वर्ष होतं १९७८.. जेव्हा त्याचा जन्म झालेला.. आणि जन्म होताच वडलांनी ऐलान केलं, की आपला मुलगा इंजिनियर होणार..
२२ वर्ष उलटली.. मुलगा इंजिनियर झाला.. त्याच्या बरोबरचे बरेचसे अमेरीकेला जात होते.. तो पण जात होता..
जायच्या दोन दिवस आधी वडलांनी मोठी जंगी पार्टी दिली तो अमेरीकेला जात होता म्हणुन..
पार्टी संपल्यावर तो मित्राबरोबर रात्री उशिरा पर्यंत गप्पा मारत बसला.. बोलता-बोलता, तो मित्राला म्हट्ला,
"खरं म्हणजे मला काही इन्टरेस्ट नाही इंजिनियरींग मधे.. मला स्वत:चं रेस्तरॉ टाकायचं आहे.. पण आता शक्य नाही.. बाबांची इच्छा आहे.. शिवाय आता तर पार्टी पण दिली आहे.. लोक हसतील.. आणि अमेरीकेला जात आहे, वाईट तर काही होणार नाही.."
खरं म्हणजे तो उडुपी होता आणि जवळचे बरेचसे काका-मामा त्या व्यवसायात असल्याने, ते सहज शक्य होतं.. पण वडलांची इच्छा होती.. आपण शिकलो नाही, निदान आपला एकुलता-एक मुलगा शिकला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे.. ही त्यांची इच्छा..
म्हणुनच त्यांनी त्याच्या लहानपणापासुन त्याला कधीच काही कमी केलं नाही.. त्याला आवडतं म्हणुन क्रिकेटचे पूर्ण सेट घेतला.. शाळेतला त्याचा जवळचा मित्र टेनिस खेळायचा म्हणुन त्याला पण टेनिसच्या कोचींगला घातलं.. कॉलेजला जायला बाईक घेतली... अभ्यासाकरता कॉम्प्युटर, पुस्तकं, क्लासेस.. वडलांनी कधीच काहीच कमी पडु दिलं नाही.. एकच ध्यास होता, आपला मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे..
शेवटी स्वत:ची इच्छा विसरुन, तो अमेरीकेला गेला.. तिकडे शिकला.. नोकरी मिळवली.. पण मन रमत नव्हतं.. CAD-CAM च्या drawings कडे रिकाम्या डोळ्यांनी बघायचा.. १० वर्ष उलटली.. कधी-कधी एक विचार यायचा,
"त्या रात्री हिम्मत करुन वडलांना सांगीतलं असतं की मला नाही अजिबात इच्छा इंजिनियर होण्यात.. मला स्वत:चं रेस्तरॉ सुरु करायचं आहे.. तर.. तर.."
**************************************
त्याच्याच बरोबर शिकणारे अजुन ४ जणं होते.. १९७८ साली जन्म झालेले.. २ इंजिनियर आणि २ कॉमर्स वाले.. त्यांची १० वर्ष जरा वेगळीच गेली..
इंजिनियर #१ ला इंजिनियरिंग पेक्षा जर्मन खूप आवडायचं... इंजिनियरींग नंतर एक वर्षभर कसं-बसं IT जॉब केला.. जर्मनची ओढ इतकी जबरदस्त होती की त्यानी युनिव्हरसिटीतुन MA - जर्मन केलं.. शिवाय Max Mueller Bhavanचे सगळे कोर्स केले.. आणि नुसतेच केले नाहीत, तर तो सगळीकडे पहिला आला.. आणि मग स्वत: जर्मन शिकवु लागला.. युनिव्हर्सिटी मधे.. MMB मधे.. सॉफ्टवेर कंपन्यांमधे... त्याचे विद्यार्थी त्याच्यावर जाम खुष होते.. त्याची शिकवायची पद्धत, बोलायची लकब - सगळंच भारी होतं..
जर्मन शिकवण्याबरोबर मित्रां बरोबर बॅन्ड मधे गिटार वाजवायची आणि गाणं म्हणायचं.. एखाद्या नाटकात काम करायचं.. एखाद्या अल्लड विषयावर डॉक्युमेन्टरी फिल्म बनवायची.. एक क्रियेटिव जिनियसच होता तो!
इंजिनियर #२ पुढचं शिकायला अमेरीकेला गेला.. MS संपवुन नोकरी मिळवली.. तब्बल ६-७ वर्ष अमेरीकेत नोकरी केली.. पण मन रमत नव्हतं.. स्वत:चा व्यवसाय करायचा होता.. ते सुद्धा भारता मधे.. शिवाय मनाला एक गोष्ट खात होती की आपण आपल्या देशाला काहीतरी देणं लागतो.. भारतात दर वर्षी डिसेंबर यात्रा व्हायची तेव्हा त्याच्या field मधल्या लोकांना भेटुन नेटवर्क करायचा की इथे परत येऊन काय करता येईल.. शिवाय एक-दोन NGO मधे जाऊन बघत होता की ते काय करतात..
Teach India Campaign आली, तेव्हा त्यानी लगेच स्वत:ला रजिस्टर केलं.. अमेरीकेतल्या नोकरीहून बिन पगारी ६ महिन्याची रजा घेतली.. आणि पोचला भारतात.. त्याच्या शहराच्या दोन municipality शाळांमधे शिकवु लागला.. त्या बरोबर स्वत:ची कंपनी रजिस्टर केली आणि एक-दोन छोटे का होईना पण सुरुवात म्हणुन प्रोजेक्ट मिळवले.. आणि ६ महिने उलटायच्या आधी अमेरीकेतल्या बॉसला कळवलं की मी परत येत नाहीये..
कॉमर्स #१ ला लहानपणापासुन निसर्गाचं वेड होतं.. रानवेडाच होता तो.. शाळा-कॉलेज मधेच त्यानी भारतातलं जंगल न जंगल फिरुन घेतलेलं.. सलीम अलीच्या 'Book of Indian Birds' पुस्तकाचा अभ्यास तर trigonometry शिकायच्या आधीच झालेला.. शिवाय वेगवेगळ्या पक्षांचे आणि प्राण्यांचे आवाज, सवयी ह्याचा अभ्यास जंगलांत फिरुन केलेला.. ताडोबा, कॉर्बेट, नागझिरा, आंदमान, मेळघाट, कान्हा, दांडेली, रणथंबोर - कुठे, कधी, काय नक्की दिसतं ह्याची माहिती स्वत:च्या डोक्यात वर्षानुवर्ष तो जोडत गेला.. सोबत उत्तम फोटोग्राफी करु लागला.. जवळपास आणि लांबचे विविध ट्रेक, किल्ले, दऱ्या-डोंगर त्यानी स्वत:च्या Nature Clubच्या माध्यमातुन गेल्या १० वर्षात किती तरी वेळा पालथ्या घातल्या.. किती तरी मुला-मुलींना निसर्गावर प्रेम करायला शिकवलं.. लहानपणी कोणत्या एका nature कॅम्पला गेल्यावर निसर्गावर जडलेलं त्याचं ते वेडं प्रेम आज त्याचं करियर झालं आहे.
