त्रिवेंद्रम रेल्वे प्लॅटफार्म वर समीर जवळ-जवळ दोन तास येर-झाऱ्या घालत होता. दुपारी १ वाजता येणारी बंग्लोर एक्सप्रेस २:१५ झाले तरी अजुन आली नव्हती. भुकेनी जीव कासावीस, आणि त्यावर ही ट्रेन लेट! नाही म्हट्लं तरी स्टेशन समोरच्या कॉफी हाऊस मध्ये एक मसाला डोसा ऑर्डर केला होता - पण मसाला डोस्याच्या भाजीमधे बीट पाहुन समीर जाम वैतागलेला. मग डोसा तसाच अर्ध्यावर सोडुन, कॉफीच्या निव्वळ एका कपावर जीव निभावुन स्वारी तडक प्लॅटफार्मवर आली होती, तर ट्रेनचा पत्ताच नाही.
शेवटी देवालाच दया आली की काय कोण जाणे, पण एकदाची ती आकाशवाणी झालीच,
"यात्री क्रिपया ध्यान दे - बंग्लोर जानेवाली ६५२५ बंग्लोर एक्स्प्रेस थोडेही समय में प्लॅटफार्म क्रमांक २ पर आ रही हैं. इस गाडी के डिब्बों का अनुक्रम कुछ इस प्रकार हैं..."
आपली हॅवरसॅक खांद्यावर पुन्हा एकदा खेचत, समीरनी कॉफीचा तो प्लॅस्टिक कप चेपुन बाजुच्या कचऱ्याच्या डब्याच्या दिशेनी फेकुन दिला. गाडीत शिरताना दरवाज्यावर जो printout लावला होता, तिथे रिझर्वेशन लिस्ट मधे त्याचं नाव होतं हे पाहिलं, आणि लगेच डब्यात शिरला. एकटा प्रवास करताना, ४ अनोळखी लोकांच्यामधे बसुन प्रवास करायचा - हे जरा त्याला मान्य नव्ह्तं - त्यामुळे, खिडकीच्या बाजूची, Side Upper - अशी मनासारखी सीट मिळाल्यामुळे समीर थोडा सुखावलेला.
"चला, आता कोणाची किट-किट नाही.. ही खालची सीट रिकामी आहे... हवं तितका वेळ वर झोपता येईल, वाट्टेल तेव्हा खाली खिडकीत बसता येईल - प्रायव्हसी पण आणि मजा सुद्धा! और क्या चाहीये!"
असा विचार मनात करत असतानाच, बाजुच्या ६ सीट्सच्या कम्पार्टमेंटमधल्या चर्चेकडे त्याचं लक्ष गेलं. एक पन्नाशीचे काका पंचवीशीतल्या एका मुलीला विनंती करत होते,
"मॅडम, क्या आप प्लीझ उस सीट पर जा सकती हैं? वो सीट खाली हैं... हम फामिली एक साथ जा रहे हैं... वो विंडो सीट हैं... TT आयेगा तो हम उससे बात करेंगे.. प्लिझ स्वल्प adjust माडी!"
२ मिनिटा नंतर ती मुलगी समीरच्या समोरच्या सीटवर स्थानापन्न झाली. ती तिथे बसताच - कसली प्रायव्हसी न कसली मजा - कुठं आपलं डोकं आपटु, असं समीरला वाटायला लागलं. ती मुलगी पण आधी थोडंसं "ह्यात माझी तरी काय चूक?!"च्या भावनेनी पहात होती.. पण त्याचा नाखुश चेहरा पाहुन तीनी पण, "आता ही माझी सीट आहे"च्या अभिमानाच्या आर्तभावनेनी आपली नज़र खिडकीबाहेर फिरवली.
त्रिवेंद्रम शहर सोडुन ट्रेन तिच्या नॉर्मल स्पीड मधे धावु लागलेली.. रुळांवर धावणाऱ्या ट्रेनच्या आवाजाचं तेच-ते पॅटर्न समीरच्या कानात घुमु लागलं...दोघं काहीच बोलत नव्हते.. खिडकीतुन ती बाहेरचं निसर्गसौंदर्य न्याहळत होती... केरळ तसं सुंदरच वाटलेलं समीरला - उंच, उंच नारळाची झाडं, बॅकवॅटर्स वर केंद्रित तिथली जीवनशैली, पाण्यानी भरलेले पॅडी फील्ड्स... पश्चीमेला अरबी समुद्र, तर पूर्वेला सह्याद्री पर्वत रांग... कुठे ठेकडी आणि मुन्नारचे नेत्रदीपक वनसौंदर्य, तर कुठे गुरुवायुरच्या मंदिरात शेकडो भाविकांसमोर विष्णुच्या सुवर्णमूर्तीची हत्तीवरुन पालखी.. कधी वरकलाच्या समुद्र किनाऱ्यावर पाहिलेला सूर्यास्त तर कधी भल्या पहाटे कन्याकुमारीला उसळणारा अथांग हिंद महासागर... खिडकीतुन जणु गेल्या ८ दिवसातली केरळ आणि कन्याकुमारीची अख्खी ट्रिप दिसत होती... तशी ही ट्रिप unplanned होती, ते एका अर्थानी बरंच झालेलं.. फक्त जायची आणि यायची तारिख ठरलेली... त्यामुळे ह्या ८ दिवसात मनसोक्तपणे, समीर इकडे-तिकडे भटकलेला... खिडकीतुन येणाऱ्या बेभान वाऱ्यानी डोळे मिटु लागले, तसा तो वरच्या बर्थवर झोपायला गेला... नाहीतरी सह-प्रवासी बोलण्याच्या मूड मधे नव्हतीच...
