"सिनेमा पारादिसो"

आज रविवारी दुपारी एक ईटालियन चित्रपट पाहिला.
सिनेमा पारादिसो.

कुठेतरी ह्या सिनेमा बद्दल वाचलं होतं, तेव्हा पासुन बघायची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली.

कहाणी आहे ईटली मधल्या एका नामांकित सिनेमा दिग्दर्शकाची, नाव 'साल्वटोर डि विटा'.
त्याचा खूप जुना मित्र 'अलफ्रेडो', ह्याचं निधन झाल्याचं कळल्यावर तो अलफ्रेडोच्या अंतयात्रेत सहभागी व्हायला तब्बल तीस-एक वर्षांनी स्वत:च्या गावी परत येतो.

चित्रपट बहुतांश flashback mode मध्येच आहे.
अलफ्रेडो त्या गावातल्या 'सिनेमा पारादिसो' नामक सिनेमा-हॉल मध्ये film projectionist असतो. अगदी बालवयापासुन साल्वटोर, म्हणजे 'टोटो'ला सिनेमाचे वेड असते. तास न तास, दिवस-रात्र, वर्षानुवर्ष तो अलफ्रेडो बरोबर त्या सिनेमा पारादिसोच्या projection रूम मध्ये बसुन त्याच्याकडुन सिनेमा आणि त्याच्या बरोबरीने आयुष्याचे धडे शिकतो.

त्या projection रूम मध्ये एकदा आग लागते आणि अलफ्रेडो आंधळा होतो. त्यानंतर, त्या गावातल्या नव्या सिनेमा हॉल मध्ये film projectionist चे काम अलफ्रेडोच्या हाताखाली तयार झालेल्या लहानश्या टोटोवर येतं.

वर्ष सरतात आणि युवा टोटो गावात नविन आलेल्या एलेना नावाच्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो.
प्रेमात पडलेल्या टोटोला अलफ्रेडो कडुन एक आगळा-वेगळा सल्ला मिळतो, ते सुद्धा एका परीकथेच्या रुपात,

"फार फार वर्षांपूर्वी, एका राज्यात एक विलक्षण सुंदर राजकुमारी होती.
त्या राजकुमारीवर त्या राज्याच्या सेनेतला एक मामुली शिपाई मनापासुन प्रेम करतो.
एक दिवस, तो शिपाई त्या राजकन्येजवळ आपल्या मनातलं प्रेम व्यक्‍त करतो.

त्याच्या प्रेमाची परीक्षा घेण्याकरता ती राजकुमारी त्याला म्हणते,
'तु जर १०० दिवस माझ्या महालासमोर माझी वाट पाहिलीस,
तर मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेल, आणि जन्मा-जन्मा करता मी तुझीच होईल.'

तिचे हे शब्द ऐकुन, तो शिपाई खुश होतो.
त्याला स्वत:च्या प्रेमावर जबरदस्त विश्वास असतो.

मग दिवस-रात्र तो शिपाई त्या राजकुमारीच्या महालासमोर उभा राहातो - उन, पाऊस, थंडी, वारा - कशाची, कशाचीही तो तमा बाळगत नाही.
दिवस सरतात...९० दिवस होऊन जातात, आणि त्याचं सगळं शरीर पांढरं-फटक पडलेलं असतं, झोपायचा त्राण देखिल राहिला नसतो त्याच्यात...

९९व्या दिवशी ती राजकुमारी त्याच्याकडे पाहुन आश्चर्यचकीत असते - आता फक्‍त एकच रात्र राहिली असते - पुढच्या दिवशी ती त्याची होणार असते.

आणि १००व्या दिवशी तो शिपाई तिथे नसतो!! तो तिथुन निघुन गेलेला असतो!!"

तो शिपाई का जातो, हे अलफ्रेडो टोटोला सांगत नाही.
ते उत्तर तो त्याचं त्यालाच शोधायला सांगतो.

मग एलेनाला मनवण्या करता टोटो कित्येक रात्र तिच्या खिडकी खाली तिच्या एका इशाऱ्याची वाट पाहतो, आणि एक दिवस ती त्याच्या प्रेमाचा स्वीकार करते.
त्यांच्या प्रेमकथेमध्ये मग नेहमीचाच जुना-पुराणा अडथळा येतो - तो निव्वळ गरीब, ती गर्भश्रीमंत!

प्रेम सफल न झाल्याने टोटो पुन्हा अलफ्रेडोकडे येतो आणि म्हणतो,
"मला आज कळलं की तो शिपाई का निघुन जातो. १००व्या दिवशी जर ती राजकुमारी हो म्हणाली असती, तर त्याला जणु स्वर्गच लाभलं असतं.
पण जर तिनी तिचा शब्द मोडला असता, तर मग त्या शिपायाकडे काहीच राहिलं नसतं.
तो निघुन गेला, म्हणुन निदान तिच्याबद्दलचं प्रेम तरी त्याच्याजवळ राहिलं."