कॉमर्स #२ नी बी-कॉम झाल्यावर तिच्या बाकीच्या मित्र-मैत्रीणीं सारखं CAT दिली आणि एका अतिशय चांगल्या कॉलेज मधुन MBA केलं.. MBA झाल्यावर एका प्रतिष्ठित प्रायव्हेट बॅंकेत नोकरी सुरु केली.. लग्न झालं.. नवऱ्याबरोबर मॅर्केटिंग एजन्सीचा व्यवसाय देखिल केला. पण मन काही रमत नव्हतं तिचं. काही दिवस विश्रांती घ्यायची म्हणुन करियर मधुन ब्रेक घेतला.
लहानपणापासुन कुत्र्यांचं प्रचंड वेड तिला. तिचा कुत्रा आजारी पडला म्हणुन त्याला वेटर्नरी डॉक्टर कडे घेऊन गेली. तिथे मग आवडीनी शिकायला लागली, स्वत:चा कुत्रा आजारी पडला की त्याची काळजी कशी घ्यायची. त्याचं डायट, औषधं, exercise.. हे तर झालंच.. पण एखाद्या कुत्र्याला काही इजा झाली, तर ते डॉक्टर काय बेसिक ट्रीटमेंट देतात.. ह्याचा अभ्यास देखिल तिनी केला.. आणि एक दिवस खूप जिद्दीने आणि हिम्मतीने कुत्र्यांचं एक पाळणाघर सुरु केलं.. कोणी गावी जाणार असेल, तर तिच्याकडे आपलं कुत्रं सोडुन जातं.. प्रत्येक येणाऱ्या कुत्र्याची ती सुरुवातीला एक चाचणी घेते.. त्याच्या सवयी, खाणं-पीणं, औषधं.. सगळ्याची नोंद घेते.. आणि मालक परत आले, की शक्यतो त्या कुत्र्याला पेहले से बेहतर condition मधे परत करते..
काल आमिरचा '३ idiots' मधला रांचो पाहिला..
गाणं ऐकलं.. उगीच काही लोकांची आठवण झाली..
हम सहमे से रहते कुए में,
वो नदिया में गोते लगाता,
उलटी धारा चीर के तैरता था वो..
बादल आवारा था वो,
यार हमारा था वो...
हम को तो राहें थी चलाती,
वो खुद अपनी राह बनाता,
गिरता, संभलता,
मस्ती में चलता था वो..
हम को कल की फिक्र सताती,
वो बस आज का जश्न मनाता,
हर लम्हे को खुल के जीता था वो..
कहां से आया था वो..
छू के हमारे दिल को...
बेहती हवा सा था वो..
उडती पतंग सा था वो..
मृत्यु बोलतोय (डेथ स्पीक्स)
Posted by
Monsieur K
on Wednesday, August 12, 2009
/
Comments: (8)
गेल्या शनिवारची गोष्ट.. मित्रांबरोबर ’लव आज कल’ बघायचं ठरलेलं.. शेवटच्या घटकेला एका मित्राचं मत..
"अरे.. सध्या नको जायला मल्टिप्लेक्स मधे सिनेमा बघायला.. स्वाईन फ्लुची साथ आहे.. नंतर बघु सिनेमा.."
म्हटलं बरं बाबा.. नको तर नको..
शेवटी प्रत्येक जण हवी ती काळजी घेणार.. कोणी मास्क घालणार.. कोणी दर दोन-एक तासानी हात स्वच्छ धुवुन घेणार.. कोणी हस्तांदोलन करणार नाही.. कोणी मल्टिप्लेक्स, मॉल्स अशा गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही.. शाळा, कॉलेज बंद होणार..
हे सगळं कशा करता.. तर आपल्याला स्वाईन फ्लु नको.. स्वाईन फ्लु का नको.. तर आजार नको आणि शेवटी मृत्यु नको..
मृत्यु.. प्रत्येकालाच भिती आहे त्याची.. त्या शनिवारी सिनेमाला न जाता, नेमकं ह्याच संदर्भात जेफ्री आर्चरच्या पुस्तकात एका अरबी कथा वाचली.. आणि अंगावर शहारे आले.. जेफ्री स्वत: म्हणतो, की ही कदाचित जगातली सर्वात छोटी, आणि सर्वात पूर्ण अशी कथा आहे.. ह्या कथेचा लेखक कोण आहे, कोणालाच माहित नाही..
********************************************
बघदादच्या एका शेठनी एकदा त्याच्या नोकराला बाजारातुन काही आणायला पाठवलं. थोड्या वेळानी तो नोकर परत आला - प्रचंड घाबरलेला, भेदरलेला - आणि म्हट्ला, "मालक, आता मी बाजारात गेलेलो, तेव्हा गर्दीत मला एकानी मागुन धक्का दिला. मी वळुन पाहिलं, तर माझ्या समोर साक्षात मृत्यु उभा होता. त्यानी माझ्याकडे धमकावुन पाहिलं; कृपया, मला तुमचा घोडा द्या - मी आताच्या आता हे शहर सोडुन समराला जातो, जिथे मृत्यु मला शोधु शकणार नाही."
मालकानी घाबरलेल्या आपल्या नोकराला घोडा दिला, नोकर त्यावर स्वार होऊन त्वरित निघुन गेला. मग मालक बाजारात आला - मला गर्दी मधे पाहुन, मला त्यानी विचारलं, "का रे? आज सकाळी, माझ्या नोकराला का धमकावंलंस?". मी उत्तरलो, "मी धमकावलं नाही त्याला. उलट त्याला इथे बघदाद मधे पाहुन माझं मला आश्चर्य वाटलं, कारण आज रात्री मी त्याला समराला भेटणार होतो."
English story on Jeffrey's website: http://www.jeffreyarcher.co.uk/excerpt-cut-short.htm

Euthanasia: a necessary evil? ढॅन टे नॅन!!