आपण किती वेळ झोपलो हे कळलं नाही, पण सॉलिड भूक लागली आहे, हे मात्र समीरला उठल्या-उठल्या जाणवलं. हॅवरसॅक मधे ना बिस्कीटाचा एखादा पुडा होता, ना काही केळाचे वेफर्स. साधी एक पाण्याची बाटली सुद्धा घ्यायला आपण कसे विसरलो. स्वत:वर चिड-चिड करत समीरनी खाली एक नज़र टाकली.
त्याची सहप्रवासी छानपैकी खालच्या बर्थवर settle झालेली - अंगावर एक चादर ओढलेली, आणि हातामधे एक जाडं-जुडं पुस्तक वाचायला घेतलेलं. डोळ्यांवर एक सानिया मिर्झा स्टाईल चष्मा पण चढवलेला. खिडकीतुन वाहणाऱ्या वाऱ्यावर तिचे लांब केस हलकेसे उडत होते. खिडकीचे बार्स संधीप्रकाशात चमकत होते. मधेच तिच्या लांब निमुळत्या बोटांनी ती पुस्तकाचं पान बदलत होती, किंवा डोळ्यावर येणारा एखाद-दोन केस मागे सरकवत होती. का कोण जाणे, पण ते करताना मनोमनी समीरला ती "अनामिका" फारच मोहक वाटली. आधीच आपण तिला लई खुन्नस दिली, आता तिला आणखिन कुठे disturb करा, अशा सात्विक विचारानी समीर वरच्या बर्थवरच पडुन राहीला. बॅगेतुन डिस्कमन काढला, आणि निवांतपणे किशोर कुमारची गाणी ऐकत तो वरच्या पंख्याकडे पाहु लागला. मधे एक कॉफीवाला आला, तेव्हा लगोलग त्याच्याकडुन एक गरम-गरम कप घेतला. कप घेताना अनामिके बरोबर नज़र मिळाली, तेव्हा समीरने एक कोलगेटवाली million dollar smile दिली. आणि प्रतिसाद म्हणुन, अनामिकेनी तिचं पुस्तक डोळ्यांच्या आणखिन जवळ आणलं. "श्या! अपना तो बॅड लक ही खराब हैं!" म्हणत समीर पुन्हा वर पंख्याकडे बघु लागला. तेव्हा अनामिकेनी हळुच तो परत आपल्याकडे पहात आहे का, हे त्याला नाही दिसलं.
रात्रीचे ८-८:३० वाजले तशी ट्रेन थ्रिस्सुर स्टेशनवर थांबली. समीरला कडाडुन भूक लागली होती, प्लॅटफार्मवर काय मिळते, हे पहाण्याकरता तो खाली उतरला, तेव्हा अचानक,
"Excuse me! Are you getting down on the platform?"
- "Yeah! Do you want anything?"
"Yes. Actually, I am hungry. But I dont want to get down. Could you please get me a pack of Goodday biscuits?"
- "Sure! No problem at all!"
आयुष्यात ह्या मुलींना काय प्रॉब्लेम असतो - स्वत:ची कामं स्वत: करावी हे ह्यांना कोण शिकवणार; बिच्चारी, दमली असेल कदाचीत, किंवा बरं नसेल तिला - अशा परस्परविरोधी विचारातच समीरनी इडली-चटणी, वेफर्स, पाण्याच्या बाटल्या, गुड-डे बिस्किटं विकत घेतली आणि परत आला. सीटवर बघतो तर अनामिका तोंड धुवुन, केस विंचरुन, अगदी नीट आवरुन बसली होती.
अच्छा! म्हणजे हिला आवरायचं होतं म्हणुन ही खाली उतरली नाही, आणि आपल्याला उगिचच वाटलं की बरं नाही बिचारीला. काय ह्या पोरी?!?!?!?
"Thank you so much! But I will have only the biscuits."
- "अरे, have some idlis. They are fantastic."
"No thanks! Actually, I dont eat anything from outside."
चायला! नाटकंच जास्ती! गुड-डेची बिस्कीटं जणु हिच्या घरच्या फॅक्टरीतुनच आली आहेत. ठीक हैं, हमको क्या? नहीं खाना हैं, मत खाओ! हमको तो बहुत भूक लगी हैं!
