चॉकलेटवाली नानी
आज सकाळी ऑफिसच्या पार्किंग लॉट मधुन येताना "नानी" दिसली. तिच्या लाल मुस्टांग मधुन ती बाहेर पडली. आरथ्रायटीस मुळे सावकाश तिची पावले ऑफिसच्या दिशेनी पडत होती. लाल स्वेटर घातलेला, हातात एक लाल पर्स. पुर्वी एकदा तिची लाल लॅपटॉप बॅग बघुन मी तिला म्हट्लेलं,
"अहो, लाल तुमचा आवडता रंग का?"
तेव्हा "तुला कसं माहित?"चा केवढा मोठ्ठा सुखद धक्का बसलेला "नानी"ला!
नानीचं नाव मारिलिन कॅपियेलो. ६ महिने आधी, ऑफिसमध्ये आम्ही शेजारी-शेजारी बसायचो. रोज सकाळी ८.३० ला नानी न चुकता येणार; दुपारी १२-१ लंच टाईम मधे खालच्या कॅफे मधुन सलाड घेउन येणार, आणि त्याबरोबर कुठलं तरी पुस्तक वाचणार; डेस्कवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी मृदु बोलणार; अगत्यानी चौकशी करणार; दुपारी कधीतरी कुठल्यातरी मैत्रिणीला फोन करणार आणि थोडा वेळ गप्पा मारणार; ५.३० झाले की घरी जायची तयारी तिची!
ऑफिसमधे बसायची ती सर्वात मस्त जागा होती आमची - टॉप फ्लोरवरची कोपऱ्यातली जागा - आम्हा दोघांचे डेस्क window facing - खाली छोटंसं तळं, दूर पाहिलं तर एका बाजुला टॅम्पाचं रेमंड जेम्स अमेरिकन फुटबॉल स्टेडियम, त्याच्या पाठीमागे टॅम्पा विमानतळावरुन येणारी/जाणारी विमानं.
सकाळी आलं की खिडकीतुन बाहेर पाहुन मी आणि नानी हमखास weather वर गप्पा मारायचो.
"आज काय मस्त sunny आहे."
"आज पाउस पडणार."
"आज थोडं dull आहे - पाउस नाही, पण sunnyदेखिल नाही."
"आज खूप छान आहे - nice, clear, blue skies - इथे ऑफिस मधे बसण्यापेक्षा कुठेतरी पिकनिकला जायल हवं."
अशा आमच्या गप्पा.
पाउस सुरु झाला की कॉफीचा मग घेउन मी त्या काचेपाशी उभा रहायचो. काचेवर पडणाऱ्या पावसाच्या धारांकडे पहात रहायचो. गरम कॉफीच्या वाफेतुन मधेच मागे वळुन नानीला म्हणायचो,
"किती छान आहे ना?"
ती पण हसुन मानेनी होकार द्यायची.
Mothers Dayला "नानी" खूप खुश होती.
"माझ्या मुलानी न्युजर्सीहून मला गिफ्ट पाठवली आहे.
पण मी ती गिफ्ट आज नाही उघडणार.
संडेला उघडणार आहे.
He loves me so much."
हे मला सकाळी-सकाळी सांगीतलं.
आणि मग दुपारी डेस्क वरुन आपल्या २-३ मैत्रिणींना सांगीतलं, तेव्हा प्रत्येक वेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता.
नानीच्या डेस्कवर एका काचेच्या बोल मधे ती चॉकलेट्स ठेवते.
जो भेटायला येईल, तो हवं तर एक-एक उचलतो.
मी तर बाजुलाच बसायचो.
आणि माझी नजर नेहमीच असायची त्यावर.
न चुकता, रोज तिला विचारुन २-३ चॉकलेट्स मागुन घ्यायचो.
हे तर विचारुन.
आणि न विचारता अजुन कितीतरी ढापायचो.
कधी-कधी तिनी मला ढापताना पाहिलं सुद्धा होतं.
पण प्रत्येक वेळेस आमची नजरा-नजर झाली, की नानी तिचे डोळे मिचकवत,
"घे रे! तुला आवडतात ना! मग लाजतोस कसला."
हे न बोलताच सांगायची.
आज ती समोर आली तेव्हा हे सगळं आठवलं.
किती दिवस झाले आहेत, नानीशी weatherबद्दल गप्पा मारुन, तिच्या डेस्कवरुन चॉकलेट्स घेउन.