Posted by
Monsieur K
on Monday, August 03, 2009
/
Comments: (4)
दर वर्षी शाळेत १ ऑगस्टला टिळक पुण्यतिथी निमित्त डिबेट कॉम्पिटिशन असायची.
एकदा कधीतरी त्या स्पर्धेत विषय आला होता,
"Euthanasia: a necessary evil?".
dictionaryतुन तेव्हा आधी euthanasia शब्दाचा अर्थ शोधलेला.
त्यावेळी इंटरनेट किंवा गुगल नव्हतं.. आईनी दादरहून एक सेकंड-हॅन्ड निबंधांचं जाडं-जुडं पुस्तक आणलेलं, त्यात बऱ्याच विषयांवर लिहिलेलं होतं.. त्यात सुद्धा ह्या विषयावर काही होतं की नाही, आठवत नाही.. (ते पुस्तक अजुन असायला पाहिजे कुठल्यातरी कपाटात - शोधलं पाहिजे...)
euthanasia म्हणजे दया-मरण ह्यावर २-५ मिनिटं काय बोललो होतो.. काहीच आठवत नाही आता..
काय मुद्दे होते.. एक सोपं होतं तेव्हा.. शाळेतल्या शिक्षिका सरळ सांगायच्या की तुमच्या टीमनी कोणती बाजु मांडायची..
त्यामुळे असा एखादा controversial टॉपिक मिळाला, तर आपण कोणती बाजु घ्यायची हे आपण नाहीच ठरवायचं.. दुसऱ्यानी तो निर्णय आपल्या करता घ्यायचा, आणि आपण मग आपली बाजु मांडताना त्याचे समर्थन करणारे मुद्दे, घटना, उदाहरणं शोधायची आणि व्यवस्थित समोर प्रस्तुत करायची..
आमची टीम for euthanasia बोलली होती असं अस्पष्ट आठवतं (or so i would like to believe now)..
आज गार्डियनच्या एडिटोरियल मधे नमुद झालेले मुद्दे तेव्हा १३-१४ ह्या वयात झेपले होते का.. प्रियंभाषिणीने सुद्धा किती मुद्देसुद लिहिलं आहे..
एक बातमी वाचतो आपण.. त्या मागची डेबी आणि ओमरची गोष्ट सुद्धा झळकते वर्तमानपत्रात..
ते वाचल्यावर स्वत: काहीतरी वेगळंच रिलेट करतो आपण.. शाळेत १६-१७ वर्षांपुर्वी झालेली कोण एक डिबेट कॉम्पिटिशन..
पण God forbid, उद्या आपलं कोणी जर डेबीच्या जागी असेल... किंवा आपणंच असलो, तर??
अंगावर काटा येतो..
आजच्या दिवसाचा विचार करायचा कोटा इथेच संपतो.. विशाल भारद्वाज आणि गुल्ज़ारला पुन्हा एकदा मोठ्ठ्यानी धन्यवाद देत, ओरडत बसतो,
आजा की one-way हैं यह ज़िंदगी की गली,
एक ही chance हैं,
आगे हवा ही हवा हैं, अगर सांस हैं तो,
यह romance हैं!
यही कहते हैं, यही सुनते हैं,
जो भी जाता हैं, जाता हैं,
वो फिर से आता नहीं!
आजा, आजा दिल निचोडे, रात की मटकी तोडे,
कोई good luck निकाले, आज गुल्लक तो फोडे!
हैं तिल, तिल, ताल मेरा तेली का तेल,
हैं कौडी, कौडी, पैसा, पैसा पैसे का खेल
चल चल सडको पे होगी ढॅन टॅन!
ढॅन टे नॅन!!
"We can live our lives. We don't have to plan my death.
I think people are beginning to realise it's not a right to die, it's a right to live, and a right to live with dignity, and with choice, and to know what your choices are."
~Debbie Purdy
डेबी खुष.. मी पण खुष.. डिबेट संपलं..

मैं तेणु फिर मिलां गी
Posted by
Monsieur K
on Saturday, July 25, 2009
/
Comments: (16)
खूप शतकांपुर्वी मला जास्वंदी आणि प्रिया कडुन आवडत्या कविता इथे टिपायला टपली मिळाली होती.
कविता माझा प्रांत नाही.. कळत तर नाहीच नाही.. आणि इथे एखादी कविता टाकायची म्हणुन वाचावी, असं पण काही केलं नाही..
गेल्या आठवड्यात वाढदिवसानिमित्त धनंजयनी अमृता प्रितम, ह्या पंजाबी कवियत्रीची एक कविता पाठवली.
अर्थात तिच्या इंग्रजी अनुवादासकट. ती कविता मराठी मधे शब्दश: लिहित आहे.. चु.भु.द्या.घ्या..
यु ट्युब वर गुल्ज़ारनी हीच कविता वाचली आहे.
ती इथे ऐका.
मी तुला परत भेटेन
कुठे? कसं? माहित नाही
कदाचित तुझ्या कल्पनेच्या एका छटेतुन
मी तुझ्या कॅन्वस वर उतरेन
तुझ्या कॅन्वसवरच्या एका रहस्यमय रेषेतुन
तुझ्याकडे शांतपणे एकटक पाहत राहिन मी...
कदाचित सूर्याच्या एखाद्या किरणाचं रूप घेऊन
तुझ्या रंगांमध्ये घुलुन जाईन
किंवा तुझ्या रंगात मिसळुन
तुझ्या कॅन्वसशी एकरुप होईन मी
माहित नाही कसं? कुठे?
पण तुला नक्की भेटेन मी
कदाचित मी एका झऱ्याचं रुप घेऊन
तुझ्या अंगावर पाण्याचे थेंब शिंपडेन
हळुच माझा गारवा
तुझ्या गरम छातीवर विसावेन
मला अजुन काही माहित नाही
पण मी इतकं जाणते
की माझं आयुष्य असंच
माझ्या बरोबर चालत राहणार
हे आयुष्य एक दिवस संपेल
सगळंच संपेल
पण माझ्या आठवणींचे धागे विणले आहेत अतुट कणांनी
तेच कण पुन्हा वेचुन
मी ते धागे पुन्हा विणेन
आणि मग पुन्हा तुला मी भेटेन..
