क्रॉसरोड
हीथ्रो (Heathrow) विमानतळावरचं ब्रिटिश एरवेजचं प्रशस्त लॉउन्ज. ब्रिटिश एरवेजच्या फर्स्ट क्लॅस आणि बिज़नेस क्लॅस प्रवाशांकरता इथे उत्तम सोय केलेली असते. आराम करायला सोफा, लेदर खुर्च्या; काम करायचं असेल तर डेस्क, फोन, इंटरनेटची सुविधा; खायचं-प्यायचं असेल तर तयार ब्रेकफास्ट, लंच, डिनर, स्नॅक्स, जुस, वाईन, ड्रिंक्स; हवं असेल तर तिथल्या कुकला ऑर्डर देऊन फ्रेश पास्ता किंवा काहीतरी मागवता देखिल येतं; फ्रेश व्हायचं असेल तर मस्तपैकी शॉवर आणि मसाज घ्यायचा; आणि नुसताच वेळ घालवायचा असेल तर पेपर, मासिकं नाहीतर टिव्ही. वेळ उरलाच तर बसल्या बसल्या एक छोटीशी झोप काढायची. तसंही लॉउन्ज म्हट्लं म्हणजे कोणताही प्रवासी इथे काही तासांपेक्षा जास्ती थांबतच नाही. फक्त कनेक्टिंग फ्लाईटची वेळ होण्यापुरतंच प्रवासी इथे येतात.
२ मिनिट अगोदर हातात घेतलेला पेपर श्रीरंगनी लगेच बाजुला ठेऊन दिला. समोर होते तेवढे सगळे पेपर त्याचे गेल्या अर्ध्या तासात चाळुन झाले होते. जून २००५ मधे जिंकलेले ऍशेस डिसेंबर २००६ मधे इंग्लंड पुन्हा राखु शकणार का, ह्यावर टेलिग्राफ, टाईम्स, गार्डियन आणि इतर वृत्तपत्रात तेच-तेच वाचुन तो कंटाळलेला!
आपल्या ब्लॅकबेरीत त्यानी पुन्हा नविन काही ई-मेल आली आहे का पाहिलं. तसं १० मिनिटापूर्वीच त्यानी चेक केलं होतं. मुंबई ऑफिसहून आलेली समीरची उद्याची मिटिंग invite त्यानी accept केली. त्याची ४ दिवसाची न्युयॉर्कची बिजनेस ट्रिप अगदी मनासारखी झाली होती. त्याबद्दलच समीरला उद्या सकाळी ९ वाजता अपडेट करायचं होतं. रात्री घरी पोचायला १ वाजणार होते. तो पर्यंत तर रिया कदाचित झोपुन पण जाईल. तिला पाहुन ५ दिवस झाले आहेत. ५ दिवस!
रिया. माझी सुंदर मुलगी. कधी ती ३ वर्षांची झाली, कळलंच नाही. काळ किती झपाट्यानी गेला. ४ वर्षांपुर्वी मी आणि वैदेही त्याच न्युयॉर्क मधे राहात होतो. आम्हाला तिथे ५ वर्ष झालेली. पण रिया होणार, तेव्हा वैदेहीनी ठरवलं, की आपलं मूल आपल्या देशातच वाढवायचं - आपल्या लोकांत, आपल्या संस्कृतीत, आपल्या भाषेत, आपल्या बरोबर.
आणि मग आम्ही मुंबईला परत आलो. रिया झाली त्या दिवशी किती आनंद झालेला आम्हा दोघांना. त्या दिवसापासुन घरात एक वेगळंच सुख नांदायला लागलं आहे.
मी न्युयॉर्क मधेच राहिलो असतो, तर कदाचित आजच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर असतो, जास्ती पैसे तर नक्कीच कमवले असते. मुंबईतलं सुख निश्चित नाही, पण अमेरिकेतलं एक वैभवसंपन्न आयुष्य नक्कीच असतं. पण का कुणास ठाउक, तेव्हा बरं झालं मला वैदेहीचं म्हणणं पटलेलं.
कदाचित कारण हे असेल की MBA झाल्यानंतर माझी पहिली ७-८ वर्ष मी माझ्या करियरकडेच लक्ष केंद्रित केलं होतं. त्या ७-८ वर्षात मी बरंच काही मिळवलं - पण ते मिळवताना, मी बऱ्याच गोष्टी सोडल्या सुद्धा होत्या. त्या सोडलेल्या गोष्टीच मला हव्या होत्या. त्या न्युयॉर्कला नसत्या मिळाल्या मला.
आणि मुख्य म्हणजे मला वैदेहीला कधीच दुखवायचं नव्हतं. तिच्यामुळेच माझ्या आयुष्यात एक स्थैर्य आलेलं; एक निश्चित अशी दिशा मिळालेली. मग न्युयॉर्क असो, किंवा कुठेही असो, तिला जिथे रहायचं होतं, जिथे आमच्या मुलाला/मुलीला वाढवायचं होतं, तिथेच मला जायचं होतं.
आज विचार केला तर एकच feeling येतं - no regrets. whatever happens, happens for the best.