गेल्या पावसाळ्यात जुलै मधे शेवटचं भेटलेलो तिला. त्यानंतर मी आता दुसऱ्या बिल्डिंग मधे बसु लागलो आहे. पुर्वीच्या जागी जायची कधी संधीच मिळाली नाही.
मध्यंतरात autumn has gone by, winter is also behind us.
spring has now come back at our doorstep.
पण नानी बदलली नाहीये. अजुनही लाल रंग तिला तितकाच आवडतो.
आजही तिनी पाहिल्यावर डोळे मिचकवलेच.
आणि न बोलता हसत-हसत सांगुन गेलीच,
"काय रे? कुठे गायब आहेस इतके दिवस?
चॉकलेट्स आवडत नाहीत का तुला आता?
मला भेटायला आलाच नाहीस."
14 comments:
:) छान..मग 'नानी'साठी चॉकोलेट घेऊन जाणार की नाही Women's Dayला?
तुझे लेख वाचत्येय..साईबाबांवरल्या लेखाचा शेवट किती सुंदर आहे!
साध्या-सोप्या भाषेत सुरेख व्यक्तिचित्रण केलंय. आजीबाई डोळ्यासमोर उभ्या राहिल्यात.
आमच्या समोरच राहणार्या अमेरिकन आज्जी मात्र एकदम opposite आहेत! Dont mess up with me अशी धमकी देणार्या!!
असो. पोस्ट खूप आवडली.
chaan lihilay....maza pan paradeshatala anubhav asach aahe...mhatari manasa far chaan vagatat...kadachit tya vayat tyanchyashi premane bolanare far kami loka tyanna bhetat asavet...
mastach!
mast ch!!! tumachee doghaanche basaayachee jaagaa, naanee sagal ekadam doLyaasamor aala. \
ata jaashil bhetayala tar mazyaa navache paN 1 choclate kha :)
va! mastach... lahanasech aahe paN khoopach chhaan.
@gayatri,
thanks a lot. yup, i guess i'll give her some chocolates tom :)
@vj,
u can try giving some chocolates to your american "naani". maybe tht'll help break the ice. ;-)
btw, 'vj' stands for?
@koham/nilesh,
yup. in general, ithe florida madhe loka tase chhan aahet. manaapaasun vichaartaat, phaarach agatya daakhavtaat. tasahee, florida is known as a pensioner's state, mhanun pan asel kadaachit ki saglech phaarach kheli-melini raahataat ithe.
@meghana,
thanks a lot. i visited your blog. hope to see s'thing soon there.
@snehal,
mee tasahee khup chocolates gheto naani kadun. tujhya naavache ajun ek khaaylaa kaahich harkat naahi. :D
@priya,
ho. tashi lahaan-ch post aahe. i had originally kept the title as "chocolate, omelette aani undraachi topi", and was planning to also write abt another naani in the cafeteria, who makes an omelette for me in b'fast; and my real naani, who used to tell me the story of "undraachi topi" almost every night when i was a kid.
but then, i stopped myself with just the chocolate-waali naani.
Why did you?? :) Lihee naa tyaa doghinbaddal paN! chhaan lihlays... manaapaasun aawaDala!
Beautiful...
Khup chan chitra ubha kelat dolya samor. Wachun kharach khup ananda milala!!!
Thanks for sharing it with us
-Mithi
@Priya,
Thanks a lot for your kind words. Will try n write about the other 2 lovely ladies s'time.
@Mithi,
Thanks for your comment. :)
~Ketan
chhan lihilayes re ketan! pan kadhi kadhi vatata apan ya lokanchi itaki chhan athavan manat jopasun thevato, tasach te hi karat asatil ka? mhanaje asa nahi ki te chhan bolatat tevha manapasun nasata, pan "move on" chi tyanna itaki chhan saway asate na, ki kuthalyahi natyat te jast guntun padat nahit; arthat he asa ek maza observation ahe. kadachit chukichahi asel.
but a very good post, keep them coming!
Thanks Abhijit.
Yup, I agree with you. Some of the elderly folks are much more practical when it comes to "letting go", or "moving on" in terms of non-trivial relationships. A very interesting observation indeed!
mast! 'naani' aavaDalee :)
Thanks Archana!
You seem to have posted a bunch of comments on the same day which I am reading today :)
Post a Comment