***************************************
मैं तेणु फिर मिलां गी
किथे? किस तरह? पता नहीं
शायद तेरे तखायुल दी चिनाग बन के
तेरे कॅन्वस ते उतरां गी
या खोवरे तेरे कॅन्वस दे उते
इक रहसमयी लकीर बन के
खामोश तेणु तक दी रवां गी
या खोवरे सूरज दी लू बन के
तेरे रंगान वीच घुलां गी
या रंगान दियां बहवां वीच बैठ के
तेरे कॅन्वस णू वलां गी
पता नहीं किस तरह? किथे?
पर तेणु ज़रूर मिलां गी
या खोवरे इक चश्मा बनी होवां गी
ते जीवन झरनेयां दा पानी उडदा
मैं पानी दीयां बूंदां
तेरे पिंडे ते मलां गी
ते इक ठंडक जाही बन के
तेरी छाती दे णाल लगां गी
मैं और कुछ नहीं जाणदी
पर एना जाणदी
के वक्त जो वी करे गा
ए जनम मैरे णाल तुरे गा
ए जिस्म मुकदा हैं
ते सब कुछ मुक जाणदा
पर छैत्यां दे धागे
कायनाती काणा दे हुंदे
मैं ओन्हां काणा नु छुनां गी
धागेयां नु वालां गी
ते तेणु मैं फिर मिलां गी...

Into The Wild
Posted by
Monsieur K
on Sunday, March 15, 2009
/
Comments: (19)

२४ वर्षांचा क्रिस.. अलास्काच्या जंगलात एका abandoned बस मध्ये स्वत:चे शेवटचे क्षण मोजत होता.. आयुष्यात काही तरी वेगळं हवं म्हणुन घर सोडलेलं त्यानी.. कॉलेज मध्ये अतिशय हुषार आणि खेळात प्राविण्य मिळवलेलं.. पण सगळं सोडुन दिलं.. शिक्षणाकरता घरुन मिळलेले $२४०००, देणगी म्हणुन देऊन टाकले.. आणि स्वत:च्याच एका प्रवासावर निघाला..
आरिज़ोना, कोलोरॅडो, कॅलिफोर्निया.. अशा विविध राज्यातुन तो त्याला हव्या त्या अलास्का पर्यंत पोचला.. रस्त्यामध्ये मिळेल ते काम... भेटतील ती लोकं.. येतील ते प्रसंग... ह्या सगळ्यांना सामोरं गेला..
फ्रान्ज नावाचा म्हातारा भेटलेला.. त्यानी क्रिसला विचारलं.. की तु हुषार दिसतोस.. आणि वयानी २३-२४... ह्या वयात तु अजुन शिकलं पाहिजे.. नोकरी-करियर केलं पाहिजेस.. का असं स्वत:चं आयुष्य वाया घालवतोयस.. त्यावर क्रिसचं उत्तर:
"Mr. Franz I think careers are a 20th century invention and I don't want one."
सगळ्या जगापासुन दूर.. लोकांपासुन लांब.. उंच डोंगरावरुन लांब वसलेलं एखादं शहर किती सुंदर दिसतं हे लांबुनच पहायचं.. जंगलात एकटं राहणं.. स्वत: जवळ दिशा दाखवणारा कंपास किंवा त्या प्रदेशाचा एखादा नक्षा देखिल नाही.. शिकार करुन स्वत:चं पोट भरायचं.. शिकार जमली नाही की रानात उगणारी झाडं, वनस्पती खायची..स्वत:ला आवडणारी काही पुस्तकं वाचायची.. डायरी मधे स्वत:चे विचार लिहायचे... एकटंच स्वत:शी संभाषण करायचं.. माणसांशी संपर्क सोडुन निसर्गाशी जवळीक केलेली.. का करावंसं वाटलं असेल..
जगातल्या materialism, नाते-संबंध, रूढी-परंपरा ह्या सगळ्यांचा इतका वीट आला होता त्याला.. आणि जंगलात एकटा राहुन काय शोधत होता... जे पाहिजे होतं, ते मिळालं का.. का शेवटी स्वत:ला फार एकाकी वाटलं म्हणुनच त्याचे ते शब्द:
"Happiness only real when shared."
शेवटची नोंद म्हणुन डायरी मध्ये त्यानी "Wise Men In Their Bad Hours" नावाच्या एका कवितेच्या काही ओळी टिपल्या:
- Death's a fierce meadowlark: but to die having made
- Something more equal to centuries
- Than muscle and bone, is mostly to shed weakness.
- The mountains are dead stone, the people
- Admire or hate their stature, their insolent quietness,
- The mountains are not softened or troubled
- And a few dead men's thoughts have the same temper.
बस मध्ये स्लिपिंग बॅग मध्ये त्याचा मृतदेह २ आठवड्यांनंतर मिळाला...
सिनेमाचं पहिलं टायटल कार्ड:
There is a pleasure in the pathless woods,
There is a rapture on the lonely shore,
There is society, where none intrudes,
By the deep sea, and music in its roar;
I love not man the less, but Nature more...
- Lord Byron
माणसापेक्षा सृष्टीच काही जणांना जास्ती आवडते...
~ "Into The Wild", a 2007 movie based on the real life character of Christopher Johnson Mccandless, directed by Sean Penn - this year's Oscar winner for Best Actor.
References:
http://www.imdb.com/title/tt0758758/
http://en.wikipedia.org/wiki/Christopher_McCandless
The picture is a self-portrait found undeveloped in his camera at the time of his death.
Christopher Johnson Mccandless
Born: February 12, 1968
Died: August 18, 1992 (aged 24)
One Life To Ride.. आणि बरंच काही..
Posted by
Monsieur K
on Friday, February 13, 2009
/
Comments: (12)
गेल्या रविवारी सवयी प्रमाणे नविन महिन्याची खरेदी म्हणुन दोन नविन पुस्तकं घेतली.
एक म्हणजे अरुणाचल प्रदेशचे पहिले गव्हर्नर श्री प्रधान ह्यांनी लिहिलेलं "Dragon's Shadow Over Arunachal" हे पुस्तक घेतलं.
एक दिवस सहज विचार करता-करता लक्षात आलं की भारतात गेल्या काही वर्षात बऱ्यापैकी फिरलो असलो तरी एका भागात मी अजिबात गेलो नाही तो म्हणजे ईशान्य भारत.. आसाम, मेघालय, अरुणाचल, ई... खरं म्हणजे ह्या भागाची जास्ती माहिती पण नाही.. अरुणाचलचा प्रश्न ऐकुन माहिती होता... पुस्तक दिसलं तेव्हा म्हटलं.. चला.. घेऊन टाकु.. तितकीच जरा जास्ती माहिती होईल..