गाडी सुरु झाली आणि रात्रीचा वारा वाहु लागला तशी ती दोघं आणखिन खुलली, आणि दुपारच्या अबोल misunderstandingच्या जागी एका नविन मैत्रीचा सुसंवाद सुरु झाला.
अनमिका: "Thanks again for the biscuits. I would have got down, but I am always afraid that I will miss the train."
समीर: "No problem at all - the pleasure is all mine." म्हणजे मी ट्रेन मिस्स केली असतं, तर काय फरक पडला असता.
A: "You do not look like you are from Kerala or Bangalore."
S: हो, मी मुंबईचा आहे. तुम्ही कुठल्या?
A: "I am actually from Mysore. But I work in a medical research institute at Trivandrum. What about you?"
S: (अरे वाह! ही पोरगी फक्त दिसायलाच छान नाही, तर हुशार पण आहे वाटतं.) मी IISc Bangalore मधे PhD करतो आहे, मधे ८ दिवस सुट्टी मिळाली म्हणुन केरळ-कन्याकुमारी ट्रिप मारली.
A: "Wow! That is amazing."
S: (काय amazing आहे - मी PhD करतो आहे ते, का ट्रिप मारली ते?)
A: "This place is a paradise - beautiful beaches, sylvan forests, mesmerising mountains, breathtaking backwaters - the culture & heritage, the people & their customs, the food & the air - no wonder this place is known as God's own country."
S: हो! मी आधी कधीच इथे आलो नव्हतो. पण तु म्हणतेस तसं हा प्रदेश नैसर्गिक द्रुष्टीने खरंच खूप सुंदर आहे.
A: "To tell you frankly, when I first saw you, I thought you are one of those nerdy software engineers from Bangalore. I dont know why, but I really hate those creatures - they probably never know that there exists a world beyond theirs."
S: खरं आहे. IT मधे माझे काही मित्र आहेत - त्यांच्याकडे पाहुन मला कधी-कधी प्रश्न पडतो - US, Europe किंवा Japan सोडा, पण आपल्याच देशातल्या नविन-नविन जागा, नाना प्रकारच्या संस्कॄती, रंग-बिरंगी जीवनशैली, वेग-वेगळे अनुभव - ह्या सगळ्याशी समरस होण्याची संधी त्यांना कधी मिळेल का?
A: "True. To some extent, even I find my job limiting myself to a typical lifestyle. What about you? As a student, do you get time to explore?"
S: तसं पाहिलं तर विशेष काही नाही. पण दर वर्षी मी कुठे ना कुठेतरी जातो, अशा ठिकाणी जे मी आधी कधी पाहिलं नाहिये.
A: "So where have you been to?"
S: खूप असं नाही, पण सिक्किम, राजस्थान आणि आता केरळ-कन्याकुमारी. अजुन लेह-लदाखला जायची इच्छा आहे - बघु कधी chance मिळतो.
A: "Wow! That is so nice. I wish I could also go to such beautiful places."
S: का नाही? तुला पण संधी मिळेलच. तु कुठे गेली आहेस?
A: "Yeah. I hope I do. I have been to..."
अशाच त्यांच्या गप्प रंगत गेल्या - पाहिलेली प्रेक्षणीय स्थळं, आवडती पुस्तकं, आप-आपले छंद, आवडलेले सिनेमे, गाणी; कधी रात्रीचे १२-१२:३० झाले दोघांना कळलंच नाही. अनामिका जांभई द्यायला लागली, तसं समीरला जाणवलं की आता उशीर झाला आहे. तिला बाय-बाय, गुड-नाईट करुन तो वर आपल्या बर्थवर पुन्हा झोपायला गेला. झोप येत नाही म्हणुन पुन्हा डिस्कमन सुरु केला, आणि अधुन-मधुन चोरुन खाली झोपलेल्या अनामिकेकडे तो पहात होता. किशोरचं गाणं सुरु झालं, आणि त्याला मनोमनी हसु आलं,
एक अजनबी हसीनासे,
युं मुलाकात हो गयी,
फिर क्या हुआ, यह ना पूछो
कुछ ऐसी बात हो गयी...
"अरे बेटा, ऊठो! बंग्लोर आ गया हैं!" समोरच्या त्या ६ लोकांच्या कंपार्टमेंटमधले काका समीरला उठवत होते. "कैसा लडका हैं यह, कल दोपहर ३ बजे त्रिवेंद्रम छूटते ही सो गया, वह सीधा आज सुबह ८ बजे ऊठ गया!"
ट्रेन मधुन उतरुन समीर चालु लागला, तसा त्याचा सेल-फोन वाजला,
"Yes boss! I am back - will be in office by 10, and then fix the bugs in my code."
आपल्याला भेटलेल्या का न भेटलेल्या अनामिकेबद्दल विचार करत समीर पुढे चालत राहिला, आणि कानात किशोर गात होता -
ख्वाब हो तुम या कोई हकिकत,
कौन हो तुम बतलाओ,
देर से कितनी दूर खडी हो,
और करीब आ जाओ...