मग अलफ्रेडो त्याला सल्ला देतो,
"टोटो, तु इथुन निघुन जा. ह्या गावात तु राहिलास, तर तुझी प्रगती कधीच होणार नाही.
तुझ्यात जे गुण आहेत, त्याची खरी पारख बाहेरच्या जगात होईल.
प्रेम, घर, परिवार, मित्र - ह्या सर्व बांधिलकींना विसरुन तु तुझ्या मार्गावर जा.
तुझी योग्यता आणि तुझी क्षमता ह्यांना तुझ्या अपार कष्टांच्या जोडीनी तु यश संपादन कर.
तु कधी इथे परत येऊ नकोस, अन आम्हाला एखादं पत्र पण लिहु नकोस.
उलट मला जगाकडुन, दुसऱ्यांकडुन तुझ्याबद्दल, तुझ्या यशाबद्दल कळु दे, असं काहीतरी कर!"

समुद्रतटावर तो हे सांगत असताना, background मध्ये जमीनीवर पडलेले लंगर (anchors) दिसतात.
एक-एक लंगर जणु जीवनातली एक-एक बांधिलकी.
ह्या सर्वांना झुगारुन, टोटो आपलं गाव, आपलं प्रेम, आपली माणसं सोडुन जातो.
आणि आपलं ध्येय गाठतो. नामांकित दिग्दर्शक बनतो.
अद्वितिय असं यश संपादन करतो.

३० वर्षांनंतर परत आपल्या गावी येतो तेव्हा पुन्हा एलेनाशी भेट होते.
तिच्याकडुन कळतं की ती सगळं सोडुन त्याच्याकडे येणार होती.
पण अलफ्रेडो तिला समजावतो की असं केल्यानी तिचं आणि टोटोचं नुकसान होईल.

हे ऐकुन टोटोला धक्का बसतो.
अलफ्रेडोनी असं का केलं?
यश आणि कीर्ती तर आपल्याला भरपुर मिळाली, पण खऱ्या प्रेमापासुन आपण वंचित राहिलो.
ते सुद्धा आयुष्यभर.

अलफ्रेडोच्या बायकोकडुन टोटोला अलफ्रेडोनी त्याच्याकरता ठेवलेली एक भेट मिळते. जुन्या चित्रपटांतील गावाच्या पाद्रीने सेन्सर म्हणुन कापलेले जे-जे kissing scenes होते, त्या kissing scenes च्या तुकड़्यांची एक रीळ असते. लहानपणी ते तुकडे टोटोनी मागीतले होते, तेव्हा अलफ्रेडोनी दिले नव्हते.

आणि आता तो यशस्वी झाल्यावर, इतक्या वर्षांनंतर त्याला जे पाहिजे होतं, ते मिळालं होतं.
जणु अलफ्रेडो त्याचं प्रेम, त्याला हवं-हवंसं वाटणारं जगच टोटोला परत देत होता.
नकळत टोटोच्या डोळ्यांत अश्रु जमा होतात.

**************************************************

ह्या सिनेमाबद्दल विचार करत असतानाच मागच्या आठवड़्यात पाहिलेला 'गुड विल हंटींग' आठवला.

त्यात मॅट डेमन एक २०-२१ वर्षांचा eccentric जिनियस दाखवला आहे.
जगातलं कुठलंही गणित तो चुटकीसरशा सोडवु शकतो.
आणि मग तो प्रेमात पडतो. फक्‍त ते प्रेम, किंवा ती बांधिलकी त्याला नकोशी असते.

सिनेमा पारादिसो आणि ह्या सिनेमात फरक हा आहे की ह्यात मॅट डेमनचा mentor रॉबिन विल्यम्स त्याला प्रोत्साहन देतो की 'follow your heart'.
आणि मग मॅट डेमन आपलं प्रेम मिळवण्याकरता बाकी सगळं सोडुन देतो.

**************************************************

दोन दृष्टीकोण. दोन पर्याय.
प्रेम, करियर.
बांधिलकी, अबद्धता.
साध्यता, विवंचता.
दोन्ही कधी सुसंगतरित्या एकत्र होऊ शकत नाहीत का?
सुवर्ण-मध्य कधी येऊ शकत नाही का?

प्रेम, करियर.
प्रश्न? उत्तर.
का उत्तर, प्रश्न?

6 comments:

Priyabhashini said...