भीती एकच आहे.. की आधी घेतलेल्या आणि न वाचलेल्या किंवा अपूर्ण वाचलेल्या पुस्तकांमधे हे पण नको जायला.. असो!
दुसरं पुस्तक घेतलं ते म्हणजे अजित हरीसिंघानी ह्यांचं "One Life To Ride".
अजित हे पुण्यात राहणारे एक स्पीच थेरपिस्ट.. सुमारे ४.५ वर्षांपूर्वी जून-जुलै २००४ साली त्यांनी पुणे ते लेह, आणि तिथुन पुढे खारडुंगला, श्रीनगर आणि शेवटी जम्मु अशी फक्त ४३०० कि.मी. ची ट्रिप त्यांच्या लाडक्या एनफिल्ड मोटरसायकलवरुन एकट्यानी केली!! तेव्हा त्यांच वय होतं फक्त ५४ वर्षांचं!!
रविवारी पुस्तक वाचायला सुरु केलं... आणि त्यांचं प्रवास वर्णन वाचताना मलाच खूप जास्ती excitement, उत्कंठा होत होती.. बऱ्याच दिवसांनी एखादं पुस्तक मला पहिल्या वाचनात (sitting) संपवावंसं वाटत होतं.. शेवटी ते तीन दिवसात संपवलं ती वेगळी गोष्ट..
एकट्यानी प्रवास करताना भेटलेले वेगवेगळे लोकं.. मनात आलेले चित्र-विचित्र विचार.. कधी वाटलेली भीती.. कितीतरी वेळा होणारा आनंद..लडाख ह्या अतिसुंदर प्रदेशाचं वर्णन... आणि मीना ह्या स्वत:च्या मोटारसायकलीवरचं जीवापाड प्रेम..
खरं म्हणजे अगदी साध्या सोप्या स्टाईल मधे लिहिलं आहे त्यांनी पुस्तक.. खूप भन्नाट असं काही नाही.. पण जे घडलं, जे डोक्यात आलं.. ते मस्त प्रामाणिकपणे लिहिलं आहे..
पुस्तक वाचताना मलाच खूप गोष्टी आठवल्या..
शंतनुनी मागच्या वर्षी केलेली लडाखची सायक्लिंग ट्रिप... गेल्या वर्षी जुलै की ऑगस्ट मधे गेला होता तो.. मे महिन्यात टेकडीवर भेटलेला तेव्हा तयारी चालु होती त्याची..
त्या ट्रिपचे फोटो मी आता कधीतरी इतक्यातच पाहिले.. एकदम भारी वाटलं ते फोटो पाहुन..
आणि काल परत टीव्हीवर चार युरोपियन मित्रांची लडाखचीच सायक्लिंग ट्रिप दाखवत होते, ते बघितलं..
मनात आलं ह्या ठिकाणी जायलाच पाहिजे आपण.. ते सुद्धा सायकल वर.. लगेच गुगलवर शोधलं.. तेव्हा हे सापडलं..
http://www.sunholidays.co.in/biking/manali-to-leh-on-cycle.html
मनाली ते लेह हा ४७५ कि.मी.चा रस्ता आहे.. जगातल्या सर्वाधिक उंच अशा रस्त्यांपैकी एक..
अवघड दिसतय सॉलिड.. खरं म्हणजे डॉन स्टाईलमधे म्हणायचं झालं, तर मनाली ते लेह ही सायक्लिंग ट्रिप, मुश्किल ही नही, नामुमकिन हैं...
म्हणजे माझ्या करता.. ओर्कुटच्या भाषेत बोलायचं तर मी म्हणजे 'a few extra pounds'... आणि शंतनु किंवा ते चौघं युरोपियन लोकं म्हणजे 'athletic build' किंव 'slim build'... आणि मी मुळात आळशी... ह्या ट्रिपच्या आधी लागणारी ट्रेनिंग, प्रॅक्टिस.. discipline, rigour... आमच्या राजेशाही आळसाला कसं चालणार, माहित नाही..
म्हणजे गेल्या वर्षी शंतनुनी स्वत: ३-४ महिने ट्रेनींग केलेलं.. शिवाय तो नेहमी ट्रेकिंग करणारा आहे... एव्हरेस्ट बेस कॅम्पचा अवघड ट्रेक करुन आला आहे.. मागच्याच वीकेंडला पुण्यात झालेल्या Enduro3 ह्या adventure रेस मधे त्याला पहिलं बक्षिस देखिल मिळालं... हे सगळं नोकरी बरोबर कसं काय करतो, गंमत आहे.. म्हणजे Enduro3 संपवुन साहेब दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या कामा निमित्त USला गेले लगेच!
तो परत आला की त्याला भेटुन विचारायचं आहे... म्हणजे मग सायक्लिंग ट्रिपची तयारी सुरु करता येईल! :)
शेवटी मुश्किल किंवा नामुमकिन आता पासुनच का म्हणायचं?
अजितनी त्यांच्या पुस्तकात JRD Tata ह्यांचं एक वक्तव्य लिहिलं आहे,
"Friends who tell me it is ridiculous and foolhardy for an octogenarian to ski, fly a plane or drive fast cars, do not understand the thrill and sense of self-fulfillment obtained from living a little dangerously".
वयाची ऐंशी उलटलेल्या टाटांनी विमान चालवलेलं तेव्हा मित्रांनी वेड्यात काढलेलं त्यांना.. पण शेवटी थोडंसं dangerous जगण्यातच जे थ्रिल आहे, जी मजा आहे... ती त्या मित्रांना कशी कळणार...
आमचं तर तीस हे गोजिरवाणं वय!! प्रयत्न करायला तरी काहीच हरकत नाही!!
बचेंगे तो और भी लढेंगे!!
पुस्तक वाचताना, माझ्या आणि DJच्या VoF ट्रिपची पण आठवण झाली... ट्रिप बद्दल तर मी आधी लिहिलेलं आहेच.. शेवटच्या दोन दिवसांबद्दल लिहायचं राहिलेलं.. तो लिहायाचा एन्थु आला.. म्हणुन मग आता तेच लिहुन टाकतो..