Posted by
Monsieur K
on Tuesday, November 14, 2006
/
Comments: (2)
तोच चंद्र नभातला...
कोजागिरी पौर्णीमेची रात्र होती ती. सलिल आणि निशा छानपैकी गच्चीवर कापडी आरामखुर्चीत बसले होते. हवेत मस्त गारवा होता. निशानी दोघांकरता गच्चीवर मसाला दूधाचे ग्लास आणले होते. नारळाच्या पोफळ्यांमधुन पौर्णीमेचा तो चंद्र पहात असताना, निशानी एकदम विचारलं,
"सलिल, हा क्षितिजावरचा चंद्र नेहमी एवढा भव्य का दिसतो रे?"
मसाला दूधाच्या ग्लासवर लक्ष केंद्रित असलेल्या सलिलनी अगदीच प्रॅक्टीकल उत्तर दिलं,
"अगं, क्षितिजावरचा चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ असतो ना... मग तो मोठाच दिसणार..."
"काय रे सलिल! ते तर मला पण माहित आहे... त्या व्यतिरिक्त काही कारण असेल तर सांग.."
मॅडमना नक्की काय उत्तर अपेक्षित आहे, हे न उमगल्यामुळे, सलिलनी आपला ग्लास थोडा बाजुला ठेवला,
"सुनो! यह जो चांद हैं ना चांद, यह दिन में नहीं निकलता. यह रात में निकलता हैं..."
"अरे सलिल! त्या संजीव कुमारची नक्कल नको करुस. मी काय विचारलय ते सांग ना प्लीझ.."
"उम्म्म्म.. तुला नक्की काय म्हणायचं आहे निशा?"
"अरे म्हणजे! अत्ता हा चंद्र क्षितिजावर किती मोठा वाटतो, किंचीत पिवळट, खरं म्हणजे क्रीम कलरच.. त्याच्यावरचे डागसुद्धा दिसत आहेत...उडी मारली तर लगेच हात लावता येईल त्याला, असं वाटतं.. थोड्या वेळानी हाच आकाशात भ्रमण करत आपल्या दूर जाईल, आणि मग आकारानी काहीसा लहान, पण जास्ती गोलाकार.. प्रकाशानी काहीसा जास्ती शुभ्र.. आणि त्याच्यावरचे डागसुद्धा एवढे दिसत नाहीत.. खरं म्हणजे, चंद्र तोच.. आपली नजर देखिल तीच.. तरी हा फरक का?"
"खरं आहे निशा तुझं म्हणणं. जे जवळ असतं, ते कितीही सुंदर असलं तरी त्यातले डाग आपल्या पासुन लपत नाहीत. एका उडीत आपल्याला ते हस्तगत करता येतं, त्यामुळे ती उडी मारण्यात काहीच मजा येत नाही आपल्याला. पण कालांतरानी तीच गोष्ट जर आपल्यापासुन लांब गेली, की मग ती जास्त आकर्शक वाटते. त्या वेळेस आपण कितीही उड्या मारल्या तरी आपले हात तिच्या पर्यंत कधीच पोचणार नसतात..."
"काय रे सलिल? किती डिप्रेसींग बोलतोयस!"
"निशा, मी खरं तेच बोलतोय..."
"अरे असं पण शक्य आहे की दिवसभर जगातले सगळे मनुष्य-प्राणी आपापल्या कामात दमुन जातात. सूर्यास्ताला सूर्याकडुन चंद्र ह्या जगाची संपूर्ण जबाबदारी घेतो. त्याचा पिवळट रंग जणु ह्या जगाच्या समस्या आणि दु:खाच्या सहानुभुती करता असतो. तो जवळ आहे म्हणुन आपण उडी मारुन आपल्या सगळ्या व्यथा, सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवुन देतो. त्याच्या वरचे डाग जणु दिवसभराच्या जगाच्या कष्टांचे प्रतिक असतात. जसं-जसं चंद्र आपल्या शीतल छायेची जादूची कांडी फिरवतो, सगळे लोकं आपली दु:ख आणि आपले कष्ट विसरुन पुन्हा हसु लागतात. म्हणुनच चंद्र जास्ती पांढरा शुभ्र दिसतो. थोडं दूर जाऊन तो ते डाग लपवुन ठेवतो, म्हणजे सगळी माणसं त्यांचे कष्ट तात्पुरतं का होईना, पण विसरतील..."
"म्हणजे आपण आपले कष्ट, दु:ख, समस्या नेहमी करता लपवुनच ठेवायच्या का?"