पोस्ट आवडली. "पारादिसो" शब्दाचा अर्थ काय? का कुणास ठाऊक "फारा दिवसांनी" असा वाटला. (अर्थातच, तो तसा नसावा) परंतु चित्रपटासाठी चपखल बसायला हरकत नाही. :))

आपण परीकथांमध्ये जरा जास्तच गुंतलो आहोत असं दिसतंय. :)

मला व्यक्तिश: प्रेम-करिअर, बांधिलकी-अबद्धता इ. इ. चा सुवर्णमध्य कधीच साधणे शक्य नाही असे वाटते. म्हणजे सुवर्णमध्य बिध्य नसतोच. आपण मानला तर असतो, नाही मानला तर नसतो.

प्रेमाचंही असंच, माणूस फक्त स्वत:वर प्रेम करतो आणि ज्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा आहे त्यांच्यावर प्रेम करतो. कालांतराने मनुष्यावरचे प्रेम कमी होऊ शकते.

प्रत्येक माणसाचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा असतो. जसा, ही गोष्ट वाचल्यावर मला वाटले की शिपायाने ९९ दिवस राजकुमारीच्या महालासमोर उभं राहून किती विचार केले असतील. त्यापैकी काही विचार, जी स्त्री लग्नापूर्वी मला इतक्या परीक्षा द्यायला लावते ती आयुष्यभर माझ्याकडून काय काय करायला लावेल
किंवा मी इतक्या खस्ता खात असता ती ९९ दिवसांत जराही विरघळली नाही म्हणजे तिचे माझ्यावर प्रेम कसे काय असणार? ९९ दिवस वाया घालवूनही शिपाई, राजकुमारीचं आपल्यावर प्रेम आहे याची ग्वाही देऊ शकत नाही आणि म्हणून कदाचित निघून जातो.

In any case, I agree with Alfredo. As a senior he must have seen and known Toto much more than Elena and probably that was the best decision he made at that point of time.

शैलेश श. खांडेकर said...

सुंदर लेख!

Tulip. said...

प्रेम-करिअर दोन्हींना शंभर टक्के एकावेळी? Don't think it's possible. निदान सुरुवातीच्या building up process मधे असताना तरी अशक्य वाटते. दोन्हीमधे commitments, demands ची सारख्याच तीव्रतेने मागणी असू शकते. प्रत्येकाची काय priority आहे त्याप्रमाणे दोन्हींपैकी एक काहीसे स्थिरावल्यावरच दुसर्‍याच्या भानगडीत पडावे. stabilty आल्यावर मग दोन्ही परस्परांना पुरक होऊ शकतील.
तरीपण अल्फ़्रेडोने केलेलं बरोबर की चूक ह्यात मतविभिन्नता होऊ शकते. एकाच्या आयुष्याचे निर्णय दुसर्‍या कोणी कां घ्यावे? टोटोच्या आयुष्याची प्रायॉरिटी त्याने स्वत: ठरवायला हवी होती असे मला वाटते.

छान लिहिलं आहेस!

Monsieur K said...

@Priya,
I like your interpretation of the word 'Paradiso' - it fits the bill perfectly! :)
I referred to wordreference.com, and my guess was right - the word actually means 'Paradise'.

Yup, having the perfect balance between love & career indeed seems to be a Herculean task, if not impossible. Unfortunately, I dont have any first-hand experience as yet. :)

Aani ho! I think its time I stop reading fairy tales at the moment. :D

@ Shailesh,
I'm glad that you liked this. Thanks a lot also for your kind words on Orkut.

@Tulip,
Agdi barobar! Giving 100% to both is indeed very very difficult. And that is where mutual understanding, respect & trust come into play into the relationship - easy words to say & flowery language to write, but maybe, an actual challenge to put into practice.

The next question is how does one define "stability" in both career & love, when both are ever-evolving. Guess that would again depend on the 2 individuals in the relationship, how they define it.

I agree with you that Toto should have decided his life's priorities himself. However in the context of the movie, where he is shown as a heart-broken 17-18 year old with raw talent, I think Alfredo took the decision for him simply because he wanted Toto to succeed in life, and not waste his life there, sitting in a projection room all his life (something that Alfredo himself did and was unhappy about it).

Dont we often see this happening around us? Parents or well-wishers appearing to give 'guidance' to teenaged souls when what they really want is seeing those youngsters achieving their own unfulfilled wishes & aspirations.

Just because this happens, I am not saying it is right - the decision finally has to remain with the individual. Sadly at that point in life, most souls are often confused & unable to decide for themselves.

Maybe, this is where the time frame comes into play - Toto left his town way back in 1954, whereas Good Will Hunting is set in the 90s.

We probably enjoy a lot more freedom as compared to earlier generations when it comes to choosing what we do in our life.

Thanks again for your comments.

HAREKRISHNAJI said...

छान.

Monsieur K said...

Thanks Harekrishnaji :)