VoF ट्रिप: Final Part
दिवस ६: गुरुवार, २८/८/०८
घांगरिया -> गोविंदघाट -> जोशीमठ -> पिपलकोटी -> चमोली -> श्रीनगर
पहाटे उठलो तेव्हा आमचा आम्हालाच विश्वास बसत नव्हता. इतकी सुंदर फुलों की घाटी पाहिलेली.. हेमकुंडचा ट्रेक केलेला.. पाऊस आणि थंडीचा खरं म्हणजे जबरदस्त कंटाळा आलेला.. दुसरं म्हणजे रविवार पासुन जगाशी संपर्कच तुटला होता.. फोन, न्युज, इंटरनेट, ई-मेल, वीज... ह्यापासुन वंचित राहिलेलो.. एका अर्थी चांगलं, पण तरी आपल्याला इतकी सवय झाली असते ह्या सगळ्यांची...
आम्ही गोविंदघाटहून सोमवारी आलेलो, तेव्हाच्या राजिंदर कूलीनी आम्हाला दुसरा एक कूली आणुन दिला.. नेपाळी होता.. बहादुर नाव होतं कदाचित.. पायात काळे प्लॅस्टिकचे पावसाळी बूट.. चेहऱ्यावर सुरकुत्या.. बारीक डोळे.. डोक्यावर टोपी.. अंगात स्वेटर.. आणि पाठीवर वेताची ती बास्केट.. बास्केट मधे आमच्या दोघांच्या बॅग्स टाकुन, साहेब खाली उतरायला तयार..
सकाळचे ६-६.१५ वाजलेले.. शेवटचं एकदा घांघरिया पोटभर पाहिलेलं.. त्याच्या आजुबाजुचे ते पहाड पुन्हा एकदा डोळे भरुन पाहिलेले.. DJ फोटो काढत-काढत खाली उतरत होता.. आणि बहादुरच्या पायात चाकं बसवलेली.. म्हणुन मग मी त्याच्या बरोबर रहायचा प्रयत्न केला.. अशक्य माणुस होता हा!!! पाठीवर वजन असुन, इतक्या चपळाईने उतरत होता.. उतरताना, बऱ्याच ठिकाणी लांब रस्त्या ऐवजी जर एखादं steep शॉर्ट-कट रस्ता असेल, तर तो त्या रस्त्यानी उतरायचा.. मी एक-दोन ठिकाणी त्यानी घेतलेला शॉर्ट-कट घेतलेला, आणि फाटलेली माझी!! गेल्या दोन-चार दिवसात पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी निसरडं झालेलं.. पण तो अत्यंत सफाईने उतरत होता.. अगदी तुरु-तुरु म्हणतात तसं!
DJला सांगीतलेलं की मधे रस्त्यात एका ठिकाणी भेटु.. १३ कि.मी. उतरायचं... जितकं जमेल, तेवढं बरोबर उतरलेलं बरं.. तसं त्याच्या बरोबर आम्हाला आदल्या दिवशी हेमकुंडला जाताना भेटलेला मुंबईचाच एक शीख माणुस होता... आणि माझ्या बरोबर बहादुर.. खरं म्हणजे बहादुर बरोबर मी!!
पण बहादुरच्या स्पीड पुढे मी हात टेकले!
पहिले तीन कि.मी. आम्ही निव्वळ अर्ध्या तासात उतरलेलो.. शेजारुन वाहणारी लक्ष्मणगंगा ओलांडायला तिथे एक छोटा पूल आहे.. आणि नदीच्या शेजारी एक छोटा ढाबा आहे.. DJला तिथे भेटायचं ठरलं होतं... म्हणुन मग मी आणि बहादुर तिथे थांबलो.. सकाळचे ६.४५-७ वाजत आले होते.. बहादुरनी पाठीवरची त्याची बास्केट खाली ठेवली.. दोन्ही पाय दुमडुन, तो बसला.. विडी पेटवली आणि वाट बघत बसला.. मी त्या खळखळणाऱ्या पाण्याच्या बाजुच्या मोठ्या दगडावर बसलो.. समोर एक राखाडी-ब्रॉऊन रंगाची अतिशय सुंदर पक्षांची जोडी त्या सकाळच्या गारव्या मधे छानपैकी पकडापकडी खेळत होती.. ती इकडुन, तिकडे अशी सारखी तिची जागा बदलत होती.. आणि तो तिच्या मागे तिला मनवायला बघत होता.. का पक्षां मधे उलटं असतं.. तो उडत होता इकडे-तिकडे.. आणि ती त्याचा पाठलाग करत होती.. माहित नाही.. त्यांचा खेळ पाहुन खूप खूष झालो, हे मात्र खरं!
स्वत:च्या लहरीत वाहणारी ती गार वाऱ्याची झुळुक.. तिच्या नखऱ्यावर सळसळणारी ती झाडांची पानं.. अतिशय वेगानी वाहणाऱ्या पाण्याच्या कडेला उभे राहिलेले ते मोठ-मोठे पांढरे खडक.. आणि ह्या सगळ्यांना शांत करणारा पाण्याचा तो आवाज (deafening roar)..
डोळे बंद करुन.. i tried to soak in everything, as much as i could.. इतकं शांत.. इतकं रम्य.. the heart lost in its own dreamy world..
हवा का झोंका हैं या तुम्हारे बदन की खुशबू
यह पत्तीयों की हैं सरसराहट के तुमने चुपके से कुछ कहा हैं
यह सोचता हूँ मैं कब से गुमसुम
के जब की मुझको भी यह खबर हैं
के तुम नहीं हो, कहीं नहीं हो
मगर यह दिल हैं के कह रहा हैं
के तुम यहीं हो, यहीं कहीं हो...
DJ आणि सरदारजी आले, तेव्हा मी आणि बहादुर पण निघालो.. ६-७ कि.मी. अंतर कापल्यावर एका ढाब्यावर आम्ही दोघं नाश्त्या करता थांबलो.. दौलत ढाबा.. पुण्यातल्या दौलत ढाब्याची आठवण आलेली..
ढाब्याचा मालक दौलत सिंह.. सॉलिड गप्पा मारणारा माणुस.. ही मंडळी मस्त मस्त गोष्टी सांगतात.. आलु पराठा बरोबर अमुल बटर, आणि फक्कड चहा.. ह्या बरोबर दौलत सिंह आम्हाला गोष्टी सांगत होता.. कोणा एका सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा इथे ट्रेकिंग करताना मरण पावला.. वादीच्या बर्फात त्याचं शव देखिल सापडत नव्हत म्हणुन त्या अधिकाऱ्यानी हेमकुंडला मन्नत मागितली.. आणि शेवटी त्या मुलाचं शव सापडलं.. ही पहिली गोष्ट... त्याचा हवा तो dramatic effect मिळाल्यावर मग.. कोणाला मूल होत नव्हतं.. इथे येऊन हेमकुंड मधे स्नान केलं.. आणि मग मूल प्राप्त झालं (इतके दिवस मूल कसं प्राप्त होतं.. ही माझी कॉन्सेप्ट किती गंडलेली होती..)..इतर असे किस्से त्यानी सांगितले..
