यूहीं चला चल राही, यूहीं चला चल.
टॅम्पाहून शिकागोची फ्लाईट होती माझी. एक तर माझी आवडती window seat मला मिळालेली, आणि उसके उपर घरी पुण्याला चाललो होतो, म्हणुन मनोमनी मी खूप खुष होतो. मी माझ्या जागेवर छानपैकी settle झालो असतानाच, एक middle-aged couple विमानात आलं, आणि काकांनी मला सीट adjust करायची request केली. त्यांनी देऊ केलेली दूसरी सीट देखिल window seat असल्यामुळे, मी पण लगेच हो म्हट्लं. समोरच्या सीट मागच्या कप्प्यात ठेवलेली मासिकं चाळत बसलो होतो, तेव्हा बाजुच्या aisle मधुन कोणीतरी जात असल्याचे जाणवले.
डोळे वर करुन पाहिलं, तर मघाचे काका दुसऱ्या एका काकांना धरुन पुढे नेत होते. दुसऱ्या काकांना त्यांच्या बायकोनी मागुन धरले होते. ६ फूट उंचीचे आणि अजिबात पोट नसलेले ते काका mostly एका paralysis attack मधुन बरे होत होते - दुसऱ्याच्या मदतीने एकदम झपझप आणि छोटी-छोटी पावलं घेत होते; एकदा चालु लागले की स्वत: थांबणं त्यांना शक्य नव्हतं; तोंडातुन जीभ थोडी बाहेर होती आणि वाकडी होती; डोळे काहीसे निस्तेज होते, मानेवर डोकं अलगदरित्या हेलकावे देत होतं - त्यांची ही अशी अवस्था पाहुन, त्यांना मदत करणाऱ्या काकांनी त्यांच्या बायकोला विचारलं,
"तुमची सीट कुठे आहे?"
-"सीट 27D, 27E."
"ओह! मग आपण इथे पहिल्याच रांगेतल्या लोकांना request करुयात. काय हो, तुम्ही मागे बसता का?"
-"नो! मी ह्यांना घेऊन मागेच बसणार. तुमच्या मदती बद्दल धन्यवाद. पण हे इथे एकटे बसु शकणार नाहीत. आमचं दोघांचं रिझर्वेशन मागे आहे, आम्ही तिथेच एकत्र बसु. He cannot sit alone here. He needs me. I will take him from here. Thank you once again for your help."
आपल्या नवऱ्याला स्वत: एकटीच ती बाई मग पुढे घेऊन गेली. स्वत:च्या नवऱ्याबद्दल त्या बाईला किती प्रेम होतं - तो जरी हतबल झाला असला, तरी मी बरोबर असताना, माझ्या खेरीज त्याला दुसऱ्या कोणाची कशाला गरज पडेल - केवढा अढळ विश्वास होता तिचा आपल्या प्रेमावर! He needs me ह्या तीन शब्दात ती केवढं काही सांगुन गेली.
असंच आपली काळजी घेणारं, आपल्यावर निसीम प्रेम करणारं कोणीतरी आपल्या करता असावं, किंवा आहे - हा विचार सुद्धा केवढा सुखावणारा आहे, नाही का?
*********************************************************
स्थळ: लॉ कॉलेज टेकडीवरचा चतु:श्रींगीकडे जाणारा रस्ता
वेळ: सकाळी ८.३०-९ च्या सुमारास
तारिख: डिसेंबर २००६ च्या शेवटी कधीचीतरी
माझ्या लाडक्या टेकडीवरची धूळ उडवत मी चतु:श्रींगीच्या दिशेनी जात होतो. तसा उशिरच झाला होता मला, त्यामुळे फारसं कोणी नव्हतंच टेकडीवर. हं, तसं ARAIच्या अलिकडे मला खो-खो खेळणारे काही उत्साही मंडळी दिसलेले. चतु:श्रींगी जवळ तारेचं एक कुंपण आहे. डिसेंबर महिन्यातली गार हवा छानपैकी खात-खात, माझं लक्ष्य त्या वाऱ्यावर खेळणाऱ्या काही पक्षांकडे गेलं. हवेतच ते २-४ पक्षी पकडा-पकडी खेळत होते; कधी खाली, कधी वर; कधी तारेच्या कुंपणावर बसत होते; कधी झाडाच्या एखाद्या फांदीवर; तर कधी खालच्या गवतावर - त्यांच्या उडण्याला कोणती दिशा घ्यायची, किती वेग घ्यायचा ते फक्त त्यांचं त्यांनाच माहिती होतं, किंवा कदाचित ते सुद्धा ते वारं पाहुनच ठरवत असतील... कुंपण असुन सुद्धा ते त्यामुळे बांधलेले नव्हते... एकाच गोष्टीची शाश्वती होती, ती म्हणजे अंधार पडल्यावर ती आपापल्या घरट्यात परतणार...