मी, वैदेही आणि रिया. आम्ही तिघं एकमेकांपासुन कधीच दूर राहु शकत नाही.
"Excuse me! Can I have the newspaper in front of you, if you are not reading it?"
हे ऐकताच श्रीरंग दचकला. मग लक्षात येताच, टेबलावरच्या पेपरवरचा हात बाजुला केला, आणि म्हट्ला,
"Oh sure! Why not. I am sorry, I am done reading it."
पेपर तिला देताना त्यानी तिला पाहिलं तर तो चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कुठे बरं पाहिलं आहे आपण हिला?
ती देखिल श्रीरंगकडे पहात होती, आठवायचा प्रयत्न करत होती.
"Hi, I am Shrirang Joshi. I am not sure, but you seem familiar. Do we know each other?"
~"श्रीरंग जोशी!!... तरीच मी म्हट्लं की तुम्हाला कुठे पाहिलं आहे. अरे! मला नाही ओळखलंस? मी अपर्णा! अपर्णा दिक्षित. आठवले का, का विसरलास तु मला?"
"अपर्णा दिक्षित! तरीच मी म्हणत होतो, कसं नाही ओळखलं मी तुला. शाळेतली १० वर्ष, आणि पुढे कॉलेजची ४ वर्ष - अशी सलग १४ वर्ष जी मुलगी नेहमी पहिली यायची, आणि मला नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानायला लावायची - तुला मी कसं विसरु शकेल."
~"वाह! अजुन लक्षात आहे म्हणजे तुझ्या. काय अरे? ते शाळा-कॉलेजचे दिवस संपुन आता १२-१३ वर्ष झाली की आपल्याला. आणि तरी तुझं - तु पहिली, मी दुसरा - हेच चालु आहे."
"१३ वर्ष? खरंच की!... कॉलेज नंतर लगेचच तु लग्न केलंस आणि गायब जी झालीस, ती आज अशी अचानक हिथ्रो वर भेटत आहेस. कशी आहेस? कुठे जात आहेस?"
~"मी मजेत आहे रे. माझ्या कंपनीनी मला नुकतंच प्रमोशन दिलं आहे. नविन पोस्टिंग २ वर्षाकरता आहे. म्हणुन न्युयॉर्कला जात आहे."
"२ वर्षाकरता म्हणजे? तु लग्न झाल्यापासुन तिथेच होतीस ना? न्युयॉर्कला?"
~"चूक! लग्नानंतर आम्ही अशुतोशची नोकरी होती म्हणुन न्युयॉर्क मधे फक्त २-३ वर्षच होतो. मग पुढे.. जाऊ दे...चल, आपण आधी कॉफी घ्यायची का? गप्पा काय होतंच राहतील. there's so much to catch up on about the last 13 years, and we can certainly enjoy a cup of coffee while we do that. what say?"
कॉफीवर गप्पा आणखिन रंगल्या दोघांच्या. जुन्या आठवणी, जुने मित्र-मैत्रीणी, दोघांचे संसार, मुलं, करियर - ह्यातच दोन तास कसे निघुन गेले कळलंच नाही. श्रीरंगच्या मुंबईच्या फ्लाईटची वेळ झाली आणि दोघांनी एकमेकांना गुडबाय केलं.
"चल गं! कधी नव्हे तो माझा नंबर पहिला लागला आहे, आणि तुझा दुसरा.
काय गंमत आहे नाही? मी न्युयॉर्क सोडुन येत आहे, आणि तु तिकडेच जात आहेस. तुला तुझ्या न्युयॉर्कच्या नविन assignment करता best of luck. तु यशस्वी होशीलच, मला खात्री आहे."
पुन्हा आपली भेट कधी होणार, दोघांनाही कल्पना नव्हती. कदाचित अशीच हिथ्रो वर होईल भेट. किंवा होणार पण नाही.
बसल्या-बसल्या अपर्णानी लॅपटॉप उघडला. न्युयॉर्कला पोचायाच्या अगोदर तिला काही महत्त्वाच्या गोष्टी संपवायच्या होत्या. पण काही केल्या, कामात मन लागत नव्हतं. मनोमनी तिला सरलेल्या १३ वर्षांचा काळ दिसत होता.
लग्न झाल्या-झाल्या न्युयॉर्कची ती २-३ वर्ष म्हणजे माझ्या आजवरच्या successful आयुष्यातली एक पोकळी! नविन देश, नविन संस्कॄती, नविन लोक - सुरुवातीला मी जरा घाबरलेलीच होते. आशुला ऑफिस मधुन परत यायला किती उशिर व्हायचा - दिवसभर मी घरी एकटीच बसुन असायची.
१ वर्ष सरलं, मग रोहन झाला. मग मी रोहनच्या मागेच व्यस्त झाले. त्याच्याकडे बघायचं, त्याची आंघोळ, त्याचं जेवण, त्याची झोप, घरातली आवरा-आवर, स्वयंपाक, नवऱ्याच्या सगळ्या गर्जा भागवायच्या - दिवस कधी सुरु व्हायचा, कधी संपायचा - मला कळतच नव्हतं.
