतन,
मी मागचे काही दिवस ब्लॉगविश्वापासून थोडी दुरावले होते. आज बर्याच दिवसांनतर अधाशा सारखे बरेच ब्लॉग वाचून काढले!
अभिनंदन आणि शुभेच्छा! लिहीत रहा! स्वप्न शोधत रहा! त्या शोधातच आनंद आहे!
ketan,
agadi tujhyaashi bolalyasarakh watatay blog wachoon....:)
"hi waat door jaate
swapnaamadheel gaavaa
maajhyaa manaatalee gaa
tethe asel priyaa" asa tar mhaNat naahiyes na??
kuThe jato aahes aata gaav soDoon? kalaw...ani ho lihit raahaa....
congrats - on ur one year of blogging! and all the best for your move. if you happen to move to my current gaon, do keep me posted :)
"जून महिना नेहमी असाच असतो. आयुष्याच्या शाळेत दर वर्षी ह्या महिन्यात एक इयत्ता पुढे जातो.."
हे भाई होतं!
बाकी कुठल्या माध्यमात शिकला याने काय फरक पडतो. च्यायला मी हिंदी आणि इंग्रजी माध्यमात शिकलो आणि माझं मराठी (डंके कि चोट पर) कुणाच्या मागे नाही! :))
नविन यत्तेत (sic) धुडगुस घाल.
Ketan,
Khara Mhanje, me dusya Ketan la shodhat hote pan tuzya baddal vachun khup chan vatle.
Asach lihit raha.
neha
>>जून महिना नेहमी असाच असतो. आयुष्याच्या शाळेत दर वर्षी ह्या महिन्यात एक इयत्ता पुढे जातो..<<
What a perspective!
Mast lihila ahes...
नव्या इयत्तेकरता शुभेच्छा! असाच लिहीत रहा, आणि नवीन अनुभव, नवीन विचार यातून तुझी खुशाली कळवत रहा :)
Thanks a lot everyone for your kind words of appreciation. I wish I could write this in Marathi, but currently, I dont have access to Baraha or any other tool in which I can type in Devangari script - so, please excuse me. :)
The last few days have been really amazing - I left Tampa, Florida, and have now joined my office in Mumbai. I took a brief vacation on my way back in the UK, and had a good time visiting London and Scotland along with my family. :)
Today is my 2nd day in Mumbai, and the priority right now is to search for a "ghar".
@Vidya,
Thanks for your wishes. I know that the road is full of ups n downs, I am just hoping that the journey ends in some fruitful destination. :)
@Nilesh (Swami?),
Your words are really very encouraging. Thanks again!
@Meghana,
I think I know what you are trying to say. Nothing is permanent, as they say. :)
@Yogesh,
Thanks for your wishes.
@Dhananjay,
When I was packing my stuff, I did encounter a lot of things that reminded me about the days gone by in the US - old movie tickets, bills, airline boarding passes, driving direction printouts, memorablia of different places, CDs, etc.
Lets hope I get some time to blog while I am in Mumbai.
@Abhijit Kulkarni,
Thanks for your wishes & kind words. Feels good, especially when I know how much I need to improve.
@Nandan,
Thanks for your wishes too! I did not get an opportunity to come to San Diego while I was in the US, but whenever I come there, I hope to meet you again.
@Tulip,
My first reaction when I read your comment was that I should stop blogging and only write comments :D
Honestly speaking, I was petrified about blogging in Marathi after reading how well you guys write - but you encouraged me to blog in Marathi after I wrote a couple of comments on your blog in Marathi - so, thanks for your continual support & encouragement. :)
@Samved,
If I get Genie's job, no worry - I will definitely recommend you for Alladin's job. :D
@Sneha,
Thanks for your wishes.
@Shailesh,
Thanks to you too.
@Sumedha,
Its good to have you visit the blog again & to read your comments.
@Snehal,
Thats a lovely song by Asha Bhosle - will let you know if I find "her" in Mumbai :)
@Rayshma,
Aint sure if Mumbai is your current gaon - I think the current gaon for you is s'where in TX. As of now, no plans to come to the 'lone star' state, but will let you know if I do happen to visit that place.
@Abhijit Bathe,
You are God when it comes to writing. Hope you are having a great time with your parents visiting you - you can ask them to have a Marathi-101 reading course for your wife, or you can learn her mother tongue so that you can then blog in that lingo. ;-)
Jokes apart, a language should never be a barrier to communicate - blogging is just one of the modern day channels. In my case, it has helped me to stay in touch with my mother tongue, and the last one year has given me the confidence that I can still write in Marathi - even after 15/16 years - yeah, I think I last wrote in Marathi in 1991 in class VII. :)
@Neha,
Thanks for your comment. Hope you have found the right "Ketan" :-)
@Anand,
Thanks for your comment too!
@Priya,
Thanks for your wishes.
Am hoping to get my hands on some tool soon, that will enable me to type in Marathi.
Also need to acclimatise myself with the new place - yeah, even though I havent changed my job (yet), working in the same company in Mumbai after 18 months feels like joining a new company :D
And need to find a "ghar"...
Can see myself singing,
ek akela is shahar mein..
~Ketan
Are Hi varchi comment mhanje anki ek blogpost jhali ahe tujhi;-)
ka re gapp jhalas ekdam? Busy?
-Vidya.
Aho Kulkarni, Mumbai la pochlyawar blogging visarlat ki marathi ki donhi?
@anand,
ho rey! the comment itself became a bit too long :D
@vidya,
busy, lazy, etc - ashi sagli kaarna deu shakto. finally, navin post taakli mee :)
@dhananjay,
mumbai la pochlyaavar baryaach goshti ghadlyaa aahet. tyaatlyaa kaahi namud kelyaa aahet navin post madhe :)
hya saglyaat hopefully, marathi aani blogging visarnaar naahi ashi kaalji gheto!
जून महिना नेहमी असाच असतो. आयुष्याच्या शाळेत दर वर्षी ह्या महिन्यात एक इयत्ता पुढे जातो..
नविन वर्ग, नविन पुस्तकं, नविन स्कुल-बॅग, नविन युनिफॉर्म..
सगळं काही नविन...
मी पण इयत्ता बदलत आहे.. पुढची की मागची ते माहित नाही..
पण पुन्हा घर बदलतोय.. शहर बदलतोय..
khar.nch chaan :)
Thanks Sneha :)
Post a Comment