"नेहमी डोक्याने विचार करु नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या दोळ्यांना
स्वप्नाचा गाव द्यावा."
~ मी माझा, चंद्रशेखर गोखले
एका वेडया मनाची आणी एका व्यवहारी डोक्याची अजन्म चाललेल्या द्वंद्वाची एक कहाणी. स्वप्नांच्या गावाचे खरे अस्तित्व कुठेशी आहे, ते ह्या मनाला ठाउक नाही, तरी देखील भरकटलेल्या विचारांच्या सहाय्याने तो आपले प्रयत्न चालु ठेवत आहे.