सुडोकु
राजुकाकांना शब्दकोडी सोडवायचा प्रचंड नाद. तसे ते नेहमीच कामात गर्क असतात - मग ते काम ऑफिसचं असो किंवा घरातलं - इतका उत्साही माणुस शोधुन सापडणार नाही. ऑफिसमधुन आलं, की चहा घेता-घेता म्हणा, किंवा सुट्टीच्या दिवशी म्हणा, त्यांना जर चुकुन वेळ मिळाला तर पेपर उघडुन त्यातले शब्दकोडे सोडवणार.
४०शीत लागलेला चष्मा नाकावर लावलेला, हातात पेन आणि पेपर, आंगणात कापडी आराम-खुर्चीत बसलेले राजुकाका, गुरुवारी आत्याकडे गेलं की दिसतात. मी बंगल्याचं फाटक उघडलं की हळुच वर बघुन मला म्हणतात,
"काय केतन, कसा आहेस?"
~ "मी छान! तुम्ही कसे आहात? आज सुट्टी ना."
"काही नाही रे, आपलं नेहमीचंच! गुरुवारी सुट्टी असली की सगळी कामं कशी छान होतात. तुमच्या सारखी आम्हाला रविवारी कुठे आली सुट्टी. आजच सकाळी तुझ्या आत्याला घेऊन मंडईतुन भाजी आणली. मग इलेक्ट्रिक बिल, फोन बिल भरलं. बॅंकेत काम होतं, ते झालं. दुपारचं जेवण झालं, मग गाडीचं थोडं काम होतं म्हणुन जोशांच्या गॅरेज मधे जाऊन आलो. आताशी ४-४:३० वाजता कुठे थोडा वेळ मिळाला, म्हणुन ह्या आरामखुर्चीत हवा खात बसलो आहे."
~"तुम्ही सुट्टीच्या दिवशीसुद्धा सकाळी ५:३० ला कसे उठता हो? मला तर रोज सुद्धा एवढ्या पहाटे जाग येत नाही, सुट्टीच्या दिवशी तर सोडुनच द्या! ....आता, तुम्ही शब्दकोडं सोडवताय ना?"
"हो रे! आयुष्याचं कोडं आपल्याचानी नाही सुटत लवकर, पण हे मात्र पटदिशी सुटतं.
अगं सुनंदा, केतन आला आहे. चहा टाकतेस ना!"
मग चहा आणि नाश्त्यावर आत्या आणि काकांबरोबर गप्पा रंगतात.
आयुष्याचं कोडं तर दूरंच राहिलं, पण मला शब्दकोडी तर कधीच झेपली नाहीत.
लहानपणी "word search", "jumble" बरेच सोडवलेले.
पहिल्या नोकरीत काम काय केलं ते नीटसं आठवत नाही, पण वेळ मिळाला की dictionary.com वर "word search" सोडवायचो, ते अजुनही आठवतं. कमीतकमी वेळात कसं सोडवता येईल, ह्या करता बऱ्याच वेळा प्रयत्न करायचो.
सध्या वेड लागलं आहे ते सुडोकुचं. पण माझं वेड जरा कंट्रोल मधे आहे.
ऑफिसमधल्या एका प्रचंड हुशार मुलानी तर सुडोकु सोडवायच्या algorithmचा एक C program पण लिहिला आहे. त्याला क्रिकेट खेळायला बोलवलं की तो म्हणतो,
"तुम्ही आधी सुडोकु सोडवा, मग मी तुमच्या बरोबर क्रिकेट खेळायला येईल!"
"घरी जा!" - ही आमची प्रतिक्रिया त्याला फारशी रुचत नसेल, पण झक मारत अधुनमधुन तो क्रिकेट खेळायला येतोच आमच्याबरोबर.
सुडोकु किंवा कुठलंही कोडं सोडवायचं एक पॅटर्न असतं, एक algortihm असतं. ते ज्याला कळलं, त्याला ते कोडं सहजासहजी सोडवता येतं. गंमत ह्याची वाटते की मी पण ते पॅटर्न शोधत असतो, किंवा ते algorithm वापरत असतो.
प्रॉब्लेम मग हा आहे की मग माझ्यात आणि ते पॅटर्न/algorithm वापरणाऱ्या इतर व्यक्तीमधे फरक एवढाच आहे का, की जास्ती लवकर ते कोण करु शकतं?websudoku.com वरच्या easy level सुडोकु सोडवायचं median time ५ मिनिटं ४९ सेकंद आहे, आणि मी बऱ्याच वेळा त्याहुन जास्ती वेळ घेतो.
कोडं, मग ते कोणतंही असो, आधी तर सुटतच नाही, आणि सुटलंच तर लवकर सुटत नाही!
असं माझ्याबरोबरंच का होतं बरं, असं प्रत्येकालाच का वाटत राहतं?
आहे कुणाकडे ह्या कोड्याचं उत्तर?
3 comments:
Karan apekshanchi ek ek payari var chadhat jate. Suruvat kartana fakt kode sodavana hech dheya asta. nantar halu halu kamit kami velat kode sodavyachi dhundi chadhte and finally itar lokansobat compare kela ki tyana haravnyachi iccha balawate. Swatahchi superiority siddha karnyasathi.
But this is the very essecnce of life. Raise the bar and improve yourself :)
खरं आहे. मला पण कोडी पटपट सुटत नाहीत. सुडोकू तर नाहीच नाही. पण सगळ्याची उत्तरं मिळायलाच हवीत असं कुठे आहे? निदान मला तरी असं नाही वाटत...
@anand,
you have hit bulls eye! it first starts with whether u can solve it, and then you want to improve.
its all about raising the bar, as u say.
sudoku is fine, but when it comes to other puzzles in life, it does get even more challenging. ;-)
@snehal,
i know its not necessary that u should be able to solve all puzzles. there are some which you can solve very easily, a few take some time to solve, and a few are just un-solveable.
the challenge is in whether you can understand the pattern/algorithm/trick in solving it.
anyways, i have to agree with you too - it definitely is not necessary that u know all answers, or if u can recognize all patterns/algorithms - least of all, sudokus! :)
thanks for your comments.
~ketan
Post a Comment