"नाही रे. तो चंद्र रात्रभर आपल्या करता ते ओझं वाहतो, म्हणजे आपल्याला निश्चिंतपणे झोपता येतं. तो बिचारा तर आकारानी लहान होतो त्या ओझ्यापायी! रोज रात्री तो पण सूर्याची वाट पहात असतो. सुर्याची पहिली किरणं पडता क्षणीच, त्याला माहित असतं की आपली शक्ती आपल्याला परत मिळाली आहे. आपण पुन्हा ताजे-तवाने झालो, की तो झोपी जातो.. पुन्हा रात्रीच्या ड्युटीला हज़र व्हायला... महिन्यातुन एकच रात्र सुट्टी घेतो, तेव्हाच तर ह्या जगाला त्याच्या सर्व समस्या, सर्व दु:ख, सगळे कष्ट नकोसे वाटतात..."
"बीच में अमावस आती हैं ना.. यूं तो अमावस..."
"अरे काय रे सलिल.. पुन्हा तुझा संजीव कुमार मधे-मधे डोकं काढतो..."
तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत, सलिल म्हट्ला,
"ओके, ओके! नो जोक्स... निशा, खरं सांगू...ह्या जगाला चंद्राची गरज असेल, पण माझ्या करता तु आहेस, तेवढंच पुष्कळ आहे..."
"इश्श, सलिल! तु म्हणजे ना!"
सलिलच्या खांद्यावर निशानी कधी आपलं डोकं टेकवलं कळलंच नाही.. दोघं त्या चंद्राकडे बराच वेळ नुसते पहातच राहिले... आणि सलिल गुण-गुणु लागला, तसं निशा हळुवार लाजली...
चौधवीं का चांद हो,

या आफ़ताब हो,
जो भी हो तुम खुदा की कसम,
लाजवाब हो...
Posted by
Monsieur K
on Thursday, November 09, 2006
/
Comments: (5)
शब्द, भावना आणि व्यक्तिमत्व
लहानपणी शाळेत असताना परीक्षेत नेहमी एक प्रश्न असायचा,
"निम्नलिखित मुहावरों का एक-एक वाक्य में उचित प्रयोग कीजीये".
हिंदी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत जसा हा प्रश्न असायचा, तसाच एखादा प्रश्न मराठी आणि फ्रेंचच्या पेपर्स मधे पण असायचा. भाषा कोणतीही असो, शब्दांचा एखाद्या वाक्यात अर्थपूर्ण वापर, हे नेहमीच एक भलं मोठं आव्हान असायचं.
शब्दातुन केवळ वाक्य-निर्मितीच नाही, तर त्या ठरावीक शब्दातुन कोणती भावना व्यक्त होते, हे पण तितकच महत्त्वाचं!
अगदी दोन साध्याच भावना घ्या ना - दु:ख आणि सुखाच्या भावना, ज्या आपण आपल्या रडण्यानी किंवा हसण्यानी व्यक्त करतो. पण ह्या रडण्याला आणि हसण्याला काही क्रिया-विशेषण (adverb) शब्द जोडले की त्या मागची भावना आणखिनच स्पष्ट होते.
उदाहरण द्यायचे झाले, तर "मुसु-मुसु" रडणं आणि "ढसा-ढसा" रडणं - दोन्ही रडणंच हो! "रडणं" हा शब्द एकच, पण त्या बरोबर जोडलेल्या "मुसु-मुसु" किंवा "ढसा-ढसा", ह्या विशेष शब्दामुळे त्या रडण्याच्या भावनेची तिव्रता कळते.
म्हणजे दु:ख लहानसं असलं, की वाक्य रचना अशी काही असते,
उदा.: अचानक बाहेर पाऊस पडायला लागल्यामुळे क्रिकेट खेळायला नाही मिळालं म्हणुन लहान पोरांची टोळी "मुसु-मुसु" रडायला लागली.
मग त्याच पावसात ओलं-चिंब मनसोक्त भिजलं, कागदी होडया पाण्यात सोडल्या, चहाच्या पाण्यात उड्या मारल्या, आणि २-३ तासानी शिंकत-शिंकत घरी परत आलं की आईच्या हातचा पोटभर मार खालला की तिच पोरं अगदी "ढसा-ढसा" रडायला लागतात!
आता तुम्हीच सांगा, "ढसा-ढसा" रडणं हे "मुसु-मुसु" रडण्यापेक्षा लाखपटीचं दु:ख, नाही का?
प्रत्येक वेळेस हे विशेष शब्द फक्त त्या भावनेची तिव्रताच दर्शवत नाहीत, तर त्या शब्दातुन एखादं व्यक्तिमत्व देखिल समोर येतं. मग शब्दातुन भावना आणि व्यक्तिमत्व दोन्ही साकार करायचं, असं दुहेरी आव्हान उभं राहतं!