त्या पक्षांची भरारी पाहुन मला माझीच गंमत वाटली. २००६ सालाची सुरुवात मी राजस्थानमध्ये भिलवाडाला जाऊन केलेली. तिथे जेमतेम ८ दिवस राहिलो ना राहिलो, तिथुन तडक फ्लोरिडा गाठलं. तसं पाहता फ्लोरिडामध्ये अख्खं एक वर्ष झालं (गेल्या ३ वर्षात एकाच ठिकाणी राहण्याचा हा सर्वात जास्ती कालावधी आहे माझ्या करता) - पण ह्या एक वर्षात न्युयॉर्कमधे Empire State Building, Statue of Liberty, Broadway आणि Times Square; Connecticut मधे Gillette Castle; एप्रिल मधे Miami ATP Tennis Masters Final मधे Roger Federerची मॅच; Belleayre ला snowboarding; बोस्टनला पाहिलेलं Quincy Market, MIT आणि Harvard; न्यु हॅम्पशायरचे फॉल कलर्स; फ्लोरिडामधे Labor day weekend ला Myakka River State Park आणि Orlandoचा गणेशोत्सव; Thanks-giving ला Miami आणि Key West; Oregonमधे Portlandचे Rose Garden... आणि वर्षात दोन वेळा झालेली India trip...
माझ्या प्रवासाला कोणती दिशा कधी मिळेल, काय वेग असेल - हे सांगणं खरंच अवघड! पण ही उडाण, ही भरारी मी मनसोक्तपणे enjoy केली... अंधार पडण्या अगोदर मी देखिल माझ्या घरटी परत जाईल... कधीतरी एखादं नविन घरटं मी पण माझं-माझं बांधेल... जो पर्यंत ह्या उरात उडण्याची आणखिन उमेद आहे, तो पर्यंत मी असाच उडत राहील...
२००७ची सुरुवात अशीच दिमाखात झाली आहे. पुण्याहून मुंबई, आणि मुंबईहून थेट UK मध्ये Durham ला भावाकडे जाऊन फ्लोरिडाला परत आलो आहे. UKची ही माझी पहिलीच ट्रिप होती - आणि मुख्य म्हणजे तब्बल ६ महिन्यांनी भावाला भेटत होतो - तो जिथे शिकत आहे, ते Durham म्हणजे अगदी छानसं old university English town होतं. २-३ दिवस हे फारच कमी वाटले तिथे... त्या २-३ दिवसांबद्दल पुन्हा कधीतरी लिहिन...
The new year has indeed started with a bang, let us see to which all places it takes me.
The woods are lovely, dark & deep,
And I have miles to go before I sleep.
ह्याच रस्त्यात प्रत्येकाला कोणीतरी कधीतरी कुठेतरी भेटेलच, ज्या व्यक्तीला आपण म्हणु शकु,
"I need you."
यह रास्ता हैं कह रहा अब मुझसे,
मिलने को हैं कोई कहीं अब तुझसे,
दिल को हैं क्यों यह बेताबी,
किससे मुलाकात होनी हैं,
जिसका कबसे अरमान था,
शायद वही बात होनी हैं
यूहीं चला चल राही,
यूहीं चला चल.
3 comments:
पोचलास का केतन? खूपच झालं की तुझही उडणं गेल्या वर्षी. आणि शिवाय दोनवेळा भारतवारी! वा वा!
पोस्ट छानच झालय. मला एक मराठीत शुभेच्छा पत्र मिळालं तिकडे गेले होते तेव्हा. त्यातल्या ओळी तुझं हे पोस्ट वाचून तुला Forward करते इथेच नव्या वर्षाच्या शुभेच्छांसहीत.:D
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे?
बांधता येईल केव्हाही
क्षितिजाच्याही पलिकडे झेप घेण्याची जिद्द असावी!
Tulip,
Thanks for your wishes. :)
Those lines are definitely inspiring - I hope the horizons expand even further in 2007.
Wish yu a wonderful 2007 too!
~Ketan
hey ekdam refreshing ahe..
Post a Comment