दौलत सिंह खाली जोशीमठ मधे राहणारा.. वर्षातले जून ते सप्टेंबर असे ३-४ महिनेच लोकं इथे येतात.. तेवढे ३-४ महिनेच तो इकडे राहतो.. मग ह्या ढाब्याचं काय करतो, विचारल्यावर त्यानी सांगितलं...
ढाब्याचे ८-१० लाकडी खांब जमिनीमधे लावलेले आहेत, ते तसेच ठेवायचे.. वरचे पत्रे काढुन घ्यायचे.. भांडी-कुंडी खाली स्वत: बरोबर घेऊन जातो.. पत्रे आणि बाकीचं सामान बांधुन तिथेच एका कोपऱ्यात ठेऊन देतो.. त्या ७-८ महिन्यात इतका बर्फ असतो की ते चोरीला कोणी घेऊन जायची भीती नसते.. जूनच्या सुरुवातीला परत येऊन.. पुन्हा ढाबा उभा करतात.. आणि चूल पेटवतात..
आणि सामग्री? मॅगी, कोल्ड-ड्रिंक्स, इ. तयार वस्तु - साधारण १० हजाराचा माल - खालुन जोशीमठ मधुन credit वर घोड्यावरुन आणतो... साधरण १०-१५ दिवस पुरतं ते सामान.. मग परत खाली जाऊन आधीच्या सामानाचे पैसे देऊन नविन सामान परत उधारीवर आणतो.. दिवस चांगले असले की कधी कधी एका महिन्याच्या आतच एक-सव्वा लाखाच्या सामानाची उलाढाल होते.. तर कधी महिन्याला २०-२५ हजारच.. कधी कधी परदेशी प्रवासी येतात, ते भरभरुन पैसे देतात.. शेवटी सगळी वाहे गुरुंची कॄपा!!
दौलत सिंहचा निरोप घेऊन मी आणि बहादुर पुन्हा खाली उतरु लागलो.. उतरताना खरं म्हणजे मजा येत होती.. सहज, उड्या मारत, धावत-पळत उतरत होतो.. सूर्य उजाडलेला.. आणि त्याची किरणं धुक्यातुन समोरच्या डोंग्रांवर पडु लागलेली.. विचार यायचा की DJला सांगावं की हा फोटो काढ.. तो फोटो काढ.. waiting for him was not possible, given that Bahadur was running away as fast as he could.. शेवटी माझा मीच ते न्याहळत खाली उतरत होतो..
अशाच एका ठिकाणी ते झाड दिसलेलं.. नदीच्या पात्रात मधोमध एकटं उभं होतं.. उंचच्या उंच.. ना एखादी फांदी.. ना एखादं पान..त्याच्या पायाशी नदीचं पाणी फेसाळत येऊन आपटत होतं.. वर टोकाशी धुक्यात सोनेरी किरणांमध्ये न्हात होतं.. समोरच्या पहाडापुढे ते झाड इवलंसंच.. पण दिमाखात उभं होतं.. आणि अशा वेळेस एक काळा पक्षी येऊन त्याच्या डोक्यावर बसला.. पंख उघडुन आकाशाकडे बघत होता.. अगदी हलकं-हलकं वाटलं असेल त्याला..
i stood there mesmerised.. for the first time in my life, identifying myself with a tree..
खाली गोविंदघाटला पोचलो, तेव्हा सकाळचे ९.३० वाजलेले.. निव्वळ ३-३.१५ तासात आम्ही १३ कि.मी. उतरलेलो.. DJ पण आमच्या पाठोपाठ लगेच आला..
आता पुढे काय करायचं.. सर्व प्रथम म्हणजे एका हॉटेल मधे जाऊन गरम पाण्यानी मस्त आंघोळ केली.. एकदम छान वाटलं.. मग DJ म्हटला.. की इथुन बद्रीनाथ फक्त २२ कि.मी आहे... तर गाडी पकडु आणि तिथे जाऊन येऊ.. म्हणुन आम्ही गाडी करता थांबलो.. घांघरियाला आदल्या दिवशी संध्याकाळी खूप लोकं एकदम आलेले.. तेव्हा त्यांच्या कडुन कळलेलं की खाली रस्त्यात कुठेतरी लॅन्डस्लाईड झालली म्हणुन १-२ दिवस सगळं रखडलेलं.. त्यामुळे खाली जायच्या ऐवजी आणखिन वर बद्रीनाथला जायचं, म्हणजे रिस्क!! ती घ्यायची का नाही.. शेवटी १.०० वाजला तरी आम्हाला बद्रिनाथला जाणारी एकही गाडी मिळाली नाही.. म्हणुन देवाला तिथुनच नमस्कार करुन.. आम्ही जोशीमठची गाडी पकडली.. ह्या वेळेस जीप मधे DJला समोरची सीट मिळाली.. आणि मला एकदम मागची.. जीप असल्यामुळे मागे फक्त एक आडवं दार होतं, बिना खिडकीचं..
रस्ता अरुंद.. आणि ड्राईव्हरला त्या रस्त्याचा इंच न इंच माहित होता.. पहाडी रस्त्यावर 'right of way' नेहमी वर चढणाऱ्या गाडीचा असतो.. खाली उतरणाऱ्या गाडीनी समोरच्या गाडीला वाट द्यायची असते.. असा अलिखित नियम असतो..
तर अशा वेळेस.. आमची गाडी खाली उतरताना, समोरुन एक गाडी आली.. रस्ता अरुंद म्हणुन आमचा ड्राईव्हर आमची गाडी रिव्हर्स घ्यायला लागला.. ते सुद्धा रस्त्याच्या कडेच्या बाजुला.. जस-जसं कडा जवळ येऊ लागला, तसं मला सुमारे ४००-५०० फूट खाली वाहणारी लक्ष्मणगंगा दिसु लागली.. ती कितीही सुंदर असली तरी तिला मला भेटायची अजिबात इच्छा नव्हती.. आणि अगदी ४-५ इंच आधीच तो थांबला तेव्हा मी सुटकेचा नि:श्वास टाकला..