एक उदाहरण द्यायचं म्हट्लं तर "फिदी-फिदी" हसणं आणि "खदा-खदा" हसणं! का कुणास ठाऊक, पण "फिदी-फिदी" म्हट्लं की हसणारी व्यक्ती ही एक अति हुशार, गर्विष्ठ शाळकरु मुलगी, असं मला तरी वाटतं. ती मुलगी कशावरुन "फिदी-फिदी" हसेल, हे सांगणं महा-कठिण आहे; "फिदी-फिदी" हसण्याचे वाक्प्रचार परीक्षेत असं काही होऊ शकतं,
सोनलच्या शाळेतले वडगावकर मास्तर त्यांचा स्वत:चा चष्मा घरी विसरुन, चुकुन त्यांच्या बायकोचा चष्मा घेउन आल्यामुळे, फळ्यावर काय लिहिले आहे हे वाचताना त्यांची झालेली तारांबळ बघुन सोनल "फिदी-फिदी" हसली!
असं वाक्य परीक्षेत लिहिलं, की त्या वाक्याचं निरिक्षण / विश्लेषण केल्यावर पुढिल निष्कर्ष आढळतात,
१) ते वाक्य इतकं भलं-मोठं असतं की ते वाचुन झाल्यावर त्या सोनलची किंवा तिच्या वडगावकर सरांची अख्खी जीवन-कहाणी वाचल्या सारखं वाटतं.
२) "सोनल" ह्या नावाच्या आधी काहीतरी खोडलेलं असतं. खरं म्हणजे आधी सुचलेलं नाव "सोनाली" असतं (इयत्ता ४थी किंवा ५वीत शिकणाऱ्या त्या विद्यार्थ्याची त्याच्या वर्गातल्या ज्या मुलीशी जबरदस्त खुन्नस असते, तिचं नाव बहुतेक "सोनाली" असतं) - पण हे नाव "सोनाली" आहे का "सोनालि" हे कोडं न सुटल्यामुळे शेवटी "सोनल" वर compromise केलेला असतो, आणि "सोनालि/सोनाली" खोडलेलं असतं.
३) वडगावकर सर इंग्रजी शिकवतात, आणि मराठी नाही - त्यामुळे त्यांनी हे वाक्य वाचण्याची शक्यता नाही - ही अतिमहत्त्वपूर्ण काळजी विद्यार्थ्यानी घेतली असते. आणि ते चष्मा विसरले होते तेव्हा आपण हसल्यामुळे आपल्याला त्यांनी केलेल्या शिक्षेचा विद्यार्थ्यानी घेतलेला हा बदला असतो.
४) ती "सोनल" (खरं म्हणजे "सोनाली") "फिदी-फिदी" हसली, म्हणजे ती किती बावळट आहे (तिच्याशी खुन्नस आहे ना) - तरी पण ती हुशार असल्यामुळे सरांनी तिला शिक्षा केली नाही, आणि आपल्याला केली - आपल्यावर झालेला हा घोर अन्याय, आणि "सोनाली" किती बावळट आहे - ह्या एका वाक्यातुन अख्ख्या जगासमोर आपण सिद्ध केल्याचा एक आगळा-वेगळा आनंद विद्यार्थ्याला मिळालेला असतो.
ह्या उलट "खदा-खदा" हसणं म्हट्लं की मनात एक खातं-पितं, दांडगं व्यक्तिमत्व उभं राहतं.
उदा.: लहानपणी कुस्तीच्या मैदानात कौरवांना हरवल्यावर भीम "खदा-खदा" हसला.
पांडवांपैकी फक्त भीमच "खदा-खदा" हसु शकतो; नकुल-सहदेव "फिदी-फिदी" हसतील, नाहीतर "मुसु-मुसु" रडतील; युधिष्ठीर कधी हसेल, किंवा रडेल सांगणं खूप मुश्किल आहे, आणि अर्जुन हा कितीही मोठा योद्धा असला, तरी "खदा-खदा" हसणं हे गदाधारी भीमालाच जास्ती शोभुन दिसतं.
असा हा शब्दांचा खेळ - भावनेनुसार, व्यक्तिमत्वानुसार बदलणारी शब्दांची एक अजबच खेळी. लहानपणी परीक्षेतल्या एका प्रश्नानी सुरु झाली, ती आजवर आपल्या आयुष्यातल्या वेग-वेगळ्या परिस्थितीतुन आपली हौस-मौज रंगवणारी, सजवणारी.
कधी कधी असे पण प्रसंग येतात, की आपल्या भावना व्यक्त करायला आपल्याला शब्द अपुरे तरी पडतात, किंवा शब्द सुचत पण नाहीत. पण मग असं पण वाटतं, कदाचित त्या वेळेस ती नि:शब्द शांतताच त्या भावनेला अप्रुप होती. काही अशा व्यक्ती असतात, त्या भेटल्या की काय बोलु आणि काय नको, किती बोलु आणि किती नाही, असं होतं. शब्द आपोआप एकामागोमाग flow होत राहतात. आणि काही व्यक्ती अशा पण असतात, की त्या समोर आल्या की काय बोलायचं सुचत नाही... आणि मग त्यांना सांगायचं राहुनच जातं...
"Its only words,
and words are all I have,
To take your heart away..."