हे सगळं करायलाच मला युनिव्हर्सिटी मधे gold medal मिळालं होतं का?
हेच सगळं मला आयुष्यभर करायचं होतं का?
का बरं मी करत होते ते?
आई-नानांना दुखवायचं नाही म्हणुन मी हातची नोकरी सोडुन, करियर सोडुन आशुशी लग्न केलं होतं. सगळं सोडुन परदेशात गेली होते.
३ वर्ष ते सगळं निभावलेलं.
with no complaints.
पण मग मला ती गाडी अजुन पुढे ढकलता येत नव्हती.
thankfully, आशुनी मला समजुन घेतलेलं.
आम्ही न्युयॉर्क सोडलेलं, माझ्याकरता.
आम्ही दिल्लीला आलो. मी नोकरी सुरु केली.
रोहनला सांभाळायला आई आणि नाना आमच्यासोबत राहु लागले.
१० वर्ष सरली. professionally, मला यश लाभत गेलं. मी कष्ट पण तसेच करत होते. आयुष्यात कधीच 'second best' यायचं पटलेलं नाहीये मला. नेहमीच मला सर्वप्रथम यायची सवय आहे.
आणि तेच मी माझ्या मुलाच्या भविष्याबाबत expect करते. त्याला सगळं उत्तमच मिळायला पाहिजे.
यंदा तो पाचवीत गेला आहे. म्हणुनच त्याला ह्या वर्षी पासुन 'Doon School' मधे admission घेतली आहे. तो तिथे होस्टेलवर राहील. स्वावलंबी होईल. confident होईल. आणि, most importantly, he will also learn to achieve nothing but the best in life, just like me.
खरं म्हणजे, आशुला माझ्याबरोबर न्युयॉर्कला येता आलं असतं. पण रोहन देहरादुनला आहे, म्हणुन त्याला दिल्ली सोडायचं नाहीये.
दोन वर्षांचीच तर गोष्ट आहे. अशी चुटकीसरशा जातील ही दोन वर्ष.
मग मी पुन्हा आशु आणि रोहन जवळ येईल.
"British Airways is pleased to announce the boarding for its flight BA179 flying from London Heathrow to JFK, New York..."
ही announcement ऐकताच अपर्णा भानावर आली.
लॅपटॉपची बॅटरी ड्रेन-आऊट झालेली.
तो तसाच बॅगेत टाकुन ती गेटच्या दिशेनी चालु लागली.
अजुन एक शिखर गाठायला.
11 comments:
Amusing....
Yash mhanje naki kay rey?
hmmmm.....nice one.
I can relate myself to Vaidehi....apala desh to apala...
वा केतन मस्त लिहीले आहेस. आवडले. बर्याच दिवसांनी ब्लॉग वाचणे झाले.
आयुष्यात प्रत्येक गोष्टीला उत्तरे नसतात. पर्याय असतात आणि परिणाम असतात.
Hi K,
Khup divasani blog lihiliay. You have a different style of writing.Actually I read ur blog for the first time 'Jaage hai der tak..' at 3am and I was studying for some exam. So it was as if someone was reading my thoughts.
:-)
Anyway, about this post, I see myself in both the personalities, Vaidehi and Aparna. I want to be home in India to raise my kids, but at the same time I dont want to lose my carrier. But I am not able to compare two people that is Shrirang and Aparna, is there any? Or it was not written to be compared?
-Vidya.
Nice one (as always.. :)
Sadha soppa tari vichar karayla lavanara.. !
Shevati personal life ani carrier hyacha balanche kuthe tari sadhavach lagato..
Good post.. Keep it up.!!
Nice! I liked the way you presented contrasting scenarios in 2 peoples lives who happen to meet at a cross-road.
Setting priorities in life is something we all have to do at one point. If you think about it, success really is living your life by your own terms.
@ Dhananjay,
I will define success as achieving a goal, be it personal or professional, that you set for yourself & being happy about it in the end.
@ Snehal,
Thanks for your comment.
How is your new job coming along?
@ Priya,
>> आयुष्यात प्रत्येक गोष्टीला उत्तरे नसतात. पर्याय असतात आणि परिणाम असतात.
You said it! Life is indeed all about choices you make, and the consequences that you face thereof.
@ Vidya,
Thanks for your compliment.
Shrirang & Aparna are two people who meet at a crossroad in life, both of them taking different directions - one path leading to career growth, the other leading to personal happiness.
@ Parag,
Thanks for your comment again. Finding the balance is easier said than done - but we are all trying, n'est ce pas? ;-)
@ Amit,
Bingo! Success is indeed living life by our own terms, or is it? :D
Thanks again for all your comments.
~Ketan
Does one really have the freedom to live the life on his / her terms? Refer Rarang Dang, last conversation between Jimmy and Vishwanath.
Dhananjay - not everyone, well almost no one, has the luxury to be able to dictate terms in life and thats exactly why it would be considered a success if you were able to live life by your own terms.
Thats just a school of thought, you need not necessarily subscribe to it. I think it holds truth.
Both the persons reflect two coins of a single coin! Nicely written!!!
I mean two sides of a single coin!
Post a Comment