जोशीमठला पोचलो.. तेव्हा DJ तिकडच्या रेल्वे बुकिंग मध्ये आमचं हरिद्वार ते दिल्लीचं ट्रेनचं बुकिंग करायला गेला.. हो.. मी फक्त जायचं बुकिंग केलं होतं.. परत यायचं ऑपशन ओपन ठेवलेलं :)))
मी जोशीमठहून पुढे जाणारी सुमो/जीप कुठे मिळेल ते बघायला गेलो.. दुपारचे २-२.३० वाजत आले होते.. रात्री त्या भागात गाड्या चालवत नाहीत.. त्यामुळे अंधार पडायच्या आत आम्हाला ॠषिकेष/हरिद्वारच्या जितकं जवळ पोचता येईल, तितकं बघायचं होतं..
जोशीमठ वरुन एकही गाडी खाली जायला तयार नव्हती.. कारण मध्ये रस्त्यात पिपलकोटी ह्या गावाच्या अलिकडे लॅन्डस्लाईड झाला होता.. त्यामुळे सुमोवाला म्हट्ला.. तुम्हीच सीट्स गोळा करुन आणा.. शिवाय रेट वाढवलेला, त्यामुळे स्थानिक लोकं तयार नव्हते जास्ती भाडं द्यायला.. आता काय करा???
भगवान उपर से देख रहा था.. नेमकं तिथेच एक ५ जणांचा ट्रेकिंग ग्रुप भेटला.. तो सुद्धा मराठी!!! सगळे मुंबई-पुण्याचे!! त्यातले चौघं तिशीतले.. आणि एक २८-२९ वर्षांचा असावा.. त्याचं नाव मन्या.. म्हणजे मनिष असावं.. पण त्याला सगळे मन्या म्हणत होते.. ग्रुपचा लिडर होता जॅकी श्रॉफ.. म्हणजे जॅकी सारखा दिसायला.. डोळ्यांवर गॉगल.. लांब केस.. मिशी... अंगात ट्रॅक सुट.. आणि बोलताना "भिडु-भिडु" म्हणणारा.. "क्या भिडु.. काय करायचं.. घ्यायची का सुमो? आम्ही ५ जणं आहोत.. तुम्ही दोघं.. अख्खी गाडी बुक करु.. म्हणजे आरामात बसता येईल आपल्याला सगळ्यांना.. नाही तर तो @#$&% १० सीट्स बसवेल.. क्या बोलता हैं भिडु?"
मी लगेच तयार.. DJ पण खुष.. we had trekked @55km in three and a half days.. आम्ही इतके दमलो होतो.. की पुढचा प्रवास आम्हाला खरंच पुन्हा १० लोकांबरोबर एका सुमोमध्ये कोंबुन करायचा नव्हता...
क्रमश:
~ Earlier posts about the VoF trip are posted here
http://asach-aapla.blogspot.com/2008_09_01_archive.html

अश्रू
Posted by
Monsieur K
on Tuesday, February 03, 2009
/
Comments: (9)
तो जगजेत्ता.. एक अद्वितिय विजेता.. एखाद्याच काळाचा किंवा एखाद्याच जागेचा नाही.. तर जिथे, जेव्हा जाईल.. तेव्हा सिकंदर सारखा तो मुलुख जिंकुनच येणारा तो.. सिकंदरच तो.. दिसायला राजबिंडा.. भूतपूर्व विजेत्यांचा मान राखणारा.. परंपरा आणि रिती-रिवाज ह्यांना नेहमी अनुसरुन वागणारा..
इतिहासात त्याच्या सारखे फारच कमी.. खरं म्हणजे त्याच्या सारखं कोणीच नाही..
त्याच्याकडे पाहिलं की अशक्य असं काहीच नाही असं वाटायचं..
स्वप्न पहायला त्यानीच शिकवलं.. आपल्याला जे मिळवायचं आहे, ते कसं हे त्यानीच दाखवलं..
कष्ट करताना वेदनेच्या ऐवजी काय मजा असते.. त्याच्या जोडीला येणारा अढळ आत्मविश्वास..
एखादं अवघड ध्येय गाठल्यावर देखिल कसं नम्र रहायचं..
स्वत:वर पण एवढा विश्वास नाही, इतका विश्वास त्याच्यावर माझा..
कधीच न हरणारा तो.. गेल्या जून मधे रोलॅन्ड गॅरॉस वर सलग तिसऱ्या वर्षी त्याच नडाल कडुन हरला.. नुसता हरला नाही, तर ६-० असा बेगल पचवावा लागला.. आणि ही नामुष्की कमी, तर लगेच जुलै मधे नडालनी त्याच्या कडुन त्याचं सगळ्यात लाडकं विम्बल्डन हिस्कावुन घेतलेलं... ७ तास टिव्ही समोर बसलेलो.. कोर्टवर पाऊस-ऊन, उजेड-अंधार यांचा लपंडाव.. क्षणोक्षणी छातीची होणारी धडधड.. नुसतं बघणाऱ्याला एवढं टेन्शन.. तर त्याचं काय झालं असेल..
स्वत:च्या अपेक्षा.. स्वत:ची स्वप्नं... स्वत:च मनानी ठरवलेलं एक असाध्य पण स्वत:ला चॅलेंज करणारं लक्ष्य..
सगळंच किती हवंहवंसं असतं ना आपल्याला... किती धडपड करतो ना आपण त्या करता..
पडतील तेवढ्या कष्टाची तयारी असते..
जिद्द आणि आत्मविश्वासाची परीक्षा...
आणि ते साध्य नाही झालं.. की वाईट वाटणं साहजिकच..
शेवटी तो देखिल मनुष्यच आहे..
पण फरक आहे.. तुमच्या किंवा माझ्या सारखा नक्कीच नाही..
म्हणुनच अश्रू लपवु शकला नाही मेलबर्नला..
मी पण रडलेलो त्या दिवशी.. मनापासुन.. अगदी अव्याहत..
त्याच्याबरोबर रडलेलो.. एकटा नव्हता तो.. शेवटी वेगळाच ना तो.. तुमच्या-माझ्यापेक्षा..

“I love this game. It means the world to me, so it hurts when you lose".
~Roger Federer, Melbourne, February 1, 2009
p.s. Bobilli Vijay Kumar has captured the emotions, the rivalry, the fall of Federer and the rise of Nadal, quite succintly in his article about the AO final match report in yesterday's TOI - The fall.. and rise of a hero