on Wednesday, November 01, 2006
/
Comments: (9)
आंब्याचा शिरा आणि...
गेल्या वीकेंडला मी पाककला क्षेत्रात नविन उच्चांक गाठला. शनवारी सकाळी उठल्या-उठल्या सवयी प्रमाणे गरम-गरम चहाचा कप ढोसत असताना, आज न्याहरी करता काय खायचं - हा टिपिकल वीकेंड प्रश्न पडलेला. रोजच्या सारखं कॉर्न-फ्लेक्स, ब्रेड किंवा बिस्किट was strictly off-limit - शेवटी वीकेंड स्पेशल काहीतरी हवंच, नाही का? आणि जरी सकाळचे ११ वाजले असले तरी न्याहरी करायलाच पाहिजे - कोणीतरी म्हट्लच आहे ना, "Breakfast is the most important meal of the day.".
काय काय साहित्य उपलब्ध आहे, आणि त्या अगोदरच्या वीकेंडला काय केलं होतं (पोहे/उपमा होतं कदाचीत) - त्यावरुन शिरा करायचा बेत ठरला.
उपमा करायचा असो किंवा शिरा - अगदी सोपं असतं हो! दोन्हीला रवा पाहिजे, बाकी प्रक्रिया more or less sameच असते. एका मध्ये मोहरी, उडदाची डाळ, मिर्ची, टोमॅटोची फोडणी, तर दुसऱ्यामध्ये बेदाणे, काजू, तुपाची धार सोडायची. एकात तिखट-मीठ, तर दुसऱ्यात दूध-साखर. एकाला सजवायचं ओल खोबरं, कोथिंबिर, लिंबू घेऊन, तर दूसरा पठ्ठ्या शिजत असताना केळ घातलं की सत्यनारायाणाचा प्रसाद झाला की तयार!
तर शिरा शिजवताना, अचानक मातोश्रींच्या मामीच्या हातचा आंब्याचा शिरा आठवला, आणि तोंडाला लई म्हणजे लई पाणी सुटलं! लगेच फ्रीज़ मधला मॅंगो पल्पचा कॅन बाहेर काढला. पहिल्यांदाच आंब्याचा शिरा करायचा प्रयोग होता तो, पण म्हणतात ना - "Fortune favours the brave". चव पाहताना, उगिचच साखर कमी झाली असं वाटत होतं, पण बाकीचे मित्र म्हटले की तु जरा जास्तीच गोडघाशा आहेस, साखर एकदम बरोबर आहे - त्यामुळे मी खाली मान घालुन, अगदी निमुटपणे, हातातला साखरेचा डबा परत त्याच्या जागेवर ठेवुन दिला.
आणि मग एखाद्या मुगल बादशाहच्या थाटामध्ये (अकबर, जहांगिर किंवा शाहजहानच म्हणा ना - औरंगज़ेब किंवा बहादुर शाह ज़फ़र नको हं!) एका बोल मध्ये तो आंब्याचा शिरा आणि त्या सोबत एक चमचा घेऊन, सोफ्यावर स्थानापन्न झालो.
"अहाहा! क्या बात हैं! सुख म्हणतात, ते हेच! जन्नत म्हणतात, ती हीच! शाही मेजवानी म्हणतात, ती हीच!" शिऱ्याचा एक एक घास घशाखाली जात होता, आणि मी स्वर्गसुख उपभोगत होतो. आडवा हात मारणं, फस्त करणं, बोटं चाटणं - हे सर्व काही करण्याचं भाग्य त्या ऐतिहासिक दिवशी लाभलं.
मग त्या संध्याकाळी इ-मेल, फोन, ओर्कुट वर 'मी आंब्याचा शिरा केला आणि खालला', अशी फुशारकी देखिल मारण्यात आली - जणु काही पानिपतची लढाईच जिंकुन आलो होतो! नाही म्हटलं तरी, there was a new found spring in the step.
रविवारी दुपारचं जेवण झाल्यावर, आज रात्री dessert करता काहीतरी sunday स्पेशल करायला पाहिजे, तेव्हा फ्रीज़ मध्ये ठेवलेला गुलाब-जामुन मिक्सचं पॅकेट दिसलं! दिवाळी करता ते पॅकेट घेऊन आलेलो, पण उभ्या आयुष्यात कधी गुलाब-जामुन केले नव्हते, फक्त दाबुन खालले होते, त्यामुळे दिवाळीच्या वेळेस ती रिस्क न घेता गुप-चुप रेडी-मेड मिठाई घेऊन आलेलो.
लेकिन इस बार, अपुन बडा chef बन गया था - अपुनने आंबा का शिरा बनाया था, फिर गुलाब-जामुन किस खेत की मूली!
पॅकेटच्या मागे रेसिपी वाचली - "अरे! कित्ती सोपं आहे! इसे पहले क्यों नहीं देखा." - असं म्हणत, सुरुवात केली.
छोट्या खलबत्त्यातून कुटलेला वेलदोडा घालुन साखरेचा पाक आधी तयार केला - त्या वेलदोड्याच्या गंधानीच जाम खुश झालो. चव घेतली आणि आपण एकदम authentic पाक तयार केल्याचं समाधान मिळालं! आता फक्त गुलाब-जामुनचे गोळे तयार करायचे राहिलेले.
गुलाब-जाम fry करायला शुद्ध तुपाचा डबा बाहेर काढला. माप घेऊन गुलाब-जामुन मिक्स एका बोल मध्ये घेतलं - थोडं मिक्स बाजुला ठेवुन दिलं. रेसिपीमध्ये सांगीतल्या प्रमाणे माप घेऊन पाणी घातलं, आणि ते मिक्स मळायला सुरुवात केली. कधी पोळ्या केल्या नाहीत आणि मळण्याचा पूर्वानुभव नसल्याने, हाताची बोटं एकदम चिकट-चिकट वाटत होती - म्हटलं थोडंसं पाणी ओतावं, म्हणजे छान मळता येईल.
आयुष्यात सत्य जाणण्याचे क्षण आधीच खूप थोडे असतात, आणि साक्षात्काराचे तर त्याहुनही कमी. बोटांवरचे मिश्रण सुटावे म्हणुन घातलेले पाणी जरा जास्ती झाले. मग त्या पॅकेटमध्ये उरलेले सगळं मिक्स घातलं, तरी पाणी थोडंसं राहिलंच त्या मिश्रणात! आता काय करायचं म्हणुन घरातल्या अन्य मान्यवरांना विचारण्यात आलं.
मान्यवर १: "इसमें और थोडा मिक्स डाल दो!"
मी: "ते मिक्स संपलय..."
मा. १: "फिर कुछ और हैं क्या, जो इसमें डाल सकते हैं?"
मी: "देखता हूं..."
थोड्या वेळानी मा. २ (जो शोधात मदत करत होता): "बेसन चलेगा?"
मी (विचार-मग्न): चालेल का? गुलाब-जामुन बेसनाच्या लाडु सारखा लागेल... नविन रेसिपी... "गुलाब-जामुन-बेसन लड्डु".. नविन पदार्था करता मी वर्ल्ड-फेमस होणार... दिवाळीच्या फराळात एक नविन गोड पदार्थ..."गुलाब-जामुन-बेसन लड्डु"....
मा. १ (आम्हा तिघांमध्ये त्यातल्या-त्यात पाक-कलेत निपुण): "अरे पागल हो क्या? बेसन नहीं डाल सकते... कुछ और देखो.."
थोडा वेळ कपाट आणि फ्रीज़ मध्ये शोधाशोध पुन्हा चालु झाली, डोक्यात विचार चालूच होते.. आणि मग माझ्या सुपिक डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.
विझलेला बल्ब एकदम अचानक पेटतो, अशा स्वरात मी: "मुझे लगता हैं, की जो पाक हैं उसमें शक्कर कम हैं (मला नेहमीच साखरेचा पाक कमी गोड आहे, शिरा कमी गोड आहे, in general सर्व गोड पदार्थ कमी गोड आहेत असं नेहमी वाटत असतं). अब मिक्स तो नहीं हैं, तो इसमें अभी शक्कर डालते हैं. क्या बोलते हो?"
मान्यवर २ मान हलवत मला होकाराचा प्रतिसाद देत होता, किंवा बहुधा "असेल बुवा, आम्हाला नाही माहीत"च्या थाटात मान हलवत होता.
तेव्हाच मान्यवर १ नी आपला निर्णय सुनावला, "क्या बात कर रहे हो! इसमें शक्कर डालोगे तो यह बिखर जायेगा. इसमें या तो खोवा डाल सकते हो, या फिर वही गुलाब-जामुन मिक्स."
घरात त्या दोन्ही पैकी काहीच नव्हतं. हताश होऊन मग ते मिश्रणाचं बोल फ्रीज़मध्ये परत ठेवुन दिलं.
मनात एकच विचार आला - आदल्या दिवशी ज्या शूर-वीर मराठयानी अटकेपार भगवा झेंडा फडकावलेला (आंब्याचा शिरा केशरी झाला होता, भगवा नाही), त्याच वीराचं आज गुलाब-जामुन समोर पानिपत झालं होतं.
आज २ दिवस झाले तरी त्या पानिपतच्या युद्धातील घाव अजुन भरले नाहीयेत. पण हिम्मत अजुन कायम आहे. धराशायी पडलेल्या ह्या खंद्या वीरानी कालच पुन्हा एकदा गुलाब-जामुन मिक्सचं नविन पॅकेट आणलं आहे. जेव्हा त्या जखमा भरतील, तेव्हा म्यानातुन तलवार पुन्हा एकदा बाहेर पडेल, आणि शत्रुपक्षावर तुटुन पडेल. विजय आपलाच होणार, असा आत्मविश्वास तर आहेच, बघुया पुढे काय होतं ते...